Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य मुलांमधील पिनकृमी: कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध

मुलांमधील पिनकृमी: कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध

मुलांमधील पिनकृमी: कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध

पिनकृमीचा संसर्ग शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये अगदी सामान्यपणे आढळतो आणि हा संसर्ग एका मुलापासून दुसऱ्या मुलापर्यंत अगदी सहज पसरू शकतो. घरातील प्रौढ व्यक्ती पिनकृमीच्या अंड्यांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या पर्यंत हा संसर्ग पोहोचू शकतो. योग्य काळजी घेतल्यास आणि स्वच्छता राखल्यास तुम्ही या कृमींना आणखी पसरण्यापासून रोखू शकता आणि तुमच्या मुलाचा त्रास तुम्ही कमी करू शकता. मुलांच्या पालकांना, पिनवर्म संसर्ग, त्याची कारणे, लक्षणे, उपचार इत्यादींबद्दल अधिक माहिती देणे हा ह्या लेखाचा उद्देश आहे.

पिनकृमी म्हणजे काय?

पिनकृमी हे छोटे जंत असतात आणि त्यांचा रंग पांढरा असतो आणि  पिनकृमींची अंडी चुकून पोटात गेल्यानंतर गुदाशयात राहतात. पिनकृमीची अंडी बाहेरील होस्टवर दोन ते तीन आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतात. एकदा ग्रहण केल्यावर आतड्यात त्यांची वाढ होते आणि प्रौढ मादी पिनकृमी रात्री गुदद्वारातून बाहेर पडतात आणि त्वचेवर अंडी जमा करतात त्यामुळे खाज सुटून अस्वस्थता येते.

हे कृमी कोणत्याही रोगास कारणीभूत नसले तरी त्यामुळे खूप अस्वस्थता येऊ शकते आणि लहान मुलांना झोप नीट लागत नाही.

पिनकृमींचा आकार २ ते १३ मिमी पर्यंत मोठा असू शकतो. मनुष्य प्राणी हा त्यांचा एकमेव नैसर्गिक यजमान आहे. परंतु, अंडी सूक्ष्म आणि पारदर्शक असतात आणि उघड्या डोळ्यांना ती दिसत नाहीत.

मुलांमध्ये पिनकृमी होण्याची कारणे

पिनकृमी कोणालाही होऊ शकतात, परंतु पिनकृमींची काही सामान्य कारणे खालील प्रकरणांमध्ये दिसून येतात:

 • ५ ते १० वर्षे वयोगटातील शालेय मुलांना पिनकृमी होण्याची शक्यता असते. जेव्हा संसर्ग होतो तेव्हा संसर्ग झालेले बालक संक्रमित भागाला खाजवतो.खेळणी आणि इतर गोष्टींद्वारे देखील ही अंडी हस्तांतरित केली जाऊ शकतात आणि इतर मुलांमध्ये पसरू शकतात.
 • संक्रमित मुलांचे कुटुंबीय आणि काळजीवाहू यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.
 • जे लोक गर्दीच्या ठिकाणी राहतात किंवा इतर संस्थांमध्ये संसर्गाची शक्यता असते.
 • जेवणापूर्वी हात स्वच्छ न धुणारी मुले किंवा प्रौढ यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

मुलांमध्ये आढळणारी पिनकृमीची लक्षणे

मुलांमध्ये पिनकृमी संसर्गाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. परंतु तुम्ही संक्रमित मुलांमध्ये दिसणारी ही सामान्य लक्षणे पाहू शकता:

 • गुदद्वाराच्या क्षेत्रात विशेषतः रात्री वारंवार खाज सुटणे आणि अस्वस्थता येणे.
 • गुदद्वाराच्या क्षेत्रातील अस्वस्थतेमुळे  झोपेची कमतरता.
 • गुदद्वाराभोवती पुरळ येणे किंवा त्वचेची जळजळ होणे.
 • तुमच्या मुलाच्या विष्ठेमध्ये किंवा गुदाशयाच्या भागात दिसणाऱ्या पिन कृमी.
 • काही प्रसंगी ओटीपोटात दुखणे.
 • काहीवेळा संक्रमित भाग खाजवल्याने इतर जिवाणू संसर्ग होऊ शकतो.

मुलांमध्ये आढळणारी पिनकृमीची लक्षणे

मुलांना पिनकृमी संसर्ग झाल्याचे निदान

पिनकृमी उघड्या डोळ्यांना सहज दिसतात. म्हणून, जर तुमच्या मुलाच्या गुद्द्वारापाशी किंवा शौचामध्ये पांढरे जंत आढळले असतील तर त्याला पिनकृमींचा संसर्ग झाला आहे असे समजावे. तुमचे मूल सकाळी उठल्यानंतर लगेच हे तपासावे, कारण रात्री गुदद्वारातून जंत बाहेर येतात. पांढरे कृमी तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाचे शौच देखील तपासू शकता.

जंत दिसत नसल्यास, डॉक्टर टेप चाचणीची शिफारस करू शकतात. ही एक सोपी प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला एक पारदर्शक टेप घ्यावा लागेल आणि तुमच्या मुलाच्या गुदद्वाराच्या आसपासच्या भागात तो चिकटवावा लागेल आणि पुन्हा बाहेर काढावा लागेल. त्या जागी जमा केलेली कोणतीही अंडी टेपला चिकटून राहतील. हे सलग तीन दिवस सकाळी केले पाहिजे, आणि टेप डॉक्टरांकडे नेली पाहिजे. नंतर पिनकृमींची अंडी तपासण्यासाठी आणि संसर्ग झाला आहे ह्याची खात्री करण्यासाठी त्यांना ते सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहावे लागेल.

मुलांना पिनकृमी संसर्ग झाल्याचे निदान

मुलांमधील पिनकृमीवर उपचार

तोंडी औषधांच्या स्वरूपात पिनकृमींवर उपचार केले जातात. मुलांसाठी पिनकृमी औषधाचा सुरुवातीला प्रारंभिक डोस असू शकतो, नंतर दोन किंवा तीन आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जातो. अलबेंडाझोल, मेबेंडाझोल आणि पायरानटेल पॅमॉएट ही औषधे सामान्यपणे लिहून दिली जातात. खाज सुटणे असह्य झाल्यास,  डॉक्टर खाज कमी करण्यासाठी मलम आणि क्रीम लिहून देऊ शकतात.

पिंनकृमींची अंडी मुलांचे पालक, काळजीवाहू आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये देखील पसरू शकतात,बाळाच्या नियमित संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांना औषधे लिहून दिली जातात.

मुलांमधील पिनकृमीसाठी घरगुती उपचार

प्रत्येकासाठी ह्या उपायाचा उपयोग होईलच असे नाही, परंतु तुम्ही खोबरेल तेल वापरून पाहू शकता कारण त्यामुळे संक्रमणाला आळा घातला जातो असे मानले जाते. तुम्ही तुमच्या मुलाला सकाळी खाण्यासाठी एक चमचा शुद्ध खोबरेल तेल देऊ शकता आणि गुदद्वाराच्या भागात खोबरेल तेल लावू देखील शकता.

मुलांमधील पिनकृमींचा प्रतिबंध

बहुतेक संसर्गाप्रमाणे, पिनकृमीचा संसर्ग रोखण्याची गुरुकिल्ली मुख्यत्वे करून तुम्ही स्वच्छता कशी राखता आणि त्या पद्धतींवर अवलंबून असते. पिनकृमींपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता:

 • त्वचेवर जमा झालेली कोणतीही अंडी काढून टाकण्यासाठी दररोज सकाळी तुमच्या मुलाला आंघोळ घाला.
 • नखे छोटी ठेवा आणि नखांवर अडकलेली अंडी नष्ट करण्यासाठी दररोज हात स्वच्छ ठेवा.
 • तुमच्या मुलाचे अंतर्वस्त्र दररोज बदला.
 • तुमच्या मुलाचे अंथरूण उन्हात दररोज चांगले वाळवा. कारण पिनकृमींची अंडी प्रकाशास संवेदनशील असतात.
 • विशेषतः जेवणापूर्वी तुमच्या मुलाला नियमितपणे हात स्वच्छ धुण्याची सवय लावा.
 • जर तुमच्या मुलाला नखे चावण्याची किंवा अंगठे चोखण्याची सवय असेल तर त्यापासून त्याला प्रवृत्त करा.
 • अंड्यांपासून मुक्त होण्यासाठी तुमच्या मुलाचे कपडे गरम पाण्यात धुवा. त्याचे कपडे वारंवार धुणे गरजेचे आहे.
 • संक्रमित मुलासोबत इतर मुलांना आंघोळ घालू नका.
 • अंडी पसरण्यापासून रोखण्यासाठी एकमेकांचे टॉवेल वापरू नका.
 • तुमच्या मुलाला गुदद्वाराच्या भागात खाजवू देऊ नका.

आपण डॉक्टरांना कधी फोन करावा?

जेव्हा तुम्हाला पिनकृमीची पहिली लक्षणे दिसू लागतात तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. तुम्ही टेप चाचणी देखील करू शकता आणि डॉक्टरांकडून खात्री करून घेऊ शकता. तुम्ही घरगुती उपाय करण्याचा निर्णय घेतल्यास, विशेषत: लक्षणे कायम राहिल्यास किंवा तुम्हाला पांढरे जंत दिसल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तुम्हाला लघवी किंवा शौचामध्ये रक्त दिसल्यास किंवा तुमच्या मुलाला ओटीपोटात दुखण्याची तक्रार असल्यास तुम्ही वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

पिनकृमींचा संसर्ग अत्यंत संसर्गजन्य आहे, आणि त्यामुळे त्याच्या उपचारात विलंब होऊ नये. आपल्या मुलाचा त्रास कमी करण्यासाठी लक्षणे वेळेवर ओळखणे आणि वेळेवर उपचार घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

आणखी वाचा:

मुलांना होणाऱ्या डोकेदुखीचा सामना कसा करावा
मुलांच्या शौचाद्वारे रक्त पडणे – कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article