Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य एचएफएमडी (HFMD: Hand Foot Mouth Disease) साठी परिणामकारक २० घरगुती उपाय

एचएफएमडी (HFMD: Hand Foot Mouth Disease) साठी परिणामकारक २० घरगुती उपाय

एचएफएमडी (HFMD: Hand Foot Mouth Disease) साठी परिणामकारक २० घरगुती उपाय

हॅन्ड, फूट अँड माऊथ (एचएफएमडी) एक संक्रमक विषाणूजन्य आजार आहे. साधारणपणे १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना हा आजार होतो. हा आजार “कॉक्सकी” ह्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू अस्वच्छ हातांच्या संपर्कांद्वारे पसरतो. तसेच,संक्रमित व्यक्तीचा मल किंवा श्वसन द्रव या द्वारेही या रोगाचा फैलाव होतो. ह्या रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, घसा दुखणे, थकवा, वेदनादायक अल्सर इत्यादींचा समावेश होतो. तसेच तोंडाच्या आणि जिभेच्या आत तसेच हात, पाय, नितंब, कोपर, आणि गुढघ्याच्या मागील बाजूस फोड येतात. हा रोग स्वयंमर्यादित आहे आणि दहा दिवसांच्या आत आपोआप बरा होतो. लशींद्वारे किंवा औषधोपचाराने हा आजार बरा केला जाऊ शकत नाही. तथापि,काही घरगुती उपचार आहेत जे आपल्या मुलास या रोगाच्या लक्षणांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात. एकदा आपले मूल ह्या रोगातून मुक्त झाल्यावर, पुन्हा हा रोग होण्याची शक्यता दुर्मिळ असते, कारण त्याच्या शरीरात या विषाणूविरूद्ध रोग प्रतिकारशक्ती वाढते. हा संसर्ग टाळण्यासाठी मुलांना चांगल्या स्वच्छता पद्धती शिकवल्या पाहिजेत. स्नानगृह वापरल्यानंतर हात साबणाने धुण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच त्यांनी जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत.

लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या हॅन्ड, फूट अँड माऊथ डिसीज (HFMD) वर काही नैसर्गिक उपाय

हॅन्ड, फूट अँड माऊथ डिसीज वर काही घरगुती उपचार खालीलप्रमाणे:

१. नारळ पाणी

नारळाचे पाणी शरीराला थंड करते आणि पोटासाठी सौम्य असते. त्यात विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स, खनिजे, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यात लॉरिक अॅसिड देखील आहे जे विषाणूंचा प्रतिकार करते. एचएफएमडी असलेल्या मुलास नारळ पाणी दिल्याने त्याला तोंडातील वेदनेतून मुक्तता मिळू शकते आणि त्याचे शरीर सजलीत होते. नारळाचे पाणी फ्रिज मध्ये ठेऊन त्याचे क्युब्स आपण आपल्या मुलास चघळण्यास देऊ शकता, त्यामुळे तोंडातील वेदना कमी होण्यास मदत होईल.

२. तेल

तोंडाची चांगली स्वच्छता राखण्यासाठी ही जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे. ही पद्धत एचएफएमडीमुळे होणाऱ्या तोंडातील फोडांमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यास देखील मदत करते. एक चमचा तीळ किंवा नारळाचे तेल घ्या आणि आपल्या मुलाला तोंडात सुमारे ५ ते १० मिनिटांचा गुळणा ठेवायला सांगा आणि मग ते थुंकून टाकायला सांगा. तुमचे मूल तेल गिळत नाही याची खात्री करा.

३. कॉड लिव्हर ऑइल

कॉड लिव्हर ऑइलमध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि ई आहे. हे शरीराच्या प्रतिकार शक्तीस उत्तेजन देते आणि त्यात जीवाणू विरोधी गुणधर्म असतात. एचएफएमडीसाठी हा चांगला उपाय आहे. ते कॅप्सूलच्या स्वरूपात दिले जाते किंवा दही अथवा रसात मिसळून सुद्धा दिले जाते.

४. इचिनेसिया (Echinacea)

इचिनेसिया ही एक औषधी वनस्पती आहे जी डेझी कुटुंबाशी संबंधित आहे. त्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत. ही औषधी वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि ताप, सर्दी, आणि एचएफएमडीसारख्या इतर संक्रमणांची लक्षणे कमी करते. इचिनेसिया कॅप्सूलच्या स्वरूपात किंवा पाण्यामध्ये उकळून त्याचा चहा बनवून त्यात मध घालून देऊ शकता.

५. लॅव्हेंडर तेल

लॅव्हेंडर तेल हे एक अतिशय चांगले जंतुनाशक असून विषाणूंचा प्रतिकार करते. ह्या तेलामुळे आपल्या मुलास चांगली झोप लागण्यास मदत होऊ शकते. आपण आपल्या मुलाच्या आंघोळीच्या पाण्यात लव्हेंडर तेलाचे काही थेंब घालू शकता.

६. नीम तेल

नीम तेल जंतुनाशक आहे. आपल्या मुलाच्या आंघोळीच्या साबणात आपण या तेलाचे काही थेंब घालू शकता. त्यामुळे विषाणूंचा सामना करण्यास मदत होईल तसेच त्वचाही तजेलदार होईल. आपण नारळ किंवा ऑलिव्ह तेलामध्ये देखील काही थेंब मिसळू शकता आणि जिथे पुरळ आहेत तिथे लावू शकता.

७. लिकोरिस रूट (Liquorice Root)

लिकोरिस रूटमध्ये विषाणू विरोधी गुणधर्म आहेत आणि विविध विषाणूंच्या संसर्गाच्या उपचारांसाठी घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. यात ट्रायटरपेनॉइड नावाचे रसायन असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. हे घसा आणि अन्ननलिकेच्या आत श्लेष्माचा पातळ थर देखील बनवते, तसेच फोडांना शांत करण्यास मदत करते. काही मुळे उकळवून घ्या, चहा बनवा आणि त्यात मध घाला, मग ते आपल्या मुलाला प्यायला द्या. तथापि, सावधगिरीने त्याचा वापर करा कारण ह्याचे जास्त प्रमाण आपल्या मुलासाठी हानिकारक ठरू शकते.

८. मिठाचे पाणी

आपल्या मुलाला मीठ घातलेल्या कोमट पाण्याने दिवसातून ३-४ वेळा तोंड धुण्यास सांगा. कारण यामुळे हात,तोंड आणि पायावरील वेदनादायक फोडांना आराम मिळतो. आपण यासाठी साधे मीठ किंवा हिमालयीन गुलाबी मीठ वापरू शकता. गुलाबी मीठ अधिक प्रभावी आहे कारण ते तोंडातील पीएच पातळी संतुलित करते. तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये इप्सम मीठ टाकल्यास आराम मिळतो आणि एचएफएमडी लक्षणांमधून लवकर बरे होण्यास मदत होते. आपण लॅव्हेंडर किंवा लिंबाच्या तेलाचे काही थेंब देखील अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता त्यामुळे आपल्या मुलाला खूप आराम मिळेल.

९. लसूण

लसणीत भरपूर प्रमाणात प्रतिजैविक गुणधर्म असतात कारण यात सल्फर उच्च प्रमाणात असते. आपण अन्नामध्ये लसूण घालू शकता, कॅप्सूलच्या स्वरूपात आपल्या मुलास देऊ शकता किंवा लसणीच्या २ ते ३ पाकळ्या पाण्यात उकळून हर्बल चहा बनवू शकता आणि थंड झाल्यानंतर त्याला प्यायला देऊ शकता.

१०. एल्डरबेरी (Elderberry)

एल्डरबेरी त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांकरिता प्रसिद्ध आहे ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हे शरीराला विषाणूंशी लढण्यासाठी श्लेष्मा तयार करण्यास मदत करते. यामुळे शरीराचे तापमान किंचित वाढते, यामुळे विषाणूंची वाढ रोखण्यास मदत होते. एल्डरबेरी आणि मधाचे एक चाटण तयार करा आणि ते आपल्या लहानग्याला वारंवार द्या. एचएफएमडी पासून लवकर बरे होण्यास ह्यामुळे नक्कीच मदत होईल.

११. आलं

आल्यामध्ये अनेक प्रतिविषाणू रसायने आहेत. आल्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म देखील आहेत. चिरलेलं आलं पाण्यात उकळून चहा तयार करा. थंड करून आपल्या मुलाला मध घालून द्या.

१२. अॅस्ट्रेलॅगस (Astralagus)

ही वनस्पती शेकडो वर्षांपासून पारंपारिक चिनी औषध म्हणून वापरली जात आहे. ही वनस्पती प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तसेच शरीरातील विषाणूंची वाढ थांबवण्यास मदत करते. वरून लावण्यासाठी ऍस्ट्रेलॅगस मलम विकत घेऊ शकता. आपण ऍस्ट्रेलॅगस चहा बॅग देखील विकत घेऊ शकता किंवा किसलेले ऍस्ट्रॅलेगस मूळ पाण्यात उकळवून स्वतः चहा बनवू शकता. एचएफएमडी च्या लक्षणांना शांत करण्यासाठी आपल्या मुलाला मध घालून हे पेय द्या.

१३. नारळ तेल

नारळाच्या तेलामध्ये प्रतिविषाणू गुणधर्म असतात. जिथे आपल्या मुलास फोड किंवा रॅशेस असतील तिथे नारळाचे तेल लावू शकता लवकरच ते अदृश्य होतील. काही लोक एक चमचा नारळाचे तेल तोंडात धरून थुंकून टाकण्याचे सुचवतात. त्यामुळे तोंडातील फोडांना आराम पडतो. तुम्ही तुमच्या मुलाला हा उपाय आरामदायी वाटत असेल तर करण्यास सांगू शकता.

१४. नीम

ह्यामध्ये कित्येक प्रतिजैविक गुणधर्म आहेत आणि शेकडो वर्षांपासून विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांवर उपचार करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. आपण आपल्या मुलाच्या शरीरावर झालेल्या दंशांवर निम तेल वापरू शकता. आपण वाळलेल्या लिंबाच्या पानांची पावडर करून त्यात पाणी घालून पेस्ट करू शकता. ही पेस्ट फोडांवर लावल्यास ते भरून येण्यास मदत होते. नीम तेल नारळाच्या तेलात मिसळून त्यात लव्हेंडर तेलाचे काही थेंब घालून फोडांवर लावू शकता.

१५. आवळा आणि भारतीय हिरव्या भाज्या

भारतीय हिरव्या भाज्या (वैज्ञानिक नाव एम्बिका ऑफिसिनलिसिस) व्हिटॅमिन सी ने समृध्द आहेत, व्हिटॅमिन-सी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक आवश्यक असलेले महत्वाचे व्हिटॅमिन आहे. हे रक्तशुद्धीस मदत करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. आवळा आणि भारतीय हिरव्या भाज्या रस स्वरूपात घेतल्या जाऊ शकतात. वाळलेल्या गूसबेरीची पावडर बनवून आणि ते पाण्यात घालून तुम्ही ते आपल्या मुलाला देऊ शकता.

१६. डाळिंब

डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि सूज कमी करणारी रसायने असतात. ही रसायने एचएफएमडीच्या लक्षणांना सौम्य करण्यास मदत करतात. आपल्या मुलाला डाळिंबाचा रस पिण्यास द्या किंवा जलद उपचारांसाठी डाळिंबाच्या रसाळ बिया खाण्यास द्या.

१७. ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये जीवनसत्त्वे बी आणि सी असते. त्यात इन्युलिन नामक एक रासायनिक पदार्थ देखील असतो. ज्यामुळे आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते. पांढऱ्या रक्त पेशी आपल्या शरीरात व्हायरसशी लढण्यास मदत करतात. कोमट पाण्यात २ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर घाला आणि त्याने आपल्या मुलाला गुळण्या करण्यास सांगा, त्यामुळे त्याच्या घशास आराम पडेल.

१८. कॅलेंडुला (Calendula)

कॅलेंडुला ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतींमध्ये प्रतिजीवाणू आणि प्रतिविषाणू गुणधर्म आहेत. कॅलेंडुला सूज कमी करतात तसेच मौखिक आरोग्य राखण्यास मदत करतात. आपण कॅलेंडुला पाकळ्यांचा चहा बनवून त्यात थोडा मध घालून आपल्या मुलाला देऊ शकता. आपण फोडांवर कॅलेंडुला क्रीम सुद्धा लावू शकता.

१९. तुळस

तुळस एक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ही हानिकारक सूक्ष्मजीवांशी लढते, सूज कमी करते आणि वेदनेतून आराम देते. आपल्या मुलाला तुळशीची पाने चघळण्यास द्या, किंवा पानांचा रस बनवा, पाणी घालून तो थोडा पातळ करा आणि एचएफएमडीकडून जलद सुटकेसाठी त्याला दिवसातून काही वेळा प्यायला द्या.

२०. कोरफड

कोरफडी मध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत. कोरफडीमुळे प्रतिकार शक्ती देखील वाढते. कोरफडीमध्ये मध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या इतर अनेक रसायनांचा समावेश आहे. कोरफडीचा गर फोडांवर लावल्यास ते बरे होण्यास मदत होते. एचएफएमडीपासून त्याला बरे करण्यास मदत करण्यासाठी आपण आपल्या मुलाला कोरफडीचा रस देखील देऊ शकता.

हॅन्ड, फूट आणि माऊथ रोगाची लक्षणे मुलांना अत्यंत अस्वस्थ आणि चिडचिडे बनवू शकतात. लहान मुलांसाठी दंश आणि फोड त्रासदायक होऊ शकतात. म्हणून, लक्षणे शांत करण्यासाठी आणि आपल्या मुलास शक्य तितके आरामदायक बनवण्यासाठी या घरगुती उपायांचा प्रयत्न करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article