Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २० वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २० वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण –  २०  वा आठवडा

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यात पोहोचला आहात. तुमची जुळी बाळे तुमच्या गर्भाशयात अगदी छान वाढत आहेत आणि सुरक्षित आहेत. बहुतेक स्त्रिया ह्या काळात उत्साही असतात परंतु काही स्त्रियांना अजूनही मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. चांगली बातमी अशी आहे की या सर्व गोष्टींचा शेवट होणार आहे कारण आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी मार्गावर आहेत. हे बदल फक्त तुमच्या शरीरात नाही तर येत्या काही महिन्यात तुमच्या बाळांच्या शरीरात पण दिसून येतील.

२० व्या आठवड्यात बाळांची वाढ

गरोदरपणाच्या २० वा आठवडा बाळांच्या विकासासाठी महत्वाचा असतो तसेच हा आठवडा डॉक्टरांसाठी देखील महत्वाचा असतो कारण त्यांना बाळांविषयी योग्य माहिती मिळते आणि त्यामुळे त्यांना योग्य वैद्यकीय निर्णय घेता येतात.

तुमच्या बाळांमध्ये होणारा सर्वात महत्वाचा अंतर्गत विकास म्हणजे चवींमधला फरक बाळाला समजू लागेल. त्यांना चव अचूक ओळखता आली नाही तरी चवीमधला फरक त्यांना समजू शकेल. ह्या आठवड्याच्या दरम्यान बाळे गर्भजल गिळू लागतील. गर्भजलाच्या माध्यमातून त्यांना बरेचसे पोषण मिळते. तुम्ही काय खाता त्यानुसार गर्भजलाची चव बदलते. बरेचदा गर्भजलाची चव गोडसर असते आणि स्तनपानासारखीच असते. पोटात असताना बाळ अंगठा चोखणे शिकलेले असते त्यामुळे ही स्तनपान घेण्यास शिकण्याची प्रक्रिया आहे. तुमच्या गर्भाशयातील तिळे किंवा जुळे आता त्यांची स्वत: ची जैविक लिंग ओळख बनवू लागले आहेत. नर बाळांनी एक लहान पुरुषाचे जननेंद्रिय विकसित केले असेल आणि स्क्रोटल सॅक्स अंडकोष तयार करण्यासाठी खाली येऊ लागतील. अंडकोष अंड्यातून खाली येण्यासाठी संपूर्णपणे अंडकोष पूर्ण होण्याची आवश्यकता असल्यामुळे ही प्रक्रिया अगदी क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे, मादी बाळांनी त्यांचे अंडाशय आत विकसित केले आहेत, त्यामध्ये आधीच ५ दशलक्षांपेक्षा जास्त अंडी तयार झाली आहेत, वास्तविक जगात प्रकट होईपर्यंत त्यांची संख्या कमी होईल. त्याचप्रमाणे, तिचे गर्भाशय देखील विकसित होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. तिच्या योनिमार्गाच्या कालव्याची वाढ ह्या आठवड्यात होण्यास सुरुवात होते.

बाळांचा आकार केवढा असतो?

गेल्या आठवड्यापासून बहुतेक बाळे सुमारे सेंटीमीटरने वाढतात. बाळांची लांबी डोक्यापासून त्यांच्या कुल्ल्यांपर्यंत मोजली जाते. त्यांचे वजन देखील अंदाजे ४०६० ग्रॅम्सने वाढते. जुळ्या किंवा एकाधिक बाळांमध्ये ही वाढ थोडी कमी असू शकते. तुमची लहान बाळे ह्या आठवड्यात केळ्यांपेक्षा मोठी असतील.

बाळांचा आकार केवढा असतो?

सामान्य शारीरिक बदल

जवळजवळ अर्धा गर्भधारणेचा प्रवास पूर्ण झाल्याने शरीर आता शांत आणि स्थिर राहू लागते. असे म्हटले जात आहे की काही विशिष्ट चिन्हे शरीराच्या बाह्यस्वरूपापेक्षा शरीराच्या कार्यक्षमतेवर अधिक तीव्रतेने परिणाम करतात.

  • तुम्हाला कितीही फिटनेसची आवड असली किंवा तुम्ही तंदुरुस्त असलात तरीसुद्धा गर्भधारणेमुळे किंवा वाढत्या पोटाच्या आकारामुळे तुम्हाला ह्या काळात अगदी विचित्र वाटेल. ओटीपोटाजवळील स्नायू ज्यांना इंग्रजीमध्ये ऍब्स म्हणतात ते एका विशिष्ट क्रमाने लावले जातात. पोटाच्या चरबीमुळे ते बऱ्याच वेळा दिसत नाहीत. जेव्हा गर्भाशयाचा आकार वाढून पोट बाहेरच्या दिशेने दाबले जाते तेव्हा स्नायू सुद्धा बदललेल्या संरचनेनुसार स्वतःला समायोजित करतात. त्यामुळे स्वतःचे नेहमीचे शरीर बघण्याची सवय असलेल्या स्त्रियांना झोपल्यावर त्यांचे पोट विचित्र दिसते. ही संरचना बदलण्याची क्रिया वेदनादायी नसते परंतु त्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया कंबरदुखीची तक्रार करतात.
  • गर्भाशयाचा विस्तार झाल्यामुळे केवळ ओटीपोटाजवळच्या भागातील अवयवांची स्थिती बदलत नाही तर शरीराच्या वरच्या भागावर सुद्धा परिमाण होतो. अवयवांच्या ह्या स्थलांतराचा डायफ्रॅम आणि फुप्फुसांवर सुद्धा परिणाम होतो. तुम्हाला ते कदाचित जाणवणार नाही परंतु तुम्ही खूप थकला असाल किंवा एखाद्या क्रियाकलापात तुम्ही भाग घेतलात तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. बऱ्याच स्त्रिया दम लागल्याची किंवा आधी घेता यायचा तसा दीर्घ श्वास घेण्यास कठीण जात असल्याची तक्रार करतात. ह्याचा गर्भवती स्त्रियांना काही त्रास होत नाही परंतु तुम्ही खूप दमून जाणार नाही ह्याची तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.
  • बहुतेक बदलांमुळे आपल्याला असे वाटू शकते की गरोदरपणाच्या २०व्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला अस्वस्थ करणारे काही अधिक शारीरिक बदल होत आहेत परंतु त्याचबरोबर स्वागतार्ह परिणाम म्हणजे तुमच्याकडे आता भरपूर ऊर्जा आहे ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटण्यास मदत होते. मळमळ कमी होते. लवकरच तुम्ही तुमच्या बाळांना तुम्ही तुमच्या हातात घेणार असल्याने गरोदरपणाचा हा काळ तुमच्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान काळ असणार आहे.

सामान्य शारीरिक बदल

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यातील लक्षणे

एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यातील लक्षणे आधीच्या आठवड्यांमधील लक्षणांपैकी वेगळी नाहीत. त्यापैकी बहुतेक लक्षणे फक्त वारंवार चिडचिड होणे किंवा आधीच्याच समस्या आहेत.

  • पाण्याची धारणा, वाढलेले रक्ताभिसरण, ब्लड पुलिंग आणि निरंतर वाढणाऱ्या गर्भाशयामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात सूज आणि पेटके येतात. मुख्यत्वेकरून तुमची पाऊले, पाय तुमचा चेहरा इत्यादी भागात हे जास्त आढळते. खूप जास्त सूज नाही तोपर्यंत ते सामान्य आणि सुरक्षित असते. तसेच तुमच्या ओटीपोटावर आणि पाठीवर येणाऱ्या ताणामुळे वेदना होऊ शकतात. योग्यरीत्या मालिश केल्यास त्या कमी होतात.
  • पोट आणि आतडे आपल्या अन्नास योग्य प्रकारे पचवण्यासाठी आणि पोषण नीट होण्यासाठी एकत्र काम करतात. त्यांचे कार्य शरीरातील त्यांच्या योग्य स्थानावर आणि विविध हॉर्मोन्सच्या पातळीवर अवलंबून असते. गरोदरपणात, संप्रेरकाची पातळी वाढलेली असते. म्हणूनच, अपचन, गॅसेस होणे आणि बद्धकोष्ठता बराच काळ कायम राहील.
  • स्त्रियांसाठी चिंता करण्याचे आणखी एक चिन्ह म्हणजे योनिमार्गातून सतत स्त्राव येणे. ते विचित्र वाटत असले तरी ते सामान्य आहे. उलटपक्षी, तुमचे शरीर योग्यरीत्या काम करीत असल्याचे ते एक चांगले चिन्ह आहे. कोणताही गंध वास किंवा विषम रंगाचा स्त्राव आढळ्यास ते संसर्गाचे चिन्ह असू शकते.

जुळ्या बाळांसह गरोदरपण २० वा आठवडा पोटाचा आकार

एकदा तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यात पोहोचलात की बहुतेक डॉक्टर तुमचे पोट किती मोठे आहे हे मोजण्यास सुरूवात करतात आणि गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत ते मोजत राहतात. आपल्या गर्भावस्थेच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी हे एक पॅरामीटर आहे. मोजमाप सामान्यत: नाभीपासून गुह्य भागाच्या हाडापर्यंत घेतले जाते.

पोटाचा आकार निरंतर वाढत असताना गर्भाशय आणखी खाली सरकते. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असल्यास त्याच ताण तुमच्यावर येऊ शकतो. त्यामुळे आधारासाठी प्रसूती पट्टा वापरल्यास तो कमी केला जाऊ शकतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपण २० वा आठवडा अल्ट्रासाऊंड

या काळात आपल्या डॉक्टरने केलेला अल्ट्रासाऊंड हा सर्व आघाड्यांवरील सर्वात महत्वाचा असतो.

तुमची नियमित तपासणी झाल्यास, अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास लागणारा जास्त कालावधी तुमच्या लक्षात येईल. वेळ जास्त लागण्याचे कारण असे आहे की तुमच्या गर्भाशयातील बाळांमध्ये काही विसंगती किंवा दोष दिसू शकतात का हे समजून घेण्यासाठी डॉक्टर सखोल निरीक्षण करू शकतात. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या मुलांना अधिक तपशीलवार पाहू शकाल आणि त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू शकाल.

काय खावे?

संतुलित पोषण या आठवड्यात देखील सुरु ठेवणे आवश्यक आहे. ठराविक जेवण खाण्याचा नित्यक्रम बदलून दिवसभर खात राहण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकतात. उकडलेल्या आणि वाफवलेल्या खाद्यपदार्थांना प्रथम प्राधान्य द्यावे. तुमची एखाद्या पदार्थाविषयीची लालसा तुमच्या निरोगी आहाराच्या आड येणार नाही ह्याची खात्री करा.

काय खावे?

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

जरी गोष्टी बदलत आहेत, तरीही आपल्या गरोदरपणात स्वत: ची प्रभावीपणे काळजी घेण्यासाठी टिप्सची आवश्यकता आहे.

हे करा

  • प्रसूती वर्गासाठी नोंदणी करा आणि तुमच्या प्रसूतीच्या योजनांबद्दल चर्चा करणे सुरू करा.
  • आपल्या पोषणात लोहाची उच्च पातळी राखण्यावर जास्त लक्ष केंद्रित करा.

काय टाळाल?

  • आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल तणावपूर्ण विचारसरणीत अडकणे टाळा.
  • योग्यवेळी व्यायामासह पोषक आहार घेणे विसरू नका.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

गरोदरपणाच्या मध्यावर खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे खूप चांगला वेळ आहे. तुम्हाला लागणाऱ्या खालील गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता.

  • बाळाच्या खोलीसाठी सजावटीच्या गोष्टी.
  • प्रसूतीची तारीख हिवाळ्यात असल्यास थर्मल कपडे आणि बूट.

जुळ्या बाळांसह २० आठवड्यांच्या गर्भवती असल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकेल आणि आत्मविश्वास वाढू शकेल. तुम्ही आतापर्यंत तुमच्या बाळांना इथपर्यंत सुरक्षितपणे आणले आहे आणि गरोदरपणाचा पुढचा प्रवास सुद्धा इतकाच असणार आहे. लवकरच, तुमच्या हातांमध्ये बाळं असतील आणि आई झाल्याबद्दल तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल.

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १९ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २१ वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article