Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात टरबूज खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात टरबूज खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात टरबूज खाणे सुरक्षित आहे का?

यशस्वी गर्भारपणाचा एक आवश्यक भाग म्हणजे पोषण गर्भवती महिलांनी आपण स्वतःसाठी आणि बाळासाठी काय खात आहोत ह्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गरोदर स्त्रियांना नेहमी फळे खाण्यास सांगितले जाते कारण फळांमुळे गर्भवती महिलांना विशेष फायदा होतो. टरबूज केवळ सुरक्षितच नाही तर गर्भवती महिलांसाठी अत्यंत फायदेशीरही आहे

आपण गरोदरपणात टरबूज खाऊ शकता का?

होय, गरोदरपणात तुम्ही टरबूज खाऊ शकता. मध्यम प्रमाणात खाल्ले तर ते सुरक्षित असतात तसेच गर्भवती स्त्री आणि बाळासाठी सुद्धा ते अतिशय उपयुक्त असतात.

गरोदरपणात टरबूज खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

गर्भवती महिलांना टरबुजामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी खाली दिली आहे.

. छातीतील जळजळ आणि ऍसिडिटी पासून मुक्तता

गरोदरपणात शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. ह्या बदलांमुळे काही प्रमाणात अस्वस्थता जाणवते. ऍसिडिटी आणि छातीत जळजळ ही गर्भावस्थेदरम्यान स्त्रियांमधील अस्वस्थतेची दोन कारणे आहेत. टरबुजामुळे पचन तंत्रावर चांगला परिणाम होतो आणि आम्लपित्त आणि छातीत जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो कधीकधी तर लगेच आराम पडतो. तर, पुढच्या वेळी जर तुम्हाला पचनाचा त्रास झाला तर लगेच चवदार टरबूज खा.

. सूज प्रतिबंधित करते

गर्भवती महिलांना बहुतेकदा पायांना सूज येते, ज्यास एडेमा देखील म्हणतात. शरीरातील विशिष्ट उतींमध्ये द्रवपदार्थाच्या असामान्य संचयामुळे एडेमा होतो. टरबुजामध्ये पाण्याचे जास्त प्रमाण असल्याने ब्लॉकेजेस उघडण्यास मदत होते आणि एडीमापासून आराम मिळतो.

. निर्जलीकरणावर चांगला उपाय

गर्भधारणेशी संबंधित आणखी एक सामान्य त्रास म्हणजे निर्जलीकरण (डिहायड्रेशन). डिहायड्रेशनमुळे थकवा आणि आळशीपणा ह्या सारख्या किरकोळ समस्यांसोबतच अकाली प्रसूतीसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. टरबूजांमध्ये जवळजवळ नव्वद टक्के पाणी असते आणि ते निर्जलीकरणावर विशेषतः प्रभावी असतात.

. मॉर्निंग सिकनेस

गर्भवती महिलांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो, विशेषत: गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये हा त्रास जास्त असतो . जरी त्याला मॉर्निंग सिकनेस म्हटले जाते, तरीही हा त्रास दिवसभरात कोणत्याही वेळी होऊ शकतो. सकाळी एक ग्लास टरबूज रस घेतल्यास ह्या त्रासाचा प्रतिकार करण्यासाठी ते खूप प्रभावी आहे. तसेच सकाळी एक ग्लास टरबूज रस घेतल्याने खूप स्फूर्तिदायक आणि उत्साही वाटते.

. रोग प्रतिकारशक्ती वाढवते

गर्भवती स्त्री स्वतःसाठी आणि तिच्या वाढणाऱ्या बाळासाठी, संक्रमणांशी आणि आजारांशी लढा देत असते. त्यामुळे कधीकधी प्रतिकारशक्तीच्या पातळीत घट होऊ शकते. टरबुजामध्ये लाइकोपीन नावाचे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असते ज्यामुळे टरबुजांचा रंग लाल असतो आणि हा घटक रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ओळखला जातो.

. शरीरातील विषारीद्रव्ये बाहेर टाकली जातात

टरबुजामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असतो जो विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि शरीरातील यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत करतो. टरबूजांचे हे गुणधर्म गरोदरपणात यकृत आणि मूत्रपिंडांचे कार्य योग्यरितीने होण्यास मदत करते. हे त्वचेचे एसपीएफ वाढविण्यात देखील मदत करते

. स्नायूंच्या पेटक्यांपासून आराम

गर्भवती महिलेचे शरीर सतत होत असलेल्या बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. संप्रेरकांमधील बदल आणि वेगाने वाढणारे वजन ह्यामुळे स्नायूंमध्ये पेटके येऊन वेदना होऊ शकतात. टरबुजामुळे त्यापासून सुटका होण्यास मदत होते.

. त्वचेवर डाग येण्याचे प्रमाण कमी करते

गरोदरपणात शरीरात होणाऱ्या संप्रेरकांमधील बदलांमुळे त्वचा मंद निस्तेज दिसू शकते. टरबूज पचन सुधारते आणि शरीरातील विषारीद्रव्ये बाहेर टाकली जातात, त्यामुळे त्वचा चमकदार होते आणि त्वचेवर डाग येत नाहीत.

. बद्धकोष्ठता कमी करते

बद्धकोष्ठता ही गर्भावस्थेदरम्यान स्त्रियांची आणखी एक सामान्य तक्रार आहे. टरबूजांमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त आहे, जे मल तयार करण्यास मदत करते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते आतड्यांच्या आवश्यक हालचालीस मदत आणि सहाय्य करते.

१०. बाळाची हाडे निरोगी होण्यास मदत करते

गर्भवती महिलांनी आपल्या आहारात टरबूज समाविष्ट करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाढत्या बाळाची हाडे आणि दात तयार होण्याच्या प्रक्रियेस टरबुजामुळे मदत होते. टरबूजामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात आणि ही खनिजे गर्भाच्या हाडांच्या योग्य विकासासाठी आवश्यक असतात.

इंटर नॅशनल जर्नल ऑफ गायनोकॉलॉजी अँड प्रसूतिशास्त्रातील अभ्यासातून असे दिसून आले आहे की नियमितपणे लाइकोपीनचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये प्रीक्लेम्पिया होण्याची शक्यता ५०% कमी होते. टरबूज गर्भवती महिलांसाठी एक उत्तम फळ आहे. टरबुजामध्ये बरीच खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील असतात. ही जीवनसत्वे बाळाची दृष्टी, मेंदू, मज्जासंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात.

गर्भवती महिलांसाठी टरबूज बियाण्याचे फायदे

फळांचे सेवन करताना बहुतेक लोक टरबूजाच्या बिया टाकून देतात. ह्या बिया पोषक असतात ह्या आई आणि वाढत्या बाळासाठी फायदेशीर ठरू शकतात. बिया भाजून कुरकुरीत होतात आणि त्यापासून एक आनंददायक, पोषक स्नॅक्स बनते

 • टरबूजच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी वाढत्या गर्भाच्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी उपयुक्त आहे.
 • निरोगी चरबी आणि प्रथिनांसोबतच टरबुजाच्या बियांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन बी आणि लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक ह्यासारखी आवश्यक खनिजे असतात, हे सर्व गर्भाच्या योग्य विकास आणि वाढीस कारणीभूत ठरतात.

गर्भवती असताना टरबूज सेवन करण्याचे काही दुष्परिणाम आहेत का?

टरबूज, सामान्यत: आरोग्यासाठी चांगले आणि गर्भवती स्त्रियांसाठी फायदेशीर असले तरी त्यांचे काही अनिष्ट परिणामही होऊ शकतात; जसे की:

 • जास्त प्रमाणात सेवन केल्यास टरबूजमधील साखरेचे प्रमाण रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते आणि गरोदरपणात मधुमेह होऊ शकतो
 • लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या टरबुजाच्या गुणधर्मामुळे विषारी पदार्थांसह आवश्यक पोषक पदार्थ सुद्धा बाहेर फेकले जाऊ शकतात
 • फक्त ताजे कापलेले टरबूज खाणे चांगले. टरबूज त्वरीत खराब होण्याची प्रवृत्ती असते आणि ताजे टरबूज खाल्ल्यास मळमळ, उलट्या आणि पोटाचे आजार होऊ शकतात

टरबुजाचा समावेश असलेल्या झटपट पाककृती

येथे आपण प्रयत्न करू शकता अशा टरबूज असलेल्या काही सोप्या पाककृती आहेत.

. टरबूज आणि अव्होकॅडो कोशिंबीर

साहित्य

 • मोठे अव्होकॅडो
 • कप चौकोनी तुकडे केलेला टरबूज
 • चवदार बाल्सॅमिक व्हिनेगर ड्रेसिंग

कृती

एका वाडग्यात दोन सोललेले,बिया काढून चिरलेले अव्होकॅडो घ्या. यामध्ये चार कप चौकोनी आकारात चिरलेले टरबुजाचे तुकडे घाला आणि चांगले मिसळा. खाण्यापूर्वी फक्त बाल्सेमिक व्हिनेगर ड्रेसिंग घाला

. टरबूज मिल्कशेक

साहित्य

 • कप बिया काढलेले आणि टरबूजाचे चौकोनी आकाराचे तुकडे
 • साखर कप
 • चवीनुसार मीठ
 • कप थंडगार डबल क्रीम

कृती

एका भांड्यात डबल क्रीम वगळता सर्व साहित्य घाला आणि चांगले मिसळा, प्लास्टिकच्या रॅपने झाकून ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ३० मिनिटे ठेवा. रेफ्रिजरेटरमधून काढून आता ते ब्लेंडरमध्ये ठेवा नंतर थंडगार डबल क्रीम घालून ब्लेंड करा.

. साधा टरबूजचा रस

साहित्य

बिया काढलेल्या टरबुजाचे चौकोनी आकाराचे तुकडे कप

कृती

फळांचे सगळे फायदे मिळण्यासाठीचा उत्तम मार्ग म्हणजे मीठ किंवा साखर घालता फळे खाणे. फक्त ब्लेंडरमध्ये हे टरबुजाची तुकडे घाला आणि चांगले ब्लेंड करा.

गरोदरपणात टरबुजाचे मध्यम प्रमाणात सेवन केल्यास ते सुरक्षित असतात कारण त्यामुळे, ऍसिडिटी, स्नायूंचे पेटके, थकवा आणि सामान्यत: गरोदरपणात उद्भवणारे इतर अनेक आजार ह्यासाठी फायदा होतो. तुमच्या आहारात टरबूज समाविष्ट करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. त्यामुळे ह्या सर्वोत्तम फळाचे फायदे तुम्हाला मिळत आहेत ह्याची खात्री होईल.

आणखी वाचा: गरोदरपणात खावीत अशी १६ सर्वोत्तम फळे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article