In this Article
- एचसीजी (ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन) म्हणजे काय?
- एचसीजी कधी तयार होते?
- एचसीजी गर्भधारणा चाचण्या कशा कार्य करतात?
- कमी एचसीजी पातळी काय दर्शवते?
- उच्च एचसीजी पातळी काय दर्शवते?
- एचसीजी आणि जुळी बाळे
- जुळ्या गर्भधारणेमध्ये एचसीजी पातळीची भूमिका
- एचसीजी पातळी चाचणी का केली जाते?
- एचसीजी पातळी तपासण्यासाठीच्या चाचणी दरम्यान वेदना होतात का?
- एकल आणि जुळ्या गर्भधारणेमध्ये एचसीजी पातळी
- एचसीजी किती वेळा वाढते?
- एचसीजीच्या पातळीवर काय परिणाम होऊ शकतो?
- एचसीजीची पातळी जास्त असल्यास तुम्हाला जुळी मुले होतील असा त्याचा अर्थ होतो का?
- एचसीजीची पातळी वाढली नाही तर काय?
हे गर्भारपण तुम्हाला थोडे वेगळे वाटत आहे का? तुम्हाला तुम्ही तीन जीवांसाठी खात आहात असे वाटतेय का? किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी सांगितलेल्या गरोदरपणाच्या लक्षणांपेक्षा तुम्हाला जाणवणारी लक्षणे अधिक तीव्र आहेत का? गरोदर असलेल्या स्त्रियांना असे खूप प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. परंतु शरीरातील एचसीजी पातळीवरून तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. एचसीजी पातळी जास्त असेल तर जुळी बाळे होण्याची शक्यता असते. जुळ्या बाळांचे गर्भारपण हे एकल गर्भारपणापेक्षा वेगळे असते. जुळ्या बाळांचे गर्भारपण कसे वेगळे असते? एचसीजी गर्भारपणात कशी भूमिका बजावते? ह्या मुद्द्यांची खालील लेखामध्ये चर्चा केलेली आहे.
एचसीजी (ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन) म्हणजे काय?
ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) हे गरोदरपणात फलित अंडींद्वारे तयार होणारे संप्रेरक आहे. ते प्लेसेंटाचा विकास होईपर्यंत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या इतर संप्रेरकांचे उत्पादन नियंत्रित करते, गर्भाच्या वाढीस समर्थन देते आणि गरोदरपणात गर्भाशयाच्या अस्तराचे संरक्षण करते. गरोदरपणातील संप्रेरक म्हणून ते ओळखले जाते. एचसीजी बहुतेकदा स्त्रियांमध्ये गर्भधारणेची शक्यता वाढवते.
थोडक्यात, शरीरातील उच्च एचसीजी पातळी हे गर्भधारणा झाल्याचे लक्षण असते. परंतु, जर तुम्ही गरोदर नसाल आणि तुमची एचसीजी पातळी असामान्यपणे जास्त असेल, तर ते कर्करोग, अल्सर, सिरोसिस किंवा दाहक आतड्यांसंबंधी रोगाची चिन्हे असू शकतात.
एचसीजी कधी तयार होते?
रोपणानंतर लगेचच प्लासेंटामध्ये एचसीजी तयार होते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात स्त्रीच्या रक्तात किंवा लघवीमध्ये हे एचसीजी आहे का ते शोधले जाऊ शकते. मासिक पाळीच्या आधी हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे मासिक पाळी चुकल्यानंतर त्याची चाचणी करणे चांगले.
काहीवेळा, एचसीजीची पातळी जास्त असल्यास ते मोलर प्रेग्नन्सीचे लक्षण असू शकते. मोलर प्रेग्नन्सीमध्ये गर्भधारणेदरम्यान शुक्राणू आणि अंडी एकत्र येतात तेव्हा नाळेची असामान्य वाढ होते. या घटनेत, शुक्राणू रिकाम्या अंड्याने फलित होतात, त्यामुळे प्लासेंटल भागांमध्ये वाढ होते, परंतु मूल होत नाही. याला संपूर्ण मोलर प्रेग्नन्सी म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे पार्शिअल मोलर प्रेग्नन्सी होय. अशा प्रकारच्या गरोदरपणात, गर्भ आणि असामान्य पेशी दोन्ही असतात. तसेच गंभीर जन्म दोष असू शकतात.
गर्भावस्थेतील ट्रोफोब्लास्टिक ट्यूमरमुळे देखील एचसीजीची पातळी वाढते. हा एक कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार आहे. लवकर उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो. एचसीजीच्या उच्च पातळीचे आणखी एक कारण म्हणजे एक्टोपिक गर्भधारणेची सुरुवात असू शकते. अशा प्रकारच्या गर्भधारणेमध्ये गर्भ गर्भाशयाच्या बाहेर म्हणजेच फॅलोपियन ट्यूबमध्ये वाढतो. फॅलोपियन ट्यूब्ज भ्रूण सामावून घेण्यासाठी योग्य नसल्यामुळे त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.
प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी आणि गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी वंध्यत्वाचा सामना करणार्या स्त्रियांना अनेकदा एचसीजीचे इंजेक्शन दिले जाते.
एचसीजी गर्भधारणा चाचण्या कशा कार्य करतात?
एचसीजी पातळी तपासण्याचे दोन मार्ग आहेत
- घरी करता येणारी लघवीची चाचणी. गर्भधारणेनंतर सुमारे 12-14दिवसांनी लघवीची चाचणी घेतली जाऊ शकते.
- आरोग्य केंद्रात रक्त तपासणी.
विशेषतः जुळी गर्भधारणा निश्चित करण्यासाठी एचसीजीची एकच रक्त चाचणी पुरेशी नाही. एचसीजी साठी पहिली चाचणी मुळात बेसलाइन म्हणून वापरली जाते. खालील चाचण्यांमध्ये, डॉक्टर एचसीजी पातळीतील बदलाचे नमुने तपासतात. प्रत्येक 48 ते 72 तासांनी, गरोदरपणाच्या पहिल्या चार आठवड्यांमध्ये, एचसीजी पातळी सामान्यत: दुप्पट होते. त्यानंतर एचसीजी पातळी अधिक हळूहळू वाढली पाहिजे, सुमारे 6-आठवड्यांच्या आसपास ही पातळी दर 96 तासांनी दुप्पट होते.
गरोदरपणाच्या सुरुवातीला एचसीजीच्या पातळीतील बदलांकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे कारण अयशस्वी गर्भधारणेमध्ये ही एचसीजी पातळी लवकर दुप्पट होण्याची शक्यता असते.
सामान्य गर्भधारणेमध्ये, शेवटच्या मासिक पाळीच्या सुमारे 10 ते 12 आठवड्यांनंतर एचसीजीची पातळी वाढते. संपूर्ण गरोदरपणात ही पातळी हळूहळू कमी होते आणि प्रसूतीनंतर, एचसीजीची पातळी ओळखता येत नाही. एचसीजी पातळीचा हा पॅटर्न न दिसल्यास, ते मुदतपूर्व प्रसूती, गर्भाची हानी, प्रीक्लेम्पसिया आणि क्रोमोसोमल विकृतीचे लक्षण असू शकते. जर तुमच्या डॉक्टरांना एचसीजीच्या पातळीमध्ये अशा प्रकारची असामान्यता दिसून आली, तर हा बदल का होतो आहे हे तपासण्यासाठी आणि परिस्थिती नीट समजण्यासाठी दररोज रक्ततपासणी केली जाऊ शकते.
कमी एचसीजी पातळी काय दर्शवते?
एचसीजी ची कमी पातळी खालील गोष्टी सूचित करते
- गर्भधारणेच्या तारखांची चुकीची गणना
- गर्भपात
- ब्लाइटेड ओव्हम
- एकटोपिक प्रेगनन्सी
तुमच्या गरोदरपणात एचसीजीची पातळी कमी असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उच्च एचसीजी पातळी काय दर्शवते?
गरोदरपणात एचसीजी पातळी उच्च असल्यास तुम्ही एकाधिक बाळांसह गरोदर आहात हे सूचित होते. क्वचित प्रसंगी, खालील गोष्टींमुळे सुद्धा एचसीजी पातळी वाढलेली असू शकते.
- डाऊन सिंड्रोम किंवा मोलर गर्भधारणा
- गर्भधारणेच्या तारखांची चुकीची गणना
जर तुम्हाला गरोदरपणात उच्च एचसीजी पातळीबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एचसीजी आणि जुळी बाळे
एचसीजी हे एक संप्रेरक आहे. गर्भधारणा झालेली आहे किंवा नाही हे ह्या संप्रेरकांमुळे समजते. एका बाळासह गरोदर असल्यास, एचसीजी पातळी 70 ते 750 mIU/ml (म्हणजे, मिलि इंटरनॅशनल युनिट्स प्रति मिलीलीटर, जे हार्मोन्स मोजण्यासाठी एक युनिट आहे) पर्यंत बदलते. जुळी बाळे असतील तर गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात एचसीजी पातळी वाढलेली असू शकते. जुळ्या मुलांसाठी सामान्य एचसीजी पातळी एकल गर्भधारणेच्या तुलनेत 30% ते 50% जास्त असते – काहीवेळा सुमारे 200 ते 1750 mIU/ml अशीही दिसून येते.
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात एचसीजीची पातळी दर 2-3 दिवसांनी दुप्पट होऊ शकते. ओव्हुलेशन नंतर 7-8 दिवसांनी केलेल्या रक्त चाचण्या सर्वोत्तम परिणाम देतात. बहुतेक घरगुती चाचण्या पुढील अपेक्षित कालावधीच्या 4 ते 5 दिवस आधी गर्भधारणा ओळखू शकतात.
जुळ्या गर्भधारणेमध्ये एचसीजी पातळीची भूमिका
शरीर एचसीजी तयार करत नाही. उलट पोटात वाढत असलेल्या बाळापासून एचसीजी तयार होते. प्रत्येक विकसनशील बाळ काही प्रमाणात एचसीजी तयार करते. त्यामुळे जुळी बाळे असल्यास हे प्रमाण दुप्पट होते. ही संप्रेरके एकत्रितपणे गर्भाशयाचे अस्तर घट्ट करण्यासाठी कार्य करतात. हे अस्तर गरोदरपणात बाळाला आधार देतात.
प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक आहे आणि ते गर्भधारणेसाठी गर्भाशयाला प्रेरित करते. हे कॉर्पस ल्यूटियम (अंडाशयातील अंतःस्रावी ग्रंथी) द्वारे तयार केले जाते. जोपर्यंत प्लेसेंटा स्वतःचे प्रोजेस्टेरॉन तयार करण्यासाठी पुरेसा विकसित होत नाही तोपर्यंत एचसीजीचा उद्देश प्रोजेस्टेरॉनची पातळी संतुलित राखणे हा आहे.
जुळी बाळे असल्यास, एचसीजीची पातळी लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे रक्त आणि लघवीमध्ये एचसीजी चाचण्यांद्वारे शोधले जाते. दर 48 ते 72 तासांनी ही पातळी दुप्पट होते.
जुळ्या बाळांची गर्भधारणा झाल्यानंतर जास्त प्रमाणात एचसीजी तयार होते आणि त्याचा नकारात्मक परिणाम म्हणजे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात मॉर्निंग सिकनेसचा त्रास होऊ शकतो आणि मळमळ तसेच उलट्या होऊ शकतात.
एचसीजी पातळी चाचणी का केली जाते?
एचसीजी पातळीची चाचणी अनेक कारणांसाठी तपासली जाते
- गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी सामान्यतः एचसीजीची चाचणी केली जाते.
- एक्टोपिक प्रेग्नन्सी ओळखण्यासाठी आणि नंतर निदान करण्यासाठी एचसीजी चाचणी केली जाते. एक्टॉपिक प्रेग्नन्सी मध्ये गर्भ फॅलोपियन ट्यूबमध्ये विकसित होत असतो.
- संभाव्य गर्भपाताचे निदान करण्यासाठी
- रक्तातील पीएपीपी-ए प्रथिनांची पातळी ओळखण्यासाठीही चाचणी केली जाते. ही पातळी कमी असताना गर्भाला डाऊन सिंड्रोम असण्याची शक्यता वाढते.
एचसीजी पातळी तपासण्यासाठीच्या चाचणी दरम्यान वेदना होतात का?
शरीरातील एचसीजी पातळी ओळखण्याचे दोन मार्ग आहेत – पहिली लघवीची चाचणी आणि दुसरी रक्ताची चाचणी होय. रक्ताच्या तपासणी दरम्यान सुई टोचली असता होणाऱ्या थोड्या वेदना वगळता, इतर कोणत्याही वेदना होत नाहीत. जेव्हा स्त्रीला ओव्हुलेशनची तारीख माहिती नसते तेव्हा मासिक पाळी चुकल्यानंतर 10 दिवसांनी यापैकी कोणतीही एक चाचणी करणे चांगले.
जर योग्यरीत्या केली तर लघवीची चाचणी किंवा घरगुती चाचण्या 97% अचूक असतात. येथे, एचसीजी पातळीसाठी, गर्भधारणा चाचणीची पट्टी थेट स्त्रीच्या लघवीशी संपर्कात आणली जाते किंवा ही पट्टी लघवी असलेल्या कपमध्ये घातली जाते. जर पट्टीचा रंग बदलला तर याचा अर्थ चाचणीचा निकाल सकारात्मक आहे.
एचसीजी पातळीसाठी तुम्ही घरगुती मूत्र चाचणी घेण्याची तयारी कशी करू शकता ते येथे दिलेले आहे:
- ही घरगुती गर्भधारणा चाचणी कशी करावी ह्याविषयीच्या तुमच्या चाचणी किटवरील सूचना नीट वाचा.
- किटची एक्स्पायरी तारीख तपासा. ह्या तारखेचा तुमच्या चाचणीच्या परिणामांवर देखील परिणाम होऊ शकतो.
- लघवीची चाचणी घेण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे तुमच्या लघवीतील एचसीजीची पातळी कमी होऊ शकते.
- सर्वात अचूक परिणाम आपल्या दिवसाच्या पहिल्या लघवीसहमिळतील.
- अधिक अचूक परिणामांसाठी तुमची मासिक पाळी चुकल्यानंतर किमान 7-14 दिवसांनी चाचणी घ्या.
रक्तातील एचसीजी ओळखण्यासाठी गुणात्मक रक्त चाचणी हा सर्वात चांगला आणि विश्वासार्ह मार्ग आहे. याशिवाय, रक्तातील एचसीजीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी परिमाणात्मक रक्त चाचण्या केल्या जाऊ शकतात. ही चाचणी प्रोजेस्टेरॉनची पातळी ओळखू शकते, गर्भधारणेचे निरीक्षण करू शकते किंवा एक्टोपिक गर्भधारणा, कर्करोग आणि गर्भपाताच्या शक्यतांचे अचूक निदान करू शकते.
रक्तस्त्राव विकार असलेल्या लोकांना रक्त तपासणी केल्यानंतर समस्या येऊ शकतात. रक्ताचे नमुने घेतल्यानंतर रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते. परंतु, असे होणे दुर्मिळ आहे आणि रक्त चाचण्यांमुळे समस्या येण्याची शक्यता फारच कमी आहे.
एकल आणि जुळ्या गर्भधारणेमध्ये एचसीजी पातळी
एकल गर्भधारणेच्या तुलनेत जुळी किंवा एकाधिक बाळे असतील तर एचसीजीची पातळी खूप वेगळी असते. खाली एक तक्ता आहे आणि ह्या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गर्भधारणांमधील एचसीजी पातळी दिलेली आहे:
जुळ्या किंवा एकल गर्भारपणातील एचसीजी पातळीचा तक्ता | ||||
शेवटच्या मासिक पाळीपासून दिवस | एका बाळासह गरोदर असताना एचसीजी पातळी |
एकापेक्षा जास्त बाळांसह गरोदर असताना एचसीजी पातळी
|
||
28 | 9.4-120 | 9.5-120 | ||
33 | 300-600 | 200-1,800 | ||
36 | 1,200-1,800 | 2,400-36,000 | ||
40 | 2,400-4,800 | 8,700-108,000 | ||
45 | 12,000-60,000 | 72,000-180,000 | ||
70 | 96,000-144,000 |
348,000-480,000
|
*एलएमपी = शेवटची मासिक पाळी
एचसीजी किती वेळा वाढते?
जसजशी गर्भाशयात भ्रूणाची वाढ आणि विकास होत असतो, तसतसे एचसीजीचे प्रमाण वेगाने वाढते. हे प्रमाण दर 2-3 दिवसांनी अंदाजे दुप्पट होते.
एचसीजीची पहिली पातळी बेसलाइन पातळी मानली जाते. हा स्तर डॉक्टरांसाठी महत्त्वाचा आहे कारण ही पातळी दुप्पट होण्यास किती वेळ लागतो ह्या संकल्पनेवर आधारित तुमची गर्भधारणा कशी होत आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरली जाते.
जसजसे गर्भारपणाचे दिवस पुढे सरकतात तसतसे, एचसीजी तयार होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. एचसीजीचे मूल्य 1200 – 6000 mIU/ml असल्यास विकसित होण्यासाठी 72 – 96 तास लागतात. 6000 mIU/ml वरील एचसीजी पातळी दुप्पट होण्यासाठी चार किंवा अधिक दिवस लागतात. एकदा एचसीजी पातळी 1000 – 2000 mIU/ml वर गेली की, गॅस्टेशनल सॅक बघण्यासाठी ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड केले जाऊ शकते. एकदा एचसीजी पातळी 6000 mIU/ml च्या वर गेल्यावर एचसीजी पातळीतील वाढ मंदावते आणि उर्वरित गर्भारपणात सुसंगत राहते. परिमाणवाचक रक्त चाचण्यांद्वारे डॉक्टर गर्भाच्या विकासाचे काळजीपूर्वक निरीक्षण करू शकतात.
एचसीजी पातळी 6000 mIU/ml वर पोहोचल्यानंतर सोनोग्राम केला जाऊ शकतो कारण ह्या अल्ट्रासाऊंड दरम्यान गर्भधारणेचे स्पष्ट चित्रण मिळते. एचसीजी पातळीबद्दल शंका असल्यास अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंग करणे देखील सामान्य आहे. सोनोग्राम केल्याने गर्भाच्या वयाचे आणि वाढीचे मूल्यांकन केले जाते आणि गर्भाचे वय निश्चित करण्यात मदत होऊ शकते कारण रक्तातील एचसीजीच्या पातळीमध्ये त्यामुळे बदल होण्याची शक्यता असते. ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन खूप सामान्य आहेत कारण ते पोटाच्या स्कॅनपेक्षा अधिक अचूक आहे.
टीप: एचसीजी पातळी कमी असल्यास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण ते गर्भपात, किंवा एक्टोपिक गर्भधारणेचे लक्षण असू शकते. म्हणून, त्याचे निदान करण्यासाठी नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे.
एचसीजीची पातळी कमी असूनही निरोगी बाळ जन्माला घालणे शक्य आहे. अशा परिस्थितीत, गर्भधारणेच्या 5 – 6 आठवड्यांनंतर अल्ट्रासाऊंडचे परिणाम हे परिमाणात्मक एचसीजी चाचणीच्या परिणामांमधून मिळालेल्या संख्येच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह असतात.
एचसीजीच्या पातळीवर काय परिणाम होऊ शकतो?
खालील कारणांमुळे एचसीजी पातळीवर परिणाम होऊ शकतो.
1. एकाधिक गर्भधारणा
आईच्या पोटातील प्रत्येक बाळ सामान्य प्रमाणात एचसीजी तयार करते. त्यामुळे शरीरातील एकूण एचसीजी पातळी वाढते. जुळे,तिळे किंवा त्याहून अधिक बाळे असलेल्या (सामान्यत: वृद्ध स्त्रियांनी अनुभवलेल्या) केसेस मध्ये, गरोदरपणातील एचसीजी पातळी सामान्य पातळीच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट असू शकते.
2. अनुवांशिक दोष
आनुवंशिक समस्यांमुळे गरोदरपणात एचसीजीची पातळी अत्यंत वाढू शकतो. एचसीजीची पातळी खूप जास्त असल्यास बाळाला डाऊन सिंड्रोम झाला असण्याची शक्यता असते. मोलर प्रेग्नन्सी असल्यास देखील होऊ शकते जेथे प्लेसेंटा पेशींच्या असामान्य गोळ्यामध्ये विकसित होते. त्यामुळे गरोदर स्त्रीच्या पोटातील बाळाचा मृत्यू होऊ शकतो. पोटातच बाळाचा मृत्यू झाला आहे किंवा नाही हे काहीवेळा समजते तर काहीवेळा समजत नाही.
3. अनुवांशिक समस्या
आनुवंशिक समस्यांमुळे एचसीजीची पातळी कमी होते. त्यामुळे एक्टोपिक प्रेग्नन्सी किंवा गर्भपात होऊ शकतो. असे गर्भारपण संपुष्टात येऊ शकते.
4. कर्करोग
गर्भाशय, पोट, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड आणि मोठ्या आतड्यांमधील कर्करोग इत्यादींमुळे एचसीजी पातळी वाढू शकते.
5. प्रभावित करणारे घटक
खूप लवकर घेतल्या जाणाऱ्या गर्भधारणा चाचण्या किंवा खूप उशिरा घेतल्या जाणाऱ्या गर्भधारणा चाचण्या ह्यामुळे गर्भधारणेचे नकारात्मक परिणाम मिळू शकतात. दिवसाच्या पहिल्या लघवीची चाचणी करून तुम्ही सर्वात अचूक परिणाम मिळवू शकता.
6. वंध्यत्व उपचार
अनेकदा, वंध्यत्व नसलेल्या महिलांवर उपचार करण्यासाठी एचसीजी इंजेक्शन दिले जाते, त्यामुळे शरीरातील हार्मोनची पातळी पुन्हा वाढते.
एचसीजीची पातळी जास्त असल्यास तुम्हाला जुळी मुले होतील असा त्याचा अर्थ होतो का?
लघवीमध्ये जास्त प्रमाणात एचसीजी असणे हे जुळे किंवा एकाधिक बाळांसह गर्भधारणा झाल्याचे लक्षण असू शकते, परंतु हे नेहमीच खरे असू शकत नाही. या संप्रेरकाची पातळी प्रत्येक -स्त्रीमध्ये बदलू शकते किंवा गरोदरपणात बदलू शकते.
एचसीजीची पातळी वाढली नाही तर काय?
जर गर्भधारणेच्या सुरुवातीच्या 8 ते 10 आठवड्यांमध्ये एचसीजीची पातळी वाढली नाही, तर ही चिंतेची बाब असू शकते. एचसीजी पातळी मध्ये बदल का होत आहेत हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर वारंवार रक्त तपासणी करण्यास सांगतील. जर एचसीजी पातळी घसरली किंवा ती स्थिर रहात असेल तर गरोदरपणात सामान्य प्रगती होत नाहीये असा त्याचा अर्थ होतो.
गरोदरपणातील प्रगती अचूक जाणून घेण्यासाठी एचसीजी पातळी तपासली पाहिजे तसेच त्यासोबत अल्ट्रासाऊंड तपासणी सुद्धा केली पाहिजे. जर गॅस्टेशनल सॅक दिसत नसेल तर आईने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गरोदरपणात एचसीजीच्या पातळीमध्ये खूप फरक दिसून येतो आणि जुळी गर्भधारणा ओळखण्यात एक महत्त्वाचा घटक असू शकतो. परंतु, एचसीजी पातळी वाढलेली असल्यास तुम्हाला जुळी मुलेच होणार आहेत असे नाही. कारण एचसीजी पातळी वाढण्यामागे इतरही कारणे असू शकतात.
आणखी वाचा:
गर्भाशयातील जुळ्या बाळांची हालचाल – बाळांच्या हालचालीचा अनुभव घेताना