Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य मुलांच्या शौचाद्वारे रक्त पडणे – कारणे आणि उपचार

मुलांच्या शौचाद्वारे रक्त पडणे – कारणे आणि उपचार

मुलांच्या शौचाद्वारे रक्त पडणे – कारणे आणि उपचार

मुले अनेकदा स्वतःला दुखापत करून घेतात आणि आजारी पडतात. हे लहान मुलांच्या वाढीचे नेहमीचे चक्र आहे. परंतु सामान्य नसणाऱ्या काही विशिष्ट घटना धोक्याची घंटा ठरू शकतात. तुमच्या मुलाच्या शौचाद्वारे रक्त पडणे ही अशीच एक घटना आहे. त्यानंतर अंतर्गत दुखापत झाली असेल का असा विचार येणे साहजिक आहे परंतु नेहमीच ही समस्या तितकी गंभीर असेल असे नाही. म्हणूनच, रक्त येण्यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

मुलाच्या शौचातून रक्त कशामुळे येते?

मुलाच्या शौचातून रक्त कशामुळे येते?

मुलांमध्ये रक्तरंजित मल होण्याची काही कारणे येथे आहेत

. हिर्शस्प्रंग डिसीज

ही समस्या सहसा नवजात मुलांमध्ये आढळते आणि बाळ जन्मल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये ही स्थिती आढळते. ही एक गंभीर स्थिती आहे. ह्या स्थितीमध्ये बाळाच्या आतड्यात कमी मज्जातंतू पेशी असतात किंवा त्या अजिबात नसतात. यामुळे आतड्यांच्या कोणत्याही हालचाली करण्यात अपयश येते, पोट फुगते आणि बाळाला उलट्या होतात. अशा प्रकरणांमध्ये शौचामध्ये रक्त आढळते.

. रक्ताचे विकार

काही वेळा शौचामध्ये रक्त आढळण्याचे कारण गुदाशयामधली समस्या नसून रक्तामध्येच काहीतरी समस्या असू शकते. रक्ताच्या गुठळ्या किंवा रक्तवाहिन्यांच्या निर्मितीमध्ये कोणतीही समस्या असल्यास मलाशयातून रक्तस्त्राव होऊ शकतो. जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा संपूर्ण शरीरावर पुरळ किंवा फोड येतात.

3. मिकल्स डायव्हर्टिकुलम

हे विचित्र नाव एका विकृतीचे आहे. ह्यामध्ये जन्मजात अपंगत्व असते. जन्मानंतर जेव्हा बाळाची नाळ कापली जाते तेव्हा हे घडते. ह्या समस्येमध्ये, नाळेचा एक तुकडा मागे राहू शकतो आणि बाळाच्या लहान आतड्याच्या खालच्या भागात जातो. नाळेच्या या भागाच्या पेशी आम्ल स्त्राव सुरू करतात. आतड्यात ह्या ऍसिडमुळे जळजळ आणि अल्सर होतात, त्यामुळे गुदाशयातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

. पॉलीप्स

ही स्थिती मुख्यतः २ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दिसून येते. पॉलीप्स मोठ्या आतड्याच्या आतील बाजूने वाढतात. पहिल्या दृष्टीक्षेपात, ते कर्करोगासारखे वाटू शकतात पण तसे ते नसतात. साधारणपणे, मल बाहेर पडल्यावर हे पॉलीप्स फुटतात आणि त्यामुळे रक्तस्त्राव होतो, पण वेदना होत नाहीत.

. संसर्गासह अतिसार

अन्न विषबाधा, अतिसार ह्या समस्या, मुले आणि प्रौढांना होतात. हानिकारक जिवाणू, परजीवी किंवा अगदी विषाणूंमुळे दूषित असलेल्या कोणत्याही अन्नपदार्थाचे सेवन केल्यावर ते पचन संस्थेत प्रवेश करतात आणि पचन संस्थेला संसर्ग होतो. परिणामी अतिसार होतो आणि शौचातून रक्त येते.

. स्तनपान

होय, शौचामध्ये रक्त आढळण्यामागे स्तनपान हे एक कारण असू शकते. तथापि, हे रक्त बाळाचे नसून आईचे असते. आईची स्तनाग्रे कोरडी आणि फाटलेली असतात. जेव्हा बाळ स्तनपान घेत असते तेव्हा स्तनाग्रांच्या भेगांतून रक्त येऊ लागते आणि बाळाच्या पोटात ते दुधाद्वारे जाते. रक्ताचे हे थेंब बाळाच्या शौचामध्ये दिसतात.

. इरिटेबल बाउल सिंड्रोम

आयबीएस म्हणून हा सिंड्रोम प्रसिद्ध आहे. अनेक मुले आणि काही प्रौढांना याचा त्रास होतो. ह्या समस्येमध्ये आतड्यांच्या हालचाली अनियमित असतात. परिणामी बद्धकोष्ठता आणि अतिसार होतो. सतत अतिसार आणि आतड्यांसंबंधी स्नायूंची जबरदस्ती हालचाल केल्याने रक्तपेशी फुटू शकतात, परिणामी गुदाशयात रक्तस्त्राव होतो.

. क्रोहन डिसीज

पचन संस्थेच्या आतील आवरणावर हा संसर्ग होतो. कोलायटिसचा हा एक प्रकार आहे. या संसर्गामुळे पचनसंस्थेत अल्सर होतात त्यामुळे तीव्र सूज होते. मल जात असताना हे अल्सर फुटू शकतात, परिणामी शौचातून रक्त येते.

. दूध किंवा सोया असहिष्णुता

दुग्धजन्य पदार्थांची, विशेषत: गायींच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांबद्दल विशिष्ट संवेदनशीलता असल्यास, रक्तरंजित मल होऊ शकतो. जेव्हा गाय किंवा सोया दुधात तयार केलेला फॉर्मुला बाळाला दिला जातो, तेव्हा संक्रमणासारखी प्रतिक्रिया येते. यामुळे बाळाला उलट्या होतात, अतिसार होतो आणि शौचाद्वारे रक्त येते. आईने जर गाईचे दूध घेतले तर बाळापर्यंत ते स्तनपानाद्वारे पोहोचू शकते.

१०. गुदाशयाला चिरा पडणे

फिशर किंवा गुदाशयाच्या आतील आवरणाला चिरा पडल्यामुळे मल बाहेर निघताना रक्तस्त्राव होऊ शकतो. बद्धकोष्ठता आणि जबरदस्तीने शौचाचा प्रयत्न केल्यास गुदाशयावर ताण पडतो आणि त्यामुळे शौचास झाल्यावर ह्या चिरांमधून रक्तस्त्राव होतो.

मुलांच्या शौचातून रक्त येत असेल तर त्यावर उपचार कसा करावा?

बहुतांश मुलांमध्ये, शौचातून रक्त पडण्याचा त्रास हा अतिसारामुळे होतो. जीवाणू आणि परजीवी दूषित अन्न खाल्ल्यानंतर हा त्रास होतो. बद्धकोष्ठताग्रस्त मुलांमध्ये, फिशर्स मुळे मल बाहेर पडताना रक्तस्रावाचा त्रास होतो. साधारणपणे, द्रवपदार्थांचे सेवन वाढवून किंवा मल मऊ करणारे वंगण वापरून अशा परिस्थितीची काळजी घेतली जाऊ शकते आणि असे केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होत नाही आणि शौचास सहजपणे होते.

पचनसंस्थेच्या समस्येमुळे रक्तस्त्राव होत असेल तर डॉक्टर एन्डोस्कोपी आणि योग्य ते उपचार करू शकतात. संक्रमणाच्या उपचारांसाठी, विशिष्ट भागासाठी औषधे थेट एन्डोस्कोपद्वारे दिली जाऊ शकतात. लेझर, हीटर किंवा इलेक्ट्रिक कोग्युलेशन तंत्रांचा वापर अंतर्गत रक्तस्त्राव हाताळण्यासाठी आणि थांबवण्यासाठी केला जाऊ शकतो. वाईट परिस्थितीत, शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. एंडोस्कोप वापरून पॉलीप्स काढले जाऊ शकतात.

रक्तस्त्राव पुन्हा होऊ नये म्हणून वरील उपचारांनंतर औषधोपचार केले जातात. अशा औषधांमुळे मल मऊ होऊन शौचास सुलभ होते. तसेच संक्रमण आणि अल्सर इत्यादींचा सामना करता येतो.

शौचाद्वारे रक्त पडत असेल तर त्यावर घरगुती उपचार

शौचाद्वारे रक्त येत असेल आणि तुम्ही त्यावर घरगुती उपचार शोधत असाल तर, येथे काही टिप्स दिलेल्या आहेत

  • शौचाद्वारे रक्त पडत असेल तर सर्वात जलद आणि सोपा मार्ग म्हणजे बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घालणे. ह्याला सिट्झ बाथ असेही म्हणतात. कोमट पाण्याने एक टब भरा आणि आपल्या मुलाला त्यात बसू द्या जेणेकरून त्याच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे पाण्याखाली बुडेल. आंघोळीच्या पाण्यात थोडे अँटीसेप्टिक द्रावण घातल्याने कोणतेही बाह्य जीवाणू काढून टाकण्यास मदत होते आणि वेदनांपासून आराम मिळतो
  • जर बद्धकोष्ठता आणि जबरदस्तीने शौचास केल्याने गुदद्वाराला चिरा आणि फिशर्स उद्भवले असतील, तर तुम्ही गुदद्वाराच्या क्षेत्राभोवती बर्फ पॅक लावावा. कोल्ड पॅक ५१० मिनिटांसाठी लावल्यास वेदनांपासून त्वरित आराम मिळू शकतो
  • रोजच्या आंघोळीदरम्यान, गुदद्वाराची जागा स्वच्छ करताना जास्त काळजी घ्या. सौम्य होण्यासाठी आणि पुढील संसर्ग टाळण्यासाठी तो संपूर्ण भाग स्वच्छ करण्यासाठी स्पंज वापरा
  • शौचातून रक्त पडायचे थांबेपर्यंत, आपल्या मुलासाठी डायपर वापरायचे टाळणे चांगले. गुदद्वारभोवती रक्तरंजित मल तसाच ठेवल्याने हा भाग अस्वच्छ होऊन संसर्ग होतो. जर डायपरची गरज असेल तर शौचास झाल्यानंतर ते लगेच बदलावे
  • पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे. सकाळी एक ग्लास पाणी आणि दिवसभर भरपूर पाणी प्यायल्यास मल मऊ होण्यास मदत होते
  • तंतुमय पदार्थ असलेला आहार घेतल्यास आतड्यांची हालचाल सुधारली जाऊ शकते. ह्यामुळे मल तयार करण्यास मदत होते आणि ते सहजपणे बाहेर टाकले जाते. तसेच त्यामुळे बद्धकोष्ठता आणि फिशर होत नाहीत

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

घरगुती उपचारांचा उपयोग झाला नाही तर ह्या समस्येसाठी वैद्यकीय सल्ला घेणे चांगले. आपल्याला खालील चिन्हे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • गुदद्वाराच्या भागाला जखम होणे
  • रक्ताच्या उलट्यांसह ओटीपोटात तीव्र वेदना
  • सतत रक्तमिश्रित गडद रंगाचे मल
  • मूल आजारी असल्यास आणि त्याला ताप आलेला असल्यास

आपल्या मुलाच्या शौचामध्ये रक्त दिसणे भितीदायक आहे परंतु असामान्य नाही. सामान्य कारणांमध्ये अयोग्य आहार किंवा बाह्य संसर्ग ह्यांचा समावेश होतो. योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास तुमच्या लहान मुलाचा दिनक्रम सुरळीत सुरु होईल.

आणखी वाचा:

मुलांना होणाऱ्या खोकल्यावर २८ सुरक्षित घरगुती उपाय
मुलांमधील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) २० परिणामकारक घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article