Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षकदिनासाठी 45 शुभेच्छासंदेश,मेसेजेस आणि कोट्स

शिक्षकदिनासाठी 45 शुभेच्छासंदेश,मेसेजेस आणि कोट्स

शिक्षकदिनासाठी 45 शुभेच्छासंदेश,मेसेजेस आणि कोट्स

आपल्या जीवनात आपल्याला घडवण्यात आई, वडील आणि गुरु ह्यांचा मोठा वाटा असतो. शिक्षक आपल्याला जीवनात एक व्यक्ती म्हणून तर घडवतातच परंतु जीवनात चांगल्या वाईट गोष्टींची ओळख सुद्धा करून देतात.5  सप्टेंबर हा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस असतो. दर वर्षी 5 सप्टेंबर भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या गुरुविषयी आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.

ह्या शिक्षकदिनी तुमच्या गुरूंचे आभार मानण्यासाठी आम्ही इथे काही शुभेच्छा संदेश आणि मेसेजेसचा संग्रह देत आहोत. गुरूंची, शिक्षकांची प्रत्यक्षात भेट झाली नाही तर तुम्ही हे मेसेजेस त्यांना व्हाट्सअपद्वारे पाठवून तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

शिक्षकदिनाच्या 35 शुभेच्छासंदेश

1. तुमच्या सारखा गुरु मला लाभला हा माझ्यासाठी परमेश्वराचा मोठा आशीर्वाद आहे. वेळोवेळी मला योग्य दिशा दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

2. आई,वडील आणि गुरु ह्यांचा माझे आयुष्य घडवण्यात मोलाचा वाटा आहे. ह्या तिघांना नमन आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

3. माझा मनात ज्ञानाचा दीपक उजळवणाऱ्या शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम

4. तुम्ही माझे प्रेरणास्थान,आधारस्तंभ आणि दिशादर्शकआहात, तुम्हाला शिक्षकदिनाच्या खूप शुभेच्छा!

5. मी आज जो कोणी आहे तो केवळ तुमच्यामुळेच. माझा यशाचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो.

6. मला मोठी स्वप्न बघायला शिकवलीत आणि ती कशी पूर्ण करायची ह्याचे वेळोवेळी मार्गदर्शन केलेत त्यासाठी मी कायम आपला ऋणी राहीन

7. गुरु देतो चांगल्या-वाईटाची जाण, गुरु म्हणजे ज्ञानाची खाण!

8. निरपेक्ष भावनेने ज्ञानाचा वारसा देणारा गुरु म्हणजे परमेश्वरस्वरूप -शिक्षकदिनाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद!

9. जीवनातील आत्यंतिक आदराचे स्थान म्हणजे गुरु

10. जीवनाच्या कोऱ्या पाटीवर, सप्तरंगी इंद्रधनुसारखे रंग भरणारे शिक्षक – तुम्हास नमन आणि शुभेच्छा!

11. तुमच्यासारखा गुरु लाभणे हे माझ्यासाठी परम भाग्याचे लक्षण आहे – खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!

12. जीवनात प्रकाश घेऊन येणारा तो गुरु, यशाची वाट दाखवणारा तो गुरु!

13. जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देऊन जीवन सुंदर करणारी व्यक्ती म्हणजे आपला गुरु!

14. गुरुविण नाही दुजा आधार, माझा आधारस्तंभ असलेल्या शिक्षकांना आदरपूर्वक नमस्कार

15. आयुष्याच्या वाटेवर चालताना कधी पाठीवर शाबासकी तर कधी हातावर छडी देऊन दिशा दाखवणाऱ्या माझ्या गुरूला वंदन!

16. शिकणं थांबलं की जगणं थांबते. शिक्षणामुळे आयुष्य सुंदर करणाऱ्या गुरूंना सादर प्रणाम!

17. तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना नमस्कार

18. तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात, तुमचा आशीर्वाद अखंड माझा सोबत राहो!

19. जे जे उत्तम ते ते दिलंत. उत्तमाचा ध्यास लावणाऱ्या माझा गुरुवर्यांना नमन ..

20. स्वतःचे सर्व आयुष्य विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यात घालवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा!

21. पुस्तकी ज्ञानासोबतच जीवन जगायला शिकवणाऱ्या शिक्षकांना सलाम!

22. गणित विषय शिकवताना आयुष्याचे गणित कधी शिकवून गेलात ते कळलंच नाही – शिक्षकदिनाच्या खूप शुभेच्छा

23. अज्ञान दूर करून ज्ञानाची कवाडे आमच्यासाठी खुली करणाऱ्या शिक्षकांना आदरपूर्वक नमन.

24. आम्हाला घडवण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत – खूप आभार आणि शुभेच्छा!

25. अपयश आले तरी हार न मानता जिद्दीने पुढे कसे जायचे हे शिकवणाऱ्या माझ्या प्रेरणादायी शिक्षकांना शतशः नमन

26. पंखांना बळ देऊन उडायला शिकवणाऱ्या माझा गुरूंना प्रणाम

27. चांगला गुरु लाभणं हे परम भाग्याचा क्षण असतो आणि माझ्या आयुष्यात तो आनंद मी घेतला – माझा सर्व गुरूंना शुभेच्छा!

28. तुमच्याकडून आलेला कौतुकाचा एक एक शब्द म्हणजे परमेश्वराचे अनंत आशीर्वाद – शिक्षकदिनाच्या शुभेच्छा

29. गुरूचा सहवास लाभणे ही जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे, आणि मला तो लाभला हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे – शिक्षकदिनाच्या खूप शुभेच्छा

30. आईसमान असलेल्या शाळेतील बाईंना आदरपूर्वक नमस्कार

31. तुम्ही आम्हाला शिकवलेत आणि घडवलेत सुद्धा! धन्यवाद आणि शुभेच्छा

32. तुम्ही आमच्यासाठी ऊर्जेचा अखंड स्रोत आहात. तुम्ही ज्ञानरूपी ऊर्जेने आमचे आयुष्य उजळवल्याबद्दल धन्यवाद!

33. शिक्षक आणि पालक हे तुमच्या आयुष्यातील दीपस्तंभ असतात – दिशा दाखवणाऱ्या आणि प्रसंगी भक्कम आधारस्तंभ असलेल्या माझा शिक्षकांना प्रणाम!

34. गुरु म्हणजे माऊली, गुरु ज्ञानाची सावली – शुभेच्छा आणि धन्यवाद!

35. तुमचे प्रेम आणि शिकवण ह्यामुळे आम्ही घडत गेलो – शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!

शिक्षकदिनासाठी 10 कोट्स

1. आयुष्यात गुरुचं स्थान अद्वितीय आहे, आणि त्याचे वर्णन शब्दात करता येत नाही

2. गुरु तोचि देव, गुरु परब्रह्म

3. गुरुविण कोण दाखवील वाट, आयुष्य हा दुर्गम अवघड घाट

4. गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गरुःदेवो महेश्वरा, गुरु शाक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः

5. लोखंडाचे सोने करणारा परीस म्हणजे गुरु

6. गुरु म्हणजे प्रेरणास्थान, गुरु म्हणजे भक्कम आधार

7.आपल्याला स्वतःची ओळख करून देणारा परमेश्वर म्हणजे गुरु

8. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा

9. गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा

10. गुरूशिवाय काहीही सध्या नाही. गुरु चिरंतन आहे

तुम्हाला ह्या शिक्षकदिनाच्या शुभेच्छा आवडल्या असतील तर तुमच्या गुरुजनांना नक्की पाठवा आणि तुमच्या त्यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article