गर्भधारणेच्या नवव्या महिन्यातील आहार (३३-३६ आठवङे)

गर्भधारणेच्या नवव्या महिन्यातील आहार

गर्भारपण म्हणजे तुम्हाला मिळालेला एक आशीर्वाद आहे. तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेत असता. नववा महिना म्हणजे तिसऱ्या तिमाहीचे, प्रसूतीच्या आधीचे काही दिवस होय. त्यामुळे ह्या कालावधीत तुम्हाला जितके जास्त निवांत राहून आराम करता येईल तितका करा. तुम्हाला हालचाल करताना जड आणि अस्वस्थ वाटेल, परंतु तुमच्या बाळाला भेटण्याची ओढ आणि उत्साह तुम्हाला होणाऱ्या सगळ्या त्रासावर मात करेल.

तुमचं बाळ तुमच्या हातात येण्यासाठी तुम्ही ९ महिने वाट पहिली आहे आणि प्रत्येक तिमाहीत अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागली आहे आणि विशेषकरून तिसऱ्या तिमाहीमध्ये, तुमच्या स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी तुमचा आहार आणि जीवनशैली नीट नियोजन केलेली असली पाहिजे.

गर्भारपणातील ९ व्या महिन्यातील तुमचा आहार

नवव्या महिन्यात  तुमच्या बाळाची वाढ जवळजवळ पूर्ण झालेली आहे. आता बाळ थोडंसं बाळसं धरू लागले आहे आणि त्यामुळे बाळाचे वजन हळूहळू वाढू लागले आहे. फुप्फुसे आणि मेंदू ह्या दोन्ही अवयवांचा विकास होत आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीप्रमाणेच आतासुद्धा आरोग्यपूर्ण आणि पोषक आहार घ्या, परंतु तो थोडा जास्त प्रमाणात घ्या, कारण ह्या दिवसात बाळाचे वजन वाढले पाहिजे.

तुमच्या तिसऱ्या तिमाहीतील आहारात समावेश असलाच पाहिजे असे पोषक पदार्थ

१. खूप जास्त तंतूमय पदार्थ असलेले अन्न खा.

तुमचा आहार म्हणजे सगळ्या पोषक पदार्थांचे मिश्रण असले पाहिजे. ताज्या हिरव्या पालेभाज्या, फळे, सीरिअल्स, ओट्स आणि संपूर्ण धान्याने बनवलेल्या सगळ्या अन्नपदार्थांचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे.

२. कॅल्शिअमचे जास्त प्रमाण असलेले पदार्थ खा.

गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही कॅल्शियमने समृद्ध असलेले पदार्थ घेतले पाहिजेत. तुमच्या बाळाची वाढ होत असल्याने त्याला/तिला खूप कॅल्शिअमची गरज भासते कारण त्यामुळे हाडांना बळकटी मिळते.

३. लोहाने समृद्ध असलेले पदार्थ खा.

ह्या टप्प्यावर लोहाच्या कमतरतेची समस्या बऱ्याच महिलांमध्ये आढळते. जरी दुसऱ्या तिमाहीपासून पूरक औषधे दिली असतील तरी, तुमचा आहार हा लोहाचा मोठा स्रोत समजला जातो.

मनुके, ब्रोकोली, चिकन, बेरी, अंडी, लाल पालक ह्या सगळ्यातून तुम्हाला लोह सहजपणे मिळू शकते. ह्यापैकी ३ अन्नपदार्थ दररोज घ्या.

लोहाने समृद्ध असलेले पदार्थ

४. व्हिटॅमिन सी युक्त अन्नपदार्थ खा.

भरपूर टोमॅटो, कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली आणि मोसंबी खा. ह्या सगळ्यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते.

५. फॉलीक ऍसिड जास्त प्रमाणात असलेले अन्नपदार्थ खा.

तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी फॉलीक ऍसिड ही अगदी महत्वाची गरज आहे, विशेषकरून पाठीच्या मणक्याच्या विकासासाठी त्याची अत्यंत गरज असते.पहिल्या तिमाहीनंतर फॉलीक ऍसिड साठी कुठलीही पूरक औषधे दिली जात नाहीत त्यामुळे बीन्स, हिरव्या पालेभाज्या, छोले वगैरेचा समावेश तुमच्या आहारात करा.

६. व्हिटॅमिन अ जास्त प्रमाणात असलेले अन्नपदार्थ खा.

बाळाच्या डोळ्यांच्या विकासासाठी व्हिटॅमिन अ सर्वात गरजेचे आहे, आणि आईच्या डोळ्यांची सुद्धा काळजी घेण्यास मदत होते.

जर तुम्ही तिसऱ्या तिमाहीत असाल, तर तुमच्या मनात एकाच गोष्टीचा विचार असतो आणि तो

म्हणजे प्रसूतिविषयी. त्यामुळे नवव्या महिन्यात तुम्ही काय खाल्ले पाहिजे ते खालीलप्रमाणे:

तूप हा खूप उत्तम अन्नपदार्थ आहे त्यामुळे आरामात राहण्यास आणि नॉर्मल प्रसूतीस मदत होते. आयुर्वेदात औषधी तूप बनवले जाते आणि ७व्या महिन्याच्या पुढे ते गरोदर स्त्रियांना दिले जाते. ते बाळ आणि आई दोघांसाठी चांगले असते आणि खालील गोष्टींमध्ये त्याची मदत होते,

 • नॉर्मल प्रसूती
 • मन:स्थितीत बदल
 • बद्धकोष्ठता
 • स्नायू शिथिलता वगैरे

तुमच्या ९व्या महिन्यात खालील अन्नपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा

 • ताजी फळे – कमीत कमी दोन फळे दर. रोज
 • संपूर्ण धान्य पदार्थ उदा: चपाती किंवा ब्रेड
 • दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ उदा: तूप,चीझ
 • प्रथिनांनी समृद्ध पदार्थ उदा: मासे आणि मांस
 • सर्व प्रकारच्या भाज्या विशेषकरून हिरव्या पालेभाज्या

भरपूर प्रमाणात स्वच्छ पाणी प्या ज्यामुळे तुमच्या शरीरातील सगळी विषारी द्र्व्ये शरीराच्या बाहेर टाकली जातील आणि तुम्ही सजलीत रहाल

पोषक आहार घ्या त्यामुळे तुम्ही निरोगी रहाल आणि तुम्हाला लागणारी ऊर्जा सुद्धा त्यातून मिळेल. असे केल्याने प्रसूतीच्या आधी आणि नंतरची गुंतागुंत दूर राहील. संतुलित आहार घेतल्याने जळजळ आणि बद्धकोष्ठता ही सामान्यतः आढळणारी लक्षणे दूर राहतील. तसेच तुमच्या बाळाचा नीट विकास होतो आणि त्यामुळे बाळ निरोगी असते,म्हणजेच तुमच्या आनंदाचा अमूल्य ठेवा!

नवव्या महिन्यादरम्यान कुठले पदार्थ टाळले पाहिजेत?

तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या पहिल्या दिवसापासून जे अन्नपदार्थ दूर ठेवले आहेत तेच तुम्ही गर्भारपणाच्या ९व्या महिन्यात सुद्धा दूर ठेवले पाहिजेत. जे अन्नपदार्थ गर्भारपणाच्या ९ व्या महिन्यात टाळले पाहिजेत त्यांची यादी खाली दिली आहे.

१. कॅफेन

गर्भारपणाच्या सगळ्या टप्प्यावर कॅफेन हानिकारक समजले जाते. त्यामुळे कॅफेन टाळणे उत्तम. जरी तुम्ही कॅफेनयुक्त पेय प्यायले तरीसुद्धा ते २०० मिलिग्रॅम/ दिवस इतकेच मर्यादित असावे. चॉकलेट मध्ये सुद्धा कॅफेन असते त्यामुळे मर्यादित प्रमाणात ते घेणे चांगले.

२. मद्य

मद्य सगळ्याच दृष्टीने हानिकारक आहे त्यामुळे तुमच्या संपूर्ण गर्भारपणात मद्यपान संपूर्णपणे टाळा.

मद्यपान संपूर्णपणे टाळा ३. मऊ चीझ

हे चीझ पाश्चराईझ केलेले नसते आणि त्यामुळे बाळाला लिस्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो, जे तुमच्या बाळासाठी हानिकारक असते त्यामुळे त्यापासून दूर रहा.

४. तंबाखू

जर तुम्ही तंबाखू खात असाल तर ती सोडा कारण तुमच्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

५. कच्चे सी फूड

जे सी फूड कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले असते ते टाळा कारण त्यामध्ये हानिकारक जिवाणू असतात.

गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीत फक्त अन्नामधून ओमेगा ३ फॅटी ऍसिड मिळणे कठीण आहे. विशेषकरून ओमेगा ३ साठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ तुम्ही घेऊ शकता. त्यापैकी काही म्हणजे व्हेजिटेबल ऑईल आणि कमी पारा असलेले मासे इत्यादी होय. जर ओमेगा ३ हे तुमच्या शरीरात कमी असेल तर डॉक्टर्स पूरक औषधे देतात. तिसऱ्या तिमाहीदरम्यान डॉक्टर्स म्हणतात की बाळाला ७० मिली ग्रॅम इतके ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स लागतात ज्यामुळे तिच्या/त्याच्या वाढत्या वयाच्या गरजा भागतात.

गर्भारपणाच्या ९व्या महिन्यातील आहार टिप्स

समृद्ध आहार हा लागणाऱ्या पोषणमूल्यांचा उत्तम स्रोत आहे, पण जर पुरेशी पोषणमूल्ये अन्नातून नीट शोषली गेली नाहीत तर तुम्हाला पूरक औषधे घेतली पाहिजेत. तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही ह्याविषयी संपर्क साधत आहात ना ह्याची खात्री करा.  काही पूरक औषधे लिहून दिली जातात ती खालीलप्रमाणे:

 • लोहयुक्त पूरक औषधे
 • मल्टीव्हिटॅमिन पूरक औषधे
 • कॅल्शिअम
 • मल्टी मिनरल पूरक औषधे
 • फॉलीक ऍसिड पूरक औषधे

आणि खालील यादी मध्ये दिलेले अन्नपदार्थ जेव्हा शक्य आहे तेव्हा टाळा कारण ते कमी पोषक असतात आणि त्यामुळे नको असलेले वजन वाढते आणि पोषण मिळत नाही.

 • चरबी आणि साखर जास्त असलेले पदार्थ
 • तळलेले पदार्थ
 • चॉकलेट
 • चीझ
 • गोड पदार्थ

पोषण नसलेल्या अन्नपदार्थांच्या पर्यायांऐवजी भरपूर प्रमाणात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य आणि दूध घ्या .

 • तुमचे जेवण तीनदा घेण्याऐवजी ६-७ भागांमध्ये विभाजित करा
 • पाणी हे जीवनावश्यक पेय आहे, दोन जेवणाच्या मध्ये जितके घेता येईल तितके घ्या
 • कमी चरबी असलेले दूध तुमची हाडे मजबूत ठेवते आणि बाळाच्या जन्मानंतर लवकरात लवकर स्तनपानास मदत करते.
 • सुकामेवा आणि बिया खा, खूप जास्त नाही पण चांगली चरबी मिळेल इतपत खा
 • दररोज १५ ते ३० मिनिटे चाला ज्यामुळे सूज, जळजळ आणि बद्धकोष्ठता कमी होईल.
 • गर्भारपणाच्या ९ व्या महिन्यात तुमच्या आहारात जास्तीत जास्त तूप घ्या त्यामुळे नॉर्मल प्रसूती होण्यास मदत होईल.
 • योगाचा रोज सराव करा, कारण स्नायूंना ताण दिल्यास आराम मिळतो.
 • ताण टाळा कारण प्रसूतीमध्ये त्याचा खूप सहभाग असतो.
 • सिझेरिअन प्रसूती टाळण्यासाठी पेरेनिअल मसाज चा सल्ला दिला जातो.

म्हणून, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की संतुलित आहार आणि पुरेसा व्यायाम जसे की चालणे आणि योगा केल्यास गुंतागुंत न होता, आई आणि बाळाला कुठलाही धोका न पोहोचता  सुलभ प्रसूती होऊ शकते.