Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात बडीशेप खाणे – फायदे, दुष्परिणाम आणि बरंच काही

गरोदरपणात बडीशेप खाणे – फायदे, दुष्परिणाम आणि बरंच काही

गरोदरपणात बडीशेप खाणे – फायदे, दुष्परिणाम आणि बरंच काही

हॅलो, न्यू मॉम टू बी! तुमच्या शरीरात होणारे आश्चर्यकारक बदल तुम्ही अनुभवत असाल – तसेच तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांचा सामना तुम्ही करत असाल. अश्यावेळी घरगुती उपचार आणि नैसर्गिक उपाय आपल्या बचावासाठी येतात, बरोबर? आपल्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा वापर करतो आणि ते खूप सामान्य आहे. अशीच एक सामान्य औषधी वनस्पती म्हणजे बडीशेप होय. पण गरोदरपणात बडीशेप खाणे सुरक्षित आहे का? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा!

बडीशेप म्हणजे काय आहे?

बडीशेप ही सुगंधी आणि चविष्ट औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती ताजी असताना तपकिरी किंवा हिरवी दिसते आणि जुनी झाल्यावर राखाडी रंगाची होते. ह्या बिया मूळतः युरोपमध्ये सापडलेल्या वनस्पतीपासून मिळवल्या जातात. बडीशेप ही वनस्पती अजमोदा (ओवा) कुटूंबातील आहे. ह्या वनस्पतीची पाने औषधी  आहेत. ही औषधी वनस्पती सामान्यतः आपल्या स्वयंपाकघरात आढळते आणि तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. बडीशेप ‘सौंफ’ म्हणून प्रसिद्ध आहे आणि आपल्यापैकी बहुतेकजण बडीशेप  स्वयंपाकात वापरण्याव्यतिरिक्त माऊथ फ्रेशनर म्हणून वापरतात. दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्यांसाठी बडीशेप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे, तसेच पचनास मदत करण्यासारखे बडीशेपचे इतर अनेक आरोग्य फायदे आहेत.

गरोदरपणात बडीशेप खाणे आरोग्यदायी आहे का?

गरोदरपणात. बडीशेप कमी प्रमाणात खाण्यास सांगितली जाते कारण बडीशेपमुळे मासिक पाळीला चालना मिळते आणि रक्तस्रावात वाढ होते. तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांमध्ये थोडी (साधारणपणे एक चमचा) बडीशेप घालू शकता. तुमच्या आरोग्यानुसार तुम्ही किती प्रमाणात बडीशेपचे सेवन केले पाहिजे हे समजून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतात.

गर्भवती स्त्रियांसाठी बडीशेपचे फायदे

गर्भवती महिलांसाठी बडीशेप खाण्याचे काही फायदे आणि दुष्परिणाम खाली दिलेले आहेत:

  • मळमळ आणि मॉर्निंग सिकनेसच्या त्रासावर उपाय म्हणून बडीशेपचा वापर पूर्वीपासून केला जातो. विशेषतः पहिल्या तिमाहीत बडीशेप खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते. गॅस आणि छातीत होणारी जळजळ बडीशेपमुळे कमी होते तसेच मॉर्निंग सिकनेस कमी होण्यास सुद्धा मदत होते.
  • बडीशेपमधील वातशामक गुणधर्मांमुळे पचनमार्गाच्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. तसेच बडीशेपमुळे पित्त प्रवाह उत्तेजित होतो आणि पचनाशी संबंधित पेटके कमीहोतात. म्हणूनच, गरोदरपणात पोट फुगण्यापासून आराम मिळण्यासाठी बडीशेप खूप उपयुक्त आहे.
  • बहुतेक गर्भवती स्त्रिया अपचन आणि गॅसमुळे भूक न लागण्याची तक्रार करतात. बडीशेप ही एक नैसर्गिक उत्तेजक आहे आणि आतड्यांमधून वायू काढून टाकण्यास मदत करते. बडीशेपमुळे पचन चांगले होते आणि आतड्यांशी संबंधित समस्यांची काळजी घेतली जाते. तसेच भूक लागते.

गरोदर असताना बडीशेप खाण्याचे दुष्परिणाम

तुम्हाला बडीशेपच्या फायद्यांविषयी माहिती मिळालेली आहे आता बडीशेपचे दुष्परिणाम जाणून घेऊयात

  • बडीशेप तुमच्या रक्त गोठण्याच्या क्षमतेवर परिणाम करते, त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद होते. म्हणून, जर तुम्ही रक्तविकाराने ग्रस्त असाल  बडीशेप टाळणे चांगले आहे – विशेषतः, जर तुम्हाला जखम आणि रक्तस्त्राव होण्याची शक्यता असेल तर बडीशेप खाणे टाळावे.
  • बडीशेप खाल्ल्याने तुमची त्वचा कोरडी आणि अत्यंत संवेदनशील होऊ शकते. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर गरोदरपणात बडीशेप टाळा.
  • बडीशेपमधील अँटिस्पास्मोडिक, फायटोएस्ट्रोजेनिक आणि दाहक-विरोधी गुणधर्म गर्भाशयाला उत्तेजित करतात, त्यामुळे गर्भाशयाचे अकाली आकुंचन होते. परंतु, संपूर्ण गरोदरपणात कमी प्रमाणात बडीशेप खाल्ल्यास गर्भाला हानी पोहोचत नाही आणि त्यामुळे अकाली आकुंचन देखील होणार नाही.

तर, गरोदरपणात बडीशेप खाणे चांगले असते का ? गरोदरपणात बडीशेप खाणे असुरक्षित असल्याचे  पुरेसे पुरावे नाहीत. बडीशेप पूर्णपणे सुरक्षित असल्याचे देखील पुरेसे पुरावे नाहीत. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार अन्नपदार्थाचे वेगवेगळे परिणाम होतात. म्हणूनच, त्या अन्नपदार्थांचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डोस देखील तपासून घ्या.

गरोदरपणात बडीशेपचे सेवन कसे करावे?

जर तुम्हाला गरोदरपणात बडीशेप खाण्याची परवानगी असेल, तर तुम्ही बडीशेपचा आहारात समावेश करण्यासाठी काही मार्ग आहेत. बडीशेपला किंचित सुगंध असतो तसेच ती थोडी गोड असते. जर स्वयंपाक करताना पदार्थांमध्ये बडीशेप घातल्यास ती फ्लेवरिंग एजंट म्हणून काम करते आणि डिशला छान स्वाद येतो. तुम्ही बडीशेप चहाच्या स्वरूपातही घेऊ शकता किंवा जेवणानंतर बडीशेप कच्ची चावून खाऊ  शकता. तुमच्या गरोदरपणाच्या आहारात बडीशेपचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

गरोदरपणात होणाऱ्या मळमळीवर उपाय म्हणून बडीशेपचा चहा

युनायटेड स्टेट्सच्या अन्न आणि औषध प्रशासनाने, गरोदरपणात बडीशेपच्या चहासह इतर हर्बल चहाच्या वापरावर कोणतेही निर्बंध लागू केलेले नाहीत. जेव्हा आपण म्हणतो की औषधी वनस्पती आणि हर्बल चहाचे मिश्रण यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे नियंत्रित केले जात नाही, तेव्हा याचा अर्थ असा होतो की औषधी वनस्पतींची ओव्हर-द-काउंटर आणि प्रिस्क्रिप्शन औषधांसारखीच तपासणी होत नाही. लक्षात घ्या की याचा अर्थ असा नाही की एफडीए हर्बल टीच्या वापराविरुद्ध सल्ला देते.

तुम्ही गरोदर असल्यापवर तुम्ही बडीशेप चहा घेऊ शकता. परंतु, त्यापूर्वी आपल्या स्त्रीरोगतज्ञांकडून त्याची खात्री करून घेऊ शकता.

गर्भवती स्त्रियांसाठी बडीशेपचा चहा तयार करणे

तुम्ही तुमच्या आहारात बडीशेपचा समावेश करण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही बडीशेपचा चहा बनवू शकता. बडीशेपचा एक कप चहा तुम्ही कसा करू शकता ह्याची कृती खाली देत आहोत:

  • चहा बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक म्हणजे पाणी, बडीशेप, गूळ सरबत किंवा मध.
  • साधारण एक चमचा बडीशेप घ्या आणि मिक्सर मध्ये त्याची बारीक पावडर करून घ्या.
  • एक कढई घ्या आणि एक कप पाणी उकळी येईपर्यंत गरम करा आणि नंतर त्यामध्ये बारीक  केलेली बडीशेप पावडर घाला.
  • पॅनवर झाकण ठेवा आणि स्टोव्ह बंद करून पाच मिनिटे थंड होऊ द्या. त्यानंतर, तयार केलेला चहा हळूहळू गाळून घ्या आणि तुमच्या चवीनुसार त्यात मध किंवा गूळ मिसळा.

गर्भवती स्त्रियांसाठी बडीशेपचा चहा

गरोदरपणात बडीशेप खाल्ल्याने गर्भपात होतो का?

अनेक लोक जेवणानंतर बडीशेप खातात कारण त्यामुळे पचन चांगले होते. परंतु बडीशेप खाल्ल्याने पाळीला चालना मिळते आणि योनीतुन रक्तस्त्राव होऊ शकतो. आणि गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे बडीशेपचे सेवन कमी प्रमाणात करणे महत्वाचे आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी बडीशेप न खाण्याचा सल्ला दिलेला असेल तर बडीशेप खाणे पूर्णपणे टाळा.

आता तुम्हाला बडीशेप खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम माहित आहेत, तुम्ही गरोदर असताना बडीशेप खाणे योग्य आहेत का ते तपासा. वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतरच पुढे जा.

आणखी वाचा:

गरोदरपणात आल्याचा चहा घेणे
गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article