Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यातील आहार (२१-२४आठवङे)

गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यातील आहार (२१-२४आठवङे)

गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यातील आहार (२१-२४आठवङे)

जसजसे तुम्ही गर्भधारणेच्या ६व्या महिन्यात प्रवेश करता तसे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या  वाढणाऱ्या बाळाचे हालचाल करण्याचे आणि आराम करण्याचे एक प्रकारचे रुटीन आहे. तसेच तुम्हाला तुमच्या शरीरातील बदलांविषयी लक्षणे जाणवतील जसे की हात आणि पायाला सूज येणे, कंबर दुखणे, पोटाच्या समस्या, योनीमार्गातील वाढलेला स्त्राव तसेच हिरडीतून रक्त येणे इत्यादी.

गर्भधारणेच्या ६व्या महिन्याच्या आहारात समावेश केला पाहिजे असे अन्नपदार्थ

तुम्हाला ह्या काळात आधी कधीच लागली नसेल एवढी भूक लागेल. वारंवारिता आणि तीव्रता दोन्ही दृष्टीने इथे गर्भारपणाच्या ६व्या महिन्यात काय खावे ह्याची यादी दिली आहे.

१. व्हिटॅमिन सी

गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर तुमच्या शरीरात रक्ताची पातळी वाढल्यामुळे तुमच्या हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. जर परिस्थिती आणखी वाईट झाली तर त्यामुळे gingivitis होऊ शकतो. ह्या महिन्यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घ्या. कारण ते संपूर्ण शरीराच्या संयोजी ऊतक (connective tissue) च्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी आवश्यक असते. ह्यामध्ये जे ऊतक दात हिरड्यांशी आणि जबड्याच्या हाडांशी बांधण्याचे कार्य करतात त्यांचा सुद्धा ह्यामध्ये समावेश असतो. लिंबूवर्गीय फळे जसे की मोसंबी, लिंबे आणि संत्री व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. व्हिटॅमिन सी चे दुसरे स्रोत म्हणजे,स्रवबेरी, द्राक्षे, कोबी आणि रताळे होय.

२. भाज्या

जसजशी तुमच्या गर्भधारणेमध्ये प्रगती होते तसे तुम्हाला बद्धकोष्ठता आणि अपचन होण्याची जास्त शक्यता असते. काही अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की ८५% स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान मूळव्याध होतो. भाज्यांमध्ये असलेले तंतुमय पदार्थ हे गर्भारपणाच्या ६व्या महिन्यातील आहारतक्त्यातील महत्वाचा भाग आहे कारण त्यामुळे शौचास साफ होते.

भाज्या तंतूमय पदार्थांचा एक उत्तम स्रोत आहे त्याचबरोबर भाज्या वेगवेगळी जीवनसत्वे आणि खनिजे ह्यांनी समृद्ध असतात.

३. द्रवपदार्थ

लक्षात ठेवा तुम्ही गरोदर आई असल्याने तुम्ही दोघांसाठी नुसते खात नाही तर पीत सुद्धा असता. सजलीत राहण्यासाठी तुम्हाला कमीतकमी  दररोज ८ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. त्याबरोबरच तुमच्या आरोग्यासाठी काही स्मूदी आणि ज्यूस सुद्धा तुम्ही घेतले पाहिजेत. सजलीत राहण्याच्या मुद्द्याला गर्भारपणाच्या ६व्या महिन्यातील आहाराचा विचार करताना कमी महत्व दिले जाते. बद्धकोष्ठतेबरोबर दोन हात केले पाहिजेत त्यामुळे भरपूर पाणी प्या.

४. फॉलीक ऍसिड

फॉलीक ऍसिड हे अतिशय जटिल व्हिटॅमिन आहे. नवीन पेशींच्या निर्मितीसाठी ते गरजेचे असते. दुसऱ्या तिमाही दरम्यान फॉलीक ऍसिड युक्त अन्नपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे कारण २४ व्या आठवड्यादरम्यान तुमच्या बाळाच्या मेंदूचा वेगाने विकास होत असतो.

फॉलीक ऍसिडने समृद्ध अन्नपदार्थांमध्ये संपूर्ण धान्य ब्रेड आणि सीरिअल्स, हिरव्या पालेभाज्या (ब्रोकोली,पालक आणि लेट्युस), फ्लेक्स सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, पांढरे तीळ, शेंगदाणे, बदाम इत्यादी. फॉलीकऍसिड काही फळे आणि भाज्यांमध्ये सुद्धा सापडते जसे की भेंडी,वाटाणा, द्राक्षे आणि केळी इत्यादी.

५. प्रथिने

प्रथिने

पेशींसाठी “बिल्डिंग ब्लॉक’ असलेली प्रथिने ह्यांचं आहारात स्वागत आहे. तसेच प्रथिनांचे, कर्बोदकांप्रमाणे लगेच चरबीमध्ये रूपांतर होत नाही, ही चरबी नंतर वापरण्यासाठी साठवून ठेवली जाते.

प्रथिनांनी समृद्ध आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाचा समावेश होतो. भारतीय जेवणात प्रसिद्ध असलेले प्रथिनांचे इतर स्रोत म्हणजे शेंगा आणि डाळी होत.

६. कर्बोदके

प्रथिनांप्रमाणे कर्बोदके सुद्धा रोजच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत.  ऊर्जेसाठी कर्बोदके शरीराकडून जाळली जातात. जास्तीच्या कर्बोदकांचे रूपांतर चरबीमध्ये होते आणि ती पेशींमध्ये साठवली जाते. शुद्ध कर्बोदके जसे की पॉलिश केलेला तांदूळ (साल विरहित) आणि पांढरा ब्रेड ह्याचे साखरेमध्ये लगेच विघटन होते. आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे संपूर्ण धान्य ब्रेड आणि तपकिरी तांदूळ खाणे चांगले.  गहू, ओटमील आणि सीरिअल्स हे सुद्धा कर्बोदकांचे चांगले स्रोत आहेत.

७. फळे

फळांमधून वेगवेगळे व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्ये आणि जाडेभरडे अन्न मिळते त्यामुळे पचनास मदत होते. तसेच बहुतांशी फळांचा पाणी हा मुख्य घटक असल्याने तुम्हाला सजलीत राहण्यास मदत होते.  वेगवेगळ्या प्रकारची फळे खाल्ल्याने तुम्हाला आवश्यक असणारी सूक्ष्म खनिजद्रव्ये मिळण्याची खात्री होते. उदा: पेअर मध्ये फॉस्फेट, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॉपर असते. सफरचंदांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, बी कॉम्प्लेक्स, लोह, फायटोन्यूट्रिएंट्स असतात. केळ्यामध्ये पोटॅशिअम, बी ६ व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन सी असतात.

गर्भारपणाच्या ६व्या महिन्यात टाळावेत असे अन्नपदार्थ

काही अन्नपदार्थ सामान्यतः आपल्या जेवणाचा भाग असतात.  सामान्यपणे त्याचा गर्भधारणेदरम्यान तुमच्या आणि बाळाच्या तब्येतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो!

१.समुद्री अन्नपदार्थ

नवीन समुद्री पदार्थांविषयी म्हणजेच सुशीविषयी लालसा वाटणे हे काही स्त्रियांनी सांगितले आहे. बऱ्याच समुद्री अन्नामध्ये पाऱ्याचे अंश असतात कारण पारा (मिथिल मर्क्युरी) असलेल्या संयुगांचे विघटन समुद्राच्या पाण्यात होत नाही, परंतु शुद्ध पाण्यात असलेल्या वनस्पतींमुळे त्या पाऱ्याचे विघटन होते. जरी पाऱ्याच्या थोड्या अंशामुळे मोठ्या माणसाच्या शरीरावर काही परिणाम होत नाही, तरी सुद्धा गर्भारपणात ते टाळणे उत्तम कारण तुमच्या बाळाचा मेंदू अजूनही विकासाच्या प्राथमिक टप्प्यावर आहे.

२.कॅफेन

जास्त कॅफेन घेतल्याने बाळ अस्वस्थ होते आणि बाळास नीट झोप लागत नाही. आईने जास्त कॅफेन घेतल्यास बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात. बाळाच्या शरीराची विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची प्रणाली अजून विकसित झालेली नसल्यामुळे कॅफेन दीर्घकाळ बाळाच्या शरीरात राहते.

३.सोया

सोया मध्ये फायटोइस्ट्रोजेन आढळतात तसेच त्यामध्ये प्रजननक्षमता वाढवण्यासाठी काही घटक सुद्धा आढळतात. फायटोइस्ट्रोजेन,हे नैसर्गिक इस्ट्रोजेनचे कार्य करू लागते, आणि इस्ट्रोजेन रिसेप्टर्सला बांधले जाते.  ज्या स्त्रिया गभधारणेसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी हे चांगले आहे परंतु तुम्ही आधीच गर्भवती आहात आणि ह्या चुकीच्या संप्रेरकांमुळे तुमच्या बाळाच्या मेंदूवर, जननेंद्रियांवर आणि रोगप्रतिकार प्रणालीवर परिणाम होऊ शकतो.

४.फास्ट फूड

फास्ट फूड

खूपशा गरोदर महिला सांगतात की त्यांना अचानक फास्ट फूड खावेसे वाटते. तसं तर बऱ्याच लोकांना सर्वसामान्यपणे म्हणजे स्त्री असो वा पुरुष, गरोदर असो वा नसो, अचानक फास्ट फूड खावेसे वाटते. फास्ट फूड मध्ये असलेल्या खूप जास्त कॅलरीजमुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते,आणि  नंतर खाली येते. आणि ह्या टोकाच्या परिस्थितीमुळे अस्वस्थता येते, थकवा वाढतो, आणि पुढे जाऊन महत्वाच्या अवयवांना इजा पोहोचते. \

फास्ट फूड मुळे गर्भारपणात मधुमेह उद्भवू शकतो. ह्यामध्ये गरोदर स्त्रीच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. आणि जर त्यावर वेळीच इलाज केला नाही तर मुलांमध्ये कायमसाठी आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.

५.कमी शिजवलेले अन्न

चिकन किंवा इतर मांस खाण्याच्या आधी ते चांगले शिजवलेले आहे ना ह्याची खात्री करा. जर कमी शिजवलेले असेल तर मांसामध्ये आढळणारे लिस्टेरिया सारखे जिवाणू शरीरात जाऊन लिस्टेरिओसिस सारखा विकार होऊ शकतो.  लिस्टेरिओसिस हे एक प्रकारचे फूड पोइसोनिंग असून दूषित भाज्या, कमी शिजवलेले मांस आणि पाश्चराईझ न केलेले दुग्धजन्य पदार्थांमुळे तो होऊ शकतो. गर्भवती स्त्रियांमध्ये त्यामुळे गर्भपात सुद्धा होऊ शकतो.

६.मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ वाढत्या बाळासाठी असुरक्षित असतात. तथापि, गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर त्यामुळे जळजळ, अपचन आणि अस्वस्थता येऊ शकते आणि गर्भवती स्त्रियांमध्ये ते जास्त होते.

७. अल्कोहोल आणि तंबाखू

हे सर्वज्ञात आहे की गर्भारपणात तंबाखू आणि अल्कोहोल हे टाळलेच पाहिजे. किंबहुना गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना सुद्धा ते टाळले पाहिजेत! ह्या औषधांमुळे तुमच्या भ्रूणाची वाढ थांबते.

६ महिन्याच्या गर्भवती स्त्रीसाठी आहाराच्या काही टिप्स

औषधांच्या दुकानात मिळणारी कुठलीही औषधे घेणे टाळा

जर तुम्ही कुठले औषध नियमितपणे घेत असाल तर गर्भारपणादरम्यान ती औषधे घ्यावीत किंवा कसे ह्यासाठी  तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे अतिशय महत्वाचे आहे.

गर्भधारणेनंतर एखाद्या अन्नपदार्थाविषयी लालसा वाटणे हे खूप नैसर्गिक आहे.  परंतु पोषक फळे आणि भाज्या खाण्याची सवय लावा!

तेलकट, चमचमीत पदार्थांची लालसा वाटणे हे गर्भधारणा झालेली असताना किंवा नसताना खूप नॉर्मल आहे. त्यामुळे आठवड्यात २ किंवा ३ वेळा ते कमी प्रमाणात खा

अन्नपदार्थांची लालसा पूर्ण करणे हे खूप कठीण काम आहे. फास्ट फूड किंवा दुसरा कुठला तेलकट जड पदार्थ खाल्ल्यास लगेच पुन्हा थाळीभर अन्न खाऊ नका. शांतपणे बसा आणि ४ मिनिटे वाट पहा. तुम्हाला प्लेट भरून घेण्याची  इचछा कमी होईल कारण तुमच्या पोटाला, पोट भरले आहे असा मेंदूला सिग्नल देण्यास थोडा वेळ लागतो आणि मग पुन्हा अन्नाची गरज नसते.

संतुलित आहार घेतल्याने आई तंदुरुस्त राहते आणि निरोगी आई निरोगी बाळाला जन्म देते!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article