Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य गर्भारपणाचे नियोजन – गरोदर राहण्याआधी करावयाच्या गोष्टी

गर्भारपणाचे नियोजन – गरोदर राहण्याआधी करावयाच्या गोष्टी

गर्भारपणाचे नियोजन – गरोदर राहण्याआधी करावयाच्या गोष्टी

पालक होणे म्हणजे आयुष्यातील सर्वोच्च आनंदापैकी एक आहे. एक नवीन आयुष्य ह्या जगात आणणे आणि ते फुलताना प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत असणं हा आयुष्य बदलावणारा एक सुखद अनुभव आहे.

परंतु, पालकत्वाची सुरुवात होण्याआधी, गर्भधारणेची प्रक्रिया कशी चांगली होईल ह्या विषयी नियोजन करणे योग्य ठरेल. गर्भारपण जर नियोजित असेल आणि तो दोघांनी घेतलेला निर्णय असेल तर त्याचे स्वागत होते.

गर्भारपणाच्या तयारी करताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

गरोदरपणासाठी शारीरिक तयारी करण्याआधी आणि तुमच्या आयुष्यात कायमसाठी एक मोठा बदल घडवण्याआधी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची ह्या बदलासाठी चांगली मानसिक तयारी असणे. त्यासाठी तुम्ही स्वतःला खालील प्रश्न विचारा

. मी ह्यासाठी तयार आहे का?

. माझे पती माझ्याइतकेच ह्यासाठी उत्सुक आहेत का?

. मी माझे काम आणि बाळाची जबाबदारी नीट हाताळू शकेन का?

. माझ्या मुलाला विशेष गरजा असूनही मी एक चांगले पालक होण्यासाठी योग्य आहे काय?

बाळाला जन्म देऊन संपत नाही तर पालक म्हणून त्यासोबत जबाबदाऱ्या सुद्धा येतात. ही प्रक्रिया अवघड होत जाते. गर्भधारणेपासून ते मुलाला स्वावलंबी बनवण्यापर्यंत ही प्रक्रिया सुरु राहते. म्हणून, कुठलाही निर्णय घेण्याआधी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा नाहीतर नंतर पश्चाताप होऊन तुमची किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची चिडचिड होऊ शकते.

शारीरिक तयारी करणे

स्त्रीला मिळालेलं सर्वात मोठं वरदान म्हणजे ती आई होऊ शकते आणि काही वेळा संपूर्ण आयुष्याच्या कालावधीत हा आनंद एकापेक्षा जास्त वेळा घेऊ शकते. तुमची पालक होण्याची मानसिक तयारी झाल्यावर तुमची शारीरिक तयारी असणे महत्वाचे आहे.

1. संतती नियमन बंद करा

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या किंवा साधने वापरणे बंद करा. जर तुम्ही आई होण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर आता संततिनियमनाची साधने आपले मित्र नाहीत.

2. तुमच्या ओव्यूलेशन चक्रावर लक्ष ठेवा

तुमच्या ओव्यूलेशन चक्रावर लक्ष ठेवा. तुमचे पर्याय शोधण्यासाठी थोडा वेळ काढा. ओव्यूलेशन चक्र मोजण्यासाठी वेगवेगळी ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत तसेच वैद्यकीय प्रमाणित किट्स सुद्धा बाजारात उपलब्ध असतात. जी वापरायला सोपी असतात असे पर्याय निवडा

जर तुम्हाला अशी किट्स किंवा तांत्रिक ऍप्लिकेशन्स वापरणे आवडत नसेल तर तुम्ही स्वतःचे स्वतः सुद्धा ओव्यूलेशन कधी होते ते जाणून घेऊ शकता. उदा: तुमच्या शरीराच्या मूलभूत तापमानाची नोंद ठेवल्यास आणि गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या श्लेष्मातील बदलांवर लक्ष ठेवल्यास तुम्हाला कुठले दिवस प्रजननासाठी चांगले आहेत ह्याचा सहज अंदाज लावता येईल. ही पद्धत तुम्ही अनेक महिने करत राहिल्यास प्रत्येक मासिक पाळी चक्रादरम्यानचा ओव्यूलेशनचा काळ तुमच्या लक्षात येईल.

3. पोषक खा

नंतर, सर्वात महत्वाचे म्हणजे पोषक खा. कॅलरीज किंवा वजनवाढ कमी करण्यासाठी नव्हे तर चांगला आहार घेतल्यास तुम्ही निरोगी राहता आणि पुढे जाऊन तुमचे शरीर मातृत्वाची तयार होते. ही टीप तुमच्या दोघांसाठी आहे. कारण, तुमच्या दोघांमधील चांगले घेऊन एक अमूल्य जीव तयार होत असतो. त्यामुळे दोघांनाही चांगला आहार घेणे महत्वाचे आहे.

स्त्रियांनी, साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कधीतरी जास्त गोड खाणे ठीक आहे. परंतु, त्याचे प्रमाण जास्त नको ह्याची काळजी घ्या कारण त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. फळे, भाज्या, संपूर्णधान्य आणि दूध ह्यासारखे पोषक पदार्थ जास्त प्रमाणात घ्या. फॉलिक ऍसिड हे सुद्धा खूप चांगले पूरक औषध आहे त्यामुळे मुलांमध्ये स्पिना बायफिडासारखे जन्मतः व्यंग निर्माण होत नाहीत.

पुरुषांनी, ऑरगॅनिक अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. मेथ्यांचा तुमच्या आहारात समावेश केल्यास निरोगी बाळाचे वडील होण्याची तुमची शक्यता वाढते कारण मेथ्या हे व्हिटॅमिन ए आणि डी ह्यांचा चांगला स्रोत आहे. जस्त आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध अन्नपदार्थ खा.

4. तंदुरुस्त रहा

तसेच, तुम्हाला व्यायामाची आवड नसेल तरी आता तुम्ही तो करण्याची वेळ आहे. गर्भारपणासाठी तुमचे शरीर नीट तयार हवे आणि त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे निरोगी आणि लवचिक शरीर असणे हा होय. तुम्ही अगदी फिटनेस फ्रिकव्हावे असे नाही तर भरभर चालणे किंवा हलके व्यायामप्रकार केले तरी त्याची तुम्हाला खूप जास्त मदत होते. पोहणे, एरोबिक्स किंवा योग केल्याने तुमचे शरीर आयुष्यातील सर्वात मोठ्या साहसास तयार होते.

जर तुम्हाला व्यायामासोबत मजा यायला हवी असेल तर तुम्ही बेली डान्सिंग केल्याने तुमचे शरीर गर्भारपणासाठी खूप छान तयार होते. हो, तुम्ही बरोबर वाचत आहात बेली डान्सिंग! हा नृत्यप्रकार केल्यास तुमचा कुल्ल्यांकडील भाग बाळाच्या जन्मासाठी तयार होतो आणि प्रसुतीदरम्यान सगळे सुलभ होते!

5. सजलीत रहा

सर्वात शेवटचे, पुरेसे पाणी पिऊन सजलीत राहण्यास विसरू नका.

वाईट सवयी सोडा

काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते अशी म्हण आहे. आणि जर तुम्हाला गर्भारपण हवे असेल आणि त्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतील. तुमचे शरीर गरोदरपणासाठी तयार व्हायला हवे असेल तर इथे काही वाईट सवयी आहेत ज्या तुम्हाला सोडल्या पाहिजेत.

1. मद्यपान बंद करा

मद्यपान बंद करा कारण त्यामुळे तुमच्या आई होण्याच्या योजनेत अडथळा येऊ शकतो. तुम्ही ओव्यूलेशन चक्राची नोंद ठेवणार आहेत आणि मद्यपान केल्याने ओव्यूलेशन नीट न झाल्यास निराशा येऊ शकते.

2. धूम्रपान बंद करा

जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते सोडून द्या कारण त्याने तुमच्या आई होण्याच्या शक्यतेवर खूप परिणाम होतो. धूम्रपान (आणि मद्यपान) केल्याने वैद्यकीय दृष्ट्या असे सिद्ध झाले आहे की पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते आणि स्त्रियांमध्ये ओव्यूलेशन ठीक होत नाही आणि त्यामुळे तुम्ही पालक बनण्याची शक्यता कमी होते. तसेच, धूम्रपान आणि मद्यपान केल्याने बाळाची वाढ खुंटते, जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असते आणि बाळाच्या अवयवांना नुकसान पोहोचते.

. काही औषधे टाळा

औषधे, मग ती मजेसाठी घेतलेली असो किंवा वैद्यकीय असो, पालक होण्याच्या तुमच्या योजनांमध्ये ही औषधे हस्तक्षेप करू शकतात. ही औषधे घेतल्यावर रक्तात बराच काळ राहतात आणि त्यामुळे केवळ आपल्या शरीरावरच परिणाम होत नाही तर आपल्या बाळाचेही नुकसान होऊ शकते. अशा काही औषधांमध्ये एनएसएआयडी (नॉनस्टेरॉइडल अँटीइंफ्लेमेटरी ड्रग्स) समाविष्ट आहेत ज्यामुळे अंडाशयातून अंडे पडण्यास अडथळा येऊ शकतो आणि नैसर्गिक किंवा हर्बल औषधे हार्मोन्सच्या परिणामाची नक्कल करू शकतात. याव्यतिरिक्त, मानसिक विकारांवरील औषधे, स्टिरॉइड्स, थायरॉईड औषधे, हार्मोन्स असलेली त्वचा उत्पादने आणि काही इतर औषधांमुळे आपल्या गर्भधारणेच्या योजनेच्या मार्गात अडथळे येऊ शकतात.

. कॅफेनचे प्रमाण कमी करा

ह्या काळात कॅफेन घेण्याचे प्रमाण कमी करा. तुमचे कॉफी घेण्याचे प्रमाण २०० मिली पर्यंत मर्यादित ठेवा, त्यामुळे तुमचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होईल. खालीलप्रकारे तुमच्या गर्भधारणे च्या शक्यतेवर कॅफेनमुळे परिणाम होतो. उशिरा परिपकवता: जास्त प्रमाणात कॅफेन घेतल्यास अंडी लवकर परिपकव होत नाहीत. परिपकव न झालेल्या अंड्यांचे फलन होत नाही आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही

बीजवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होतो: खूप जास्त प्रमाणात कॅफेन घेतल्याने बीजवाहिन्यांच्या स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो त्यामुळे अंडाशयातून गर्भाशयात अंड्यांचे वहन होत नाही.

शुक्राणूंची हालचाल मंदावते: कॅफेन घेतल्याने शुक्राणूंची हालचाल मंदावते आणि त्यामुळे गर्भधारणा लवकर होत नाही.

गर्भपाताची शक्यता: मेडिकल सायन्स मॉनिटर, २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार वडिलांनी गर्भधारणेच्या आधी जास्त कॅफेन घेतल्यास आणि आईने गर्भारपणात जास्त कॅफेन घेतल्यास गर्भपाताची शक्यता वाढते.

5. उशिरा झोपणे टाळा

गर्भधारणेसाठी तुमच्या शरीरास खूप विश्रांतीची गरज असते. उशिरा झोपल्याने तुम्हाला थकवा जाणवतो आणि त्यामुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत होत नाही. चांगली विश्रांती आणि वरती दिलेल्या टिप्सचा वापर केल्यास तुम्ही मातृत्वाजवळ पोहचण्यासाठी एक पाऊल पुढे जाता.

वैद्यकीय घटक

1. संपूर्ण शारीरिक तपासणी करून घ्या

दोन्ही पालकांनी संपूर्ण शारीरिक तपासणी करून घेणे चांगले त्यामुळे पालक होण्यासाठी काही समस्या तर नाहीत ना हे लक्षात येईल. सगळे अवयव आणि शरीराची मूलभूत प्रणाली सुरळीत आहे ना हे जाणून घेण्यासोबतच गर्भधारणेमुळे स्त्रीच्या शरीराला काही धोका तर नाही ना हे समजेल. ज्या स्त्रियांना नाळेच्या समस्या, रक्त गोठण्याच्या समस्या किंवा प्रीइक्लॅम्पसिआ असेल तर आईच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका पोहोचण्यापेक्षा आधी तपासणी केल्यामुळे बाळासाठी दुसऱ्या पर्यायाचा विचार. केला जाऊ शकतो.

2. जनुकीय चाचण्या करून घ्या

वैद्यकीय तपासणी केल्यास कोणतीही आनुवंशिक डिसऑर्डर बाळासाठी धोकादायक तर नाही ना हे ठरविण्यास दोन्ही पालकांना सक्षम करते. बाळाला अनुवंशिकतेने होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर उपचार किंवा काळजी घेता येते आणि त्यामुळे निरोगी बाळ जन्मास येण्यास मदत होऊ शकते. दोन्ही पालकांचा कौटुंबिक इतिहास विचारात घेतला पाहिजे जेणेकरून आईला किंवा बाळाला होणार धोका टाळता येईल.

3. तोंडाचे आरोग्य

गर्भधारणेची प्रक्रिया सुरु करण्याआधी तोंडाचे आरोग्य सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. बाळापेक्षा, आईला त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. गर्भारपणात शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात संप्रेरकांचे बदल होत असतात.

मुख आरोग्य चांगले नसल्यास हिरडयांना सूज येणे, रक्तस्त्राव होणे किंवा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ची पातळी वाढल्यामुळे हिरड्यांचे आणि दातांचे नुकसान होणे असे त्रास होऊ शकतात.

आर्थिक स्थिरता

1. आरोग्याचा विमा काढून ठेवा

तुमच्याकडे विमा आहे ना ते पहा ज्यामुळे अपरिहार्य खर्च निघाल्यास त्यामुळे तुम्हाला ते परत मिळू शकतील. तसेच, तुमचे गर्भधारणेच्या आधी काही खर्च असतील तर ते सुद्धा त्यामधून तुम्हाला मिळू शकतील.

2. तुमच्या मातृत्व आणि पितृत्वाच्या रजेची योजना करा

आपल्या मातृत्व किंवा पितृत्वाच्या रजेदरम्यान आपल्याला पैसे दिले जातील की नाही हे जाणून घेतल्याने आणि आगाऊ अंदाजपत्रक केल्याने निश्चितपणे प्रसूतीच्या आसपासच्या सर्व खर्चाची पूर्तता करण्यास सक्षम असल्याची खात्री होते.

3. आपत्कालीन फंड सुरु करा

आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी होतील असे वेगळे पैसे ठेवा

संसर्ग आणि वातावरणातील धोके

. धोकादायक किरणोत्सर्गापासून सुरक्षित रहा

किरणोत्सर्गाशी संपर्क टाळा. एक्सरेदेखील अत्यावश्यक असल्यासच घेतले पाहिजेत

. धूम्रपान करणाऱ्यांपासून दूर रहा

बाळासाठी ते धोकादायक असल्याने टाळले पाहिजे. धूम्रपान करणाऱ्यांपासून किंवा जिथे धुम्रपानास परवानगी असते अशा जागांपासून दूर रहा

. रसायने टाळा

तुमच्यासाठी आणि बाळासाठी रसायने हानिकारक असतात. घरी स्वच्छता करण्यासाठी वापरली जाणारी रसायने सुद्धा काळजीपूर्वक हाताळली पाहिजेत.

सरते शेवटी, या प्रवासावर जाताना आपण आनंदी आणि सकारात्मक रहाणे चांगले. चांगल्या विचारात रहा आणि मदत घ्या. गर्भधारणेच्या आणि गरोदरपणाच्या अनेक आव्हानांना सामोरे जाणे कधीकधी कठीण आणि विदारक असू शकते, परंतु मित्र, कुटुंबातील सदस्य आणि हितचिंतक असलेल्या कोणाकडूनही तुम्हास मदत मिळू शकते.

आणखी वाचा:

लवकर आणि सहज गर्भधारणेसाठी काय कराल?
लवकर गर्भधारणा होण्यासाठी १३ सर्वोत्तम लैंगिक स्थिती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article