Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना अनियमित पाळीची ११ अनपेक्षित कारणे

अनियमित पाळीची ११ अनपेक्षित कारणे

अनियमित पाळीची ११ अनपेक्षित कारणे

मासिक पाळी म्हणजे स्त्रियांच्या बाबतीतली खूप काही छान वाटावी अशी गोष्ट नाही आणि मासिक पाळीची कुणीही उत्सुकतेने वाट पहात नाही. परंतु, स्त्रीच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित तो एक महत्वाचा भाग आहे. जर मासिक पाळी नियमित असेल तर त्याचा फायदा होतो. तुम्हाला तुमच्या पाळीची तारीख माहिती असते आणि त्यानुसार तुम्ही विशेष समारंभाच्या तारखांचे नियोजन करू शकता. दुर्दैवाने, हे सगळ्या स्त्रियांसाठी लागू होत नाही कारण बऱ्याच स्त्रियांना अनियमित मासिक पाळीची समस्या असते. अनियमित मासिक पाळी तसेच ती कशी हाताळावी ह्याविषयी अधिक जाणून घेऊयात.

अनियमित मासिक पाळी म्हणजे काय?

अनियमित मासिक पाळी म्हणजे संप्रेरकांची पातळी अनियमित असल्याचे लक्षण आहे. २८ दिवसांचे मासिक पाळी चक्र असणे सर्वात योग्य असते. म्हणून, ज्यांना २९ व्या दिवशी मासिक पाळी येते त्यांचे मासिक पाळी चक्र अगदी निरोगी आहे असे म्हणता येईल. पण जर तुम्हाला २१ दिवसांच्या आत पुन्हा पाळी आली आणि रक्तस्त्राव ८ दिवस होत राहिला, तर तुमची मासिक पाळी अनियमित आहे असे म्हणता येईल.

अनियमित मासिक पाळीची कारणे काय आहेत?

स्त्रियांची मासिकपाळी अनियमित होण्यास कारणीभूत असे बरेच घटक आहेत. आणि हे घटक निरोगी जीवनशैली नसल्याशी संबंधित असतात.

. ताणाची वाढलेली पातळी

मासिक पाळी दरम्यान जर ताण आला तर त्याने ओव्यूलेशन प्रक्रिया नीट होत नाही. इस्ट्रोजेन आणि इतर प्रजननसंबंधित संप्रेरकांच्या निर्मितीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, गर्भाशयाचे आवरण जसे हवे तसे तयार होत नाही आणि तुम्हाला वेळेवर पाळी येत नाही.

. आहार योग्य नसणे

आहारामध्ये अँटिऑक्सिडंट्स कमी असतील तर स्त्रीच्या शरीरात वेगवेगळ्या संप्रेरकांचे कार्य नीट होत नाही. त्यामुळे, मासिक पाळी अनियमित होते.

उदा: अन्नपदार्थांमधील वेगवेगळे पदार्थ आणि कीटकनाशकांमुळे मूत्रपिंडांजवळील ग्रंथींचे कार्य नीट होत नाही आणि त्यामुळे कॉर्टिसोलच्या पातळीत वाढ होते. जास्त कॉर्टिसोलमुळे बऱ्याच संप्रेरकांचे कार्य नीट होत नाही आणि त्यामध्ये प्रजननाशी संबंधित संप्रेरकांचा सुद्धा समावेश होतो.

. ताणयुक्त व्यायाम

जास्त व्यायाम केल्याने ताण आणि थकवा आल्याने मूत्रपिंडांजवळील ग्रंथी, थायरॉईड आणि पिट्युटरी ग्रंधींचे कार्य नीट होत नाही आणि त्यामुळे पाळी अनियमित होते.

. थायरॉईड

संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की ज्या स्त्रियांना थायरॉइडच्या त्रास आहे त्यांची पाळी चुकते आणि त्यांना अनियमित मासिक पाळीचा सामना करावा लागतो.

. गर्भनिरोधक गोळ्या

गर्भनिरोधक गोळ्यांचा मासिक पाळीवर परिणाम होतो.. त्यामुळे रक्तस्त्राव हलका होतो आणि बऱ्याच वेळा मासिक पाळी थांबते.

. पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम

ह्या वैद्यकीय स्थितीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट आढळते. ज्या स्त्रियांना ह्याचा त्रास असतो त्यांना मासिक पाळी अनियमित येते.

. वजनात खूप घट होणे

जर तुमचा बीएमआय १८ किंवा १९ पेक्षा कमी असेल तर तुमची मासिक पाळी अनियमित असू शकते कारण शरीरातील चरबीचे प्रमाण कमी असते. चरबीमुळे इस्ट्रोजेनची निर्मिती होण्यास मदत होते. इस्ट्रोजेन हे संप्रेरक अंडाशयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी महत्वाचे असते.

. वजनात अचानक वाढ होणे

कमी कालावधीत अचानक वजनात वाढ झाल्यामुळे शरीरातील संप्रेरकांच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामध्ये लैंगिक संप्रेरकांचा समावेश होतो आणि त्यामुळे हे सुद्धा मासिक पाळी अनियमित असण्याचे कारण असू शकते.

. अन्नपदार्थांची ऍलर्जी

काही विशिष्ट अन्नपदार्थांची ऍलर्जी, म्हणजेच ग्लूटेन किंवा सिलियाक डिसीज मुळे सुद्धा शरीरातील संप्रेरकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लैंगिक संप्रेरकांवर परिणाम होऊन अनियमित मासिक पाळी उद्भवू शकते.

१०. इतर वैद्यकीय समस्या

स्त्रीला मधुमेह, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रोसिस किंवा लैंगिक संबंधातून पसरणारे आजार असतील तर त्यांना अनियमित मासिक पाळीचा अनुभव येऊ शकतो.

११. वय

असे निदर्शनास आले आहे की जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा मासिक पाळी नियमित होण्यास वेळ लागतो. वय वाढते तसे स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित होते. किशोरवयीन मुलींच्या बाबतीत अनियमित मासिक पाळीविषयी काळजी करण्याचे कारण नाही कारण पौगंडावस्थेत तसे होणे सामान्यपणे आढळते.

अनियमित मासिक पाळी काय नॉर्मल आहे आणि काय नाही

वर्षातून एक दोन वेळा पाळीची तारीख अनियमित होणे नॉर्मल आहे, परंतु असे सारखेच होत असेल तर त्याची दखल गंभीररीत्या घेतली पाहिजे कारण ते इतर आजारांचे लक्षण असू शकते. असे झाल्यास तुमच्या सामाजिक आयुष्यावर तर त्याचा परिणाम होतोच परंतु दैनंदिन आयुष्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो.

  • पाळी अनियमित असल्यास त्याचा गर्भारपणावर परिणाम होतो का? तर ह्याचे उत्तर हो असे आहे. पाळी अनियमित आहे म्हणजे दर महिन्याला ओव्यूलेशन होत नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याचा तुमच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. जर तुम्ही गर्भधारणेसाठी खूप काळ प्रयत्न करीत असाल आणि तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे कारण त्यामागचे कारण अनियमित मासिक पाळी हे कारणअसू शकते.
  • अनियमित मासिक पाळी हे एंडोमेट्रोसिस, पीसीओएस किंवा थायरॉईडचे लक्षण असू शकते. म्हणून जर तुम्हाला अनियमित मासिक पाळीचा त्रास खूप दिवसांपासून होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घेणे आवश्यक असते.
  • अनियमित पाळी असणे हे काही अंडाशयाच्या कॅन्सरचे लक्षण नाही. परंतु जर डॉक्टरांना तपासणीची गरज वाटली तर तुमची तपासणी ते करू शकतात.
  • अनियमित पाळी हे संधिवाताचे सुद्धा लक्षण असू शकते. तुमच्या डॉक्टरांशी त्यासंदर्भात संपर्क साधा आणि शंका निरसन होण्यासाठी चाचणी करून घ्या.

उपचार आणि घरगुती उपाय

अनियमित मासिक पाळीसाठी बरेचसे घगूती उपाय आहेत त्यामुळे स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते आणि ते खालीलप्रमाणे:

  • ताण हे अनियमित मासिक पाळीचे कारण असेल तर तुम्ही ताणविरहित आयुष्यासाठी योग आणि ध्यानधारणा करू शकता. अनियमित मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांसाठी ऍक्युपंक्चरचा सुद्धा फायदा होऊ शकतो.
  • संतुलित आणि पोषक आहार हे निरोगी आयुष्यासाठी गरजेचे आहे. संप्रेरकाचे कार्य सुरळीत रहावे म्हणून आहारात चरबी आणि प्रोबायोटिक्स चा समावेश करणे गरजेचे आहे.
  • व्यायाम करताना शरीराचे ऐका आणि जेव्हा थांबावेसे वाटेल तेव्हा थांबा. ताण कमी करण्यासाठी व्यायाम करा. फक्त कॅलरी जाळण्यासाठी नव्हे.
  • जर संप्रेरकांच्या असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित येत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. तुमचे डॉक्टर तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या किंवा औषधे देतील

अनियमित मासिक पाळीवर औषधे घेण्याआधी आधी घरगुती उपचार करून बघावेत. आणि कुठलीही औषधे घेण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधणे अत्यंत गरजेचे आहे.

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?

खालील लक्षणे आढळ्यास डॉक्टरांची भेट घ्या:

  • तुम्हाला सतत अनियमित मासिक पाळीचा अनुभव येत असेल तर
  • सुचवलेले सगळे उपाय आणि उपचार घेऊन सुद्धा सुधारणा होत नसेल तर
  • तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल आणि ते अनियमित मासिक पाळी मुळे शक्य होत नसेल तर
  • अनियमित पाळीमुळे खूप पेटके येत असतील तर

एक काळ असा होता की मासिक पाळीविषयी काही बोलणे म्हणजे निषिद्ध मानले जात असे. परंतु, आज काळात ह्या विषयावर मोकळेपणाने बोलणे समाजात स्वीकरले जाऊ लागले आहे. पाळीविषयी बोलण्याबाबत स्त्रियांनी कुठलाही संकोच न बाळगता त्याबाबतच्या समस्यांविषयी बोलले पाहिजे. लक्षात ठेवा, बोलल्यामुळे आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतल्यानंतरच तुमचा प्रश्न सुटणार आहे!

 आणखी वाचा:

पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) – आढावा
ओव्युलेशन प्रेडिक्टर किट (ओ. पी. के.)

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article