Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: २६वा आठवडा

गर्भधारणा: २६वा आठवडा

गर्भधारणा: २६वा आठवडा

गर्भारपणाचा २६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा विकास होताना  खूप महत्वाचे बदल होतात. ह्या टप्प्यावर नक्की कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यासंबंधित माहितीसाठी पुढे वाचा.

गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यातील तुमचे बाळ

२६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा खालील बाबतीत विकास होतो,

  • रोगप्रतिकारक प्रणालीचा विकास – बाळाच्या रोगप्रतिकारक प्रणालीचा आतापर्यंत विकास झालेला असतो.
  • पंचेंद्रियांचा विकास – बाळाचे डोळे आणि कान विकसित झालेले आहेत आणि बाळाला तुमचा आवाज ऐकू येतो
  • मेंदूची क्षमता वाढते – २६ व्या आठवड्यात तुमचे बाळ बाहेरच्या आवाजाला प्रतिसाद देऊ लागते त्यामुळे बाळाच्या क्रिया वाढतात. अचानक झालेल्या एखाद्या आवाजाला बाळ हालचाल करून प्रतिसाद देऊ लागते.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यात बाळाची लांबी ३५सेंमी आणि वजन ९००ग्रॅम्स इतके असते.

सामान्यपणे शरीरात होणारे बदल

तुमच्या गर्भारपणात जशी जशी प्रगती होते तसे तुमच्या शरीरात काही बदल होत राहतात, काही स्पष्ट दिसतात तर काही खूप सूक्ष्म असतात. इथे गरदोरपणामुळे तुमच्यात होणारे काही बदल दिले आहेत.

  • तुमच्या  गर्भाशयाची वाढ तुमच्या बेंबीच्या वर २ इंच इतकी झाली आहे.
  • काही स्त्रियांना बारगडीच्या खाली वेदना जाणवतात, कारण बाळ पाय मारते किंवा आळस देत असते. झोपलेले असताना किंवा बसताना स्थिती बदलल्यास तुम्हाला वेदनांपासून आराम मिळू शकतो. वजन वाढल्यामुळे तुम्हाला पाठदुखी सुद्धा होऊ शकते.
  • २६ व्या आठवड्यात तुमचे वजन १४-२८ पौंडांनी वाढले आहे. स्वतःचे वजन वारंवार तपासून पाहणे टाळा कारण  पाणी धरून ठेवण्याची (water retention ) तुमची किती क्षमता आहे ह्यावर तुमचे वजन कमी जास्त होत असते.

२६व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भारपणाच्या २६व्या आठवड्याचा काळ हा थोडा अस्वस्थतेचा काळ असतो कारण बाळाची वाढ होत असते आणि तुमच्या शरीरात सुद्धा बाळाच्या जन्माच्या तयारीच्या अनुषंगाने बदल होत असतात.

  • झोपताना त्रास होणे– जसे जसे तुमच्या बाळाच्या जन्माचा दिवस जवळ येतो तसे आराम करणे कठीण होऊ लागते. तुम्ही कॅफेन घेणे बंद केले पाहिजे आणि भरपूर द्रव पदार्थ घेतले पाहिजेत त्यामुळे तुम्हाला रात्रीची चांगली झोप लागण्यास मदत होईल.
  • सूज – ह्या कालावधीत थोड्या प्रमाणात सूज येणे हे सामान्य आहे परंतु तुमच्या वजनात अचानक बदल झाल्यास त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. ह्याचे कारण ‘preeclampsia’ सुद्धा असू शकते, आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो.
  • डोकेदुखी – ताण आणि संप्रेरकांमधील बदलांमुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. तथापि भूक आणि निर्जलीकरण (Dehyadration ) ही सुद्धा डोकेदुखीची कारणे असू शकतात म्हणून तुम्ही  स्वतःची आणि बाळाची काळजी घेणे हे महत्वाचे आहे, त्यासाठी भरपूर पाणी प्या आणि थोड्या थोड्या अंतराने खा.
  • विसरभोळेपणा – गर्भारपणाचा हा काळ कुठल्याही स्त्रीसाठी खूप ताणयुक्त असतो कारण ह्या कालावधीमध्ये संप्रेरकांच्या पातळीमध्ये खूप बदल होत असतात आणि त्यामुळे विसरभोळेपणा वाढतो आणि तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
  • सराव कळा (Braxton Hicks contractions) – २६ व्या आठवड्यात ह्या कळा येतात, विशेषतः जर तुम्हाला जुळी मुले होणार असतील तर ही शक्यता जास्त असते. परंतु जर त्या स्थिर असतील आणि गंभीर नसतील तर काळजीचे काही कारण नाही. जर तुमच्या कळा  खूप वेदनादायी असतील आणि त्या सतत येत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.
  • रक्तदाबात वाढ – ह्या कालावधीमध्ये रक्तदाबात थोडी वाढ झालेली असल्यास ते सामान्य आहे परंतु रक्तदाब  खूप जास्त वर खाली होत असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला निरीक्षणाखाली ठेऊ शकतात. हे preeclampsia किंवा HELLP चे लक्षण असू शकते आणि त्यावर त्वरित उपचारांची गरज असते.
  • ओटीपोटात दुखणे (Round ligament pain): तुमच्या ओटीपोटात वेदना होतात.
  • श्वसनास त्रास– बाळाचा आकार वेगाने वाढत असल्यामुळे त्यास जास्त जागा लागते आणि त्यामुळे  बरगड्यांच्या खालच्या स्नायूंवर (diaphragm) वर ताण येतो.
  • अस्थिबंध सैल पडणे – (Symphysis pubis dysfunction) – रिलॅक्सिन ह्या संप्रेरकांमुळे होते त्यामुळे श्रोणीच्या भागातील हाडांचे (pelvic bones)अस्थिबंध सैल पडतात.
  • पायांमध्ये पेटके येणे – वजनातील वाढीमुळे पायांमध्ये पेटके येतात तसेच रक्तवाहिन्यांवर दाब येतो, पेटके येण्याचे लक्षण ह्या टप्प्यावर वारंवार आढळते.

  • जबडा, गुढघे आणि इतर सांध्यांमध्ये वेदना: आपले शरीर जेव्हा बाळाच्या जन्माची तयारी करीत असते तेव्हा सांधे सैल पडतात त्यामुळे सांधेदुखी होते.
  • सूज येणे: शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे (water retention) सूज येते.
  • गॅस होणे, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता: झडपा सैल झाल्यामुळे पोटातील आम्ल पुन्हा आतड्यांमध्ये जाते आणि त्यामुळे जळजळ होते.
  • खाज सुटणे: पोटाचा घेर वाढल्यामुळे त्वचा ताणली जाते आणि त्यामुळे खाज सुटते आणि पोट, मांड्या आणि स्तन ह्या भागातील त्वचा कोरडी पडते.
  • स्ट्रेच मार्क्स – बाळाच्या वाढीमुळे पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसतात आणि मॉइश्चराइजिंग लोशन लावल्यास ते कमी होते.
  • झोप न लागणे आणि अस्वस्थता: वजन वाढल्यामुळे आणि पोटाचा घेर वाढल्यामुळे तुम्हाला झोपताना त्रास होतो आणि त्यामुळे झोप लागत नाही आणि अस्वस्थता येते.

गर्भधारणेच्या २६व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यात तुमचे वजन वाढले आहे. तुमच्या तिसऱ्या तिमाहीच्या सुरवातीस तुमच्या गर्भाशयाचाची वाढ बेंबीच्या वर २ इंच इतकी असते. तुमचे पोट पुढच्या प्रत्येक आठवड्याला १.५ इंच इतके वाढते.

गर्भधारणेच्या २६व्या आठवड्यातील सोनोग्राफी

तुम्ही तुमच्या गर्भावस्थेच्या मध्यावर आहात.  जी बाळे २६ व्या आठवड्यात जन्मतात त्यांचा जगण्याचा दर हा ५०% इतका आहे.

ह्या आठवड्यात सुद्धा सोनोग्राफी केली जाणार असल्याने तुम्ही तुमच्या बाळाला बघू शकता. तसेच ग्लुकोज चाचणी, रक्ताच्या चाचण्या आणि अँटीबॉडीज ची तपासणी केली जाते, ज्यामुळे गर्भारपणातील मधुमेह आणि आर.एच फॅक्टरची शक्यता तपासली जाते. जर ग्लुकोज चाचणी पॉझिटिव्ह आली  तर ग्लुकोज टॉलरन्स चाचणी करायला सांगितली जाते त्यामुळे गर्भारपणातील मधुमेह असल्यास त्याला पुष्टी मिळते.

आहार कसा असावा?

२६व्या आठवड्यात काय खावे ज्यामुळे तुम्हाला योग्य पोषण मिळेल त्याची यादी खाली दिली आहे

  • अंडी आणि मांस – हे ‘choline’ चे स्रोत आहेत आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी ते महत्वाचे आहे.
  • रोमाईन लेट्युस – रोमाईन लेट्युस खाल्ल्यास व्हिटॅमिन बी, फोलेट, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम मिळते.
  • फळे आणि भाज्या – ताजी फळे, भाज्या आणि व्हिटॅमिन बी आणि तंतू असलेले उच्च तंतूमय पदार्थ खाल्ले पाहिजेत.
  • पाणी – भरपूर पाणी प्यायलास रक्ताभिसरण संतुलित राहते आणि बद्धकोष्ठता सुद्धा होत नाही.
  • ज्यूस – न्याहारीच्या वेळेला दररोज ताजा मोसंबीचा रस प्यायल्यास, तो व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत ठरतो.
  • हिरव्या पालेभाज्या – आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास त्यामध्ये असलेल्या ल्युटीन, म्हणजेच नैसर्गिक कॅरोटेनॉइड मुळे डोळ्यांचा चांगला विकास होतो.

हे लक्षात असुद्या की थोड्या थोड्या वेळच्या अंतराने खाल्ल्यास जळजळ कमी होते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

धोक्याच्या सूचना: तुमच्या संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत जर खाली दिलेली लक्षणे आढळली तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा

  • छातीत दुखणे
  • बाळाची हालचाल मंदावणे
  • चालताना त्रास होणे

काय काळजी घ्याल? त्यासाठी काही टिप्स

आता तुम्हाला आजूबाजूला फिरण्यास असुविधा जाणवेल. खाली काही टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तुमचा हा काळ चांगला जाईल.

हे करा

  • तुम्ही व्यायाम करत राहणे हे महत्वाचे आहे.
  • तुम्ही पोटॅशिअम जास्त प्रमाणात घेतले पाहिजे कारण वाढत्या वजनामुळे तुमच्या शरीरावर ताण येईल. पोटॅशिअममुळे रात्रीच्या वेळी स्नायूंमध्ये येणाऱ्या पेटके कमी होतात. तसेच प्रसुतीपूर्व वर्गांना जाणे योग्य ठरेल.
  • तुमचे बाळ लोहासाठी तुमच्या शरीरावर अवलंबून आहे त्यामुळे लोहसमृद्ध अन्नपदार्थ खाणे गरजेचे आहे.
  • भरपूर झोप घ्या.
  • गर्भारपणात शारीरिक संबंध ठेवा.

हे करू नका

  • धूम्रपान टाळा कारण त्यामुळे जन्मानंतर बाळाचे वजन कमी भरते आणि तयामुळे बाळामध्ये जन्मतःच व्यंगाची शक्यता वाढते.
  • मद्यपान टाळा कारण त्यामुळे ‘Fetal Alcohol Syndrome’ होण्याची शक्यता आहे.
  • कच्चे न शिजवलेले मांस खाऊ नका त्यामुळे लिस्टेरिओसिस (listeriosis),टॉक्सओप्लास्मोसिस (Taxoplasmosis) आणि अन्न विषबाधा होण्याची शक्यता असते.
  • पाश्चराइझ न केलेले दुग्धजन्य पदार्थ खाऊ नका कारण त्यामुळे आजारपण येऊ शकते आणि गर्भपात होऊ शकतो.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

जर तुम्ही अजूनही शॉपिंग ला सुरुवात केली नसेल तर तुम्ही बाळांच्या कपड्यांची खरेदी करू शकता. हे तुमच्या गर्भारपणाचे अंतिम दिवस असल्याने तुमच्या पतीला सुद्धा नियोजनात सहभागी करून घ्या.

निष्कर्ष: गर्भधारणेचा २६ वा आठवडा म्हणजे बाळाचा खूप महत्वाचा विकास होत असतो. तुम्हाला त्याविषयी माहिती असल्यास तुम्ही राहिलेला प्रवास आत्मविश्वासाने करू शकता.

मागील आठवडा: गर्भधारणा: २५वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: २७वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article