Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य कोविड-१९ कोरोनाविषाणूचा संसर्ग वाढत आहे. तुम्ही (आणि तुमचे कुटुंबीय) कसे सुरक्षित राहू शकाल ह्याविषयी माहिती इथे दिली आहे

कोविड-१९ कोरोनाविषाणूचा संसर्ग वाढत आहे. तुम्ही (आणि तुमचे कुटुंबीय) कसे सुरक्षित राहू शकाल ह्याविषयी माहिती इथे दिली आहे

कोविड-१९ कोरोनाविषाणूचा संसर्ग वाढत आहे. तुम्ही (आणि तुमचे कुटुंबीय) कसे सुरक्षित राहू शकाल ह्याविषयी माहिती  इथे दिली आहे

प्राणघातक कोविड १९ कोरोनाव्हायरस जगभरात वेगाने पसरत असताना, भारतातील त्याच्या प्रवेशाबद्दल आणि होणाऱ्या परिणामांबद्दल न्यूज चॅनेल्स आणि तुमच्या फोनवर येणारे असंख्य फॉरवर्ड्स ह्यामुळे तुम्हाला भारावल्यासारखे होऊन जबरदस्त भीती वाटू शकते. विशेषत: जर आपल्याकडे मुले असतील तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटणे नैसर्गिक आहे. तथापि, आपली चिंता कमी करण्यासाठी एक दीर्घ श्वास घेऊन काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. या व्हायरसपासून आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपण काय करू शकता ते येथे दिले आहे

कोरोना विषाणू कसा पसरतो?

जेव्हा संसर्ग झालेला व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा लाळ किंवा श्लेषमाच्या थेंबांमधून कोरोनाविषाणू पसरतो. निरोगी माणसाच्या शरीरात हे विषाणू श्वासाद्वारे किंवा विषाणू असलेल्या पृष्ठभागास स्पर्श झाल्यामुळे प्रवेश करतात. हे विषाणू सीट्स, हॅन्डल्स, डेस्क्स, रेलिंग इत्यादी वर पसरतात. निरोगी माणूस जेव्हा त्यास स्पर्श करतो तेव्हा ते त्याच्या हातावर येतात आणि जेव्हा तो स्वतःच्या किंवा त्याच्या प्रिय माणसाच्या चेहऱ्याला स्पर्श करतो तेव्हा ते आजारी पडतात.

कोरोनाविषाणूचा संसर्ग झाला असल्याची लक्षणे

कोरोनाविषाणूचा संसर्ग झाला असल्याची लक्षणे साधी सर्दी आणि फ्लू सारखीच असतात त्यामुळे निर्णय घेणे अवघड असते. ह्या विषाणूचा इन्क्युबेशनचा काळ १४ दिवसांचा असतो, त्यामुळे जर ही लक्षणे ७१० दिवसांपेक्षा जास्त काळ राहिली तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.

  1. खोकला
  2. सतत वाहणारे नाक
  3. ताप
  4. श्वसनाच्या समस्या
  5. घशाला सूज येणे
  6. डोकेदुखी
  7. फुप्फुसांना सूज येणे

जर तुम्हाला कोरोनाविषाणूंचा संसर्ग झाला असल्याची लक्षणे वाढली तर काय कराल?

जर तुम्ही आजारी असाल आणि तुम्हाला कोविड १९ चा संसर्ग झाला असल्याची शंका आली तर घाबरून जाऊ नका. तुमच्या आणि तुमच्या आजूबाजूच्यांच्या आरोग्यरक्षणासाठी तुम्ही काही संरक्षक गोष्टी करू शकता. वैद्यकीय तज्ञांची मदत घ्या जर:

  1. जर तुम्हाला कोविड १९ ची लक्षणे ७ दिवसांपेक्षा अधिक कालावधी साठी दिसली तर
  2. जिथे कोरोनाविषाणुंचा उद्रेक झाला आहे अशा ठिकाणी तुम्ही राहिला असाल किंवा प्रवास केलेला असेल
  3. संसर्ग झालेल्या व्यक्तीशी तुमचा संपर्क आलेला असेल
  4. जी व्यक्ती उद्रेक झालेल्या ठिकाणी राहून आलेली असेल किंवा प्रवास करून आलेली असेल तिच्या संपर्कात आलेले असल्यास

तुम्हाला मदत मिळेपर्यंत तुमच्या कुटुंबातील व्यक्ती सुरक्षित आहेत की नाही ह्याची खात्री करा

  1. डॉक्टरांकडे जाण्याआधी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधा जेणेकरून ते तयारीत राहतील
  2. घरातच स्वतःचे विलगीकरण करा आणि जितके शक्य होईल तितके सार्वजनिक पृष्ठभागाना स्पर्श करणे टाळा
  3. रूम किंवा वाहन कुणाशीही शेअर करू नका
  4. लहान मुले आणि मोठ्या माणसांपासून दूर रहा कारण त्यांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते.

कोरोनाविषाणूंच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?

कोरोनाविषाणूपासून स्वतःचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे संरक्षण करण्याचा एकच उपाय म्हणजे स्वच्छता राखणे. कोरोनाविषाणू दूर ठेवण्यासाठी इथे काही टिप्स देत आहोत

  1. गर्दी आणि खूप जास्त लोक असतील अशा समारंभांना जाणे टाळा. कारण तुम्हाला कळणार पण नाही आणि तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या सानिध्यात याल
  2. जर तुम्हाला समारंभाला जाणे खूपच आवश्यक असेल तर मास्क वापरा विशेषकरून जर कोणी आजारी असेल किंवा त्यांना फ्लूसदृश लक्षणे दिसत असतील तर हे पाळा
  3. जर तुमच्या आजूबाजूला कुणी खोकताना किंवा शिंकताना दिसले तर त्यांना मास्क द्या
  4. जर एखाद्याला सतत शिंका येत असतील किंवा खोकला येत असेल तर २ मीटरचे अंतर ठेवा
  5. नियमितपणे हात धुवा किंवा तुमचे हात सॅनिटायझर लावून निर्जंतुक करा. विशेषकरून सार्वजनिक जागांना स्पर्श केला असेल तर हे नक्की पाळा
  6. टिश्यूचा वापर झाल्यावर त्यांना लागलीच कचऱ्याच्या पेटीत टाका
  7. मास्क १२ दिवसांपेक्षा जास्त काळ न वापरता कचऱ्याच्या पेटीत टाका. विशेषकरून जिथे ह्या विषाणूचा उद्रेक झाला आहे अशा ठिकाणी तुम्ही रहात असाल तर हे करा
  8. खूप गर्दीच्या ठिकाणी लहान बाळांना आणि ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणे टाळा कारण संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो
  9. तुमचा चेहरा, डोळे आणि कानांना शक्यतोवर स्पर्श करणे टाळा
  10. अन्नपदार्थ, कपडे किंवा भांडी कुणाशीही म्हणजेच कुटुंबातील सदस्यांसोबत सुद्धा शेअर करू नका

तुमचे हात परिणामकरीत्या स्वच्छ धुण्यासाठी काही टिप्स

जंतू विरहीत राहण्यासाठी नियमितपणे तुम्ही हात स्वच्छ धुतले पाहिजेत. आणि हो! हात योग्य प्रकारे धुण्याची सुद्धा एक पद्धत आहे. खाली दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही परिणामकरीत्या हात स्वच्छ धुवू शकता!

  1. हात धुण्यासाठी नेहमी साबण आणि पाणी वापरा. विशेषकरून डॉक्टरांनी सांगितलेला साबण वापरा
  2. हात धुताना मागच्या बाजूने तसेच बोटाच्या मधल्या जागांकडे सुद्धा लक्ष द्या
  3. ढोपरापर्यंत हात धुवा
  4. नखांखाली धुण्यास विसरू नका, ही जागा जंतूंना लपण्यासाठी चांगली जागा आहे
  5. कमीत कमी २० सेकंदांसाठी हात धुवा

योग्य टिप्स आणि युक्त्या तुमच्याकडे असताना कोरोनाविषाणूला घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. लक्षात ठेवा स्वच्छ रहा. तुमची प्रतिकारशक्ती वाढवा आणि तुम्ही व तुमच्या कुटुंबातील सदस्य ह्या झपाट्याने पसरणाऱ्या विषाणूपासून संरक्षित राहण्यासाठी काळजी घ्या.

आणखी वाचा: कोरोनाविषाणूचा उद्रेक झालेला असताना तुमच्या मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी घरात करता येणारे १५ क्रियाकलाप

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article