Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य अक्षय तृतीया – तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी 60 शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

अक्षय तृतीया – तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी 60 शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

अक्षय तृतीया – तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी 60 शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा सण हा अत्यंत शुभ मानला जातो, हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ह्या वर्षी अक्षयतृतीया २२ एप्रिल रोजी आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. ह्या दिवशी केलेले चांगले काम हे अक्षय असते असे मानले जाते. देशभरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. ह्या सणानिमित्त आपल्या प्रियजनांवर शुभेच्छांचा वर्षाव तुम्ही करावा ह्यासाठी आम्ही इथे काही शुभेच्छासंदेश दिलेले आहेत.

1. ह्या अक्षय तृतीयेला लक्ष्मी आणि सरस्वती देवीची कृपा आपल्यावर सदैव राहो

2. लक्ष्मीचा असो वास तुमच्या घरी, सुख आणि शांती असुदे तुमच्या दारी

3. मंगल तोरण दारी ठिपक्यांची रांगोळी, सण अक्षय तृतीयेचा आला जवळी

4. आनंद, सुख,शांती आणि आरोग्य घेऊन हा अक्षय तृतीयेचा सण येवो हीच प्रार्थना

5. आनंदाचा वर्षाव आणि भरभरून यश घेऊन हा अक्षय तृतीयेचा सण येऊदे

6. धन वृद्धिंगत होवो, लक्ष्मी मातेची कृपा अशीच अखंड राहो

7. मंगलदिनी ह्या अक्षयतृतीयेच्या तुम्हाला आमच्या कडून खूप शुभेच्छा

8. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असा, तुमच्या कडे सुद्धा धन, आरोग्य, संपत्ती ह्याचा अक्षय साठा राहो

9. श्रीलक्ष्मीची तुमच्यावर अखंड कृपा राहो, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!

10. तुमच्या जीवनात ही अक्षय तृतीया आनंद, सुख,सौख्य आणि शांती घेऊन येवो

11. धन आणि प्रेमाची होवो बरसात आनंदी क्षणांनी होऊदेत अक्षय तृतीयेची सुरुवात

12. उत्तम आरोग्य आणि धनाची बरसात हीच आहे अक्षय तृतीयेच्या सणाची खास बात

13. अक्षय तृतीयेला उजळूदे यशाचा दीप, येऊदे सुख आणि सौख्य समीप

14. अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व इच्छा पूर्ण होऊदे, धन धान्याची बरसात होऊदे

15. सुख घरी अक्षय राहो नात्यांमध्ये प्रेम अक्षय राहो ह्या मंगलमय दिनाच्या शुभेच्छा

16. सोन्याची पावलांनी लक्ष्मी येवो प्रेमाची तुमच्यावर बरसात होवो

17. नवचैतन्य,आनंद, सुख, समाधान घेऊन हा सण येऊदे सोनेरी क्षणांची सोबत असू दे

18. लक्ष्मी आणि सरस्वती मातेची तुमच्यावर अशीच अखंड कृपा राहो अक्षयतृतीयेच्या शुभ सणाच्या शुभेच्छा

19. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा अक्षय तृतीयेचा सण आपल्या दारी आनंद आणि सुख घेऊन येवो

20. अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करण्यापेक्षा प्रेम वृद्धिगंत करूयात

21. लक्ष्मीची कृपा, सरस्वतीचा आशीर्वाद आप्तांजनाचे प्रेम, सुखाचा संवाद – अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!

22. दारी मंगल तोरण बांधा, अक्षयतृतीयेचा सण समृद्धीचा आला

23. हे लक्ष्मी माते तुझी कृपा अशीच राहूदे, सरस्वती मातेचा आशीर्वाद असाच राहूदे

24. सोनेरी क्षण, आनंदाचा सण – अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा

25. तुमच्या जीवनातील आनंद असाच अक्षय राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

26. अक्षय तृतीयेचा दिवस आहे खास, राहूदे तुमच्या घरी राहूदे लक्ष्मीचा वास

27. दुःख दूर होऊन आनंद पसरूदे, लक्ष्मीचा वास अखंड राहूदे – अक्षयतृतीयेच्या खूप शुभेच्छा

28. अक्षय तृतीयेचा सण सोनेरी क्षणांचा, होऊदे सौख्याचा आणि आनंदाचा

29. दानाचे महत्व जाणून घेऊयात, अक्षय तृतीयेचा सण उत्साहाने साजरा करूयात

30. संकटे सारी दूर होवोत, अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाचा अक्षय वर्षाव होवो

31. लक्ष लक्ष आनंदी आठवणी, नात्यांची वीण घट्ट होई धनाची होवो बरसात, प्रेमाचा होवो वर्षाव – अक्षयतृतीयेच्या खूप शुभेच्छा

32. अपूर्ण न राहो तुमची कुठलीही इच्छा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आमची हीच आहे सदिच्छा

33. सोन्यासारखी नाती जपूयात, अक्षय तृतीयेचा सण प्रेमाने साजरा करूयात

34. सुख आणि समृद्धी घेऊन आला हा सण आनंदाचा, आशीर्वाद सदैव राहो तुमच्यासोबत परमेश्वराचा – अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

35. अक्षयतृतियेचा हा सण तुमच्यासाठी अक्षय सुख घेऊन येवो

36. अक्षय तृतीयेचा हा सण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आनंदाचा आणि सौख्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

37. तुमच्या जीवनात प्रेम, सुख, आनंद आणि चांगले आरोग्य अक्षय राहो

38. कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मी आली, अक्षयतृतीया सुख आणि शांती सोबत घेऊन आली

39. ॐ श्रीं गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा॥ अक्षय तृतीया च्या शुभेच्छा

40. सगळ्यांची दुःखे दूर होऊन सर्वांना सुख लाभुदे – अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जीवनाला नवी दिशा मिळूदे

41. लक्ष्मीची कृपा होऊन वैभव मिळो – अक्षय तृतीयेच्या खूप शुभेच्छा

42. प्रेम राहो अक्षय, क्षय होऊदे द्वेषाचा जिंकूदे प्रेमाला, पराभव होऊदे मत्सराचा

43. वर्षाचा सण आला अक्षय्यतृतीयेचा, होऊ दे वर्षाव आनंदाचा आणि प्रेमाचा! अक्षयतृतीयेच्या खूप शुभेच्छा!

44. आपापसातील प्रेम, माया आणि जिव्हाळा अक्षय राहूदे

45. सण सुखाचा, सण भाग्याचा सण सोनेरी क्षणांचा

46. नात्यामध्ये स्नेह वाढो व्यवसायात भरभराट होवो शांती आणि आरोग्य लाभो लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहो

47. चांगले विचार अक्षय राहोत सुख,समृद्धी,धनवृद्धी होवो प्रेमाला यावा बहर अक्षय तृतीयेचा सण घेऊन येवो आनंदाची लहर

48. दानधर्म करूया देण्यातला आनंद मिळवूया अक्षय तृतीयेचा सण खरेदीऐवजी दान करून साजरा करूया

49. ईश्वराचा अंश आहे कणाकणात आनंद आणि उत्साह राहूदे प्रत्येक क्षणात अक्षय तृतीयेचा सण आला दारी घेऊयात यशाची उत्तुंग भरारी

50. अक्षय तृतीयेच्या सणाच्या गोड आठवणी वाटूयात स्नेह आणि ठेवू मधुर वाणी

51. दुःखे आणि संकटे व्हावीत दूर अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्यास आपण सगळे आतूर

52. फुलांची आरास, रांगोळीची महिरप दारी तोरण, देवापाशी निरांजन सोन्याची खरेदी, आले उत्साहाला उधाण नवी सुरुवात आणि यशाची चढती कमान

53. चैत्राची पालवी कोकिळेचे मंजुळ गान खरेदी सोबतच चला करूया दान

54. निराशा सारी दूर होऊन आशेचा नवीन किरण येवो यश, किर्ती,आरोग्य सर्व काही भरभरून लाभो

55. नवपालवी नवचैतन्य घेऊन आली अक्षय तृतीया यश,स्नेह, आरोग्य घेऊन आली

56. अक्षय तृतीयेचा सोनेरी सण घेऊन आला नवचैतन्याची खाण

57. विसरुनी दुःखे सारी मनाला मिळावा विसावा अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक क्षणी परमेश्वर सोबत असावा

58. शब्दांमध्ये गोडवा अक्षय राहो अक्षय तृतीयेच्या दिवशी नात्यांना नवी झळाळी येवो

59. प्रेमाची उब लाभो तुम्हाला यशाची झालर लाभो जीवनाला अक्षय तृतीयेचा सण आला सगळीकडे आनंद ओसंडू लागला

60. मैत्री आणि नात्यांमध्ये स्नेह वाढावा अक्षय तृतीयेच्या सणाला धनाचा वर्षाव व्हावा

वरील शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस आपल्या प्रियजनांना पाठवा आणि अक्षय तृतीयेचा सण उत्साहात साजरा करा.

आणखी वाचा:

अध्यात्मिक फायद्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या गोष्टी कराव्यात?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article