Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य बाळांसाठी पपई: फायदे आणि पाककृती

बाळांसाठी पपई: फायदे आणि पाककृती

बाळांसाठी पपई: फायदे आणि पाककृती

पपईच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी काहीच शंका नाही. पपई अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते आणि लहान मुलांसोबतच मोठ्या माणसांनासुद्धा पपईच्या ह्या विरोधी दाहक (अँटीइंफ्लामेंटरी) गुणधर्माचा उपयोग होतो. पपई मध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारी पोषणमूल्ये सुद्धा असतात. गडद रंगाचे हे फळ उष्णकटिबंधात वाढते आणि वर्षभर उपलब्ध असते. ह्या फळाचा पोत मऊ असल्यामुळे हे फळ बऱ्याच पाककृतींचा घटक असते. ह्या मधुर फळापासून तुमच्या बाळास सर्व पोषणमूल्ये मिळतात, कसे ते पाहुयात

तुमच्या बाळाला पपई देताना

तुमच्या बाळाच्या आहारात समावेश करण्यासाठी पपई हे उत्तम फळ आहे परंतु तुम्ही आधी बाळाला केळं, अवोकाडो, रताळे ही फळे देण्यास सुरुवात करा. ही फळे पचनास सोपी असतात. एकदा बाळाला ही फळे पचवता आली तुम्ही बाळाला पपईची ओळख करून देऊ शकता. बाळाच्या आहारात पपईची ओळख करून देण्याचे उत्तम वय म्हणजे ७८ महिने होय.

पपईचे पोषण मूल्य

एका मध्यम आकाराच्या पपई मध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. व्हिटॅमिन ए, बी, सी, फोलेट, मॅग्नेशिअम, कॉपर, लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लायकोपीन, फोस्फेरस हे पपई मध्ये सापडतात.

एक कप कुस्करलेल्या पपई मध्ये किती प्रमाणात पोषणमूल्ये असतात ते बघण्यासाठी खालील टेबल पहा.

जीवनसत्वे

खनिजद्रव्ये

व्हिटॅमिन ए २१८५ आय. यु. पोटॅशिअम ४१९ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी १ (थायमिन) – ०६ मिग्रॅ फॉस्फरस २३ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी२ – (रिबोफ्लाविन) – ०७ मिग्रॅ मॅग्नेशिअम ४८ मिग्रॅ
नियासिन ८२ मिग्रॅ कॅल्शिअम ४६ मिग्रॅ
व्हिटॅमिन सी १४०. १ मिग्रॅ सोडियम १८ मिग्रॅ
व्हिटॅमिन के ६ एमसीजी लोह ५७ एम जी
फोलेट १ एमसीजी त्यामध्ये जस्त, मँगेनीज आणि कॉपर कमी प्रमाणात असते
ह्यामध्ये इतर व्हिटॅमिन्स कमी प्रमाणात असतात

तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी पपईचे फायदे

पपईमध्ये पोषणमूल्ये आणि व्हिटॅमिन्स तर असतातच परंतु त्याव्यतिरिक्त पपईचे इतरही फायदे आहेत. पपईचे कितीही फायदे असले तरी ५ महिन्यांच्या बाळाला पपई देऊ नये. बाळ ७८ महिन्यांचे झाल्यावर पपईची ओळख बाळाला करून द्यावी. बाळाच्या आरोग्यासाठी खालील गोष्टी पपई तुमच्यासाठी करू शकते.

. पचन सुधारते

पपई मध्ये असलेले पॅपेन नावाचे एंझाइम हे पचनास मदत करते. नियमित पपई खाल्ल्यास बाळाची पचनक्रिया लक्षणीयरीत्या सुधारते.

. प्रतिकारशक्ती सुधारते

तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती अजून मोठ्या माणसांइतकी विकसित झालेली नसते. त्यामुळे बाळाला संसर्गाचा धोका जास्त असतो. व्हिटॅमिन सी मुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते आणि बाळ आजारी पडत नाही.

. त्वचेवरील जखमा बऱ्या होण्यास मदत होते

पपईमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे अल्सर, भाजलेल्याच्या जखमा ह्यापासून बाळ सुरक्षित राहते. पपईचे साल किंवा गर रॅशेस किंवा भाजलेल्या ठिकाणी तुम्ही लावू शकता त्यामुळे दाह कमी होईल.

. चयापचय सुधारते

पपई फॉलेटने सम्रुद्ध असते, आणि अमिनो ऍसिड्सच्या निर्मितीसाठी ते आवश्यक असते. आणि ह्यामुळे काही प्रमाणात बाळ मोठे झाल्यावर हृदयरोगाचा धोका कमी होतो तसेच बाळाला पोटदुखीची शक्यातसुद्धा कमी होते.

चयापचय सुधारते

. शौचास नियमित होते

पपई मध्ये असलेले तंतुमय पदार्थ नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते. बाळाला बद्धकोष्ठता झाल्यावर पपई हा उपाय आहे.

. जंतांपासून सुटका

पपईच्या बियांची वाळवून केलेली पूड मधासोबत दिल्यास पोटातील जंत नाहीसे होण्यास मदत होते. सिस्टीन प्रोटिनेज नावाच्या एन्झाईममुळे असे होते.

. डोळ्यांसाठी ते चांगले असते

बाळाची दृष्टी चांगली होण्यासाठी पपईमधील व्हिटॅमिन ए ची मदत होते आणि रातांधळेपणा दूर होतो

. तांबड्या पेशी वाढण्यासाठी मदत करते

लोहामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते आणि तांबड्या रक्तपेशींची संख्या स्थिर राहते.

बाळाला पपई भरवण्याआधी घेण्याची काळजी

कुठल्याही नवीन पदार्थांप्रमाणेच, तुम्ही बाळाला पपईची ओळख हळू आणि काळजीपूर्वक करून दिली पाहिजे. तुमच्या बाळाला ह्या फळाची चव आवडते का आणि ते खाल्ल्यावर बाळाला ते पचते का हे पाहणे जरुरी असते. सुरुवातीला पपई थोड्या प्रमाणात द्या आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. तुम्ही बाळाला पपई भरवण्याआधी खालील काही गोष्टी लक्षात घ्या.

  • पपई पुरेशा प्रमाणात पिकली आहे आणि खाण्यायोग्य झाली आहे का ते पहा. कच्च्या पपईमुळे पोटदुखी होते आणि पोटात पेटके येतात.
  • सुरुवातीला फक्त दोन टेबलस्पून पपई बाळाला भरवा कारण खूप जास्त प्रमाणात पपई प्रमाणात खाल्ल्यास बाळांना पोटदुखी होऊ शकते
  • जर तुमच्या बाळाला पपई आवडली नाही किंवा पपई खाल्ल्यानंतर बाळ अस्वस्थ झाले तर बाळाला ती भरवणे बंद करा

तुमच्या बाळासाठी पपईच्या सोप्या पाककृती

बाळांना सुद्धा जेवणात विविधता लागते त्यामुळे तुम्ही बाळाला पपई वेगवेगळ्या स्वरूपात देऊ शकता. परंतु बाळासाठी पपई वापरताना ती संपूर्ण पिकलेली हवी आणि पपई विकत घेतानासाठी काही टिप्स खाली दिल्या आहेत

  • पपई हिरवी आणि कडक असेल तर घेऊ नका कारण ती पिकण्यास वेळ लावतो. त्यामुळे झाडावरून काढताना पपईचा काही भाग पिवळा झाला असेल तरच काढा. अशी पपई चांगली पिकते.
  • खाण्यासाठी तयार असलेली पपई रंगाने केशरी असते आणि त्यामध्ये थोडी लाल छटा असते. अशी पपई कडक असते पण थोडी दाबून पाहिल्यास हाताला मऊ लागते. अशा पपईस मंद गोड सुवास येतो.
  • पपईला खूप जास्त गोड वास येत असेल तर पपई जास्त पिकलेली आहे आणि ती लवकर खराब होणार आहे. जर पपई काही दिवसांनी खायची योजना असेल तर पिवळसर पपई घ्या.

नेहमीच्या पपईच्या प्युरी व्यतिरिक्त खाली काही पपई वापरून करावयाच्या पाककृती दिल्या आहेत.

. पपई मॅश

घटक: तुम्हाला ह्यासाठी एक पिकलेली पपई लागेल

पपई मॅश

कृती

  • पपईचे साल काढा तसेच आतील बिया सुद्धा काढून टाका आणि पपईचे चौकोनी मोठे तुकडे करा.
  • तुमच्या बाळाच्या आवडीनुसार पपई कुस्करा किंवा ब्लेंडर मध्ये त्याची प्युरी तयार करा.

पपईचे तुकडे तुम्ही आधी उकडून घेऊ शकता त्यामुळे पचनास सुलभ जाईल अशी मऊ प्युरी करता येईल.

. बाळांसाठी खरबूज आणि पपई मिल्कशेक

घटक

  • २ टेबलस्पून योगर्ट किंवा १/४ कप दूध
  • १ टेबलस्पून कापलेले कलिंगड़ किंवा खरबूज
  • १ टेबलस्पून कापलेली पपई
  • ह्या सगळ्या फळांचे मोठे तुकडे करा आणि ब्लेंडर मध्ये योगर्ट सोबत घाला आणि स्मूदी तयार करा. आणि दूध घालून मिल्कशेक तयार करा

. फ्रुटी ब्रेकफास्ट ट्रीट

घटक

  • २ टीस्पून ओटमील, आधीच करून ठेवलेले
  • १ टेबलस्पून पपई, प्युरी करून किंवा तुकडे
  • /२ चिरलेले केळं

सगळे घटक मिक्सर मधून फिरवून घ्या त्यामुळे बाळाच्या दिवसाची पोषक सुरुवात होईल.

पिकलेली पपई हे चवदार आणि पोषक फळ आहे. ते आहे तसे खाता येते किंवा दुसऱ्या फळांसोबत त्याच्या चवदार डिश तयार करता येतात. अवोकाडो, सफरचंद, केळी, पीच, गाजर, योगर्ट आणि चिकन ह्यामध्ये पपई घालून पाककृती तयार करता येतात.

अस्वीकरण: प्रत्येक बाळाचा विकास वेगळा होत असतो. ही माहिती तुम्हाला फक्त मार्गदर्शन देण्यासाठी आहे. ही माहिती म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या सल्ल्याला पर्याय म्ह्णून नाही.

संसाधन आणि संदर्भ:

स्रोत १
स्रोत २

आणखी वाचा:

बाळासाठी सफरचंदाची प्युरी – पाककृती आणि साठवणुकीसाठी टिप्स
बाळासाठी गाजराच्या प्युरीची पाककृती – प्युरी कशी कराल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article