Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे?

बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे?

बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे?

In this Article

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत बाळाला स्तनपान करण्याची शिफारस करते. कारण स्तनपानाचे बाळाला बरेचसे फायदे आहेत. तथापि, स्तनपान हे काही मतांसाठी आव्हानात्मक असते आणि म्हणूनच ज्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे ह्याविषयी सर्व माहिती ह्या लेखात दिली आहे आणि त्याची त्यांना नक्कीच मदत होईल.

बाळाला बाटलीने दूध पाजण्याचा निर्णय घेण्यामागे ऑफिसला पुन्हा रुजू होण्यापासून ते पुरेसे दूध येत नाही इथपर्यंत कुठलेही कारण असू शकते. ह्या लेखात बाळाला बाटलीने दूध देण्याविषयी आईला माहिती पाहिजेत अशा सर्व गोष्टींची चर्चा केलेली आहे.

नवजात शिशुला बाटलीने दूध पाजण्यास केव्हा सुरुवात करावी?

बाळाला स्तनपान नीट घेता येऊ लागेपर्यंत आणि स्तनांवरची पकड बाळाला घट्ट करता येईपर्यंत बाटलीने दूध देऊ नये असे लॅक्टेशन तज्ञ सांगतात. तुमच्या वेळापत्रकानुसार किंवा बाळाच्या गरजेनुसार बाळाला जास्त पोषणाची गरज भासते तेव्हा तुम्ही बाळाला बाटलीने दूध देण्यास सुरुवात करू शकता. बाटलीने दूध पिण्याची सवय होण्यासाठी बाळाला कमीत कमी २ आठवडे लागतात.

बाळासाठी बाटलीची निवड करताना

बाळासाठी योग्य बाटलीची निवड करणे महत्वाचे असते. जर तुमचे बाळ खूप छोटे असेल तर हळू प्रवाह असणाऱ्या बाटलीची निवड करा. जेव्हा बाळाला त्या प्रवाहाची सवय होईल तेव्हा नॉर्मल प्रवाह असणारी बाटली वापरण्यास सुरुवात करा. दूध पाजण्यासाठी सर्वात चांगल्या बाटल्या म्हणजे BPA (बाय फिनॉल ए) आणि EA (इस्ट्रोजेन ऍक्टिव्हिटी) फ्री बाटल्या होय.

किती वेळा आणि किती प्रमाणात तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजले पाहिजे?

सुरुवातीला तुमचे नवजात शिशु स्तनपान घेणाऱ्या बाळाप्रमाणेच ३०५० मिली दूध बाटलीने पिते. ३ दिवसांनंतर बाळाची गरज ६०९० मिली इथपर्यंत वाढू शकते. तसेच बाळाला प्रत्येक ३४ तासांनी दूध पाजण्याची शिफारस सुरुवातीला केली जाते. बाळ दोन दूध पाजण्याच्या वेळांमध्ये ४५ तास झोपते, परंतु तुम्ही बाळाला दर ५ तासांनी दूध पिण्यासाठी उठवले पाहिजे. एक महिन्यानंतर तुमच्या बाळाचे दुधाचे प्रमाण १२० मिली इतके वाढेल आणि बाळाला प्रत्येक ४ तासांनंतर दूध द्यावे लागेल. पुढे बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत हे प्रमाण १८०२४० मिली, ५ वेळा दिवसातून असे होईल.

तुम्ही बाळाला स्तनपान आणि फॉर्मुला दूध दोन्ही देऊ शकता का?

स्तनपान आणि फॉर्मुला दूध दोन्ही दिल्याने तुमच्या बाळाला दोन्हींमधून चांगले पोषणमूल्य मिळते. तुम्ही ऑफिसला पुन्हा रुजू होण्याचा विचार करीत असाल तर काहीवेळा बाटलीचे दूध आणि नंतर रात्री झोपताना स्तनपान दिल्यास योग्य संतुलन राखले जाईल.

स्तनपान आणि फॉर्मुला दूध दोन्ही कसे द्यावेत ह्याविषयी काही टिप्स

 • तुम्ही दिवसा स्तनपान देणे हळू हळू कमी करा आणि बाटलीने दूध देण्यास सुरुवात करा. असे हळूहळू करत राहिल्यास दूध येणे कमी होईल आणि स्तनांमध्ये दूध साठून ते घट्ट होणार नाहीत.
 • सकाळी आणि संध्याकाळी बाळाला स्तनपान दिल्यास बाळाला भरपूर प्रमाणात पोषण मिळते
 • तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा स्तनपान देणे चांगले आणि नंतर गरज भासल्यास फॉर्मुला देणे चांगले
 • तसेच बाटली मध्ये स्तनपान आणि फॉर्मुला एकत्र करू नका त्यामुळे ते मिश्रण खराब होण्याची शक्यता असते

दुधाच्या बाटल्या निर्जंतुक करणे

संसर्गास दूर ठेवण्यासाठी बाळ एक वर्षाचे होईपर्यंत बाळाच्या दुधाच्या बाटल्या तसेच इतर गोष्टी निर्जंतुक करून घेणे चांगले. बाटल्या निर्जंतुक कशा कराव्यात ह्याविषयी काही टिप्स

. दुधाच्या बाटल्या धुणे

काही वेळा दूध पाजल्यानंतर बाटल्या, बाटल्यांची झाकणे आणि इतर गोष्टी गरम साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्या पाहिजेत.

बाटल्या धुण्याचा ब्रश वेगळा ठेवा आणि झाकणांसाठी वेगळा ब्रश ठेवा. बाटलीचे निपल उलटे करून गरम साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. अगदी उग्र साबण वापरण्याऐवजी नेहमीच सौम्य साबण किंवा बाळासाठीचा लिक्विड साबण वापरावा.

सगळ्या दुधाच्या बाटल्या व इतर सामान पुन्हा थंड पाण्याने धुवून घ्या त्यामुळे साबण राहणार नाही.

. दुधाच्या बाटल्या निर्जंतुक करणे

बाटल्या निर्जंतुक करण्याचे काही मार्ग खाली दिले आहेत

 • बाटल्या गरम पाण्यात उकळून घेण्याची पारंपरिक पद्धत दुधाच्या बाटल्या पाण्यात उकळून घेणे ही खूप जुनी पद्दत आहे. दुधाच्या बाटल्यांचे सगळे साहित्य १० मिनिटे पाण्यात उकळून घ्या. हे सगळे साहित्य पाण्यात पूर्ण बुडले आहे ह्याची खात्री करा. मध्ये मध्ये बाटल्या आणि बुचांवर लक्ष ठेवा कारण खूप जास्त तापमानामुळे ते खराब होऊ शकतात.

 • मायक्रोवेव्ह किंवा इलेक्ट्रिक स्टरलायझर दुधाच्या बाटलीचे साहित्य मायक्रोवेव्ह किंवा इलेक्ट्रिक स्टरलायझर मध्ये निर्जंतुक केले पाहिजेत. स्टरलायझर सोबत दिलेल्या सूचना वाचून त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. बाटली आणि झाकणे खालच्या दिशेने असल्याची खात्री करा आणि जेवढा वेळ सांगितला आहे तितकाच वेळ दुधाच्या बाटलीचे साहित्य आत आहे ह्याची खात्री करा.
 • निर्जंतुक करण्याचे द्रावण बाजारात मिळणारे निर्जंतुक करण्याचे द्रावण तुम्ही वापरू शकता. त्याचे उत्पादन करणाऱ्यांच्या सूचनांचे अनुसरण करा. बाटल्यांचे सगळे साहित्य द्रावणात संपूर्णपणे बुडले पाहिजे.

. निर्जंतुकीकरण झाल्यावर

जोपर्यंत लागत नाहीत तोपर्यंत दुधाच्या बाटल्या स्टरलायझर मध्ये ठेवाव्यात. जर तुम्ही बाटल्या उकळून घेण्याची पद्धत वापरत असाल तर, बाटल्या निर्जंतुक झाल्यावर काढून घ्या आणि त्यांना बूच व झाकणे लावून बंद करून ठेवा. बाटल्याना हात लावण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या.

दुधाची बाटली गरम करून घेण्यासाठी काही उत्तम मार्ग

जर बाळांना आवडत असेल तसे अन्नपदार्थ बाळाला दिले नाहीत तर बाळे ते घेत नाहीत. दुधाच्या बाटल्या गरम करण्यासाठी इथे काही टिप्स दिल्या आहेत

. बाटल्या गरम करण्याचे मशीन

ह्यामध्ये तुम्हाला बाटल्या दुधाने भरून त्या मशीन मध्ये ठेवाव्या लागतात आणि ४५ मिनिटांसाठी मशीन सुरु ठेवावे लागते आणि त्यानंतर लगेच छान कोमट झालेल्या दुधाच्या बाटल्या बाळासाठी तयार असतात.

. गरम पाण्याचे भांडे

एका खोलगट भांड्यात गरम पाणी भरून घ्या आणि त्यामध्ये भरलेल्या दुधाच्या बाटल्या ठेवा, ठेवताना झाकण काढून ठेवा. १०१५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका नाही तर जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

. काय टाळले पाहिजे

 • दुधाच्या बाटल्या गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरणे टाळा. त्यामुळे दूध सगळीकडे सारखे गरम होत नाही. बाटलीमधील एका विशिष्ट भागातील दूध गरम होते आणि ते बाळासाठी धोकादायक असते
 • दुधाची एकच बाटली दोनदा गरम करणे टाळा, कारण जेव्हा दूध गरम होते आणि थंड होण्यासाठी ठेवले जाते तेव्हा तिथे जिवाणूंची वाढ होते. म्हणून हे दूध टाकून देणे चांगले. पुन्हा बाळाला देताना ताजे दूध तयार करा.

बाळाला भूक लागली असल्याची लक्षणे

बाळाला भूक लागली असल्याच्या संकेतांवर लक्ष ठेवा. स्तनपान घेणाऱ्या बाळांप्रमाणेच बाटलीने दूध घेणारी बाळे प्रतिसाद देत असतात. स्तनांचा शोध घेणे, ओठ चाटणे हे त्यापैकीच काही संकेत होत.

जर तुमचे बाळ बाटलीने दूध पित असेल तर तुमचे बाळ किती दूध पीत आहे ह्याची कल्पना तुम्हाला येईल. इथे काही संकेत दिले आहेत ज्यावरून बाळाला भूक लागली आहे हे तुम्हाला समजेल.

 • बाळाला दिवसातून कमीत कमी ६८ वेळा दूध दिले पाहिजे. तुमचे बाळ सुद्धा नियमितपणे दुधाची मागणी करेल.
 • बाळाची स्तनांवरची पकड घट्ट झाल्यावर बाळ दूध पितानाचा आवाज ऐकू येईल. बाळाचे पोट भरल्यावर बाळ दूध पिण्याचे थांबते आणि स्तननांपासून बाजूला होते.

तुमचे बाळ योग्यरीत्या दूध पिते आहे हे कसे समजते?

स्तनांमधून आणि बाटलीतून दूध घेताना तोंड आणि जिभेच्या वेगवेगळ्या हालचाली असतात. म्हणून, बाळाला समायोजित होण्यासाठी थोडा वेळ लागतो. स्तनपान घेणाऱ्या बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे ह्याविषयी इथे काही टिप्स आहेत.

 • बाळासाठी योग्य बाटलीची निवड करा
 • दुसऱ्या कुणालातरी बाळाला दूध पाजण्यास सांगा कारण तुम्ही जेव्हा नसता तेव्हा बाळाला त्याची सवय व्हायला हवी
 • जर तुम्ही बाळाला फॉर्मुला दूध देत असाल तर सुरुवातीला ते थोड्या प्रमाणात आणि स्तनपानानंतर द्या त्यामुळे बाळाला बदलांशी जुळवून घेण्यास वेळ मिळेल
 • तुमच्या बाळाला समायोजित होण्यासाठी थोडा वेळ द्या. काही वेळेला बाळ दिवसा खूप दूध पिणार नाही परंतु रात्री दुधासाठी उठेल

बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे?

बाळाशी बंध घट्ट करण्यासाठी बाळाला दूध पाजतानाची वेळ सर्वात उत्तम आहे. नवजात शिशुला बाटलीने दूध पाजण्यासाठी काही टिप्स इथे दिल्या आहेत.

 • तुमच्या हाताच्या पाळण्यात बाळाला थोडेसे वर उभे धरून दूध द्या. असे केल्याने बाळाच्या घशात दूध अडकत नाही आणि दूध पिताना बाळाची नजर आईच्या नजरेला भिडते
 • बाळ बसलेल्या स्थितीत असताना सुद्धा तुम्ही बाळाला दूध पाजू शकता. म्हणजेच बाळ तुमच्या मांडीत बसलेले आहे आणि तुम्ही पुढच्या बाजूने बाटली धरून त्याला दूध देत आहात.
 • दूध पाजताना बाटली थोडी आडवी धारा त्यामुळे निपल हे दुधाने भरलेले असेल आणि हवेसाठी जागा नसेल. त्यामुळे गॅस होण्याची शक्यता कमी होईल

बाटलीने दूध पाजण्याची अशी काही विशिष्ट पद्धत नाही. बाळ झोपलेले नसेल किंवा बाटलीने दूध पिताना पाठीवर झोपलेल्या स्थितीत नसेल तर वरीलपैकी कुठलीही पद्धत योग्य आहे.

बाटलीने दूध पाजल्यामुळे निर्माण होणारे प्रश्न

स्तनपानाप्रमाणेच बाटलीने दूध पाजल्यामुळे सुद्धा काही प्रश्न असतात. तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजल्यामुळे निर्माण होणाऱ्या काही समस्या खालीलप्रमाणे

 • जर बाटल्यांचे नीट निर्जंतुकीकरण झाले नसेल तर बाळाला संसर्ग होऊन जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात.
 • दूध पाजताना बाळाला योग्य स्थितीत न घेतल्यास बाळाच्या घशात दूध अडकू शकते. जर बाळ झोपण्याच्या स्थितीत असेल तर असे होण्याची शक्यता जास्त असते.
 • दुधाच्या बाटलीमुळे बाळाच्या पोटात हवा जाते आणि त्यामुळे बाळाला गॅस होतात. नियमित ढेकर काढल्यास त्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. पोटाकडच्या भागात सैल असलेले कपडे बाळाला घाला.
 • दूध पाजून झाल्यावर बाळाला उभे धरा त्यामुळे बाळ दूध बाहेर काढणार नाही.

बाटलीने दूध पाजण्याचे फायदे

स्तनपानाला दुसरा पर्याय म्हणजे बाटलीने दूध पाजणे होय. बाटलीने दूध पाजण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. बाटलीने दूध पाजण्याचे फायदे काय आहेत ते बघुयात

 • जेव्हा बाळाला बाटलीने दूध पाजले जाते तेव्हा बाळाने किती दूध प्यायले आहे हे तुम्ही मोजू शकता
 • बाटलीने दूध पाजल्याने घरातील दुसऱ्या व्यक्ती सुद्धा बाळाला दूध देऊ शकतात. त्यामुळे बाळाचा कुटुंबातील इतर व्यक्तींशी बंध जुळतो, तसेच आईला सुद्धा अतिशय आवश्यक असा थोडा आराम/वेळ मिळतो
 • ज्या माता बाळाला फक्त बाटलीतून दूध देतात त्यांना बाळासाठी स्वतःच्या आहाराची काळजी करण्याची गरज नसते
 • ज्या माता आपल्या बाळाला बाटलीने दूध देतात त्या त्यांच्या गर्भारपूर्व अवस्थेवर लवकर येऊ शकतात

बाटलीने दूध पाजण्याचे तोटे

बाटलीने दूध पाजण्याचे तोटे खालीलप्रमाणे

 • जर फॉर्मुला दुधामध्ये तुमच्या बाळाच्या आरोग्यपूर्ण आणि सशक्त वाढीसाठी सगळी पोषणमूल्ये असली तरी सुद्धा त्यामध्ये मेंदूच्या पोषणमूल्यांसाठी आवश्यक अशा पोषणमूल्यांचा आभाव असतो
 • स्तनपानाचे दूध बाळाच्या नाजूक पचनसंस्थेसाठी चांगले असते आणि शरीर त्याचे विघटन सहज करू शकते
 • ज्या स्त्रिया स्तनपान करतात त्यांना स्तनांचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग आणि हाडांचा ठिसूळपणा ह्या समस्या येऊ शकतात
 • बाटलीने दूध पाजणे रात्रीचे खूप अवघड होते, कारण त्यासाठी उठून बाटली तयार करावी लागते. त्या तुलनेत स्तनपान सोपे असते

बाळाचे स्तनपान सोडवून बाटलीने दूध पाजण्यास सुरुवात करणे

स्तनपानापासून बाटलीने दूध पाजण्याच्या बदलाला वेळ लागू शकतो परंतु ते कालांतराने शक्य होते. इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे स्तनपान सोडवणे बाळासाठी आणि आईसाठी कमी त्रासदायक होऊ शकते

 • तुम्ही ठरवलेल्या तारखेच्या एक ते दोन महिने आधी बाळाची स्तनपान सोडवण्याची प्रक्रिया सुरु केली पाहिजे. असे केल्यास दोघांनाही ह्या बदलासाठी पुरेसा वेळ देईल. प्रक्रियेला हळूहळू सुरुवात करा जेणेकरून दुधाने भरलेल्या वेदनादायक स्तनांचा सामना करावा लागणार नाही.
 • सकाळमध्यरात्री किंवा दुपारच्या वेळेस म्हणजेच बाळाला कमीत कमी आनंद मिळणाऱ्या दुधाच्या वेळेपासून सुरुवात करा आणि बाळाला सवय लावण्यास मदत करण्यासाठी दिवसातून एकदा बाटलीतून दूध द्या
 • त्यांच्या स्तनपानाच्या आवडत्या वेळा जसे सकाळी लवकर आणि रात्री उशिरा ह्या आहेत अशा वेळी तुम्ही एकत्र वेळ घालवू शकता. बाटलीने दूध पाजणारी व्यक्ती ही आई नसल्यास मदत होते कारण जेव्हा आईचे दूध सहज उपलब्ध असते तेव्हा बाळ कदाचित बाटलीला नकार देते
 • जेव्हा आपण बाळाचे स्तनपान सोडवण्यास सुरुवात करता तेव्हा वेदना होणे आणि स्तन दुधाने भरून जाणे हे अटळ असते. आपल्या स्तनांमधून मागणीपुरवठा तत्त्वावर दूध तयार होते, त्यामुळे आपल्या शरीरास जुळवून घेण्यास वेळ लागेल. दुधामुळे स्तन घट्ट होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्तनांमधून थोडे दूध काढून टाका. परंतु आपले स्तन रिक्त करू नका, कारण यामुळे शरीरात अधिक दूध तयार होईल.

नंतर वापरण्यासाठी दूध फ्रिजमध्ये साठवून ठेवणे योग्य आहे का?

जर फॉर्मुला दूध २ तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवले असेल तर ते टाकून द्या कारण त्यामध्ये जिवाणूंची वाढ होते. न वापरलेले फॉर्मुला दुधाची बाटली २४ तासापर्यंत फ्रिजमध्ये चांगली राहते.

काही स्त्रिया वैयक्तिक आवडीनिवडीमुळे किंवा नोकरीवर परत जाण्याचा विचार करत असल्याने बाळाला बाटलीने दूध देतात, तर इतरांना वैद्यकीय अडचणीमुळे हा पर्याय निवडण्याची गरज असते. कारण काहीही असू शकते, या सोप्या टिप्सचे पालन केल्यास आई आणि बाळासाठी हा बदल सोपा जाईल.

आणखी वाचा:

बाळाचे स्तनपान सोडवताना – लक्षणे, अन्नपदार्थ आणि घनपदार्थांची ओळख
बाळांसाठी गाईचे दूध

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article