Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य बाळांसाठी गाईचे दूध

बाळांसाठी गाईचे दूध

बाळांसाठी गाईचे दूध

आपल्या पैकी बऱ्याच जणांना आईने गाईचे दूध दिल्याचे आठवत असेल. हे चवदार आणि पोषक दूध मुलांना ओट्स, कॉर्नफ्लेक्स सोबत दिले जाते किंवा त्याचा मिल्कशेक करून दिला जातो. तथापि, बाळाची पचनसंस्था दहा वर्षांच्या मुलांइतकी विकसित झालेली नसते त्यामुळे बाळांसाठी ते योग्य आहे का हा प्रश्न पडतो. इथे, आपण बाळांसाठी गाईचे दूध योग्य आहे किंवा नाही ह्याची चर्चा करणार आहोत आणि ते बाळाला केव्हा दिले पाहिजे हे सुद्धा जाणून घेणार आहोत.

आपण नवजात बाळाला गाईचे दूध देऊ शकतो का?

नवजात शिशुला गायीचे दूध देणे खालील कारणांमुळे योग्य नाही

  • सर्वात आधी, बाळाची पचन संस्था गाईच्या दुधातील मोठ्या प्रमाणातील प्रथिने हाताळण्याइतकी विकसित झालेली नसते (केसीन आणि व्हे)
  • तसेच, बाळाला गाईच्या दुधाची लवकर ओळख करून दिल्यास ते बाळाला सहन होणार नाही
  • आणि शेवटी, गाईच्या दुधाने तुमच्या नवजात बाळाला लोहाची कमतरता भासते, कारण त्यामुळे शरीरात लोह शोषण्यास अडथळा निर्माण होतो.

बाळाला दूध पाजणे जरी योग्य नसले तर योगर्ट आणि चीझ सारखे दुग्धजन्य पदार्थ एक वर्षाखालील बाळाला देणे चालते. तथापि, बाळाला गाईचे दूध देणे टाळले पाहिजे कारण गाईच्या दुधामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बाळाच्या मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो.

मुलांना गाईच्या दुधाची केव्हा ओळख करून दिली पाहिजे?

बरेचसे पालक जे मुलांना फॉर्मुला दूध देतात त्यांना मुलांना गाईचे दूध सुरु करण्याची उत्सुकता असते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे फॉर्मुला दूध हे महाग असते आणि ते फक्त बाळासाठी आणावे लागते. तर दुसरीकडे गाईचे दूध हे सगळ्या कुटुंबासाठी आणलेलेच असते आणि एक स्वस्त पर्याय ठरू शकतो. जर बाळाला दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी नसेल तर बाळ एक वर्षांचे झाल्यावर बाळाला त्याची ओळख करून दिली जाऊ शकते.

लक्षात ठेवा की जर बाळाला त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत स्तनपान दिले गेले तर त्यांना सर्वात चांगले पोषक दूध मिळत आहे! स्तनपान हे बाळासाठी चांगले असतेच, परंतु तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या पोषक मूल्यांचा त्यामध्ये समावेश असतो. स्तनपानामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते ते तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असते. ( होय! गाईच्या दुधापेक्षा सुद्धा जास्त) गाईचे दूध म्हणजे कॅल्शिअम, प्रथिने, चरबी आणि व्हिटॅमिन ड ह्यांचा प्रमुख स्रोत आहे. गाईच्या दुधाची तुलना स्तनपानाशी होऊ शकत नाही परंतु ज्या स्त्रियांना बाळ एक वर्षांचे झाल्यावर स्तनपान सोडवायचे असते त्यांच्या साठी हा एक उत्तम पर्याय आहे.

तुमच्या बाळाला गाईच्या दुधाची ओळख कशी करून दयावी?

तुमच्या बाळाला गाईच्या दुधाची ओळख कशी करून दयावी?

बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर बाळाला थोड्या प्रमाणात गाईच्या दुधाची ओळख करून द्यावी. सुरुवातीला ते स्तनपानाचे दूध, फॉर्मुला दूध किंवा उकळून गार केलेल्या पाण्यासोबत द्यावे त्यामुळे बाळासाठी ते सोपे जाईल. बाळाच्या इतर अन्नपदार्थांमध्ये घालून तुम्ही ते देऊ शकता, असे केल्याने बाळाला ते पचते आहे किंवा नाही हे तुम्हाला समजेल.

तुम्ही गाईचे दूध स्तनपानाच्या दूध १:३ ह्या प्रमाणात एकत्र करू शकता. म्हणजे गाईच्या दुधाचा एक भाग आणि स्तनपानाच्या दुधाचे तीन भाग होय. तुम्ही हळूहळू गाईच्या दुधाचे प्रमाण वाढवू शकता आणि स्तनपानाच्या दुधाचे प्रमाण कमी करू शकता. नंतर, तुमच्या टॉडलरला तुम्ही फक्त गाईचे दूध देऊ शकता. बाळाला अन्नपदार्थ भरवण्यापूर्वी तासभर आधी दूध द्यावे. त्यामुळे बाळास दुधापासून पोषणमूल्ये मिळतात आणि इतर अन्नपदार्थां साठी बाळाला भूक राहते.

गायीच्या दुधाचे आरोग्यास फायदे

गाईचे दूध बाळांसाठी चांगले असते कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते जे मजबूत हाडे, दात आणि स्नायूंच्या वाढीसाठी महत्वाचे असते. ह्यामध्ये व्हिटॅमिन डी असते त्यामुळे कॅल्शिअम शरीरात शोषणासाठी मदत होते.

दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रथिने असतात, जी बाळाच्या वाढीस मदत करतात. त्यामध्ये कर्बोदके सुद्धा असतात जी तुमच्या बाळाला दिवसभर लागणारी ऊर्जा पुरवतात. खूप जास्त प्रमाणात असलेले कॅल्शिअम मजबूत हाडे, योग्य रक्तदाब आणि निरोगी हृदय राहण्यास मदत करते.

तुमच्या टॉडलरला किती दुधाची गरज असते?

एक वर्षांच्या बाळाला दिवसाला ७१२ औंस दुधाची गरज असते. तुम्ही ह्या प्रमाणात बाळाला योगर्ट किंवा चीझ ह्यासारखे दुग्धजन्य पदार्थ सुद्धा देऊ शकता. काही मुलांना त्याची चव आवडते आणि मग ते नियमित आहारातील पदार्थांपेक्षा ह्यास प्राधान्य देतात. तथापि, तुम्ही बाळास हे पदार्थ मर्यादित प्रमाणात दिले पाहिजे नाहीतर बाळाला इतर घनपदार्थांसाठी भूक राहणार नाही. तसेच बाळाला संतुलित आहार मिळणार नाही.

दोन जेवणांच्या मध्ये एखादा द्रवपदार्थ म्हणून तुम्ही बाळाला दूध देऊ शकता. परंतु जेवणाऐवजी बाळाला दूध देणे टाळा. हे लक्षात घेतले पाहिजे की तुमचे मूल बाटलीतील दूध जसे पटकन संपवत असे तसे ग्लासने दूध पिताना होणार नाही. आणि ते ठीक आहे कारण गायीचे दूध हे पोषणासाठी पूरक पेय आहे आणि ती पोषणमूल्ये बाळाला इतर पदार्थांपासून सुद्धा मिळू शकतील.

गाईच्या दुधाचे दुष्परिणाम

नेहमीप्रमाणेच बाळाला कुठल्याही पदार्थाची ओळख करून देताना आपण तीन दिवसांचा नियम लक्षात घेतला पाहिजे. नवीन पदार्थ सुरु करण्याआधी तुमच्या बाळावर अगदी जवळून लक्ष ठेवा. गायीचे दूध सुरु करताना सुद्धा असेच करा. आईने जरी दुग्धजन्य पदार्थ घेतले तर बाळ त्याला सुद्धा संवेदनशील असते. बाळाचे अस्वस्थ होणे, जुलाब, उलट्या, पोट गडगडणे इत्यादी लक्षणांतर लक्ष ठेवले पाहिजे.

तुम्हाला प्रश्न पडेल, “बाळासाठी गायीचे दूध चांगले का नाही?” . गायीच्या दुधामध्ये प्रथिने, सोडियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ड भरपूर प्रमाणात असते आणि काहीवेळा त्याचा ताण बाळाच्या पचनसंस्थेवर येतो. बाळाला गायीचे दूध नीट पचते आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी खालील लक्षणांकडे लक्ष द्या.

. ऍलर्जी

रॅशेस, श्वसनास त्रास हे गाईच्या दुधामुळे होणाऱ्या ऍलर्जी आहेत. ही लक्षणे टोकाची असू शकतात उदा: बद्धकोष्ठता, अंगावर पित्ताचे पुरळ उठणे किंवा नाकाला खाज सुटणे इत्यादी

. लॅकटोज इंटॉलरन्स

लॅकटोज इंटॉलरन्स असेल तर गायीचे दूध दिल्यावर पोट बिघडते आणि मुलांना जुलाब होतात. जर तुमच्या बाळाला गायीच्या दुधाची ऍलर्जी असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून गायीच्या दुधासाठी योग्य पर्याय जाणून घ्या. उदा: सोया दूध

जर तुमच्या मुलाने गायीचे दूध पिण्यास नकार दिला तर काय?

इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुमचे बाळ स्वतः हुन गायीचे दूध पिण्यास टायर होईल

. बाळाला देण्याआधी दूध कोमट करा. बऱ्याच वेळा दूध गार असल्यामुळे मुले दूध पिण्यास नकार देतात. तापमानातील थोडा बदल युक्ती ठरू शकते.

. जर मुलांना चव आवडली नाही तर त्यांना मिल्कशेक देण्याचा प्रयत्न करा किंवा सीरिअल, लापशी इत्यादी पदार्थांसोबत दूध द्या. दुधामध्ये नैसर्गिक रंग घालून दिल्यास ते पिण्यासाठी मजेदार वाटू शकते.

. दररोज दूध पिण्यासाठी सकारात्मक शब्द किंवा बक्षिसांचा वापर करा. तुमच्या बाळासाठी दूध पिणे मजेदार बनवा!

. बाळाला रंगीबेरंगी कप किंवा स्ट्रॉ द्या. तुम्ही बाळासाठी दूध प्यावे म्हणून नवीन कप आणू शकता आणि हा विशेष कप म्हणून घोषित करा जेणेकरून बाळ त्या कपमधून दूध पिण्याची वाट बघेल

. शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही दूध गोड करू शकता. बाळाला गोड दूध प्यायची सवय लागू शकते त्यामुळे ह्या पर्यायापासून शक्यतोवर दूर राहणे चांगले. तुम्ही दुधात सुकामेवा किंवा फळे घालून दुधाची गोडी वाढवू शकता.

जर तुमच्या मुलाने गायीचे दूध पिण्यास नकार दिला तर काय?

बाळासाठी कुठल्या गाईच्या दुधाचा पर्याय निवडावा: संपूर्ण दूध कि कमी चरबीचे दूध?

दोन वर्षांचे होईपर्यत मुलांना संपूर्ण दुधाची गरज असते. कारण बाळाच्या वाढीसाठी चरबीची जास्त गरज असते त्यानंतर बाळाला कमी चरबीचे किंवा नेहमीचे दूध दिले तरी चालते. बाळाच्या वजनानुसार योग्य पर्याय निवडावा. जास्त वजनाच्या बाळांसाठी सुरुवातीला कमी चरबीचे दूध द्यावे.

जरी जगभरात दूध हे प्रसिद्ध पेय असले तरी बाळांना ते पहिल्यापासून देण्यास सांगितले जाते. तथापि, एक वर्षाचा टप्पा ओलांडल्यानंतर बाळाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दिले जाऊ शकतात.

गाईच्या दुधाला पर्याय

जर तुमच्या बाळाला;गाईच्या दुधाची ऍलर्जी असेल किंवा लॅकटोज इंटॉलरन्स असेल तर बाळाला खालील पर्याय तुम्ही देऊन बघू शकता

. सोया दूध

गायीच्या दुधाला हा पर्याय प्रसिद्ध आहे. सोया दूध देशात सगळीकडे उपलब्ध आहे आणि हा पर्याय सगळ्यांना परवडू शकतो. ह्यामध्ये गाईच्या दुधाइतकीच पोषणमूल्ये असतात. परंतु, सोया दुधाची सवय तुमच्या मुलास झाली पाहिजे.

. नारळाचे दूध

नारळाचे दूध व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी ने समृद्ध असते आणि ते पोषक असून सहज उपलब्ध असते. ते मलईदार असून त्याची चव सुद्धा छान असते. नारळाच्या दुधामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिनांचे प्रमाण कमी असते त्यामुळे ही कमतरता इतर अन्नपदार्थांमधून भरून काढता आली पाहिजे.

. बदामाचे दूध

बदामाच्या दुधाला विशेष अशी चव नसते, त्याचा पोत मलईदार असतो आणि ते वेगवेगळ्या चवींमध्ये उपलब्ध असते. हे दूध खूप पोषक असते आणि त्यामध्ये कॅलरी खूप कमी असतात. तथापि, ह्या पर्यायाची किंमत खूप जास्त असते.

जेव्हा बाळ एक वर्षाचे होते तेव्हा गाईच्या दुधातून बाळाला पोषणमूल्ये मिळतात. गाईच्या दुधाला चव नसते परंतु ते चवदार करता येते. तथापि, बाळाला गाईच्या दुधाची ओळख करून देताना बाळाला त्याची ऍलर्जी नाही ना हे तपासून पहा.

आणखी वाचा:

बाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी
बाळासाठी केळ्याची प्युरी – ती करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article