Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य १० ते १२ महिन्यांच्या बाळाच्या झोपेविषयी मूलभूत गोष्टी

१० ते १२ महिन्यांच्या बाळाच्या झोपेविषयी मूलभूत गोष्टी

१० ते १२ महिन्यांच्या बाळाच्या झोपेविषयी मूलभूत गोष्टी

आपल्या बाळाला दररोज पुरेशी झोप मिळत आहे ना ह्या विचाराने बऱ्याचशा पालकांना चिंता वाटत राहते. ह्या लेखात बाळाच्या झोपेच्या गरजांविषयीची माहिती दिली आहे.

तुमच्या बाळाच्या झोपेचा पॅटर्न काय आहे?

जेव्हा तुमचे बाळ सहा महिन्यांचे होते, ते जास्त झोपू लागते आणि रात्रीचे कमी उठू लागते. तथापि, बाळाच्या झोपेच्या रुटीनवर तुमची झोप अवलंबून असते. आणि जसजसे बाळाची वाढ होते तसे हे प्रमाण वाढते.

तर बघूयात बाळे कशी झोपतात? १०१२ महिन्याच्या बाळाच्या झोपेच्या पॅटर्नविषयी जाणून घेऊयात.

जर तुमचे बाळ रात्रीचे १० तासांपेक्षा जास्त वेळ झोपत असेल आणि स्वतःचे स्वतः कसे झोपावे हे त्याला समजत असेल तर तुमची झोप चांगली होईल. तथापि, जर तुमचे बाळ अचानक निशाचर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

माझे ११ महिन्याचे झोपत नाहीआणि माझे १२ महिन्यांचे बाळ खूप झोपतेहे स्त्रीला पडणारे नेहमीचे प्रश्न आहेत आणि त्यामागचे कारण मात्र सारखेच आहे. ह्या काळात झोपेमध्ये अडथळा येणे हे सामान्य आहे कारण ह्या कालावधीत बाळाचे हस्तकौशल्य आणि आकलनकौशल्य विकसित होत असते. ह्या काळात तुमचे बाळ रांगू लागते आणि चालायला शिकते. तुमचे बाळ एकाच वेळेला अनेक गोष्टी शिकत असते, बाळ रात्री मधेच उठून त्याचा सराव करू लागते आणि किंवा ते झोपेसाठी उत्सुक असते.

आई दूर जाण्याच्या भीतीपोटी सुद्धा बाळ मध्ये उठू शकते आणि ही बाळाच्या झोपेची नेहेमीची समस्या आहे.

बाळाला किती झोपेची आवश्यकता असते (१० १२ महिने )

सामान्यपणे १० ते १२ महिन्यांचे बाळ रात्रीचे १२ तासांपेक्षा जास्त झोपते. दिवसा हे बाळ दोनदा किंवा तीनदा तासभरापेक्षा जास्त वेळ झोपते. बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी बाळाला पुरेशी झोप मिळते आहे ना ते पहा.

बाळाच्या झोपेचे नियमित रुटीन तयार करा. ह्याचा रात्री जास्त उपयोग होईल, बाळ रात्रीचे जास्त उठणार नाही आणि त्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येणार नाही.

दिवसा

दिवस बाळे एकूण २३ तास झोपतात. ह्या झोपेच्या तासांमध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या झोपेचा समावेश असतो. तुमचे बाळ दिवसभरात एकूण १ ते ३ तास झोपेल आणि ती एका वेळेला अर्धा तास ते २ तास इतकी असेल

रात्री

१०१२ महिन्यांचे बाळ रात्रीचे १११४ तास झोपते. १० महिन्यांच्या बाळ रात्रीचे ६ ते १० दरम्यान केव्हाही झोपी जाऊ शकते.

बाळाला झोपेच्या चांगल्या सवयी कशा लावाव्यात?

बाळाला कसे झोपवावे? बाळाला झोपवण्याच्या पद्धती जरा कमी सारख्याच आहेत. तुमचे बाळ जेव्हा सहा महिन्यांचे होते तेव्हा बाळाला झोपविण्याची जी पद्दत तुम्ही वापरत होतात तीच आता सुद्धा वापरली पाहिजे. इथे बाळाला झोपवण्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.

बाळाचे झोपेचे एक रुटीन निश्चित करा

बाळाच्या झोपेचे रुटीन ठरवल्यास त्याचा तुम्हाला आणि बाळाला दोघांना फायदा होईल.

 • बाळाला झोपवण्याआधी बरेचसे खेळ आहेत जे तुम्ही बाळासोबत खेळू शकता
 • बाळाला अंघोळ घाला
 • बाळाला झोपवताना गोष्टी वाचून दाखवणे ही चांगली कल्पना आहे
 • बाळासाठी अंगाईगीत गा
 • बाळाला स्वेटर घालून बाळाची पापी घ्या

तुमचे दररोज रात्रीचे रुटीन सारखेच असणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला दररोज रात्री काय अपेक्षित आहे हे समजेल.

दररोजची दिनचर्या सारखीच ठेवा

जर तुम्ही बाळाचे दिवसाचे आणि रात्रीचे रुटीन सारखे ठेवले तर बाळाला रात्रीचे झोपवणे सोपे जाईल. जर तुमच्या बाळाच्या खाण्याच्या, झोपण्याच्या आणि खेळण्याच्या वेळा सारख्या असतील तर तुम्हाला रात्री बाळाला झोपवताना त्रास होणार नाही

बाळाला स्वतःचे स्वतः झोपू द्या

जर तुम्हाला तुमचे बाळ रात्रभर मध्ये न उठता झोपायला हवे असेल तर बाळाला स्वतःचे स्वतः झोपण्याची संधी द्या. जर तुमच्या बाळाला झोपण्यासाठी स्तनपानाची किंवा हातावर झुलवायची सवय लागली तर बाळ रात्रीचे उठल्यावर प्रत्येक वेळेला तुम्हालासुद्धा उठावे लागेल.

बाळाला झोपवण्यासाठी खाली काही सोप्या टिप्स दिल्या आहेत

ह्या वयात बाळाला झोपण्याच्या काही समस्या असतात का?

जेव्हा तुमचे बाळ ९१० महिन्यांचे होते तेव्हा बाळ स्वतःचे स्वतः रात्रभर झोपते. परंतु तुम्ही दूर जाण्याची भीती मुळे बाळावर परिणाम होतो. बाळ जसे मोठे होते तसे तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये बदल केला पाहिजे. हे बदल कोणते आहेत त्याही पेक्षा हे बदल स्वीकारताना त्यामध्ये नियमितता पाहिजे.

बाळाची झोप आणि विकास

तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर, त्यांच्यामध्ये नवीन बदलाचा विकास होतो आणि त्यामुळे झोपेच्या पॅटर्नवर परिणाम होतो.

बाळ जागे राहण्यास शिकते आणि त्याबरोबर अनेक नवी कौशल्ये शिकत असते. नवीन कौशल्ये शिकत असताना जागे राहताना बाळ पुन्हा लवकर झोपी जाण्यास नकार देते.

आपले बाळ झोपेच्या प्रशिक्षणासाठी तयार आहे का?

जर तुमच्या बाळाने तुमच्या कुटुंबाच्या झोपेचा पॅटर्न अंगिकारला असेल तर बाळाच्या झोपेच्या प्रशिक्षणासाठी ह्याचा नक्कीच उपयोग होईल. बाळाच्या झोपेच्या प्रशिक्षण पद्धतींमुळे बाळ लवकर झोपते आणि बाळाची झोपेची ठराविक वेळ होते आणि बाळ खूप तासांसाठी झोपते

झोपेला आलेल्या आणि थकलेल्या बाळाची लक्षणे

जर तुमच्या बाळाला पुरेशी झोप मिळत नसेल तर बाळाच्या वर्तणुकीत त्याची चिन्हे दिसतील. ही चिन्हे प्रत्येक बाळाची वेगळी असली तरी सर्वसामान्यपणे असलेली लक्षणे खालीलप्रमाणे

 • हिसके देणाऱ्या हालचाली
 • जांभया
 • डोळे चोळणे
 • चिडचिड
 • रडणे
 • झोपेतल्यासारखे आवाज काढणे
 • मुठी घट्ट आवळणे
 • ओढलेला चेहरा
 • हात पाय हलवणे

निष्कर्ष: तुम्ही ह्या लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या बाळाला पुरेशी झोप मिळेल. नाहीतर, तुमचे बाळ खूप थकून जाईल आणि तुम्हाला बाळाला शांत करून झोपवणे कठीण जाईल.

आणखी वाचा:

बाळाला रात्री कसे झोपवावे?
एसआयडीएस (SIDS) आणि बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article