Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांचे चोंदलेले नाक: कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळांचे चोंदलेले नाक: कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळांचे चोंदलेले नाक: कारणे, लक्षणे आणि उपचार

नाक चोंदलेले असल्यास ते एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरू शकते. यामुळे श्वास घेणे कठीण होते, आणि वाहणाऱ्या नाकामुळे निराशा येऊ शकते. त्याचप्रमाणे, बाळांना सुद्धा नाक चोंदलेले असल्यास बरीचशी अस्वस्थता येते, त्यामुळे त्यांना रात्रीची झोप नीट लागत नाही. बाळांना काय त्रास होतो आहे हे ते व्यक्त करू शकत नसल्यामुळे, अवरोधित नाकाची लक्षणे ओळखणे आणि त्यानुसार त्यावर उपाय शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

बाळाचे नाक चोंदणे म्हणजे काय?

सामान्यत: नाकातील उतीना सूज आल्यामुळे किंवा जळजळ होण्यामुळे बाळाचे नाक चोंदते त्यामुळे जास्त श्लेष्माचा स्त्राव होतो. गर्भाशयात गर्भजलामुळे नवजात बाळांमध्ये पहिल्या काही दिवसांकरिता बाळाचे नाक चोंदलेले असू शकते. बाळे शिंकण्याद्वारे चोंदलेल्या नाकापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या बाळाच्या चोंदलेल्या नाकामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, विशेषत:बाळे आणि लहान मुले त्यांच्या नाकाने श्वास घेऊ शकत नाहीत.

बाळाचे नाक चोदण्याची कारणे

वेगवेगळ्या कारणांमुळे बाळांमध्ये नाक चोदण्याचा त्रास होऊ शकतो. त्यापैकी काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.

. सामान्य सर्दी

वेगवेगळ्या विषाणूंमुळे बाळाला सामान्य सर्दी होऊ शकते; तथापि, सर्वात सामान्य व्हायरस हा ऱ्हिनोव्हायरस आहे. या विषाणूंमुळे आपल्या बाळाच्या नाकाच्या आतील भागात जळजळ होते आणि जाड श्लेष्मा तयार होते त्यामुळे बाळाचे नाक चोंदले जाते.

. इन्फ्लूएंझा

ह्या संसर्गामध्ये सर्दी सारखी लक्षणे असतात आणि नाक सतत वाहते असते. इन्फ्लूएन्झा मध्ये तुमच्या बाळाला तीव्र ताप येऊ शकतो. इन्फ्लूएंझा विषाणू फुफ्फुस, घसा आणि नाकावर परिणाम करतो.

. सायनस संसर्ग

जर रोगजनकांनी नाकाच्या वरच्या बाजूला आणि बाजूने असलेल्या सायनस (हवा भरलेल्या थैली) वर आक्रमण केले तर त्यामुळे जाड आणि जास्त प्रमाणात श्लेष्म तयार होऊ शकतो. नाकाच्या अस्तराचा सूक्ष्मजंतूंमुळे दाह होऊन सूज येऊ शकते.

. ऍलर्जी

परागकणांची ऍलर्जी किंवा ऱ्हीनिटिस (हे फिवर) ही नाक चोंदण्यामागची सामान्य कारणे आहेत. परागकण किंवा इतर पदार्थांमध्ये आढळणाऱ्या ऍलर्जिक द्रवांमुळे नाकामध्ये दाह होऊन सूज येते आणि नाक वाहू लागते. तसेच यासोबत पोटदुखी किंवा अतिसार देखील होऊ शकतो.

. टॉन्सिल आणि ऍडिनॉइड्स

एखाद्या संसर्गाच्या वेळी, प्रतिकार प्रणालीच्या प्रतिसादामुळे टॉन्सिल्स आणि ऍडिनॉइड्स नावाच्या लिम्फॅटिक सिस्टममधील ऊतकांवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, टॉन्सिल्स आणि ऍडिनॉइड्स वाढतात आणि नाकावर दबाव आणतात त्यामुळे श्वास घेणे कठीण होते.

. नाकातील पॉलीप्स

नाकातील पॉलीप्स हे वाढीच्या विसंगतीमुळे उद्भवतात आणि अतिरिक्त वाढ पॉलीप्सच्या स्वरूपात दिसते. हे सौम्य असतात आणि साधारणपणे श्लेषमा पासून तयार होतात. तथापि हे पॉलीप्स नाकात कुठे आहेत त्यानुसार नाकाची पोकळी बंद होऊ शकते. सतत वाहणारे नाक देखील नाक चोंदण्यास कारणीभूत ठरू शकते .

. दमा

दम्यामुळे श्वसनमार्ग संकुचित होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. जर आपल्या मुलाच्या श्वसनमार्गातील स्नायूंना सूज आल्यामुळे दम्याचा त्रास होत असेल, तर बाळाचे नाक चोंदले असण्याची शक्यता असते. श्वास लागणे, खोकला आणि श्वास घेताना आवाज येणे ह्यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

. नाकाचे विकार

बाळे देखील नाकाच्या विकारांमुळे ग्रस्त होऊ शकतात त्यामुळे नाक चोंदले जाते. पॉलीआंजिटिससह ग्रॅन्युलोमाटोसिस नावाच्या स्थितीमुळे फुफ्फुस, नाक आणि सायनसमधील रक्तवाहिन्यांना सूज येते आणि त्यामुळे नाक वाहते. चुर्गस्ट्रॉस सिंड्रोम ही आणखी एक स्थिती आहे ज्यामध्ये सूज येऊन नाक चोंदले जाऊ शकते. काही वेळेला दोन नाकपुड्यांमधील ऊती एका बाजूला जास्त झुकलेली असते त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे नाक चोंदले जाण्याची शक्यता असते.

. क्षोभकारक घटक

अनुनासिक पोकळीला त्रास होऊ शकतो अशा कोणत्याही हवेतील घटकांमुळे नाक चोंदले जाऊ शकते. त्यामुळे जास्तीचा श्लेष्मा तयार होऊ शकतो. जर आपल्या मुलास कोरड्या हवेचा धोका असेल तर श्लेष्मा घट्ट होऊन श्वास घेणे कठीण होते.

१०. अनुनासिक पोकळीतील बाहेरील घटक

लहान मुलांच्या नाकाच्या आतील भागावर ते खेळत असलेल्या गोष्टींमधून लहान धूलिकण चिकटणे खूप सामान्य आहे. कधीकधी, जेव्हा हे कण नाकाच्या पोकळीत अडकतात तेव्हा संसर्ग होऊन नाक चोंदले जाऊ शकते.

लहान बाळांचे नाक चोंदल्याची लक्षणे

आपल्या बाळाला काय होते आहे हे सांगता येत नाही, परंतु बाळाचे नाक चोंदले असल्याची काही लक्षणे खालील प्रमाणे:

. सतत वाहणारे नाक

जर तुमच्या बाळाचे नाक २४ तास वहात असेल तर बाळाचे नाक चोंदले असल्याची शक्यता असते.

. श्वास घेताना आवाज येणे

आपणास लक्षात येईल की प्रत्येक वेळी श्वास आत घेताना आणि सोडताना बाळ आवाज करते. जेव्हा बाळ झोपलेले असते तेव्हा आवाज अधिक स्पष्ट होईल.

. घोरणे

नाक चोंदलेले असल्यामुळे बाळ झोपल्यावर घोरते.

. नाकात बोट घालणे

जर आपले बाळ मोठे असेल आणि त्याच्या बोटाचे कौशल्य विकसित झाले असेल तर, चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी बाळ सतत नाकात बोट घालेल.

. शिंका येणे

जर तुमच्या बाळाचे नाक चोंदलेले असेल तर, नाकाच्या अस्तरात असलेले मज्जातंतू उत्तेजित होऊ शकतात ज्यामुळे शिंका येऊ शकतात. बऱ्याचदा शिंकांमुळे नाक मोकळे होण्यास मदत होऊ शकते. परंतु काही वेळा शिंकांमुळे नाक चोंदण्यास मदत देखील होते.

बाळांच्या नाक चोंदण्यावर उपचार

बाळांच्या नाक चोंदण्यावर उपचार

कारणानुसार डॉक्टर बाळाचे नाक मोकळे होण्यासाठी औषध लिहून देतात. विषाणू आणि संसर्गामुळे चोंदलेल्या नाकावर प्रतिजैविक आणि अँटीव्हायरल औषधोपचारांद्वारे उपचार केला जाऊ शकतो. टॉन्सिल आणि ऍडेनोईड्स किंवा पॉलीप्सच्या बाबतीत, लक्षणे कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. जर औषधे घेऊन सुद्धा नाकाचे चोंदणे कमी झाले नाही तर शस्त्रक्रियेद्वारे ते काढून टाकावे लागतात.

हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की जेव्हा तुमच्या बाळाचे नाक चोंदते तेव्हा बाळाला सर्वात आधी नीट श्वास कसा घेता येईल ते पहा. इथे काही उपाय दिलेले आहेत ज्यामुळे बाळाला त्वरित आराम मिळू शकेल.

. श्लेष्मा बाहेर काढण्यासाठी सलाईन थेंब

सलाईनचे थेंब करण्यासाठी १/४ चमचे मीठ २४० मिली पाण्यात विरघळवा. आपण ते फार्मसीमध्ये देखील खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या बाळाला पाठीवर झोपवून त्याच्या नाकात २३ थेंब सोडावे लागतील. ३० ते ६० सेकंदांनंतर तुम्ही तुमच्या बाळाला पोटावर झोपवू शकता त्यामुळे सलाईनबरोबर श्लेष्मा बाहेर पडेल. टिशू पेपरने ते स्वच्छ करा आणि उर्वरित श्लेष्मा साफ करण्यासाठी आपल्या बाळाचे नाक हळूवारपणे दाबून पुसून घ्या. जेव्हा तुमच्या मुलाच्या नाकात कोरडा श्लेष्मा असतो तेव्हा ही पद्धत उपयुक्त आहे कारण खारट पाणी बाहेर काढण्यापूर्वी ते श्लेष्मा मऊ करू शकते.

. नाकासाठी सक्शन बल्ब

नाकाच्या सक्शन बल्बना ऍस्पिरेटर असेही म्हणतात आणि ते प्रभावीपणे बाळाच्या नाकातून श्लेष्मा काढून घेते. ते वापरण्यासाठी, आपल्याला त्यामध्ये हवा सोडण्यासाठी ते दाबून काही वेळ बाळाच्या नाकात ठेवावे लागेल. ते नाकात खूप खोलवर ठेवू नका कारण यामुळे आपल्या बाळाच्या नाकाच्या आतील आवरणाचे नुकसान होऊ शकते. नाकात घातल्यानंतर, हळुवारपणे पकड सोडा आणि श्लेष्मा बल्ब मध्ये येऊ द्या.

दुसऱ्यांदा वापरण्यापूर्वी ब्लब साफ करा आणि गरम पाण्याने धुवा. दुसर्‍या कोणासाठीही आपल्या बाळाचा हा ऍस्पिरेटर वापरू नका.

घरगुती उपचार

जर तुमच्या बाळाला नाकातून हलका रक्तस्त्राव झाला तर तुम्ही तुमच्या बाळाला होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी काही घरगुती उपचार करू शकता . लक्षात ठेवा, जर तुमच्या मुलाला वाहत्या नाकाचा त्रास होत असेल तर, त्याच्या शरीरावर औषध किंवा विक्स वेपोरब चोळून लावू नका कारण ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते. येथे काही उपाय आहेत जे आपल्या बाळाला नाकातून होणाऱ्या रक्तस्रावापासून मुक्त करू शकतात.

. बाळाच्या वरच्या ओठांवर व्हॅसलीन लावणे

वाहणारे नाक सतत पुसण्यामुळे आपल्या बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आपण सतत घर्षणापासून बचाव करण्यासाठी आपल्या बाळाच्या वरच्या ओठात थोडेसे व्हॅसलीन लावू शकता. अतिरिक्त काळजी घ्या आणि बाळाचे नाक पुसण्यासाठी मऊ वाइप्स किंवा कापड वापरा.

. त्याचे डोके उंचावर ठेवा

बाळाचे डोके उंच ठेवण्यासाठी बाळाच्या डोक्याखाली उशी ठेवा. त्यामुळे श्लेषमा बाहेर पडेल आणि नाक चोंदणार नाही.

. बाष्प

कोरडी हवा टाळण्यासाठी आपल्या बाळाच्या खोलीत एक व्हेपोरायजर किंवा एक ह्युमिडिफायर ठेवा, असे केल्याने आपल्या मुलाचे भरलेले नाक साफ होण्यास मदत होऊ शकते. कुठल्याही प्रकारची बुरशी वाढू नये म्हणून ह्युमिडिफायर वारंवार साफ करा.

. लव पॅट्स

तुमच्या हाताच्या तळव्याचा उंचवटा करून आणि बाळाला गुडघ्यांवर झोपवून त्याच्या पाठीवर थोपटा. तुम्ही त्याला तुमच्या मांडीवरघेऊन जवळजवळ ३० अंशांमध्ये झुकवून त्याच्या पाठीवर थोपटू शकता. यामुळे त्याच्या छाती मधील कफ मोकळा होण्यास मदत होऊ शकते, श्लेष्मा सैल होऊन श्वासोच्छ्वास खूपच सुलभ होण्यास होईल.

. बाळाला हायड्रेटेड ठेवा

यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते तसेच इतर गुंतागुंत होऊ शकते. म्हणूनच, आपल्या बाळाला पाणी किंवा आईच्या दुधाने हायड्रेटेड ठेवा.

. आपल्या बाळाला झोक्यात ठेवा

आपल्या बाळाला झोक्यात ठेवल्याने त्याचे मन शांत होईल. बाळाला सरळ किंवा वाकलेल्या स्थितीत ठेवल्याने श्लेष्मा बाहेर पडण्यास मदत होईल.

. बेबी प्रोबायोटिक्स

प्रोबायोटिक्स आपल्या बाळाची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यात आणि संक्रमण व विषाणूंविरूद्ध लढायला मदत करू शकतात. आपण आपल्या बाळाला कोणतीही प्रोबायोटिक्स देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. नाकाला मसाज

नाक मोकळे होण्यासाठी आपल्या बाळाच्या नाकाला हलकी मालिश द्या. आपल्या बोटांचा वापर करून, नाकाच्या साइनस पॉइंट्सवर हळूवारपणे दाबा आणि आता आपली बोटे बाळाच्या नाकावरून हळुवारपणे नाकपुड्यांच्या दिशेने खाली आणा. पुन्हा हळूवारपणे त्याच मार्गाचे अनुसरण करा.

प्रतिबंध

आपण काही सोप्या सावधगिरीच्या उपाययोजना करून नाकाचा त्रास टाळण्याचा प्रयत्न करू शकता.

  • आपल्या मुलाच्या खोलीत एक ह्युमिडिफायर ठेवा.
  • आपल्या बाळाभोवतीची हवा स्वच्छ ठेवा. त्याला कोणत्याही प्रदूषकांसमोर आणू नका.
  • आपल्या बाळाच्या भोवती तीव्र सुगंध असलेल्या किंवा दुर्गंधीयुक्त पदार्थांचा वापर करू नका.
  • घरात किंवा आपल्या बाळाजवळ धूम्रपान करू नका.
  • आपल्याकडे पाळीव प्राणी असल्यास नियमितपणे व्हॅक्युम करा.
  • आपल्या घरात हवा शुद्ध करणारे यंत्र वापरा आणि आपल्या मुलाचे कपडे, खेळणी आणि इतर गोष्टी जंतुसंसर्ग आणि रोगजनकांच्या संपर्कात न येण्यासाठी ते स्वच्छ ठेवा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर आपल्या बाळाचे चोंदलेले नाक मोकळे होत नसेल किंवा आपल्याला खालील लक्षणे दिसत असतील तर आपल्याला ताबडतोब आपल्या बाळाच्या डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता असेल.

. रक्ताचे डाग असलेला श्लेष्मा

हे बॅक्टेरियाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते आणि त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता आहे.

. श्लेष्मा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा असल्यास

अनुनासिक पोकळी किंवा सायनसच्या संसर्गातील परकीय घटक ह्यामुळे श्लेष्मावर डाग येऊ शकतात. डॉक्टर ह्या संक्रमणांवर प्रभावीपणे उपचार करू शकतात.

. तीव्र ताप, पुरळ किंवा घशाला सूज येण्यासह नाक चोंदणे

हे गंभीर विषाणूंचा संसर्ग किंवा एलर्जीची प्रतिक्रिया दर्शवू शकते. दोन्ही प्रकरणांमध्ये, आपल्या बाळाला त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असेल.

. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बाळाला सर्दी होणे

जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आपल्या बाळाचे वाहणारे नाक थांबण्याचे चिन्ह दर्शवत नसेल तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

. बाळ दोन महिन्यांपेक्षा लहान आहे

लहान मुलांमध्ये श्लेष्मा काढून टाकण्यासाठी किंवा तोंडाने श्वास घेण्याची यंत्रणा नसते. म्हणूनच, नाक चोंदलेले असल्यास त्यांच्या झोपेमध्ये आणि आहारात व्यत्यय येऊ शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.

नाक चोंदल्यामुळे बाळाला अस्वस्थता येऊ शकते आणि त्याला योग्यरित्या आहार घेण्यास किंवा झोपायला प्रतिबंधित करू शकते. तुम्हाला तुमच्या बाळामध्ये रक्तस्त्राव होण्याची लक्षणे दिसल्यास, त्या अस्वस्थतेपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपचार करून पहा. जर त्याची लक्षणे तीव्र असतील तर तुम्ही योग्य वैद्यकीय मार्गदर्शन घ्या.

आणखी वाचा:

बाळांच्या तापावर सर्वोत्तम ९ परिणामकारक घरगुती उपाय
बाळांच्या छातीत कफ होणे: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article