Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गर्भधारणेच्या दुसर्‍या महिन्यातील आहार (५-८ आठवङे)

गर्भधारणेच्या दुसर्‍या महिन्यातील आहार (५-८ आठवङे)

गर्भधारणेच्या दुसर्‍या महिन्यातील आहार (५-८ आठवङे)

पाचव्या आठवड्यात तुम्ही गर्भारपणाच्या दुसऱ्या महिन्यात प्रवेश केला आहेबऱ्याच स्त्रियांना आपण गरोदर आहोत हे सुद्धा समजलेले नसते, पण ज्यांना ते समजलेले असते त्यांनी आहाराच्या बाबतील अतिशय काळजी घेतली पाहिजे. पहिल्या महिन्या इतकाच दुसरा महिना सुद्धा महत्वाचा आहे आणि गर्भारपणाच्या ह्या प्राथमिक टप्प्यावर खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. ह्या टप्प्यावर पोषण ही प्राथमिकरीत्या महत्वाची गोष्ट आहे कारण गर्भाच्या मज्जातंतू नलिकेचा विकास होत असतो. ही मज्जातंतू नलिका पुढे बाळाचा मेंदू, पाठीचा कणा आणि नसांमध्ये विकसित होते. गर्भामध्ये मूलभूत रक्ताभिसरण संस्था विकसित होते आणि हृदयाचे ठोके सुद्धा गर्भधारणेच्या ह्या टप्प्यावर पडू लागतातजीवनसत्वे, खनिजद्रव्ये, प्रथिने आणि इतर पोषणमूल्ये ह्या टप्प्यावर आवश्यक असतात. कुठल्या प्रकारचे अन्नपदार्थ खावेत आणि टाळावेत ह्या विषयीचे संपूर्ण वर्णन जाणून घेण्यासाठी वाचा.

गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्याच्या आहारात समावेश असावा  अशी महत्वाची पोषणमूल्ये 

पहिल्या तिमाहीसाठी खाण्यायोग्य अन्न म्हणजे असे अन्न ज्यामुळे बाळाच्या विकासास मदत होते. मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ ह्यामुळे तुम्हाला  नीट खाता येत नाही, परंतु तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या दुसऱ्या महिन्याचा भाग म्हणून जास्तीत जास्त शक्य होतील तितकी पोषणमूल्ये घेतली पाहिजेत. काही महत्वाची पोषणमूल्ये आणि अन्नपदार्थ ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला पाहिजे ती खालीलप्रमाणे:

. फॉलीक ऍसिड

फॉलीक ऍसिड हा गर्भारपणाच्या आहाराचा महत्वाचा भाग आहे, फॉलीक ऍसिड व्हिटॅमिनबी चा हेतू सध्या करतो. जेव्हा तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असता तेव्हा दररोज ५मिलिग्रॅम फॉलीक ऍसिडची पूरक औषधे घेण्यास सांगितले जाते. फॉलिक ऍसिडमुळे न जन्मलेल्या बाळाचा मज्जातंतू नलिकेत दोष निर्माण होण्यापासून बचाव होतो. हिरव्या पालेभाज्या, अंडी, फळे, सुकामेवा( बदाम, अक्रोड), डाळी, मसूर हे सगळे गर्भवती महिलेसाठी फॉलीक ऍसिड ने समृद्ध असे नैसर्गिक स्त्रोत आहेत.

. लोह

गर्भधारणेच्या ५व्या आठवड्यात लागणारे महत्वाचे पोषणमूल्य म्हणजे लोह होयचांगल्या रक्तभिसरणासाठी लोह आवश्यक आहे. ह्या टप्प्यावर, आईला तिच्या शरीरात चांगल्या रक्ताभिसरणाची गरज असते त्यामुळे तिला मॉर्निंग सिकनेस आणि थकवा ह्या गर्भधारणेतील लक्षणांना सामोरे जाण्यास ताकद येते. लोहसमृद्ध अन्नपदार्थ म्हणजे फळे, पालक, मेथी आणि बीटरूट ह्या सारख्या भाज्या तसेच चिकन, मासे आणि सुकामेवा इत्यादी होय.

. कॅल्शिअम

हे गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्यादरम्यान लागणारे महत्वाचे खनिज आहे, १००० मिलिग्रॅम कॅल्शिअम घेणे हे होणाऱ्या आईसाठी अत्यावश्यक आहे. ह्या टप्प्यावर गर्भाची हाडे विकसित होत असतात. जर तुमच्या शरीराला आवश्यक मात्रेचा पुरवठा झाला नाही तर, असलेल्या साठ्यामधून ते वापरले जाईल आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता वाढते. कोबी, हिरव्या पालेभाज्या,सलगम हे कॅल्शिअमचे उत्तम स्त्रोत आहेत.

. प्रथिने

गर्भधारणेच्या सुरुवातीला प्रथिने खूप महत्वाची आहेत. चिकन, अंडी, दूध, मासे आणि मसूर ह्यामुळे शरीराला आवश्यक प्रथिनांचा पुरवठा होतो.

प्रथिने

. जस्त

जस्त हे आम्ल चयापचयासाठी आणि शरीराच्या जैविक कार्यासाठी आवश्यक आहे. चिकन, मासे, हिरव्या पालेभाज्या, बीन्स हे जस्ताचे समृद्ध स्रोत आहेत आणि तुमच्या आहारात ह्या सगळ्या अन्नपदार्थांचा समावेश आहे ह्याची खात्री करा.

. चरबी

चरबी नेहमीच वाईट नसते, परंतु तुम्ही कुठल्या प्रकारची चरबी खाता ह्यावर तुमच्या बाळाची निरोगी वाढ अवलंबून असते. ह्यात काहीच शंका नाही की तळलेले अन्नपदार्थ आणि संतृप्त चरबी असलेले अन्नपदार्थ हे तुमच्यासाठी आणि बाळासाठी हानिकारक असतात. परंतु तूप आणि साय ह्यासारखी आरोग्यपूर्ण चरबी ही बाळाचे डोळे, मेंदू, नाळ, टिश्यूची वाढ ह्यासाठी मदत करते तसेच काही वेळा बाळाच्या जन्माच्या वेळी काही व्यंग निर्माण होण्यास प्रतिबंध करते.

. ऊतक

पचनास मदत करणारा हा महत्वाचा घटक आहे, तसेच बद्धकोष्ठतेला आळा बसावा म्हणून आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असणे हे जरुरुचे आहे. तंतुमय पदार्थानी समृद्ध आहार हा गाजर, कोंबी ह्या सारख्या भाज्यांनी तसेच सीरिअल्स, मोसंबी, केळी ह्यासारख्या फळांनी बनलेला असतो. तंतुमय पदार्थांमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि गर्भधारणेदरम्यान कुठल्याही धोक्याची शक्यता सुद्धा कमी असते. दररोज कमीत कमी १४ ग्रॅम्स तंतुमय पदार्थ घेण्याची शिफारस केली जाते.

गर्भारपणाच्या दुसऱ्या महिन्यात टाळायला हवेत असे अन्नपदार्थ 

टाळायला हवेत अशा अन्नपदार्थांमध्ये खालील पदार्थांचा समावेश होतो.

. मीट स्प्रेड्स

ह्यामध्ये लिस्टेरिया नावाचे जिवाणू असतात आणि गर्भधारणेच्या ह्या टप्प्यावर ते हानिकारक असतात. त्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतो आणि म्हणून ते संपूर्णरीत्या टाळले पाहिजेत.

. सॉफ्ट चीझ

ब्री आणि क्यामेम्बर्ट खाण्याची शिफारस केली जात नाही कारण त्यामध्ये इ. कोलाय. नावाचा जिवाणू असतो ज्यामुळे गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

. कच्ची अंडी

कच्च्या अंड्यांमुळे साल्मोनेला नावाचा जिवाणू शरीरात पसरतो आणि त्याचा तुमच्यावर हानिकारक परिणाम होतो आणि बाळाच्या सामान्य विकासावर गंभीर अडथळा निर्माण होतोअंडी खाण्याच्या आधी संपूर्णपणे चांगली उकडून घेतली पाहिजेतअर्धवट उकडलेली किंवा कमी शिजवलेली अंडी खाऊ नका.

. प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले मांस कपाटांमध्ये दीर्घकाळासाठी  साठवून ठेवलेले असते, आणि त्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या बाळाला हानिकारक ठरू शकतील असे जिवाणू असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या मांसापासून तब्येत खराब होऊ नये म्हणून गर्भधारणेदरम्यान दूर राहणे चांगले.

. कच्चे मासे

समुद्री अन्नपदार्थ जसे की, खेकडा, कोळंबी वगैरे मध्ये पारा असतो ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. ते प्रथिनांनी समृद्ध नसतात आणि शरीराला लागणाऱ्या कुठल्याही पोषणमूल्यांचा पुरवठा ते करत नाहीत.

. पाश्चराईझ न केलेले दूध

पाश्चराईझ न केलेले दूध घेऊ नका, त्यामध्ये जिवाणू, तसेच साल्मोनेला आढळतात. त्यामुळे तुमच्या शरीरास हानी पोहचू शकते आणि त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो.

. मद्य

मद्य घेणे हे टाळलेच पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या तब्येतीमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. तुमच्या गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत मद्यापासून दूर रहा.

मद्य

ताजी फळे, भाज्या, संपूर्ण शिजवलेले अन्न, संपूर्ण शिजवलेले अन्न आणि प्रथिने खा. तुमच्या स्नायूंना बळकटी येण्यासाठी आणि त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी ते जरुरीचे आहे. कॅलरी वाढवण्यासाठी गोड अन्नपदार्थांपेक्षा पिष्टमय पदार्थ खा.

गर्भारपणाच्या २ऱ्या महिन्यात पाळाव्यात अशा आहाराच्या काही टिप्स

  • सकाळची आहार योजना

तुम्ही जर योग्य प्रमाणात योग्य वेळेला खाल्लेत तर तुम्हाला अन्नपदार्थांचा संपूर्ण फायदा मिळेल. सकाळी चांगला संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये फळे, भाज्या, सीरिअल्स, दुधासारखे दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करा. सकाळी समृद्ध आहार घेतल्यास दिवसभर पचनास खूप वेळ मिळतो.

  • दुपारची आहार योजना

सलाड मुळे तुम्हाला उत्साही आणि तरतरीत वाटेल. तुम्ही तुमच्या जेवणात उकडलेल्या अंड्यांचा समावेश करू शकता. ह्या टप्प्यावर पोळी, शिजवलेली भाजी, डाळ असलेली थाळी म्हणजे संपूर्ण पोषक आहार होय.

  • रात्रीची आहार योजना

जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल तर, तुमचे रात्रीचे जेवण हलके ठेवा. साध्या रात्रीच्या जेवणात कमी मसालेदार व उकडलेल्या आणि शिजवलेल्या भाज्यांचा आणि सॅलेडचा समावेश करा.

जर तुम्हाला काही चवीढवीचे खावेसे वाटले तर थोड्या प्रमाणात पोषक नाश्ता घ्या जसे की उपमा, भेळ पुरी, ढोकळा इत्यादी. तळलेले अन्नपदार्थ टाळा आणि तुमच्या भुकेप्रमाणे किती खायचे ते ठरवा. खुपही जास्त प्रमाणात खाऊ नका कारण दोन जीवांसाठी खायचे म्हणून बरेच जण तुम्हाला खाण्याचा आग्रह करतील. ह्या प्रसिद्ध समजुतीच्या विरुद्ध खरं तर, तुम्ही दोघांसाठी खात नसता तर श्वास घेत असता. तुम्ही फक्त एका साठीच खाल्ले पाहिजे आणि ते दोघांसाठी पुरेसं आहे !

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article