Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात करू शकणारे १८ अन्नपदार्थ

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात करू शकणारे १८ अन्नपदार्थ

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात करू शकणारे १८ अन्नपदार्थ

मातृत्वाची सुरुवात गर्भधारणेपासून सुरू होते. गर्भवती महिलेला आपल्या बाळाचे व स्वतःचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे. तथापि, पपई, अननस, खेकडे, अंडी आणि पारा-समृद्ध माशांसारखे काही पदार्थ आहेत जे गर्भवती महिलांनी खाण्यापासून दूर राहिले पाहिजे. याचे कारण असे आहे की ह्या अन्नपदार्थांमुळे गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत संभाव्य गर्भपाताची सुरुवात होऊ शकते, आणि पहिल्या तिमाहीत  हा धोका जास्त असतो. गर्भवती स्त्रियांनी त्यांच्या आहारात कुठले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत ह्याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे आणि गर्भपात टाळण्यासाठी त्यांनी आहारात पौष्टिक अन्न समाविष्ट केले पाहिजे आणि गर्भधारणेदरम्यान गर्भपात टाळण्यासाठी विशिष्ट अन्न टाळणे आवश्यक आहे.

गर्भवती महिलेचं वय आणि आरोग्यासारख्या इतर घटकांचे महत्त्व, तिची जीवनशैली आणि सेवन करीत असलेले खाद्यपदार्थ याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. विशेषतः गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात, या खाद्य पदार्थांपासून दूर राहणे उचित ठरते. हे अन्नपदार्थ गर्भवती महिलेच्या गर्भाशयाचे मुख रुंद करण्यास किंवा उघडण्यास कारणीभूत असतात, यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.

गर्भवती महिलांनी गर्भपातास कारणीभूत असलेले पदार्थ टाळले पाहिजेत. गर्भवती महिलांनी ज्या फळांमुळे गर्भपात होतो त्या फळांपासून दूर राहिले पाहिजे.

ज्या अन्नपदार्थांमुळे गर्भपात होऊ शकतो त्यांची यादी खाली दिली आहे.

१. अननस

अननसामध्ये ब्रोमेलेन असते जे गर्भाशयाचे संकुचन सुरू करण्यासाठी गर्भाशयाला मऊ करू शकते. परिणामी गर्भपात होऊ शकतो. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात अननस किंवा अननस रस घेण्याचे टाळणे सर्वोत्तम आहे.

अननस

२. खेकडे

खेकडे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत असले तरी त्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉलची उच्च पातळी देखील असते. यामुळे गर्भाशयाचे संकुचन होऊ शकते, परिणामी आंतरिक रक्तस्त्राव आणि संभाव्य गर्भपात होतो. म्हणूनच,त्यांचा स्वाद चांगला असला तरी गर्भधारणेदरम्यान ते खाण्यापासून दूर राहणे चांगले.

खेकडे

३. तीळ

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भवती स्त्रिया तीळ बियाण्यापासून दूर राहू शकतात. तीळ मधासह खाल्ल्यानंतर गरोदरपणात त्रास होऊ शकतो. तथापि, गर्भवती महिला गर्भधारणेच्या नंतरच्या टप्प्यात थोडे काळे तीळ खाऊ शकतात कारण त्यामुळे प्रसूतीस लाभ होतो.

तीळ

४. पशु यकृत

सामान्यतः निरोगी मानले जाते कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. म्हणून, महिन्यातून ते दोन वेळा खाल्ल्यास हानिकारक नसते. परंतु गर्भवती महिलांनी ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास, गर्भधारणेदरम्यान त्रास होऊ शकतो कारण ते रेटिनॉलचा संचय वाढवू शकते जे बाळाला प्रतिकूल परिणाम देऊ शकते.

पशु-यकृत

५. कोरफड

बहुगुणी कोरफड आरोग्यास असलेल्या अनेक फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु बऱ्याच अभ्यासातून सूचित होते की गर्भधारणेदरम्यान कोरफड खाण्याआधी गर्भवती महिलांनी विचार करायला हवा. याचे कारण असे आहे की कोरफडीत अँथ्राक्विनोन्स, हे एक प्रकारचे रेचक आहे जे गर्भाशय संकुचित करण्यास प्रेरित करतात आणि त्यामुळे रक्तस्त्राव होऊन गर्भपात होऊ शकतो. तथापि, गर्भधारणेदरम्यान कोरफड वरून लावल्यास असुरक्षित मानले जात नाही.

कोरफड

६. पपई

कच्च्या किंवा हिरव्या पपईमध्ये असे घटक असतात जे रेचक म्हणून कार्य करतात त्यामुळे अकाली प्रसव आणि गर्भपात होऊ शकतो. पपईचे बीज संप्रेरकांनी समृध्द असतात ज्यामुळे गर्भाशयाचे संकुचन होऊ शकते, परिणामी गर्भपात होतो. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान पपई समाविष्ट असलेला कुठलाही खाद्यपदार्थ खाणे सुरक्षित नाही.

पपई

७. शेवगा

गर्भारपणात गर्भवती महिलांनी शेवगा खाताना काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याचे कारण शेवग्यामध्ये अल्फा-सायटेस्टेरॉल असते, जे गर्भधारणेसाठी हानिकारक असू शकते. तथापि, शेवगा हे लोह, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांनी समृध्द आहे. म्हणून, मर्यादित प्रमाणात शेवगा खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच गर्भधारणेतील अडचणी टाळण्यासाठी शेवगा खाण्याआधी तो स्वच्छ धुवून घेणे आवश्यक आहे.

शेवगा

८. दुग्धजन्य उत्पादने

गोगोन्झोला, मोझारेला चीझ यासारख्या कच्च्या दुग्ध उत्पादनांमध्ये लिस्टरिया मोनोसाइटोजेनेस सारखे रोग प्रसारक जीवाणू असू शकतात, जे गर्भधारणेस हानिकारक ठरु शकतात. गर्भवती स्त्रियांनी कच्च्या दुधापासून बनविलेले काहीही खाणे किंवा पिणे यासाठी सुरक्षित मानले जात नाही कारण यामुळे गर्भधारणेमध्ये अनावश्यक गुंतागुंत होऊ शकते.

दुग्धजन्य-उत्पादने

९. कॅफिन

बऱ्याच संशोधकांच्या मते, गर्भधारणेदरम्यान कॅफिनला असुरक्षित मानले जात नाही. तरीही, गर्भधारणेदरम्यान कॅफीन ची वाढीव पातळी, गर्भपात किंवा कमी वजनाचे बाळ होणे ह्यासारख्या समस्येस कारणीभूत ठरू शकते. याशिवाय, काही तज्ञांनी कॅफिन निर्जलीकरणास कारणीभूत असते असे सांगितले आहे, याचा अर्थ शरीरात द्रव कमी होऊ शकतो. चहा, कॉफी, चॉकलेट आणि काही शीतपेय यांसारख्या अनेक खाद्य पदार्थांमध्ये कॅफिन आढळते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

कॅफिन

१०. पारा समृद्ध मासे

मासे खाताना गर्भवती स्त्रियांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. मासे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेली असले तरी, गर्भवती स्त्रिया ज्यामध्ये पारा जास्त प्रमाणात असतो अशा माशांच्या विशिष्ट जाती खाण्यापासून दूर राहू शकतात उदा: किंग मॅकेरल, ऑरेंज रफ, मार्लिन, शार्क, टाइलफिश, टुना इत्यादी. याचे कारण असे आहे की पाऱ्याच्या सेवनामुळे बाळाच्या विकसनशील मेंदू आणि मज्जासंस्थावर प्रतिकूल परिणाम होतो.

पारा-समृद्ध-मासे

११. औषधी वनस्पती

बऱ्याच तज्ञांनी गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान औषधी वनस्पती घेणे टाळावे अशी शिफारस केली आहे. काही औषधी वनस्पतींमध्ये स्टेरॉईड्स असतात जे गर्भधारणेदरम्यान बाळांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करतात. सेन्टेलासारख्या औषधी वनस्पती गर्भवती स्त्रीने खाल्ल्यास, यकृताला हानी पोहचवू शकतात, परिणामी तीव्र कावीळ आणि बाळाच्या मेंदूला संभाव्य नुकसान होऊ शकते. डोंग क्वाई, गोतु कोला सारख्या औषधी वनस्पतींमध्ये गर्भपात किंवा अकाली प्रसव सुरू होणारी एजंट असू शकतात. कोणत्याही औषधी वनस्पती घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.

औषधी-वनस्पती

१२. पीच

पिचला निसर्गात “उष्ण” असे मानले जाते. गर्भधारणेदरम्यान मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यास, गर्भवती महिलेच्या शरीरात जास्त उष्णता वाढू शकते. यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो, परिणामी गर्भपात होतो. शिवाय, गर्भवती महिलांनी पीच खाण्याआधी त्याचे साल काढून टाकले पाहिजे कारण फळांच्या आवारणावरील लहान केसांमुळे जळजळ आणि घशाची खवखव वाढू शकते.

पीच

१३. जंगली सफरचंद

गर्भवती महिलांनी जंगली सफरचंद खाता कामा नये. ऍसिडिक आणि आंबट गुणधर्मांमुळे ते गर्भाशयाचे संकुचन प्रवृत्त करू शकतात. यामुळे अकाली कळा सुरु होऊन गर्भपात होऊ शकतो.

जंगली-सफरचंद

१४. प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले मांस जसे सॉसेज, स्टफ्ड मीट, सलामी, डेली मीट, पेपरोनी गरोदरपणात खाणे हे असुरक्षित मानले जाते. याचे कारण असे आहे की प्रक्रिया केलेल्या मांसामुळे टोक्सोप्लाझ्मा गोंडी, लिस्टरिया किंवा सॅल्मोनेला सारख्या जीवाणूंची बाधा होऊ शकते, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. विशेषत: गर्भवती महिलांनी कच्चे मांस खाणे टाळावे कारण मांसामध्ये असलेल्या जिवाणूंमुळे गर्भपात, अकाली प्रसव किंवा आजारपण यासारख्या गंभीर समस्या होऊ शकतात. म्हणून, मांस योग्य प्रकारे शिजवणे किंवा ते खाण्याआधी ते पूर्णपणे गरम करून खाणे आवश्यक आहे.

प्रक्रिया-केलेले-मांस

१५. अंडी किंवा पोल्ट्री

गर्भधारणेदरम्यान अंडी किंवा कोंबडीचे मांस खाताना काळजी घ्यावी. याचे कारण असे की अंड्यांमध्ये सॅल्मोनेला नावाचे जीवाणू असू शकतात ज्यामुळे अन्न विषबाधा, अतिसार, ताप, आतड्यांचा त्रास किंवा अगदी गर्भपातसुद्धा होऊ शकतो. अंड्याचा पांढरा भाग तसेच बलक घट्ट होईपर्यंत, अंडी शिजवणे महत्वाचे आहे त्यामुळे जीवाणू नष्ट होतात आणि अंडे खाण्यासाठी सुरक्षित होते. गर्भवती महिलांनी कच्चे अंडे घालून केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे. जसे की घरगुती मेयोनेझ, सॉफल्स, कच्चे अंडे घातलेल्या स्मूदी इत्यादी.

अंडी-किंवा-पोल्ट्री

१६. अस्वच्छ भाज्या

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. परंतु कच्च्या किंवा अस्वच्छ भाज्यांमध्ये टोक्सोप्लाझ्मा गोंंडी, एक सामान्य परजीवी असतो, ज्यास गर्भधारणा करणाऱ्या स्त्रियांमध्ये टॉक्सोप्लाज्मॉसिस म्हणतात. गर्भवती महिला जर संसर्गग्रस्त असेल तर तिच्या बाळाला सुद्धा संसर्ग होऊ शकतो. आणि ते तिच्या गर्भारपणास हानिकारक ठरू शकते. म्हणून, भाज्या वाहत्या पाण्याखाली किंवा मीठ घातलेल्या स्वच्छ पाण्याने काळजीपूर्वक धुणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांनी हे ही लक्षात ठेवले पाहिजे की स्वयंपाकाची भांडी स्वच्छ असली पाहिजेत तसेच खाण्याआधी भाज्या नीट शिजवलेल्या असल्या पाहिजेत.

अस्वच्छ-भाज्या

१७. सी फूड

शेलफिश, ऑयस्टर, सशीमी, सुशी, प्रॉन यासारखे बहुतेक समुद्री खाद्य पदार्थ लिस्टरियासारख्या जीवाणूंमुळे प्रदूषित होऊ शकतात. जेव्हा गर्भवती स्त्रिया ते खातात तेव्हा अकाली प्रसव किंवा गर्भपात यासारख्या गर्भधारणेच्या समस्या होऊ शकतात. कच्चे किंवा ताजे सीफुड हे सहसा टेपवर्म आणि विषाणूंनी दूषित होण्याचा उच्च धोका असतो, यामुळे गर्भवती महिलांना लिस्टरियोसिस किंवा अन्नाच्या विषबाधेसारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. गर्भवती महिलांनी फक्त शिजवलेल्या सी फूडचा उपभोग घेण्याचा सल्ला दिला पाहिजे, विशेषत: जर जपानी रेस्टॉरंटमध्ये जेवण घेत असेल तर ते सामान्यत: फक्त बाहेरून सीफूड शिजवतात आणि खातात.

सी-फूड

१८. मसाले

पदार्थ चविष्ठ होण्यासाठी स्वयंपाक करताना मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमध्ये भरपूर पोषक मूल्य असते. परंतु गर्भधारणेदरम्यान गर्भवती महिलांनी मेथी, हिंग, लसूण, दंडिका, पेपरमिंटसारख्या काही मसाल्यांचा त्याग करावा. हे मसाले गर्भाशयाला उत्तेजित करु शकतात, परिणामी गर्भाशय संकुचित होण्याची शक्यता असते. त्यामुळे अकाली प्रसव किंवा गर्भपात होतो. जास्त लसूण असलेल्या मसाल्यांचा वापर न करण्याच्या बाबतीत काळजी घेतली जाऊ शकते कारण त्यामध्ये शक्तिशाली पदार्थ असतात ज्यामुळे रक्त पातळ होते आणि गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होऊ शकतो.

मसाले

गर्भधारणेदरम्यान निरोगी आणि संतुलित आहार राखणे आवश्यक आहे. याचा अर्थ गरोदर महिलेच्या आहारात सर्व अन्न गटांमधील अन्न पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे जेणेकरून गर्भवती महिलेला जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे मिळवू शकतील. ह्याचे संतुलन ठेवणे महत्वाचे आहे. जास्त प्रमाणात काहीही खाल्ल्यास ते गर्भधारणेसाठी हानिकारक ठरू शकते. या संदर्भात आपल्या डॉक्टरांशी जरूर सल्लामसलत करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article