Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ४था आठवडा

गर्भधारणा: ४था आठवडा

गर्भधारणा: ४था आठवडा

अभिनंदन! तुम्ही आई होणार आहात हे तुम्हाला आता समजलंय हो ना? आणि ही आनंदाची बातमी तुमच्या जवळच्या माणसांना कधी एकदा सांगू असे तुम्हाला वाटत असेल. पण त्यास पुष्टी देण्याआधी तुम्ही रक्ताची चाचणी करून घेतली पाहिजे. हा आठवडा म्हणजे तुम्ही गरोदर आहात हे स्पष्ट करते कारण तुमची पाळी नुकतीच चुकलेली आहे आणि तुम्ही गरोदर असल्याची चाचणी सुद्धा करून घेतलेली आहे. तुम्ही आता खूप उत्सुक असाल ना!

गर्भारपणाच्या ४ थ्या आठवड्यातील तुमचे बाळ

गर्भारपणाच्या ४ थ्या आठवड्यातील तुमचे बाळ

गरोदरपणाच्या ४ थ्या आठवड्यात रोपण होते. Blastocyte गर्भाशयाच्या आवरणामध्ये स्वतःचे रोपण करते आणि नाळ आणि भ्रूण ह्यामध्ये विकसित होण्यासाठी दोन भागात विभाजित होते. ह्या आठवड्यात छोट्या भ्रूणाभोवती गर्भजल पिशवी (ऍम्नीऑटिक सॅक) आणि बाळाच्या पचनसंस्थेचा भाग (योक सॅक) तयार होण्यास सुरुवात होते. ४ थ्या आठवड्यात भ्रूणाची सुद्धा ठळक ३ भागात वाढ होते. हे भ्रूणाचे ३ भाग म्हणजे, एन्डोडर्म (endoderm) (सर्वात आतला थर), मेसोडर्म (Mesoderm) (मधला थर) आणि एक्टोडर्म (ectoderm) (बाहेरील थर). बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी हा अत्यंत महत्वाचा आठवडा आहे ह्यात काही शंकाच नाही.

बाळाचा आकार केवढा असतो?

हा महत्वाचा आठवडा असतो ज्यामध्ये गर्भाच्या वाढीस सुरुवात होते. आत्ता तुमच्या बाळाचा आकार म्हणजेच भ्रूणाचा आकार खसखशीच्या दाण्याएव्हढा असतो. भ्रूणाभोवती २ थर असतात,epiblast आणि hypoblast, ज्यातून बाळाच्या शरीराचे भाग विकसित होतात. जरी ४ आठवड्यांच्या बाळाचा आकार सूक्ष्म असला तरीही त्याचा विकास खूप वेगाने होत असतो.

शरीरात होणारे बदल

तुमच्या शरीरात गर्भारपणामुळे वेगवेगळे संप्रेरके स्त्रवत असतात आणि ह्या आठवड्यात तुमचे शरीर ह्या संप्रेरकांच्या होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यास व्यस्त असेल. तुम्हाला लवकरच गरोदरपणाच्या लक्षणांचा अनुभव येण्यास सुरुवात होईल. तुम्हाला अस्वस्थ आणि खूप थकल्यासारखे वाटू लागेल. शरीरात होणारे रासायनिक बदल तुम्हाला जाणवू लागतील आणि तसं वाटणे खूप साहजिक आहे. Blastocyte, म्हणजेच तुमचं बाळ गर्भाशयात स्थिरावलेलं असतं! असे दिसून आले आहे की गर्भारपणाच्या ४ थ्या आठवड्यात, ३०% स्त्रियांमध्ये रोपण रक्तस्त्राव होतो, त्यामुळे रक्ताचे हलके डाग आढळतात. हा रक्तस्त्राव म्हणजे पाळी नव्हे आणि त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ह्यामुळे तुम्हाला पोटात पेटके जाणवतील आणि स्तन सुद्धा हळुवार आणि दुखरे होतील. तुम्ही तुमच्या ह्या नव्या पर्वाचा आनंद घ्या आणि आई होण्यासाठी स्वतःला तयार करा.

४ थ्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

४ थ्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

४थ्या आठवड्यात गरोदरपणातील वेगवेगळ्या संप्रेरकांमुळे शरीरात खूप बदल होतात. सामान्यपणे आढळणारी गरोदरपणाची ४ लक्षणे खालीलप्रमाणे

  • प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांमुळे तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटेल.
  • भ्रूणाच्या रोपणामुळे पोटामध्ये सौम्य प्रमाणात पेटके येतील पण तुम्हाला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. परंतु जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पेटके जाणवत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • Blastocyte चे जेव्हा गर्भाशयात रोपण होते तेव्हा तुम्हाला गुलाबी, फिकट लाल किंवा गडद लाल रंगाचे डाग आढळतील. परंतु काळजीचे काहीही कारण नाही. जर ते दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिले तर मात्र तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • संप्रेरकांच्या बदलणाऱ्या पातळीमुळे तुमच्या मनःस्थिती मध्ये बदल होतील. तुम्हाला त्यावर ताबा मिळवता आला पाहिजे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही कशातून जात आहात हे कळावे आणि त्यांनी तुम्हाला सहकार्य करावे अशी प्रार्थना करा. कारण तुमच्या मनःस्थिती होणारे हे बदल फक्त १२ आठवड्यांसाठी राहणार आहेत.
  • सर्वसामान्यपणे आढळणारे लक्षण म्हणजे मॉर्निंग सिकनेस. ९०% स्त्रियांना उलटी किंवा मळमळ ह्याचा त्रास होतो. ९ आठवड्यानंतर ते कमी होते त्यामुळे थोडा धीर धरा.
  • छोटंसं भ्रूण ते निरोगी बाळ, ह्या प्रवासात तुमचे शरीर खूप कार्यरत असते, त्यामुळे तुम्हाला थकवा येणे हे खूप साहजिक आहे. परंतु हा त्रास पहिल्या तिमाहीनंतर कमी होणार आहे.
  • गरोदरपणातील संप्रेरकांच्या वाढत्या पातळीमुळे तुमचे स्तन जड आणि हळुवार होतील.

गर्भधारणेच्या ४ थ्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भधारणेच्या ४ थ्या आठवड्यात पोटाचा आकार

गरोदरपणाच्या ४ थ्या आठवड्यात तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनच्या वाढलेल्या पातळीमुळे तुम्हाला थोडे पोट फुगल्यासारखे वाटेल, परंतु तुम्ही गरोदर आहात हे सगळ्यांना कळण्यासाठी अजून वेळ आहे. तुमचं बाळ अगदीच खसखशीच्या दाण्याएवढं छोटं आहे. त्यामुळे तुम्ही आई होणार आहात हे अजूनही गुपितच राहणार आहे.

गर्भधारणेच्या ४ थ्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भधारणेच्या ४ थ्या आठवड्यातील सोनोग्राफी

तुमच्या शरीरात ह्या आठवड्यात खूप बदल होत आहेत. गर्भाशयाच्या आवारणामध्ये blastocyte स्थिर होऊन भ्रूण आणि नाळेमध्ये विभाजित होत असते. बाळाचा मेंदू, आणि मणका हे विकसित झालेले आहेत. गर्भावरण  पिशवी आणि गर्भजल बाळाभोवती सुरक्षित कवच तयार करीत आहेत. ४ थ्या आठवड्याच्या सोनोग्राफी मध्ये तुम्हाला अगदी छोट्या बिंदू एवढी गर्भावरण पिशवी दिसेल. निराश झालात? निराश अजिबात होऊ नका. थोडा धीर धरा. तुम्हाला गर्भारपणाच्या पुढच्या काही महिन्यांमध्ये तुमच्या बाळाचा विकास कसा होतो आहे ते दिसणार आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्ही घेणार आहात.

आहार कसा असावा?

निरोगी बाळासाठी तुम्ही आरोग्यपूर्ण आहार घेतला पाहिजे. संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या, शेंगा, मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि फळे हे सर्व घटक तुमच्या आहारात पुढचे ९ महिने असलेच पाहिजेत. तुम्ही अजूनही फॉलीक ऍसिडयुक्त व्हिटॅमिन्स घेण्यास सुरुवात केली नसेल तर ताबडतोब घेण्यास सुरुवात करा. तुमच्या बाळाच्या निरोगी वाढ आणि विकासासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे.

आजपासून तुम्ही कॅफेन टाळाच. कॅफेन मुळे कॅल्शिअम आणि गर्भारपणात आवश्यक असलेली अन्य पोषाणमूल्ये शरीराबाहेर टाकली जातात. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर कॉफीची सवय असेल तर ती एकदम बंद करणे कठीण जाईल. त्यामुळे एकदम बंद करू नका, ही प्रक्रिया हळू हळू करा. तुमच्या कॉफीच्या वेळेला काही आरोग्यपूर्ण पेय घ्या किंवा चविष्ट प्रोटीन स्नॅक्स खा. त्यामुळे इथूनपुढे तुम्ही काय खात आहात ह्याची काळजी घ्या.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

तुम्ही तुमची गरोदरचाचणी मागच्या आठवड्यात यशस्वीरीत्या पार पडलीच असेल आणि तुम्हाला तुम्ही आई होणार आहात हे समजले असेल. त्यामुळे तुम्ही तुमचे डॉक्टर निश्चित करून त्यांना भेटणे तर जरुरीचे आहेच परंतु तुमचा वैद्यकीय विमा असणे जरुरीचे आहे. त्यामुळे त्याविषयी माहिती घ्या. आता काय करावे आणि काय करू नये ह्याविषयी जाणून घेऊ या.

हे करा

  • घरी करता येणारी गरोदर चाचणी आणा.
  • पोषक अन्न खा.
  • दररोज फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा.
  • फॉलीक ऍसिड असलेली  व्हिटॅमिन्स घ्या.

हे करू नका

  • जंक फूड टाळा.
  • धूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन बंद करा.
  • कॅफेन घेऊ नका.
  • आराम करा, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा विश्रांती घेणे टाळू नका.
  • तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा आणि कुठल्याही प्रकारचे औषध घेऊ नका.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमची ४थ्या आठवड्यांच्या खरेदीची यादी पण अगदी साधी आहे, म्हणजेच गर्भारपणाविषयीचे पुस्तक, घरी करता येणारी गरोदर चाचणी किट, कॉटन ब्रा इत्यादी. तुम्हाला हवं असेल तर लेगिन्स, पँट्स ह्यांचा सुद्धा खरेदी यादीमध्ये समावेश करू शकता ज्यामुळे तुमचा पोटाजवळचा भाग सैल राहील. तुमच्या आधीच्या पँट्स आता तुम्हाला आरामदायक वाटणार नाहीत. त्यामुळे त्यावर थोडी जास्त खरेदी करावी लागली तरी अजिबात संकोच बाळगू नका.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३रा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ५वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article