Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य अध्यात्मिक फायद्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या गोष्टी कराव्यात?

अध्यात्मिक फायद्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या गोष्टी कराव्यात?

अध्यात्मिक फायद्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या गोष्टी कराव्यात?

अक्षय तृतीया हा एक लोकप्रिय हिंदू उत्सव आहे, जो सामान्यत: वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या शुभ दिवशी बरेच लोक सोन्याची खरेदी करतात. लोक ह्या दिवशी दान धर्म करतात. अक्षय तृतीयेला दान केल्याने श्रीमंती आणि समृद्धी येते.

अक्षय तृतीयेबद्दल तुम्हाला काय माहित असावे?

अक्षय तृतीयेबद्दल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत.

  • अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन यांचा वार्षिक वसंत ऋतू उत्सव आहे.
  • अक्षय्य तृतीयेला बरेच लोक सोने खरेदी करतात कारण सोने हे संपत्ती आणि शुभेच्छा यांचे प्रतीक मानले जाते.
  • ह्या दिवशी दान केल्याने श्रीमंती तसेच आयुष्यमान वाढते असा विश्वास असल्याने लोक या दिवशी विविध गोष्टी दान करतात.
  • अक्षय तृतीया, ज्याला आखा तीज देखील म्हणतात, हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसर्‍या दिवशी साजरा केला जातो.
  • हा दिवस भगवान परशुरामाचा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. श्री परशुराम हे श्री विष्णूंचा सहावा अवतार आहेत.
  • वेद व्यासांनी या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरवात केली.
  • हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो.
  • असा विश्वास आहे की सूर्य आणि चंद्र अक्षय्य तृतीयेवर सर्वात तेजस्वी असतात.

अक्षय तृतीयेच्या दिवशी हे करा आणि हे करू नका

अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जे काही सकारात्मक अथवा नकारात्मक करता ते भविष्यात दहापट वाढून तुमच्याकडे पुन्हा येईल आणि त्या दिवशी तुम्ही काय केले यावर त्याचा परिणाम अवलंबून असेल. म्हणून आपण या दिवशी जे काही करता किंवा बोलता त्याबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. ह्या सणाच्या दिवशी कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या करू नयेत हे खाली दिलेले आहे.

हे करा

अक्षय तृतीयेवर तुम्ही करावयाच्या गोष्टींची यादी खाली दिली आहे.

. सोनं खरेदी करा अक्षय्य तृतीयेवर सोनं खरेदी करणं ही एक परंपरा आहे आणि यापूर्वी कधीही सोनं विकत घेतलं नसेल तर ते विकत घेण्याचाही विचार करा. तो गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय तर आहेच परंतु संपत्तीचे प्रतीक आहे. या दिवशी सोने खरेदी केल्याने समृध्दी मिळते असेही मानले जाते. सोने खरेदी करणे पवित्र मानले जाते आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक कल्याण देखील करते.

सोनं खरेदी करा

. नवीन उद्योग सुरू करा आपल्याला एखादा नवीन व्यवसाय, वेबसाइट, कंपनी किंवा आपल्या जीवनाशी संबंधित कोणतीही गोष्ट सुरू करायची असल्यास या दिवशी प्रारंभ करा. या दिवशी कोणतीही नवीन सुरुवात केल्यास भविष्यात भरभराट होईल याची खात्री आहे.

. वाहने खरेदी करा आपली गाडी किंवा मोटारसायकल खरेदी करण्याची योजना असेल तर अक्षय्य तृतीयेवर खरेदी करा. या दिवशी वाहने खरेदी करणे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. तुमचा प्रवास सुकर होईल हे देखील ह्याने सुनिश्चित होईल. अनेक कार आणि ऑटोमोबाईल कंपन्या अक्षय तृतीयेच्या दिवशी वाहनांवर उत्तम सूट देतात म्हणून या दिवशी वाहन खरेदी करण्याचा विचार करा.

. नवीन घर खरेदी करा अक्षय तृतीया हा नवीन घर विकत घेण्यासाठी एक चांगला दिवस आहे. नवीन घर विकत घेतल्यामुळे जोडप्यांना आशीर्वाद मिळतो आणि गृह प्रवेशसोहळा करण्यासाठी हा चांगला दिवस आहे. वाईट विचार नष्ट होतात आणि घरात सकारात्मक उर्जा येते. या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी केल्याने आपल्या घरात सकारात्मक स्पंदने येऊ शकतात आणि त्या घरात आपण समृद्ध आणि निरोगी जीवन जगू शकता ह्याची खात्री होते.

हे करू नका

अक्षय तृतीयेला आपण करु नये अशा गोष्टींची यादी येथे आहे.

. मुंज करू नका हा विधी हिंदू ब्राह्मण मुलांसाठी आहे. या दिवशी हा सोहळा करू नका. तसेच, या दिवशी पवित्र धागा घालू नका कारण हे दुर्दैवाचे लक्षण आहे.

. या दिवशी तुमचा उपवास मोडू नका जर तुम्ही बराच काळ एखादा उपवास करत असाल तर तो अक्षय तृतीयेच्या काही दिवस आधी सोडू नका. ह्या दिवशी उपवास सोडणे आणि त्याचा सोहळा करणे अशुभ मानले जाते.

अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कोणते विधी करू शकता?

या दिवशी आपण कोणतीही पूजा करण्यापूर्वी, घरातला कचरा नष्ट करून आणि स्वच्छ करून प्रारंभ करा. पूजेसाठी काही तुळशीची पाने, प्रसाद आणि फुले तयार ठेवा. या शुभ दिवशी केल्या जाणार्‍या पूजा खाली दिल्या आहेत.

. लक्ष्मी पूजा आणि विष्णू पूजा

देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे, तर भगवान विष्णू संपत्तीचा रक्षणकर्ता आहेत. देवी लक्ष्मी आणि विष्णूला प्रार्थना करून आपल्या घरात लक्ष्मी आणि विष्णू पूजा केल्यास आपल्या घरात नेहमीच संपत्ती राहील आणि आनंद मिळेल.

लक्ष्मी पूजा आणि विष्णू पूजा

. अश्व पूजा

अश्व म्हणजे घोडा. अश्व पूजा घोड्यांसाठी केली जाते. जर तुम्हाला धैर्याने आशीर्वाद घ्यायचा असेल आणि सकारात्मक उर्जेचा आशीर्वाद मिळाला असेल तर घोड्याची उपासना करुन प्रारंभ करा. हा मंगळाचा शिष्य मानला जातो आणि ते अधिकार आणि उर्जा यांचे प्रतीक आहे.

. गज पूजा

हत्तीला प्रार्थना करणे आणि गज पूजा केल्यास तुमच्या जीवनातील सर्व अडथळे व अडचणी दूर होतील. ह्यामुळे आपल्याला भविष्यात जर कोणतीही आव्हाने आली तर तुम्ही कोणत्याही आव्हानांवर सहजतेने विजय मिळवू शकण्यास मदत होते.

. गाई पूजा

संपूर्ण भारतातील लाखो हिंदू गायीची पूजा करतात. गायींना शुक्र ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि त्या निसर्गतः प्रेमळ आणि पालनपोषण करणाऱ्या असतात.

अक्षय तृतीयेवर तुम्ही दान करू शकता अशा गोष्टी

अक्षय्य तृतीयेला संपन्नता आणि कल्याणासाठी दान देण्यासाठी काही चांगल्या गोष्टी येथे आहेत.

. सुपारीसह पाणी

एका ब्राह्मणाला सुपारीसह पाणी दान केल्याने तुमच्या कडे समृद्धी येते.

. पलंग

या दिवशी पलंग दान केल्याने आपल्या जीवनात दीर्घकालीन समृद्धी येईल आणि आनंद मिळेल.

. कपडे

गरजूंना कपडे दिल्यास तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.

कपडे

. चंदन

अपघातांचा धोका टाळण्यासाठी गरीबांना चंदन दान केले जाते.

. नारळ

या दिवशी ब्राह्मणांना नारळ दान केल्याने तुमच्या पूर्वजांना त्यांच्या पूर्वीच्या पापांपासून मुक्त केले जाऊ शकते.

. ताक

या दिवशी आपल्या मुलांना ताक दान करण्यास सांगा. तुमचे मूल शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होईल.

. उदाकुंभ दानम

ज्यांचे लग्न व्हायचे आहे किंवा ज्यांना मुले हवी आहेत त्यांच्यासाठी हे एक महत्वाचे दान मानले जाते. त्यामध्ये पाणी, कापूर, केशर, तुळशीची पाने आणि सुपारी ठेवली जाते.

. चप्पल

अक्षय तृतीयेवर जर तुम्ही एखाद्याला चप्पल दान केली तर ते मृत्यूनंतर नरकात जात नाही.

. कुमकुम

आपण गरजूंना कुमकुम दान केल्यास आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि तुमची भरभराट होईल.

कुमकुम

१०. दही तांदूळ

एखाद्याला दही भात दान केल्यास तुम्हाला जीवनात नकारात्मकतेपासून मुक्तता मिळते आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता.

अक्षय तृतीया हा एक लोकप्रिय सण आहे. योग्य मार्गाने साजरा केल्यास आपल्या जीवनात धन आणि आनंद मिळू शकेल. म्हणून महत्वाची पूजा करुन गरजूंना वस्तू दान करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article