In this Article
भारत हा बरीच राज्ये, धर्म, समुदाय आणि संस्कृतींचा देश आहे. त्या अनुषंगानेच भारतात प्रत्येकाला सण समारंभाच्या निमित्ताने आनंद मिळतो. बरेच लोक इंग्रजी कॅलेंडरचे अनुसरण करीत नाहीत, त्याऐवजी ते अधिक पारंपारिक कॅलेंडरचे अनुसरण करतात. अशाच प्रकारे नवीन वर्षाचे वेगवेगळे दिवसही आहेत, गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्राच्या पारंपरिक नवीन वर्षाची सुरुवात!
गुढीपाडवा हे चंद्रशास्त्राच्या कॅलेंडरशी संबंधित असून महाराष्ट्रीयन लोक त्याचे अनुसरण करतात. हा दिवस म्हणजे चंद्राच्या तेजस्वी अवस्थेचा पहिला दिवस असतो. ह्या सणामागे इतर महत्वपूर्ण घटक देखील आहेत जसे की ह्या काळात वसंत ऋतूची सुरवात होते तसेच कापणीचा हंगाम सुरु होतो. गुढी उभारण्याची प्रथा सुरू करणारे प्रसिद्ध मराठा सम्राट शिवाजी महाराजांचा देखील या सणाला सन्मान आहे.
इंग्रजी वर्षानुसार उत्सवाचा दिवस हा सहसा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरूवातीस येतो. जरी आपण सायबर युगात राहत असलो तरी जगभरातील महाराष्ट्रीयन लोक पारंपारिक शैलीत गुढी पाडवा साजरा करतात. गुढी पाडव्याला काय करायचे, हा महोत्सव अस्सल महाराष्ट्रीयन शैलीत कसा साजरा केला जातो ते येथे पाहुयात.
सणाची तयारी
इतर कोणत्याही सणाप्रमाणे, गुढीपाडव्याची तयारीही शॉपिंगपासून सुरू होते! गुढीसाठी आवश्यक वस्तू आणि रांगोळी, त्यासाठी लागणाऱ्या रंगासह संपूर्ण कुटुंबासाठी नवीन कपडे विकत घेतले जातात. इतर सजावट आणि घरगुती वस्तू देखील विकत घेतल्या जातात.
काही लोक उच्च किंमतीची उत्पादने खरेदी करण्यासाठी हा एक शुभ काळ मानतात आणि म्हणूनच ते सोने, चांदी किंवा इतर घरगुती उपकरणे खरेदी करतात. विक्रेते विशेष किमतीत वस्तू विक्री करण्यात व्यस्त असतात. बरेच लोक अजूनही घरी गोड धोड पदार्थ करतात, तर काही लोक ते बाहेरून मागवणे पसंत करतात. म्हणूनच मिठाईच्या दुकानात ऑर्डर आधीपासून दिली जाते.
सजावट
गुढीपाडवा वसंत ऋतूची सुरूवात दर्शवितो, संपूर्ण कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन घर स्वच्छ आणि एकदम चकचकीत करतात. फुलांचे आणि पानांचे तोरण घराच्या आत आणि घराबाहेर लावलेले असते त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वाराकडे विशेष लक्ष दिले जाते. खेड्यांमध्ये, अंगण झाडून घेतले जाते तसेच ते शेणाने सरावले जाते.
तयार होणे
दिवसाची सुरुवात लवकर होते. कुटुंबातील सर्वजण तेल लावून अंघोळ करतात आणि नवीन कपडे घालून तयार होतात. बहुतेक लोक या दिवशी पारंपारिक महाराष्ट्रीयन वस्त्र परिधान करतात. अनोख्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी आणि हा सण साजरा करण्यासाठी काही स्त्रिया साधारणतः रेशीम किंवा ब्रोकेडच्या नऊवारी साड्या परिधान करतात, तर काही जणी सहावारी साड्या नेसतात. पुरुष झब्बा कुर्ता पायजमा आणि डोक्यावर टोपी असा पारंपरिक वेष करतात. स्त्रिया हातात रंगीबेरंगी बांगड्या घालतात तसेच केसात फुले घालून नटतात.
गुढी उभारणे
गुढीपाडव्याच्या उत्सवाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे. गुढी म्हणजे एका बांबूला, चमकदार रंगीत कापडाने झाकले जाते त्यावर तांब्याचे किंवा पितळेचे भांडे उलटे ठेवले जाते. भांड्याच्या आत आंब्याची पाने ठेवलेली असतात. नंतर गुढीला हार घालून हळद कुंकू चंदन लावले जाते. गुढी घराच्या मुख्य दरवाजात उजव्या बाजूला ठेवली जाते जेणेकरून ती सगळ्यांना दिसू शकेल. त्यानंतर कुटुंबातील सगळे सदस्य गुढीची पूजा करतात आणि नवीन वर्ष त्यांच्या घरात आरोग्य, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो अशी प्रार्थना करतात. घरातील स्त्रिया गुढीसमोर रांगोळी काढतात. गुढी हा विजयाच्या ध्वजाचे सूचक आहे आणि असा विश्वास ठेवला जातो की त्यामुळे वाईट गोष्टी दूर होतात आणि घरातील सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या जातात.
सणासाठीचे पदार्थ
गुढीपाडव्याच्या दिवशी साधारणतः कडुलिंबाच्या पानांपासून तयार केलेली खास चटणी तयार केली जाते त्यामध्ये कच्ची कैरी किंवा चिंच तसेच गूळ घातला जातो. ह्या मिश्रणामुळे रक्त शुद्ध होते तसेच प्रतिकारशक्ती मजबूत होते असा विश्वास आहे. स्पेशल महाराष्ट्रीयन पदार्थ अर्थात पुरणपोळी ह्या सणाच्या निमित्ताने केली जाते. तसेच काही लोक श्रीखंड पुरीचा बेत करतात. त्यासोबतच कैरीची पन्हे हे पेय असते.
उत्सव साजरा करण्याबरोबरच, गुढीपाडव्याला एक शुभ दिवसही मानतात. ह्या दिवशी लोक एखादे दुकान किंवा कार्यालयाचे उद्घाटन करणे, पूजा करणे किंवा गृहप्रवेश करणे यासारख्या नवीन उपक्रमाची सुरूवात करतात. एकंदरीत, संपूर्ण कुटुंब त्यांचे शेजारी, नातेवाईक आणि मित्रांसह ह्या सणाचा तसेच स्वादिष्ट पदार्थांचा आनंद लुटतात.