In this Article
- ३३ व्या आठवड्यात बाळांची वाढ
- ३३ व्या आठवड्यात बाळांचा आकार
- सामान्य शारीरिक बदल
- जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यातील लक्षणे
- जुळ्या बाळांसह गरोदरपण – ३३ वा आठवडा – पोटाचा आकार
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३३ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
- काय खावे?
- गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
- आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात पोहोचला आहात. तुम्ही उत्साहित (आणि चिंताग्रस्त) असणे अगदी साहजिक आहे! अजून काही आठवडे बाकी आहेत आणि तुमच्या हातांमध्ये तुमची पिल्ले असतील. नवीन आई म्हणून तुम्हाला तुमच्या बाळांच्या वाढीबद्दल देखील उत्सुकता असेल. गरोदरपणाच्या प्रत्येक आठवड्यात, तुमची बाळे वाढतील आणि तुम्हाला ती कशी विकसित होत आहे हे जाणून घ्यावे लागेल. या लेखात, आम्ही गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्याविषयी चर्चा करणार आहोत आणि जुळ्या बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रीला तिच्या बाळांच्या वाढीबद्दल कुठल्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत ह्या बद्दलची सुद्धा सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.
३३ व्या आठवड्यात बाळांची वाढ
३३ व्या आठवड्यात, तुमच्या गर्भाशयात तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या वाढीचा दर कमी होईल, परंतु बाळे विकसित होत राहतील.
जगण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात येते कारण बाहेरच्या जगात जिवंत राहण्यासाठी बाळांच्या शरीराला सर्व आवश्यक क्रियांची तालीम दिली जाते. गर्भजलाचा श्वास घेण्यापासून ते गिळणे तसेच अंगठा चोखणे इत्यादी कृतींमुळेच तुम्हाला तसेच डॉक्टरंसुद्धा बाळे गर्भाशयाच्या बाहेर जिवंत राहण्यास तयार होत आहेत हे लक्षात येते.
हाडांचे ओसीफिकेशन आणि कडक होणे आतापर्यंत अंतिम टप्प्यात पोहोचते किंवा पूर्ण होते. बाळाची हाडे टणक होतील. कवटी मऊ असते कारण प्रसूतीचा मार्ग जन्म कालव्यातून असतो.
वाढीच्या दरासोबत तुमच्या लहान बाळांचे विविध क्रियाकलाप सुद्धा कमी होताना दिसतील. या लहान बाळांना हालचाल करण्यासाठी आधीसारखी फारशी जागा नसल्यामुळे असे होते. परंतु तरीसुद्धा तुम्हाला बाळाचे पाय मारणे पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे जाणवेल. जर तुम्हाला बाळे पोटात शांत असल्यासारखी वाटली तर तुम्ही थंड पाणी किंवा एखादा कप कोमट दूध पिऊन किंवा त्यांना आवडणारे एखादे गाणे म्हणून त्यांना जागे करू शकता. जर हे सर्व प्रयत्न करून सुद्धा बाळाची हालचाल जाणवली नाही तर तुम्ही ते त्वरित डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले पाहिजे.
३३ व्या आठवड्यात बाळांचा आकार
गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात तुमची लहान बाळे आता अननसाइतकी मोठी असतील. त्यांची उंची सुमारे ४१–४३ सेंटीमीटर असेल आणि त्यांचे वजन सुमारे १.६ ते १.८ किलोग्रॅम इतके असे. या आठवड्यापर्यंत, तुमच्या बाळांचे वजन वाढलेले असेल आणि त्यामुळे त्यांची उपस्थिती जाणवेल.
सामान्य शारीरिक बदल
जसजशी तुमची लहान बाळे वाढतात तसतसे तुमच्या गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात तुमचे शरीर काही बदल घडवून आणते.
- गरोदरपणातील शेवटच्या टप्प्यात सतत होणारा बदल म्हणजे सूज. या आठवड्यापर्यंत शरीराचा कोणताही भाग सूज यायचा राहिला नसेल. शरीरात सूज येण्यासाठी पाणी धरून ठेवणे आणि रक्ताभिसरण हे मुख्य घटक कारणीभूत आहेत आणि सूज येण्याचा आणखी एक परिणाम म्हणजे शरीराचा तो भाग सुन्न होतो. कधीकधी स्त्रियांना ह्या बधिरपणामुळे त्यांच्या हातापायांवर योग्यरित्या नियंत्रण ठेवणे कठीण जाते. खुर्चीवर बरेच तास बसून राहिल्यावर तुमच्या पायातील संवेदना नष्ट झाल्यासारखे तुम्हाला जाणवेल. सूज आतल्या मज्जातंतूंवर एक अयोग्य दबाव आणते ज्याचा परिणाम म्हणून तो विशिष्ट भाग बधिर होतो. बैठी जीवनशैली जगणाऱ्या स्त्रियांना बर्याचदा ह्या समस्येचा सामना करावा लागतो, परंतु, वारंवार पावित्रा बदलूनही समस्या सोडवली जाऊ शकते. तथापि, पावित्रा बदलल्यानंतर संवेदना कमी झाल्यास तातडीने सुधारणा होत नसेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा.
- जुळ्या किंवा तिळ्या बाळांसह गर्भवती राहिल्यास तुमचे पोट नक्कीच मोठे होईल. आणि आपल्या गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यापर्यंत, आपल्याला फिरण्यास त्रास होऊ शकेल. तुमचा वाढलेला पोटाचा आकार आणि शरीराची बदलती संरचना ह्यामुळे तुम्हाला हालचाल करताना शरीराचा पावित्रा बदलावा लागेल.
- सूज येऊन मज्जातंतूंवर दाब पडल्यामुळे उद्भवणाऱ्या बधिरपणाव्यतिरिक्त आणखीही एक विशिष्ट वेदना देखील ह्याच कारणामुळे जाणवते. तुमच्या कंबरेकडील भागात एक महत्वपूर्ण मज्जातंतू असतो जो कुल्ल्यांकडील भागापासून मांड्यांपासून घोट्यांकडे जातो. त्यास सायटिका मज्जातंतू म्हणून संबोधले जाते. त्यामुळे गरोदर स्त्रियांमध्ये सायटिका वेदना जास्त प्रमाणात आढळून येतात. मज्जातंतूचे कोणतेही संकुचन किंवा आकुंचन ह्यामुळे तुमच्या पायांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. हे शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणत्याही प्रकारचे क्रियाकलाप थांबविणे आणि शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त विश्रांती घेणे आणि जर ते असह्य होत असेल तर न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक असते.
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यातील लक्षणे
गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात तुमच्या शरीरावर भरपूर भार येईल. जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या वाढलेल्या वजनामुळे ह्या आठवड्यात लक्षणे अधिक तीव्र होतील.
- विश्रांती घेणे आणि कठोर क्रियाकलापांमध्ये भाग न घेणे हीच काळजी बहुतेक गर्भवती महिला गरोदरपणाच्या अंतिम तिमाहीत घेतात. असे असूनही, तुम्हाला स्वतःला घाम येत असल्याची किंवा गरम वाफा येत असल्याचे जाणवेल. तुम्हाला ताप आला आहे किंवा इतर काही आजार झाला आहे असे तुम्हाला वाटेल परंतु तसे सहसा होत नाही. अशा प्रकारची लक्षणे उद्भवण्याची कारणे म्हणजे गरोदरपणाच्या ह्या आठवड्यात तुमची वाढलेली चयापचय क्रिया होय. सर्व चयापचय प्रक्रिया एक्झोथर्मिक असल्याने, आतून बाहेर पडणारी सर्व उष्णता शरीराबाहेर पडते आणि त्यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होते आणि आपल्याला कायमच गरम वाटत राहते. म्हणूनच, आपण योग्य कपड्यांची निवड करावी.
- जरी गरोदरपणामुळे तुम्ही सतत काही गोष्टी विसरत असलात तरी सुद्धा काहीवेळा ती तुमच्यासाठी डोकेदुखी सुद्धा ठरू शकते. हॉर्मोन्सच्या पातळीत होणारा बदल हे त्यामागील कारण आहे तसेच दीर्घकाळ होणारे डिहायड्रेशन सुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकते. तसेच तुमच्या डोक्यात प्रसूतिविषयी आणि सुरक्षिततेविषयी सतत येणारे विचार आणि चिंता ह्यामुळे ताण वाढतो. तुम्ही विश्रांती घेतली नाहीत तर ही समस्या आणखी वाढू शकते.
- बहुतेक बाळे गर्भाशयात खाली सरकतात आणि त्यांची स्थिती बदलू शकतात. परंतु जर तुमच्या बाळांनी अद्याप तसे केलेले नसेल तर तुम्हाला छोटी कामे केल्यानंतर सुद्धा दम लागू शकतो. काही वेळा त्यामुळे चक्कर सुद्धा येऊ शकते. तुम्हाला थकल्यासारखे वाटून व्यायाम करणे देखील कठीण होऊ शकते. म्हणूनच गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात वारंवार विश्रांती घेणे आवश्यक आहे.
जुळ्या बाळांसह गरोदरपण – ३३ वा आठवडा – पोटाचा आकार
या आठवड्यापर्यंत, जुळ्या किंवा तिळ्या बाळांसह गरोदर राहणे सोपे नाही. प्रसूतीच्या चिन्हांवर आता तुमचे लक्ष केंद्रित होईल. कोणत्या बदलांसाठी तुम्ही तुमच्या पोटाचे निरीक्षण कराल. आतापर्यंत तुमच्या पोटाचा आकार मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल, तुम्हाला सराव कळा येण्यास सुरुवात झालेली असेल त्यामुळे तुम्ही अधिक सावधगिरी बाळगाल आणि आता प्रसूती केव्हाही होऊ शकेल हे तुमच्या लक्षात येईल.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३३ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
मागील आठवड्यात घेतलेला अल्ट्रासाऊंड एक गहन असेल जो या नंतरच्या आठवड्यातच पुन्हा केला जाईल. या आठवड्यात जर तुम्ही अल्ट्रासाऊंड केला तर बाळे डोळे उघडे ठेऊन जागी असल्याचे तुम्हाला दिसेल. श्वासोच्छवास आणि अंगठा चोखणे ह्यामध्ये सुद्धा बाळे समन्वय साधू शकत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. एकसारखे जुळे असल्यास किंवा इतर गुंतागुंत तपासण्यासाठी तुमचे डॉक्टर पुन्हा स्कॅन करून बघू शकतील.
काय खावे?
या आठवड्यात तुम्हाला कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थाची तीव्र इच्छा होऊ शकते कारण तुमची बाळे पूर्ण क्षमतेने मजबूत होऊ लागतात . मनुका आणि इतर फळांसारखे तंतुमय पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत. आपण मसालेदार पदार्थ खाणे टाळावे आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी, छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुरळीत सुरु राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
गरोदरपणाच्या ह्या आठवड्यात काळजी घेण्यासाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत.
हे करा
- रुग्णालयात प्रसूतीसाठी जाताना तुमच्यासाठी आणि बाळासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू घालून तुमची प्रसूतीची बॅग तयार ठेवा.
- या आठवड्यात आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवू शकता कारण हा शेवटचा आठवडा असेल जो त्यासाठी सुरक्षित आणि अनुकूल असेल.
काय टाळावे?
- पाठीवर झोपणे टाळा कारण यामुळे आपल्या हृदयावर दबाव येऊ शकतो.
- तुमच्या डॉक्टरांना बाळाच्या जन्मासाठी सर्वात सुरक्षित मार्ग सीझेरियन आहे असं तिला वाटत असल्यास डॉक्टरांना एपिसिओटॉमी करण्यास भाग पाडू नका.
आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
आपल्या गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यात खालील गोष्टींची आवश्यकता असेल:
- मुलांसाठी कपडे आणि बेडिंग.
- लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी खेळणी.
तुम्ही जुळ्या बाळांसह ३३ आठवड्यांच्या गर्भवती आहात. तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे आणि ते आम्हाला समजते. परंतु तुम्ही सकारात्मक राहून जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची निरोगी प्रसूती होईल!