In this Article
आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि शरीर सजलीत रहावे म्हणून सारखे पाणी प्यावे परंतु हाच नियम छोट्या बाळांना लागू होत नाही. त्यामुळे आपल्याला महत्वाचे प्रश्न पडतात जसे की नवजात बाळ वयाच्या कोणत्या महिन्यापासून पाणी पिण्यास सुरुवात करू शकते? बाळाला पाणी कमी पडत असल्याची लक्षणे कोणती? तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचे १ महिन्यांचे बाळ पाणी पिऊ शकते का! चला तर मग बाळाला पाणी कसे द्यावे ह्या बाबत अचूक तपशीलवार माहिती घेऊयात.
बाळ पाणी पिण्यास केव्हा सुरुवात करू शकते?
बऱ्याच नवीन पालकांना प्रश्न पडतो की बाळाच्या आहारात पाण्याचा समावेश केव्हा करावा? मोठ्या माणसांसाठी जसे विशिष्ट प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे असा नियम असतो तसे लहान बाळांच्या बाबतीत नसते. पाण्याची ही गरज वयपरत्वे बदलते, बाळाचे शरीर पाणी घेण्यास तयार होण्याआधीच खूप जास्त प्रमाणात पाणी दिल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
जन्मापासून ४ महिन्यांपर्यंत
ज्या बाळांना स्तनपान दिले जाते अशा बाळांना पाण्याची गरज नसते कारण स्तनपानामध्ये बाळाच्या पोषणाच्या आणि पाण्याच्या सगळ्या गरजा भागतात. बाळाला सजलीत राहण्यासाठी आवश्यक प्रमाणात पाणी स्तनपानातून मिळत असते. थोडक्यात तुम्ही बाळाला लागेल तसे स्तनपान देत असाल तर तुम्हाला बाळाला जास्तीचे पाणी देण्याची गरज भासत नाही.
फॉर्मुला घेत असणाऱ्या बाळाला सुद्धा जास्त पाण्याची गरज नसते. लहान मुलांच्या फॉर्मुला पॅकवर सुद्धा किती पाणी घालावे ह्याबाबत बऱ्याच सूचना असतात. जेव्हा तुम्ही ह्या सूचनांचे पालन करता आणि बाळाच्या वयानुसार योग्य प्रमाणात पाणी फॉर्मुला मध्ये घालता तेव्हा बाळ सजलीत राहते.
५–८ महिने
ह्या महिन्यांमध्ये तुमच्या बाळाने पाणी प्यायले पाहिजे का? ह्याचे उत्तर असे आहे की, असा काहीही नियम नाही. तुमच्या बाळाने स्तनपान किंवा फॉर्मुला दुधाव्यतिरिक्त दुसरे काहीही घेतले नाही तरी चालते. बाळाच्या आयुष्याचे सुरुवातीचे काही महिने पाणी देऊ नये. स्तनपानाव्यतिरिक्त इतर पदार्थ बाळाने घेण्यास सुरुवात केल्यावर बाळाला थोडे थोडे पाणी देण्यास सुरवात करावी.
९–१२ महिने
बाळ एक वर्षांचे झाल्यावर, तुम्ही स्तनपान सुरु ठेवू शकता. बाळाला पाणी किंवा ज्यूस जेवणाच्या वेळेला देऊ शकता. तथापि, कृत्रिम गोड पदार्थ घातलेले द्रवपदार्थ बाळाला देणे टाळा. तुम्ही नुकतेच आई झालेल्या असल्याने बाळाला किती पाण्याची गरज आहे हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. बाळाला तहान लागली आहे हे सांगण्यासाठी बाळ अजून खूप लहान आहे आणि तुम्हाला बाळ सजलीत राहते आहे ना अशी काळजी वाटू शकते आणि बाळाला स्तनपानासोबत पाणी द्यावे का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. बाळे सामान्यतः वेगवेगळ्या आवाजातून किंवा हावभावातून संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे पाण्याच्या कप कडे बोट दाखवून किंवा चेहऱ्यावरच्या हावभावरून पाणी हवे आहे असे बाळ सांगू शकते. बाळाला भरवताना बाळाने खाण्यास नकार दिला किंवा मोठा घास घेतला तर त्यांना पाणी हवे आहे असे निर्देशित होते. जेव्हा बाळाला पाणी दिले जाते तेव्हा त्यांना हवे तेवढे पाणी ते पितात. जर पाण्याचा कप काढून घेतला तर बाळ रडू शकते किंवा पाण्याचा कप घेण्यास पुढे झुकते, त्याचा अर्थ त्यांना आणखी पाणी हवे आहे असा होतो. पाणी कमी पडले तर बाळाला पोटात दुखू शकते आणि शौचास होत नाही त्यामुळे बाळ हळू आवाजात रडत राहते
लहान बाळांना पाण्याची ओळख कशी करून द्यावी?
बाळाला घनपदार्थांची सुरुवात केल्यानंतरच पाणी देण्यास सुरुवात करावी. बाळ एक वर्षाचे होईपर्यंत पाण्याचे पचन करण्याइतपत त्यांची मूत्रपिंडे तितकीशी परिपकव झालेली नसतात आणि त्यामुळे बाळाची पाण्याची गरज खूप कमी असते. तथापि, बाळाला पाण्याचा एखादा घोट देऊन पाण्याची ओळख करून देण्यास हरकत नाही. तुम्ही बाळाची बाटली किंवा कप पाण्याने भरू शकता आणि त्यामधून बाळाला तहान लागल्यावर काही घोट देऊ शकता. बाळ मोठे झाल्याशिवाय नॉर्मल कप मधून पाणी देण्यास सुरुवात करू नका.
बाळांना किती पाणी द्यावे?
६ महिन्यांच्या बाळाला किती पाणी द्यावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते बाळाच्या जेवणाच्या सवयींवर अवलंबून असते. जर बाळ अजूनही स्तनपान घेत असेल तर बाळाला सजलीत करण्यासाठी पाण्याचे काही घोट पुरेसे आहेत. बाळाला स्तनपानातून आणि फॉर्मुला दुधातून पुरेसे पाणी मिळत असते त्यामुळे बाळाला पाणी कमी पडणे हे खूप दुर्मिळ आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. जी बाळे ४ महिन्यांपेक्षा कमी वयाची आहेत त्यांना वेगळे पाणी देण्याची गरज नसते. स्तनपानातून त्यांना पुरेसे पाणी मिळत असते.
वॉटर इंटॉक्सिकेशन
मोठ्या लोकांनी खूप पाणी प्यायले तरी काही नुकसान होत नाही परंतु लहान बाळांसाठी मात्र ते खूप हानिकारक असते. तुमच्या ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला खूप पाणी दिल्यास त्यांची स्तनपान आणि फॉर्मुला दुधातून पोषक मूल्ये शोषून घेण्याच्यानैसर्गिक क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो. खूप पाणी प्यायल्याने बाळाच्या शरीरातील सोडिअमची पातळी कमी होते. बाळाची मूत्रपिंडे अजूनही सक्षम नसतात आणि त्यामुळे हानिकारक स्थिती निर्माण होते त्यास वॉटर इंटॉक्सिकेशन असे म्हणतात. जर पाणी प्यायल्यानंतर तुमच्या बाळामध्ये त्याविषयी काही लक्षणे आढळली जसे की – अंधुक दिसणे, अस्वस्थता, थकवा तर ताबडतोब वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. खूप जास्त पाणी घेल्यामुळे बाळांना फिट येऊ शकते. ह्याच कारणामुळे छोट्या बाळांना पोहण्याचे धडे देऊ नयेत. पोहताना बाळे पाणी गिळू शकतात आणि त्यामुळे वॉटर इंटॉक्सिकेशन होऊ शकते आणि तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते.
बाळाने काही वेळेला पाणी पिणे गरजेचे आहे का?
जरी नवजात बाळाला पाणी पिण्याची गरज नसली तर जसजसे बाळ मोठे होते तसे बाळाला पाण्याची गरज भासते. जेव्हा तुमचे बाळ मोठे होते तुम्ही बाळाला पाणी देणे सुरक्षित आहे. ४–६ महिन्याची बाळे ३० मिली पाणी पिऊ शकतात. परंतु त्यापेक्षा जास्त पाणी बाळाला देऊ नये. बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर बाळाची पचनसंस्था परिपकव होते आणि जास्त पाणी सहन करू शकते. तथापि, बाळ एक वर्षांचे झाल्यावर बाळाच्या पाणी पिण्यावर लक्ष ठेवले पाहिजे.
बाळाला पाणी देण्याविषयी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न
बाळाला पाणी देण्याविषयीच्या शंकांचे निरसन करूयात
१. ६ महिने किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या बाळाला पाणी देणे सुरक्षित आहे का?
४–६ महिने वयाच्या बाळाला तुम्ही पाण्याचे काही घोट देऊ शकता परंतु दिवसाला ३०–६० मिली पेक्षा जास्त पाणी बाळाला देऊ नये.
२. तुम्ही फॉर्मुला मध्ये पाणी घालून तो पातळ करू शकता का?
तुम्ही तयार फॉर्मुला दूध वापरत असाल तर त्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही. तथापि, जर तुम्ही पावडर स्वरूपातील फॉर्मुला वापरत इसाक तर तुम्हाला त्यामध्ये पाणी घालण्याची गरज आहे. परंतु जितके सांगितले आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका कारण त्यामुळे फिट्सचा त्रास होऊ शकतो
३. बाळ पाणी पिण्यास केव्हा सुरुवात करू शकते?
बऱ्याच पालकांना असा प्रश्न पडतो की बाळाला कोणत्या वयात पाणी देण्यास सुरुवात करावी. आधी सांगितल्याप्रमाणे जी बाळे स्तनपान घेतात त्यांना जास्त पाण्याची गरज भासत नाही. किंबहुना बाळ ४–६ महिन्यांचे झाल्यावरच बाळाच्या आहारात पाण्याचा समावेश करावा असे सांगितले जाते.
४. जर बाळाला पाणी कमी पडले तर काय?
बाळाला लागेल तसे स्तनपान दिल्यास बाळाला पाणी कमी पडण्याची शक्यता खूप कमी असते. बाळाची पाण्याची गरज स्तनपानातून पूर्ण होते. फॉर्मुला घेणाऱ्या बाळांना सुद्धा पुरेसे पाणी मिळते.
५. स्तनपान घेणाऱ्या बाळाला पाणी देऊ शकतो का?
स्तनपान घेणाऱ्या बाळाला पाणी देऊ नये बाळाची पाण्याची गरज स्तनपानातून पूर्ण होते.
६. बाळाला खूप पाणी दिल्यास फिट्सचा त्रास होऊ शकतो का?
हो, बाळाला जास्त प्रमाणात पाणी दिल्यास लहान बाळांमध्ये ‘वॉटर इंटॉक्सिकेशन‘ ची स्थिती निर्माण होते. ही खूप भयानक स्थिती असून त्यामुळे बाळाला फिट्सचा त्रास होऊ शकतो. त्याचा बाळाच्या शरीरावर खूप परिणाम होतो कारण खूप पाण्यामुळे सोडियमचे पातळी कमी होते.
सजीव प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. प्रौढांना दररोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो आणि चांगल्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिण्यास सांगितले जाते. परंतु बाळांच्या बाबतीत तसे नसते. बाळ निरोगी राहण्यासाठी तुम्ही बाळाला पाणी देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
आणखी वाचा: बाळाची ढेकर कशी काढावी?