Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) वर्तणूक आणि शिस्त तुम्ही तुमच्या मुलांना शिकवली पाहिजेत अशी १५ नैतिक मूल्ये

तुम्ही तुमच्या मुलांना शिकवली पाहिजेत अशी १५ नैतिक मूल्ये

तुम्ही तुमच्या मुलांना शिकवली पाहिजेत अशी १५ नैतिक मूल्ये

पालकत्व म्हणजे केवळ मुलांना शारीरिक दृष्ट्या वाढवणे नव्हे तर त्यांना मानसिक दृष्ट्या सुद्धा घडवणे होय. पालक त्यांच्या मुलांचे चारित्र्य घडवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावतात. मूल मोठे झाल्यावर  कसे बनते ह्यामध्ये पालकांचा सर्वात जास्त वाटा असतो.

मुलांनी लहानपणापासून नैतिक मूल्ये समजून घेणे आवश्यक आहे. नैतिक मूल्ये ही मूलभूत तत्त्वे आहेत. आणि नियम म्हणून कार्य करतात. हे नियम एखाद्या व्यक्तीला चांगले आणि वाईट ह्यातील फरक करण्यास मदत करतात. दैनंदिन जीवनात निर्णय घेण्यासाठी ही तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे

व्हिडिओ: नैतिक मूल्ये जी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवली पाहिजेत

मुले स्वतःच नैतिकता शिकतात असे काहींचे म्हणणे आहे. प्राथमिक शाळेतील मुलांसाठी नैतिक मूल्ये आणि कल्पना शिकणे खूप लवकर होते आहे असे त्यांना वाटते. मात्र, ते खोटे आहे. लहान वयातच मुलांना मूल्ये शिकवणे चांगले आहे, जेणेकरून ही नैतिक मूल्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतील

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शिकवली पाहिजेत अशी नैतिक मूल्ये पाहूयात.

नैतिक मूल्ये म्हणजे काय?

नैतिक मूल्य म्हणजे एक धडा किंवा तत्त्व आहे. ते एखाद्याचे वर्तन, निवड आणि कृती निर्देशित करते. चुकांमधून चांगले शिकणे,शौर्य आणि प्रामाणिकपणा ह्यासारखे गुण म्हणजेच नैतिक गुण होय.

मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचे महत्त्व

मुलांमध्ये नैतिक आदर्श निर्माण करण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत

  1. नम्रता, आदर, करुणा आणि दयाळूपणा यासह सकारात्मक चारित्र्य इत्यादी वैशिष्ट्ये विकसित करण्यात नैतिक मूल्ये मदत करतात.
  2. नैतिक मूल्ये तरुणांना चांगले आणि वाईट किंवा बरोबर आणि चूक यातील फरक ओळखण्यास शिकवतात. नैतिक मूल्ये निष्पक्ष निर्णय आणि विवेकपूर्ण विचारांना प्रोत्साहन देतात.
  3. नैतिक मूल्ये लोकांना एक दृष्टिकोन देतात आणि जीवनाच्या असंख्य पैलूंवर प्रभाव पडतात.
  4. नैतिक मूल्यांमुळे लोकांचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रतिकूल परिस्थितीतही ते उत्साही राहण्यास सक्षम होतात.
  5. नैतिक मूल्ये मुलांना त्यांची उर्जा योग्य दिशेने केंद्रित करण्यास सक्षम करतात.
  6. पौगंडावस्थेतील मुले किशोरवयीन किंवा प्रौढांमध्ये विकसित होत असताना, वर्गमित्र, सोशल मीडिया किंवा समाजाच्या हानिकारक प्रभावापासून दूर राहण्यासाठी,नैतिक मूल्ये होकायंत्र म्हणून काम करतात.

तुमच्या मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचे मार्ग

1. तुम्ही जे उपदेश करता त्याचा सराव करा

मुले त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून शिकतात. म्हणून तुमच्या मुलांना चांगले शिकवण्यासाठी, तुम्ही तुमच्या जीवनात आदर्श बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही तोंडाने त्यांना अनेक मूल्ये समजावून सांगू शकता, परंतु जे तुम्ही तुमच्या वर्तनातून शिकवाल तेच तुमचे मूल शिकेल.

2. वैयक्तिक अनुभव सांगा

वैयक्तिक अनुभव हे कथांसारखे असतात आणि सर्व मुलांना कथा ऐकायला आवडतात. नैतिक मूल्यांचे पालन केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक अनुभव कसा  आला, अश्या तुमच्या स्वतःच्या जीवनातील कथा मुलांसोबत शेअर करा. अश्या कथा तुमचे मूल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेईल.

3. चांगल्या वागणुकीला बक्षीस द्या

तुमच्या मुलाला चांगल्या वागणुकीबद्दल तुम्ही बक्षीस द्याल. स्तुती आणि बक्षिसे हे सकारात्मक घटक  मुलांना आकार देण्यासाठी आश्चर्यकारकपणे चांगले कार्य करतात.

4. प्रभावीपणे संवाद साधा

ही नैतिक मूल्ये दैनंदिन जीवनात कशी कार्य करतात याबद्दल प्रत्येक दिवशी आपल्या मुलाशी संवाद साधा. उदाहरणार्थ, तुम्ही वर्तमानपत्रातील लेखावर चर्चा करू शकता आणि तुमच्या मुलाने त्याच परिस्थितीत काय केले असते असेही तुमच्या मुलाला तुम्ही विचारू शकता.

5. दूरदर्शन आणि इंटरनेटचा वापर

टेलिव्हिजन आणि इंटरनेटपासून सुटका नाही, परंतु तुमचे मूल काय पाहते त्यावर निश्चितपणे तुम्ही लक्ष ठेवू शकता. चांगल्या मूल्यांना आणि नैतिकतेला प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या वयाला योग्य असे टी. व्ही. वरील कार्यक्रम त्यांना पाहूद्यात.

मुलांना उत्तम जीवन जगण्यासाठी 15 नैतिक मूल्ये

1. आदर

अनेक पालक आपल्या मुलांना फक्त मोठ्यांचा आदर करण्याबद्दल शिकवतात. पण ते चुकीचे आहे. वयाची किंवा सामाजिक स्थितीची पर्वा न करता प्रत्येकजण आदरास पात्र आहे. आदर हे एक अत्यावश्यक नैतिक मूल्य आहे. आपल्या मुलास लहान वयातच त्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कारण हे नैतिक मूल्य लहान मुलांना माहिती असल्यास, अनोळखी व्यक्ती आणि वडीलधारी व्यक्तींसोबत आदरपूर्वक वागण्यासाठी त्याची मदत होते. लहानपणापासूनच आपल्या वयाच्या व्यक्तींचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिकणाऱ्या चिमुकल्यांना भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल. भविष्यात कठीण काळ आला तरीही, तुमचे मूल इतरांसोबत चांगले वागेल.

2. कुटुंब

कुटुंब हा मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कुटुंब लहान मुलांना आकार देते आणि प्रौढ बनवते. म्हणून, आपल्या मुलांना कुटुंबाची जाणीव करून देणे आणि कुटुंब महत्त्वाचे का आहे हे समजण्यास मदत करणे आवश्यक आहे. मुलांना कुटुंबातील सदस्यांचा आदर राखण्यास शिकवल्यास ते चांगल्या वाईट काळात त्यांच्या कुटुंबाचा आदर करतील.

3. समायोजन आणि तडजोड

प्रत्येक गोष्ट त्यांच्या म्हणण्यानुसार होत नाही हे मुलांना माहित असणे महत्वाचे आहे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांना प्रयत्न करून सर्वांशी जुळवून घ्यावे लागेल हे मुलांना शिकवा. तुम्ही तुमच्या मुलाला परिस्थितीशी जुळवून घ्यायला आणि तडजोड करायला शिकवले पाहिजे. समायोजन आणि तडजोड ह्यामध्ये एक पातळ सीमारेषा आहे. जर एखाद्या तडजोडीमुळे मुलाला अपयश आले तर ते केवळ हानिकारकच नाही तर त्यामुळे त्याच्या ओळखीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

4. इतरांना मदत करण्याची वृत्ती

जरी एखादी व्यक्ती संपूर्णपणे अनोळखी असली तरी सुद्धा तुमच्या मुलाला लहानपणापासूनच इतरांना मदत करायला शिकवले पाहिजे. इतरांना मदत करणे इतके महत्त्वाचे का आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा तुम्ही ती कशी परत मिळवता हे तुम्ही तुमच्या मुलाला शिकवले पाहिजे. समाजाचा कार्यशील भाग होण्यासाठी, तुमच्या मुलाने इतरांच्या गरजांबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे.

5. धर्माचा आदर करणे

आपल्या मुलाला वाढवताना त्याला स्वतःच्या धर्माचा आदर करायला शिकवले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म निवडण्याचा अधिकार आहे हे देखील  त्याला समजले पाहिजे. माणसांचा धर्म कुठलाही असला किंवा त्यांनी कोणतेही सण साजरे केले तरी सुद्धा सर्व माणसे समान आहेत हे तुमच्या मुलांना लहानपणापासूनच शिकवा.

धर्माचा आदर करणे

6. न्याय

नैतिकता आणि न्यायाची भावना ही दोन सर्वात महत्त्वाची मूल्ये आहेत. ही मूल्ये कोणत्याही मुलामध्ये लहानपणापासून असणे आवश्यक आहे. तुमच्या मुलांना किंवा इतरांना चुकीची वागणूक मिळत असल्यास मुलांना त्याविरुद्ध बोलण्यास शिकवणे गरजेचे आहे.

7. प्रामाणिकपणा

लहानपणापासूनच, प्रामाणिकपणा हे मुलांसाठी सर्वात महत्त्वाचे मूल्य आहे. प्रामाणिकपणा हे नेहमीच सर्वोत्कृष्ट धोरण असते आणि तुमच्या मुलाला त्यांनी कितीही चुका केल्या असतील तरीही सत्य सांगण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.

8. कधीही कोणालाही दुखवू नका

एखाद्याला दुखापत करणे ही केवळ शारीरिक समस्या नाही – कोणत्याही दुखापतीचा मानसिक आणि भावनिक परिणाम देखील होऊ शकतो हे तुमच्या मुलाला समजावून सांगा. तुमच्या मुलांना माफी कशी मागायची हे शिकवण्याचे लक्षात ठेवा आणि त्यांनी कधी एखाद्याला शारीरिक किंवा शाब्दिक दुखावले असल्यास त्यांना माफी मागायला प्रोत्साहित करा.

9. चोरी

चोरी करणे चुकीचे आहे, मग त्याचे कारण कुठलेही असो,  हे मुलांना सांगितले आणि शिकवले पाहिजे.  केवळ कायदेशीरच नव्हे तर नैतिकदृष्ट्या देखील चोरी करणे चुकीचे आहे हे त्याला समजून सांगा. चोरी करताना आपण दुसऱ्याच्या मालकीचे काहीतरी घेत असतो हे त्याला सांगा.

10. शिक्षणाबद्दल प्रेम वाढवा

शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे आणि तुमच्या जीवनावर शिक्षणाचा खूप परिणाम होत असतो आणि शिक्षणामुळे जीवनात तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता हे सुद्धा त्यावर अवलंबून असते. प्राथमिक शाळेपासूनच मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे. तुम्हीही तुमच्या मुलाला जीवनातील शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगा.

11. कौतुक आणि कृतज्ञता

कृतज्ञता म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींची प्रशंसा करणे आणि आभार व्यक्त करण्यास तयार असणे. समाधान ही पहिली पायरी आहे. तुमच्या मुलाला जीवनात जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास शिकवा जेणेकरून त्यांना समाधान आणि कृतज्ञता विकसित करण्यात मदत होईल. कोणालाही गृहीत धरू देऊ नका.

12. शेअरिंग

शेअरिंग हे दयाळूपणाचे लक्षण आहे. त्यामुळे गरजूंना देण्याचे महत्त्व तरुणांनी समजून घेतले पाहिजे. शेअरिंग निस्वार्थीपणे केले पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्याकडे असलेली संपत्ती आणि संसाधने शेअर करण्यातस प्रोत्सा‍हित करू शकता. त्यांना त्यांची काही खेळणी त्यांच्या चुलत भावंडांना देण्यास सांगा.  गरीब मुलांना काही पुस्तके, अन्न आणि कपडे दान करण्यासाठी प्रोत्साहित करा.

13. सहानुभूती

दुसऱ्या व्यक्तीच्या समस्या आणि चिंता समजून घेण्याची क्षमता सहानुभूती म्हणून ओळखली जाते. दुसऱ्याची परिस्थिती मुलांना समजून घेता आली पाहिजे. तुमच्या लहान मुलामध्ये सहानुभूतीचा नैतिक गुण रुजवण्यासाठी तुम्ही त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे. तुम्ही त्यांच्या अडचणी, आव्हाने आणि चिंता ऐकत असताना त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दोघांसाठी योग्य असे उपाय तयार करा.

14. सहकार्य

सहकार्य म्हणजे एक समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतरांना मदत करण्याची कृती. सहकार्याची भावना वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे घरातील सहकार्य. घरातील कामात एकमेकांना मदत करून आणि एकमेकांच्या अडचणी ऐकून कुटुंबाने सहकार्य केले पाहिजे. असे वातावरण घरात असल्यास मुलाला “मी” ऐवजी “आम्ही” असा विचार करण्यास प्रोत्साहित करते.

15. स्वीकृती

दुसऱ्या व्यक्तीचा वेगळा दृष्टिकोन मान्य करण्याची क्षमता म्हणजे स्वीकृती. ह्यामुळे तुमच्या मुलाला गोष्टी अधिक व्यापकपणे पाहण्यास मदत होईल आणि त्यांना परिस्थिती वेगळ्या पद्धतीने जाणून घेता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचा आणि त्यांच्या भावंडाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असल्यास, त्यांना शांतपणे आणि निष्पक्षपणे एकमेकांचे दृष्टिकोन ऐकण्यास सांगा. मुलांना इतरांच्या मतांचा आदर करायला आणि उत्तर शोधण्यासाठी संवाद साधण्यास सांगा.

नैतिक मूल्ये मुलांमध्ये सुरुवातीपासूनच रुजवली गेली पाहिजेत आणि सुरुवात करण्यासाठी कोणतेही वय नसते. नैतिक मूल्ये लहान मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यात खूप मोठी भूमिका बजावतात. तुमच्या मुलाचे आयुष्य घडवण्यात ही नैतिक मूल्ये महत्वाची भूमिका बजावतात.

आणखी वाचा:

हट्टी मुलांना हाताळण्याचे प्रभावी मार्ग
मुलांना योग्य प्रकारे ‘ नाही ‘ कसे म्हणावे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article