Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे तुमच्या बाळासाठी श्री गणेशाची ७५ नावे

तुमच्या बाळासाठी श्री गणेशाची ७५ नावे

तुमच्या बाळासाठी श्री गणेशाची ७५ नावे

आपल्या देशात बाळाचे नाव ठेवताना देवाचे नाव निवडले जाते. संपूर्ण देशात गणपतीची पूजा केली जाते. त्याच्या अनेक कथा लहान मुलांना आवडतात आणि माहीतही असतात. गणेश चतुर्थी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. आपला गणपतीबाप्पा त्याच्या ज्ञान आणि बुद्धीसाठी प्रसिद्ध आहेच, तसेच तो उदार आणि प्रेमळ सुद्धा आहे आणि जगातील दुष्टांचा पूर्णपणे नाश करणारा आहे. आणि म्हणूनच पालकांना आपल्या लाडक्या बाप्पाचे नाव लाडक्या बाळासाठी ठेवायचे असते. तथापि, आपल्या लहान मुलासाठी देवा गणेशाचे नावाचे नाव निवडताना, आपल्यातील काही जण पारंपारिक मार्गाचे अनुकरण करतात आणि संस्कृत मूळ असलेले नाव निवडतात. तर इतर जण आधुनिक आणि अद्वितीय नाव पसंत करतात. तर, आपला बाळाच्या नावासाठीचा शोध संपलेला आहे. कारण आपल्याकडे नावांची यादी आहे जी आपल्याला नक्कीच आवडेल.

लहान मुलांसाठी गणपती बाप्पाची आधुनिक नावे

खाली काही गणपतीची नावे आहेत. परंतु ती आधुनिक असून आजच्या काळातील मुलांसाठी अगदी योग्य आहेत.

नाव अर्थ
आयोग गणेशासोबत घट्ट बंध असलेला
आमोद आनंददायी
अणव माणसाबद्दल प्रेम असलेला
अनीक वैभव, हे एक प्रसिद्ध बंगाली नाव आहे
अथर्व सर्व अडथळे पार करणारा
अवनेश धरतीचा अधिपती
अयान जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा परमेश्वर
धार्मिक दानधर्म करणारा
गजदन्त हत्तीचा दात
गौरीक श्री गणेशाचे नाव, पर्वतावर जन्म झालेला असा तो
इभान गजमुखी
कबिलान प्रसिद्ध संत ज्याने गणपतीची उपासना केली.
लावीन परमेश्वराचा सुगंध असलेला
परीन गणपतीचे नाव
प्रज्ञेश बुद्धीची देवता
प्रहर सुयोग्य सुरुवात
प्रथमेश गणपतीचे नाव, ज्या देवाची सर्वात आधी पूजा केली जाते
रिद्धेश सर्वांच्या हृदयात राहणारा परमेश्वर
रुद्रांश शिवदेवतेचा अंश
रुदवेद गणेशाची शक्ती
शिवांशु जीवनातल्या संकटांवर मात करणारा
श्रीजा सर्जनशील, सर्वांशी संवाद साधणारा
तनुष बुद्धिवान
विघ्नेश दुष्टांचा नाश करणारा, हे नाव दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे
विकट भव्य

मुलांसाठी श्री गणेशाची नावे

श्रीगणेशाची अनेक नावे आहेत आणि ती सगळी त्याच्या गुणांशी संबंधित आहेत. खाली काही एकमेवाद्वितीय नावे दिली आहेत.

नाव अर्थ
आदिदेव ज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा
आखूरथ मूषक वाहन असलेला
आलंपत अनंत
अंबिकेय पर्वतावर निवास करणारा ईश्वर
अमित अविनाशी
बालेश दुष्टांचा नाश करणारा
भालचंद्र शंकराचे आणि गणपतीचे नाव
भूपती सर्वांच्या आवडीचा देव
देवव्रत सर्वांची पूजा गोड मानून घेणारा देव
दूरजा ज्याचा कुणीही विनाश करू शकत नाही असा
इशानपुत्र शंकराचे नाव
कपिल गणेशासारखीच सोनेरी त्वचा असलेला
लंबकर्ण गणपतीसारखे सुंदर मोठे कान असलेला
महामती बुद्धीची देवता
मनोमय श्रीगणेशाचे प्रसिद्ध नाव. आपल्या भक्तांचे हृदय जिंकणारा
मुक्तीदया चिरंतन आनंदाचे भागीदार
ओजस गणेशासारखंच बुद्धीचे तेज असणारा
शार्दूल देवांचा महिपती
शुभम शुभ क्षण सोबत घेऊन येणारा
सिद्धेश श्री गणेशाचे नाव
तक्ष कबुतरासारखे सुंदर डोळे असणारा
उड्डाणद जगातील सर्वात वाईट वृत्तीचा शत्रू
वरद तेजस्वी
विश्वक विश्वाचा खजिनदार
युनय सर्वशक्तिशाली परमेश्वर

मुलांसाठी श्रीगणेशाची काही संस्कृत नावे

तुम्ही तुमच्या बाळासाठी काही पारंपरिक नावे शोधात असाल तर इथे काही नावे आहेत ज्याचे मूळ संस्कृत आहे.

नाव अर्थ
अजित ज्याच्या उपस्थितीमुळे वाईट गोष्टी दूर जातात
अर्हत सगळे ज्याचा आदर करतात असा तो
अवनीश सगळ्या जगावर राज्य करणारा
चतुर्भुज चार हात असलेला
गजानंद गजमुखी आनंदी
गणपती श्री गणेशाचे सर्वात प्रसिद्ध नाव
गणेशा शिव पार्वतीच्या मुलाचे नाव
हरिद्र सोनेरी त्वचा असलेला
हेरंब श्रीगणेशाचा आदर राखणारा
कवीश श्रीगणेशाचे दुसरे नाव
कीर्ती प्रसिद्ध, कीर्तिवान
क्षिप्रा ज्याला खुश करणे सोपे आहे असा
लम्बोदर मोठे पोट असलेला देव
महाबली गणेशासारखाच शक्तिशाली
महं ईशाधिपती
नंदन उत्सव आणि आनंदाची देवता
परीन श्रीगणेशाचे पारंपरिक नाव
पुरुष सर्वकाही करण्याची कुवत असलेला
रुद्रप्रियं शिवप्रिय असा तो श्रीगणेश
शंभू शंकराचे नाव
सुमुख आकर्षक चेहरा असलेला
स्वरूप सत्य आणि सुंदरतेची देवता
तरुण चिरतरुण असणारा
विनायक नेता
यशस्वसीन आनंद आणि यश घेऊन येणारा ईश्वर

 

ही सगळी श्रीगणेशाच्या नावांची यादी वाचताना तुम्हाला ह्या यादीतील काही नावे खूप आवडतील. श्री गणेशा मध्ये एका सुपुत्राचे सर्व गुण आहेत. तुमचा बाळ सुद्धा मोठा होऊन एक आदरयुक्त व्यक्ती होईल आणि त्याच्यामध्ये हे सगळे गुण आणि कौशल्य असतील. सध्या पुन्हा मुलांची नावे, देवतांची ठेवण्याचा कल आहे. गणपतीबाप्पाची अशी कितीतरी छान छान नावे आहेत, त्यामधील एक नाव निवडून ते आपण आपल्या बाळाचे ठेऊ शकता. वरील आधुनिक नावांच्या यादीमधून आपण आपल्या बाळासाठी नाव निवडू शकता जे आजच्या काळात योग्य ठरेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article