जुलाब किंवा अतिसाराद्वारे, विषारी द्रव्ये आणि जीवाणू पचन संस्थेच्या बाहेर फेकले जातात. बाळाला पातळ शी होते आणि दुर्गंधी येते. सतत होणाऱ्या शी मुळे, बाळाला त्रास होऊन ते अस्वस्थ होते आणि मग रडू सुद्धा शकते. ज्या अर्भकांना दात येत आहेत त्यांना सुध्दा जुलाब होऊ शकतात, परंतु जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग हेच अतिसाराचे प्रमुख कारण आहे.
अर्भकांमध्ये आणि मोठ्या मुलांमध्ये जुलाब होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, त्यामुळे उपचारपद्धती सुरु करण्याआधी कारण माहित असणे जरुरी ठरते.
१. दोन वर्षाखालील मुलांना बरेच वेळा रेट्रो व्हायरस ची लागण होते आणि त्यामुळे अतिसार होतो.
२. दूध,अंडी,शेंगदाणे यापैकी कशाचीही ऍलर्जी असेल तर जुलाब होऊ शकतात. त्यामुळे तुमचा मुलाला यापैकी कशाची ऍलर्जी आहे का हे शोधून काढणे जरुरीचे असते.
३. कुठलेही प्रतिजैविक पोटातील चांगल्या जीवाणूंचा नाश करते, त्यामुळेही जुलाब होऊ शकतात.
४. जर परिसर स्वच्छ नसेल आणि बाळ रांगत असेल, किंवा तोंडात खेळणी किंवा इतर गोष्टी घालत असेल,तर पोट बिघडू शकते.
बाळाच्या जुलाबावर सर्वोत्तम घरगुती उपाय
बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा मोठ्यांपेक्षा नाजूक असल्या कारणाने त्यांना जुलाब किंवा अतिसाराची लागण पटकन होते. लगेच औषधे देण्याआधी घरगुती उपाय करणे चांगले असते. सुदैवाने बाळाच्या जुलाबावर परिणामकारक नैसर्गिक उपाय आहेत. पण ४८ तासांपेक्षा जास्त परिस्थिती तशीच राहिली तर गंभीर परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरी आहे.
१.ओरल रिहायड्रेशन सोलुशन : (ORS)
२ महियांच्या बाळाला जुलाब होत असतील तर हा जुना घरगुती उपाय आहे. ORS तुम्ही औषधांच्या दुकानातून आणू शकता किंवा घरी तयार करू शकता.१ लिटर उकळलेले पाणी थंड करा, त्यामध्ये ६ टी स्पून साखर आणि १ टी स्पून मीठ घाला, ते विरघळेपर्यंत चांगले ढवळा. निर्जलीकरणा पासून आणि क्षार व द्रव्याच्या कमतरतेपासून बाळाला वाचवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने बाळाला ORS देत रहा. जर तुम्हाला ते घरी करणे शक्य नसेल तर जवळच्या औषधांच्या दुकानातून आणून ते बाळास पाजत रहा. भाताची पेज हा सुद्धा क्षार आणि द्रव्याचा ऱ्हास भरून काढण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे.
२.केळं
जुलाबामुळे बाळामध्ये पोटॅशिअम चा ऱ्हास होतो व तो भरून काढणे आवश्यक असते. केळ्यामधे पोटॅशिअम ,कॅल्शिअम, जस्त, लोह, व्हायटॅमिन अ आणि ब ६ असते. जुलाबामुळे जेव्हा शरीर गळून गेलेले असते तेव्हा केळं हा ऊर्जेचा एक चांगला स्रोत ठरतो, आणि सुदैवाने मुलांना केळ्याची चव आवडते. केळं वर्षभर उपलब्ध असते आणि सगळ्या घरांमध्ये असते.
३.आले
आले पचनसंस्थेला चांगले असते. आणि अतिसारावर उपाय म्हणून वापरले जाते.१ टी स्पून आले पावडर, थोडी दालचिनी पावडर, चिमूटभर जिरे पावडर आणि १ टी स्पून मध हे मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या बाळाला दिवसातून तीन वेळा द्या. बाळाला देण्याआधी थोडा जायफळ सुद्धा घालू शकता.
४.लाह्या
एका ग्लासमध्ये १५-२० मिनिटे लाह्या भिजत ठेवा. नंतर लाह्या काढून टाकून, दिवसातून दोन वेळा थोडे थोडे पाणी बाळास द्या. बाळाला जुलाबापासून लगेच आराम पडेल. भारतामध्ये मध्ये जुलाबावर हा फार परिणामकारक उपाय आहे, कारण भारतात लाह्या सहज उपलब्ध असतात.
५.सफरचंद
सफरचंदामध्ये भरपूर पेक्टिन असते. शी घट्ट होण्यास ते मदत करते. सफरचंद पाण्यात चांगले उकळा, त्याची प्युरी करा. त्यामुळे ते पचायला हलकं जाईल. ह्यामुळे जुलाब थांबून बाळाला तरतरीत वाटेल.
६.लाल मसूर
जेव्हा बाळाला जुलाब होतात, तेव्हा ते काहीही खाण्यास नकार देते. तथापि ऊर्जेची पातळी कायम राखण्यासाठी लाल मसुराची मदत होऊ शकते. पचायला हलके आणि पोषक असलेले ह्या अन्नामध्ये भरपूर ऊर्जा आणि प्रोटीन्स आहेत. एक कप भर डाळ घेऊन पाण्यामध्ये उकळा.काही वेळाने डाळ तळाशी राहील, वरचे पाणी काढून टाका, आणि ते बाळाला द्या. चवीसाठी चिमूटभर मीठ घाला.
७.ताक
घरी बनवलेले ताक जंतू आणि जीवाणूंचा सामना करण्यासाठी परिणामकारक ठरते. ताकामुळे पचनसंस्थेला लगेच आराम पडतो आणि चवीला ही चांगले असते. थोडं मीठ आणि मिरपूड घालून तुमच्या बाळाला द्या. ८ महिन्यांच्या पुढील बाळांना द्यावे.
८.नारळ पाणी
आरोग्यविषयक भरपूर उपयोग असलेले हे नारळपाणी, तुमच्या बाळाला जुलाबापासून बरे करण्यासाठी एक चांगले द्रव्य आहे. ते चवीला तर चांगले आहेच पण शरीरातील द्रव्यांचा ऱ्हास भरून काढण्यास पण मदत करते.
९.दही
घरी तयार केलेले दही बाळाच्या पचनसंस्थेतील चांगले जीवाणू पुनर्संचयित करण्यास मदत करते. जेव्हा बाळाला अतिसार होतो तेव्हा हे पचनसंस्थेला पूरक असे अन्न आहे. घरी केलेले ताक किंवा लस्सी (साखरविरहित)मध्ये सुद्धा प्रोबायोटिक असतात, त्यामुळे बाळाला ते निश्चितपणाने द्या.
१०. गाजराचा रस
जुलाबामुळे गमावलेली ऊर्जा परत मिळवण्याची बाळाला गरज असते. अशा वेळी गाजर हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे गाजराचा रस किंवा प्युरी दिवसातून दोन वेळा दिली जाऊ शकते. तुमचे मूल एक वर्षापेक्षा मोठे असेल तर गाजराचा रस चांगला.
११. पिष्टमय पदार्थ
जेव्हा तुम्ही तुमच्या बाळास घन आहाराची सुरुवात करता, तुम्ही बटाटा आणि भाताची निवड करू शकता. बटाट्यामध्ये असलेले भरपूर पिष्टमय पदार्थ बाळाला जुलाबातून बरे करण्यास मदत करतात. बटाटा उकडून घ्या, चांगला मऊ होईपर्यंत कुस्करा. त्यात थोडी मिठाची चिमूट घाला. बाळाला गॅस होऊ नये म्हणून भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला. हे बाळाला दिवसातून एकदा द्या.
१२. लिंबू
लिंबू साधारणपणे प्रत्येक घरात असतो आणि जुलाबावर हा चांगला उपाय आहे. एक चमचाभर लिंबाचा रस बाळाला दिवसातून ४-५ वेळा दिल्याने अतिसार आणि पोटाचे त्रास दूर होण्यास मदत होते. बाळाचे बिघडलेले पोट बरे होऊन शरीराचा pHपूर्ववत होण्यास मदत होते.
१३. पुदिना
पुदिन्याच्या पानांमध्ये खूप अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म आहेत आणि ते पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे लहान मुले आणि मोठ्या माणसांमध्ये जुलाबावर हा उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. पुदिन्याच्या एका जुडीतून एक टी स्पून रस निघतो त्यामध्ये मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. हे मिश्रण बाळाला देण्याआधी चांगले ढवळा. हा रस तुम्ही बाळाला दिवसातून २-३ वेळा देऊ शकता.दोन वर्षाखालील बाळांना हा रस देऊ नका.
१४. जायफळ
अर्भकांमध्ये सतत होणाऱ्या जुलाबावर जायफळ हा एक प्रभावशाली उपाय आहे. थोडंसं पाणी घालून चाटण करून तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता.
१५. आरारूट पावडर
आरारूट पावडर पिष्ट पदार्थांचा एक भाग आहे. मुलांमधील जुलाबाचा प्रश्न हाताळण्यासाठी चांगली पूरक आहे एलर्जी विरहीत असल्याने छोट्या बाळाच्या पोटास आराम पडण्यास मदत होते. आणि शरीराची जलपातळी पुनःस्थापित करण्याचे जादुई काम करते. आरारूट पावडर मध्ये पाणी किंवा दही घालून पातळ लापशी तयार करा व ती बाळास भरवा.
जर तुमचे बाळ जुलाबामुळे काहीही खाण्यास नकार देत असेल, तर जबरदस्ती न करणं हे उत्तम. खूप वेळानंतर, जेव्हा बाळाला खरंच भूक लागली असेल तेव्हा भरवा म्हणजे बाळ अन्न नाकारणार नाही.१ वर्षाखालील बाळांना घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांना दाखवणे जरुरी आहे. बाळाच्या आहारात द्रव्यपदार्थांची वाढ करू शकता. जर जुलाबासोबत इतर काही लक्षण आढळत असतील तर ताबडतोब बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.