बाळाने ६ महिन्यांचा टप्पा गाठला की ते घन पदार्थ खाण्यास तयार होते. पालक म्हणून तुम्हाला तुमच्या बाळाला अगदी रोज नाही, तरी प्रत्येक आठवड्याला नवीन पदार्थ भरवावेसे वाटतील. मऊ कुस्करलेला वरण भात आणि भाज्यांची प्युरी ही तुमची पहिली पसंती असेल. तुम्ही बाळाच्या आहारात काही फळांचा समावेश करण्याचा विचार करू शकाल. फळे पौष्टिक असतात आणि बाळाच्या आरोग्यासाठी […]
जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल, तर तुम्ही आतापर्यंत गरोदरपणाविषयीच्या किंवा पालकत्वासंबंधित काही मासिकांचे सदस्यत्व घेतलेले असेल. तसेच आतापर्यंत गर्भारपणाविषयीची सर्व माहिती गोळा करण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर केलेला असेल. आता तुम्ही या जगात एक नवीन जीवन आणण्याचा गंभीर विचार करत आहात आणि त्यासाठी तुम्ही शारीरिक दृष्ट्या तयार असणे गरजेचे आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही मूल […]
गरोदरपणात खाज सुटणे खूप वेदनादायी असू शकते. जसजसे शरीरात बदल होतात आणि आकारात वाढ होते तसे त्वचेवरील ताण वाढतो आणि वजन वाढल्यामुळे शरीरावर एक प्रकारचा घट्टपणा येतो. संप्रेरक पातळीत सतत बदल होत असताना शरीराच्या त्वचेवर सर्वत्र खाज सुटण्यास सुरुवात होते. गरोदरपणात खाज सुटणाऱ्या त्वचेसाठी काही नैसर्गिक उपाय आहेत ज्यामुळे त्वचेची खाज कमी होऊन त्वचेला आराम […]
तुमचे बाळ आता अकरा महिन्यांचे आहे. ४८ आठवड्यांपूर्वी ते अगदी छोटंसं बाळ होतं ह्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे. तो आता आत्मविश्वासाने सगळीकडे फिरत असेल, आधारासाठी फर्निचरला धरून चालेल आणि लवकरच तो स्वतंत्रपणे चालू लागेल (जर त्याने अजून चालण्यास सुरुवात केलेली नसेल तर). त्याचा मेंदू देखील वेगाने विकसित होत आहे, जटिल प्रक्रिया समजून घेत आहे. […]