गर्भधारणेदरम्यान पोट दुखणे खूप सामान्य आहे, पण ते भीतीदायक सुद्धा वाटू शकते. वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी गरोदर स्त्रीच्या शरीरात खूप बदल होत असतात, त्यामुळे ह्या कालावधीत पोट दुखणे हे सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान पोटदुखीची काही कारणे असतात जी हानिकारक नसतात परंतु काही वेळा त्यामागील कारणे गंभीरसुद्धा असू शकतात. काही वेळा गर्भधारणेशी संबंधित काही गुंतागुंत असल्यास पोटदुखी […]
तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत केलेले आहे. आई होणे खूप आव्हानात्मक आहे हे सुद्धा तुम्हाला समजले असेल. तुमचा सगळा वेळ तुम्हाला तुमच्या लहान बाळाला द्यावा लागतो तसेच बाळाकडे सतत लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे तुमच्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी फारसा वेळ नसतो – आम्ही तुम्हाला हा वेळ स्वतःसाठी कसा काढायचा हे सांगू शकतो, अगदी खरंच! […]
बाळाला स्तनपान द्यावे की फॉर्मुला दूध हा पालकांसाठी मोठा निर्णय आहे. जर तुम्ही बाळाला फॉर्मुला दूध देण्याचे ठरवले तर ते दररोज किती प्रमाणात द्यावे ह्या विचाराने तुम्ही गोंधळात पडाल. ह्याचे उत्तर बाळाचे वय, उंची, तुम्ही फक्त फॉर्मुला देणार आहात का? किंवा स्तनपानासोबत अथवा घनपदार्थांसोबत पूरक म्हणून देणार आहात? ह्या सर्व घटकांवर अवलंबून आहे .तुमच्या बाळाला […]
तुमचं बाळ जन्मल्यापासून ते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही बाळाबरोबर एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण, बाळाच्या कानात तुम्ही कुजबुजलेला प्रत्येक गोड शब्द आणि तुम्ही बाळाला प्रेमाने कुरवाळलेला प्रत्येक क्षण आणि तुमच्या चेहऱ्यावरील प्रेमळ हावभाव बाळाला संवाद साधण्यास शिकवत असतो. बाळाच्या सामाजिक, भावनिक तसेच संवादकौशल्य विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे ठरते. ९ व्या महिन्यात तुमचे बाळ […]