Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी बाळांच्या केसातील कोंड्याची समस्या कशी हाताळाल?

बाळांच्या केसातील कोंड्याची समस्या कशी हाताळाल?

बाळांच्या केसातील कोंड्याची समस्या कशी हाताळाल?

मुलांची वाढ होत असताना त्वचेच्या समस्या होणे सामान्य आहे कारण त्यांची त्वचा अजूनही संवेदनशील असते आणि आजूबाजूच्या जीवाणूंपासून स्वतःचे संरक्षण करते. बहुतेक त्वचेच्या समस्यांमुळे अस्वस्थता येते. कुठल्या भागाच्या त्वचेची समस्या आहे त्यावर हा त्रास अवलंबून असतो. डोक्यातील कोंड्याची समस्या आपल्या मुलाच्या टाळूवर परिणाम करते. मुलांना होणारा हा सर्वात सामान्य आणि व्यापक संसर्ग आहे.

कोंडा म्हणजे काय?

डोक्यातील कोंडा हा त्वचेच्या समस्येचा एक सौम्य प्रकार आहे, याला सेबोरिया डार्माटायटीस असेही म्हणतात. यात टाळूवरील त्वचेचे खवले निघतात आणि कधीकधी भुवया आणि पापण्यांचा समावेश होतो. त्वचेचे खवले निघतात आणि लहान, पांढरे फ्लेक्स तयार होतात. डोक्यातील कोंड्यामुळे त्रास होत नाही परंतु खाज आणि लालसरपणा येऊ शकतो. उपचार न केल्यास त्यामुळे केस गळू शकतात. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोक्यात कोंडा आढळला किंवा जास्त केस गळताना दिसले तर डॉक्टरांकडे जा कारण इतर समस्यांमुळे सुद्धा ही लक्षणे दिसू शकतात. अशीच आणखी एक समस्या म्हणजे मुलांच्या डोक्यात उवांचा प्रादुर्भाव होणे. डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी अनेक औषधे उपाय उपलब्ध असताना, वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला जातो कारण काही उपचारांमुळे मुलांना ऍलर्जी ऍलर्जी होऊ शकते.

लहान बाळांच्या केसांमध्ये कोंडा होण्याची कारणे

आपल्या बाळाच्या केसांमध्ये कोंडा का होऊ शकतो याची अनेक कारणे आहेत. खालील कारणांचा ह्यामध्ये समावेश होतो:

 • बुरशीजन्य वाढ: मालासेझिया या बुरशीमुळे टाळूवर मृत त्वचेच्या पेशी जास्त प्रमाणात वाढू शकतात. जेव्हा या पेशी तेल ग्रंथींद्वारे तयार होणाऱ्या सेबममध्ये मिसळतात, तेव्हा कोंडा होतो
 • शाम्पू जास्त प्रमाणात वापरल्यास: जास्त शाम्पू वापरल्याने टाळूतील सर्व नैसर्गिक तेले काढून टाकली जाऊ शकतात. त्यामुळे त्वचा कोरडी होते, आणि नंतर कोंडा होतो. कधीकधी रसायनांच्या प्रभावामुळे त्वचारोग होण्याची शक्यता असते
 • केसांना फक्त शाम्पू लावून धुणे पुरेसे नाही: टाळूची स्वच्छता राखणे फार महत्वाचे आहे कारण यामुळे मृत त्वचा, घाण आणि तेल खूप लवकर जमा होऊ शकते आणि त्यामुळे कोंडा होऊ शकतो
 • त्वचेच्या स्थिती: एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या काही त्वचेच्या स्थितीमुळे कोंडा होतो
 • उष्णता: टाळू जास्त उष्णतेच्या संपर्कात आल्यास उदा: जर टाळू जास्त सूर्यप्रकाशाखाली असेल तर कोंडा होऊ शकतो
 • आर्द्रता: आर्द्रतेचा अभाव, विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांत, टाळू कोरडी होऊ शकते
 • तेलकट टाळू: त्वचेला ओलसर आणि निरोगी ठेवण्यासाठी टाळू तेल तयार करते. तथापि, तेलाचे उत्पादन जास्त असल्यास, कोंडा होऊ शकतो

लहान बाळांच्या केसांमध्ये कोंडा होण्याची कारणे

बाळांच्या डोक्यातील कोंड्याची चिन्हे आणि लक्षणे

डोक्यातील कोंड्याची अनेक चिन्हे आहेत त्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

 • टाळू, कपाळ आणि पापण्यांच्या जवळील त्वचेचा कोरडेपणा
 • त्वचेचे स्निग्ध डाग
 • लालसरपणा
 • खाज सुटणे
 • त्वचेवरचे पांढरे खवले
 • तात्पुरते केस गळणे

बाळाच्या डोक्यावर खवले दिसत असतील तर त्यामागे डोक्यातील कोंडा हे एकमेव कारण आहे का?

डोक्यातील कोंडा हे तुमच्या बाळाच्या डोक्यावर खवले दिसण्याचे सर्वात सामान्य कारण असले तरी ते एकमेव कारण नाही. इतर कारणे खालीलप्रमाणे

 • सनबर्न
 • शाम्पूने अयोग्य पद्धतीने केस धुणे
 • क्रेडल कॅप
 • रिंग वर्म

डोक्यातील कोंड्यापासून सुटका होण्याचे मार्ग

बाळाच्या डोक्यातील कोंड्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते तुम्ही करून पाहू शकता.

 • ब्रश आणि शॅम्पू: मुलाच्या टाळूला हळूवारपणे ब्रश करण्यासाठी मऊ दातांचा ब्रश वापरा. ह्या कंगव्यामुळे मृत त्वचा निघून जाईल. त्यानंतर, बाळाचे केस धुण्यासाठी सौम्य शाम्पू वापरा
 • औषधी शैम्पू: जर कोंडा कायम राहिला तर बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधी शाम्पूसाठी प्रिस्क्रिप्शन मागा. आपल्या डॉक्टरांनी आणि शाम्पूच्या बाटलीवर दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा
 • स्वच्छ धुवा: मुलाच्या केसांना मऊ टॉवेलने सुकवण्यापूर्वी शाम्पू चांगला स्वच्छ धुवून काढावा, त्याचे अंश केसांवर राहणार नाहीत ह्याची काळजी घ्या
 • त्वचेला शांत करा: कधीकधी, प्रभावित त्वचेला खाजवल्याने समस्या आणखी वाढू शकते. त्याऐवजी, त्वचेची जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी खोबरेल तेल, कोरफड किंवा अगदी लोणी ह्या सारख्या उत्पादनांचा वापर करा.

डोक्यातील कोंड्यापासून सुटका होण्याचे मार्ग

यापैकी कोणत्याही समस्येवर उपचार सुरू करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोक्यातील कोंडा किंवा इतर कोणत्याही त्वचेच्या स्थितीचे स्वत: निदान करू नका आणि आपल्या मुलासाठी विशिष्ट उपाय योजनांसाठी वैद्यकीय सल्ला घ्या.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

. लहान मुलांमध्ये कोंडा संसर्गजन्य आहे का?

डोक्यातील कोंड्यामुळे त्रास होतो आणि बाळाच्या डोक्याला खाज येऊन सूज येऊ शकते. परंतु डोक्यात कोंडा होणे संसर्गजन्य नाही. तुमचे बाळ इतर मुलांशी आणि प्रौढांशी त्याच्या सवयीप्रमाणे संवाद आणि संपर्क ठेवू शकते.

. क्रॅडल कॅप म्हणजे काय आणि डोक्यात होणारा कोंडा आणि क्रॅडल कॅप मध्ये काय फरक आहे?

क्रॅडल कॅपला इनफंटाईल सेबोरहाइक डार्माटायटीस असेही म्हणतात. लहान मुलांमध्ये ही टाळूची समस्या आढळते. आणि शरीराच्या इतर भागात पसरू शकते. ह्यामध्ये त्वचेवर लाल फोड येतात आणि नंतर त्याचे रूपांतर पिवळ्या कडक खवल्यांमध्ये होते. कोंडा कुठल्याही वयोगटातील व्यक्तीच्या डोक्यात होऊ शकतो परंतु क्रॅडल कॅपची समस्या लहान मुलांमध्ये त्यांच्या वयाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये आढळते आणि केवळ एक वर्षापर्यंत राहते.

जर तुमच्या बाळाच्या टाळूला भेगा पडू लागल्या, रक्तस्त्राव होऊ लागला तर बाळाला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. ही लक्षणे इतर संसर्गाच्या सुरुवातीची चिन्हे असू शकतात.

डोक्यातील कोंडा कमी होण्याच्या चिन्हे नसल्यास, किंवा डोक्यातील कोंड्यामुळे होणारी केस गळती जास्त काळ राहिल्यास त्याकडे लक्ष देऊन वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बाळाच्या त्वचेवर आणि टाळूवर फक्त दर्जेदार ब्रँडेड उत्पादने वापरता आहात ना याची खात्री करा. बाळाच्या संवेदनशील त्वचेचे रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना त्याचे डोके झाकून घ्या. जर तुम्ही तुमच्या बाळाला नियमित तेल मालिश करत असाल तर टाळूकडे दुर्लक्ष करू नका आणि बाळाच्या टाळूवर तेल जास्त काळ राहणार नाही ह्याची काळजी घ्या. बाळाच्या डोक्यातील कोंड्याबद्दल जास्त काळजी करू नका. ही समस्या दूर करणे सोपे आहे, परंतु तरीही तुम्हाला काळजी वाटत असेल तर तुम्ही बालरोगतज्ञांशी बोलू शकता.

मुलांमध्ये डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी स्वच्छता हा एक महत्त्वाचा भाग आहे, म्हणून नियमितपणे त्यांचे केस धुवा, केस खूप कोरडे असल्यास तेल लावा आणि आपल्या मुलाच्या केसांच्या प्रकारानुसार विशिष्ट शाम्पू वापरा.

स्रोत अणि सन्दर्भ:

स्रोत १

आणखी वाचा:

दाट केसांसाठी बाळाचे मुंडण करणे – हे खरे आहे की खोटे?
बाळ किंवा मुलांच्या डोक्यातील उवांपासून सुटका कशी करून घ्याल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article