कावीळ हे बिलिरुबिन वाढल्याचे लक्षण आहे. पूर्ण वाढ झालेल्या बालकांमध्ये ६०% आणि अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये कावीळ होण्याचे प्रमाण ८०% आहे. बिलिरुबिन हे नवजात बाळांमध्ये जुन्या लाल रक्त पेशींच्या विघटनाचे उप–उत्पादन आहे. बिलिरुबीनच्या उच्च पातळीची प्राथमिक कारणे पुढीलप्रमाणे: प्रौढांच्या तुलनेत नवजात बाळांमध्ये लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी असते. त्याचा परिणाम म्हणून बिलिरुबीनची रक्तातील पातळी जास्त असते. मेकोनिअम […]
७ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची तुमच्या पोटात वेगाने वाढ होत असते. परंतु तुमच्या पोटाच्या आकाराकडे पाहून तसे वाटत नाही. ह्या काळात तुमच्या शरीरामध्ये महत्वाचे बदल होत असतात, कारण तुमचे शरीर बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सज्ज होत असते. बऱ्याच स्त्रियांना ह्या आठवड्यात आपण आई होणार आहोत हे समजलेले असते. ह्या आठवड्यात तुमच्या वजनात वाढ झालेली नसते. […]
बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्या शरीराचा आकार पूर्ववत होणे महत्वाचे आहे, कारण त्यामुळे केवळ आपले आरोग्य सुधारत नाही तर बाळाच्या जन्मानंतरचे औदासिन्य सुद्धा टाळता येते. कृतज्ञतापूर्वक, नियोजित व्यायामाच्या मदतीने प्रसूतीनंतर पुन्हा पूर्ववत होणे खूप कठीण नाही. तथापि, आपली प्रसूती कशा प्रकारे झाली आहे त्यानुसार व्यायाम करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. गर्भारपणानंतर आपली तंदुरुस्ती पुन्हा पहिल्यासारखी […]
संतती नियमनाच्या अनेक पद्धती स्त्रिया आणि पुरुषांकरिता उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींमध्ये छोटी शस्त्रक्रिया करावी लागते आणि त्या साधारणपणे संततिनियमनाच्या कायमसाठीच्या पद्धती असतात. महिला नसबंदी ज्याला इंग्रजीमध्ये ट्युबल लिगेशन किंवा ट्युबल स्टरलायझेशन असे म्हणतात ही सामान्य प्रक्रिया आहे आणि ती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. महिला नसबंदी म्हणजे काय? सामान्य माणसाच्या भाषेत, ट्यूबल लिगेशनला आपल्या कडे बीजवाहिन्या […]