Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ३५ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ३५ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ३५ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ रुग्णालयातून घरी येऊन आतापर्यंत सुमारे नऊ महिने झाले आहेत. तुमच्या ३५ आठवड्यांच्या बाळाची वेगाने वाढ होणे सामान्य झाले आहे. तुम्हाला मागच्या नऊ महिन्यातील फारसे काही लक्षात नसले तरीसुद्धा तुमच्या बाळाची लक्षणीय वाढ झालेली आहे.

३५ आठवड्यांच्या बाळाचा विकास

३५ आठवड्यांच्या बाळाचा विकास

आतापर्यंत, मोटार कौशल्याच्या बाबतीत तुमचे बाळ खूप विकसित झालेले आहे. बाळाची बोटांची पकड पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, म्हणून बाळ स्वतःची स्वतः बाटली धरून दूध घेईल. तो प्लेटमधून खाद्यपदार्थांचे लहान तुकडे घेऊन खाऊ लागेल. ह्या बाळाच्या कृतीला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. त्यामुळे बाळाला अधिक अन्न मिळेल आणि ते चांगले स्वीकारू शकेल.

या वयात, तुमचे बाळ एक चांगला श्रोता देखील आहे. तुम्ही त्याच्याबरोबर केलेले प्रत्येक संभाषण तो ऐकत असेल ह्याची खात्री करा. तो तुमच्या आवाजाचे आणि इतर आवाजांचे अनुकरण करेल. त्याची बडबड आता अधिक संरचित असेल आणि संभाषणासारखी वाटेल. त्याचे पहिले शब्द आधीच बोलले गेले असतील, कारण त्याला नाही” “दूध” “आई” “दादाअशा अनेक सोप्या शब्दांचे अर्थ समजलेले असतील. आपण त्याच्याशी जे बोलता त्याचा काही भाग कदाचित त्याला समजू शकेल, कारण बहुधा मला द्याकिंवा नाहीया साध्या विनंत्यांना तो प्रतिसाद देईल.

मुलाच्या संज्ञानात्मक कौशल्यांमध्येही खूप वाढ होते, कारण आता बाळ आपल्या आजूबाजूच्या वातावरणाच्या विविध पैलूंवर कार्य करण्यास सक्षम असेल. काही आठवड्यांपूर्वी, त्याचा आवडता चेंडू दिसेनासा झाल्यावर बाळ अनियंत्रितपणे रडत होते पण आता तुमचे बाळ शांतपणे बसून चेंडू कुठे गेला हे समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

मोटर कौशल्ये, विशेषत: हालचाली देखील बर्‍यापैकी विकसित झाल्या आहेत. तुमचे बाळ वेगाने रांगू लागेल आणि आधाराने उभे रहाण्यास सक्षम असेल. काही मुले या वयात एकतर आधार वापरुन चालण्यास सुरुवात करतात किंवा काही पावले टाकल्यानंतर खाली पडतात. कुठल्याही मार्गाने, खाली पडणे बाळाच्या आयुष्याचा भाग बनते म्हणून त्याच्याकडे लक्ष द्या!

आपल्या सुधारित हालचाली आणि मोटर कौशल्यामुळे तुमच्या बाळास स्वातंत्र्याची भावना प्राप्त होईल. तुम्ही खेळणे देण्याची वाट पहात बसण्याऐवजी किंवा रडण्याऐवजी स्वतः रांगत जाऊन बाळ एखादे खेळणे घेईल.

त्याला आजूबाजूच्या जगाविषयी शक्य तितकी जास्त माहिती मिळण्यासाठी, तुम्ही जितके शक्य असेल तितके त्याच्याशी बोलणे महत्वाचे आहे. तुम्ही जे काही बोलता तो ते ऐकण्याची खात्री आहे, म्हणून विविध शब्दांना त्याच्या अर्थाशी जोडण्यासाठी बाळाला मदत करा.

३५ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

  • तुमचे बाळ तुमच्याशी अधिक संवाद साधण्यास सुरुवात करेल आणि अशा प्रकारे तुम्ही त्याच्यासोबत सोपे खेळ खेळण्यास सक्षम असेल
  • जर तुम्ही त्याच्याकडे चेंडू टाकला तर तो परत तुमच्याकडे टाकेल अर्थातच तो त्याच्या हातातून निसटल्यानंतरच
  • तुमचे बाळ फर्निचरला धरून उभे राहण्यास सक्षम असेल आणि फर्निचरचा आधार घेऊन काही पावले चालतही असेल.
  • त्याची बोबडी बडबड खऱ्या संभाषणासारखी वाटू लागते आणि संभाषणासाठीच्या मूलभूत गोष्टी त्याला समजू लागतात जसे की बोलण्याआधी थोडे थांबणे

बाळाचा आहार

जशी ४ महिन्यापूर्वी बाळाची खाण्याची सवय बदलली होती तशी ह्या कालावधीत सुद्धा ती लक्षणीयरीत्या बदलेल. बाळामध्ये होणाऱ्या अनेक विकासात्मक बदलांच्या परिणामी तो आईचे दूध पिण्यास नकार देऊ शकतो याला इंग्रजी मध्ये नर्सिंग स्ट्राइकअसेही म्हणतात. या इंद्रियगोचरमुळे, घरातील आजी आणि इतर लोक नवीन मातांना, बाळ नकार देत असेल तर स्तनपान थांबवण्याचा सल्ला देतात परंतु हे चुकीचे आहे. बाळाला त्याच्या वयाच्या दोन वर्षांपर्यंत स्तनपान देण्याचा सल्ला दिला जातो आणि तेव्हा आपोपाप बाळाचे स्तनपान सुटते. बाळ स्वतंत्र झाल्यावर स्तनपान सुटण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा वेग आपोआप वाढतो.

तुमच्या बाळाची दिवसा खाण्याची आवड या वेळी कमी होऊ शकते दिवसाच्या इतर क्रियाकलापांच्या विचलनामुळे आणि काही इतर कारणांमुळे हे उद्भवते. दिवसा घन पदार्थ खाण्यास प्राधान्य दिले जाते आणि रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी स्तनपानास प्राधान्य दिले जाते.

बाळाची झोप

३५ आठवड्यांच्या बाळाचा झोपेचा त्रास (स्लिप रिग्रेशन) होणे ही एक सामान्य घटना आहे. याचा अर्थ असा आहे की बाळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय रात्रभर झोपू शकत नाही आणि लक्ष वेधून घेण्यासाठी ओरडत रात्री जागे होईल. तथापि, झोपेचा त्रास (स्लिप रिग्रेशन) हा या समस्येसाठी योग्य शब्द नाही, कारण ह्याद्वारे असे सूचित होते की असे प्रथमच घडले आहे. पण ती वस्तुस्थिती नाही प्रत्येक वेळी जेव्हा मूल मोठ्या विकासात्मक बदलांमधून जाते तेव्हा बाळाची झोपेची पद्धत अस्थिर असणे सामान्य आहे. दात येताना, बाळ पालथे पडताना, रांगताना, उभे राहतानाच्या टप्प्यांवर हे खरे आहे.

रात्री झोपणे हा आता भूतकाळ बनतो, कारण बाळ रात्री कधीही जागे होण्याची खात्री असते. ह्या अवस्थेत बाळासोबत झोपणे चांगले कारण त्यामुळे स्वतःची झोप गमावता पालक आपल्या बाळाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकतील. परंतु नंतर बाळ हळू हळू रात्री झोपू लागेल आणि हा बदल तुम्हाला लवकरच जाणवेल म्हणजेच काही दिवसांनी तुम्हाला पुन्हा छान झोप मिळेल अर्थातच पुढच्या विकासाच्या टप्प्यापर्यंत!

३५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

येथे काही टिप्स आहेत ज्या तुमच्या बाळाला व्यवस्थापित करण्यास तुम्हाला मदत करू शकतील तसेच मोटार मानसिक कौशल्य सुधारण्यास मदत करतील

  • शक्य तितके तुमच्या बाळाशी बोला आणि त्याच्या सभोवतालच्या सर्व गोष्टींना एक नाव देण्याचा प्रयत्न करा. जेव्हा बाळ तो ध्वनी आपल्या आजूबाजूला पाहिलेल्या गोष्टींशी संबद्ध करतो तेव्हा त्याचे जगाविषयीचे ज्ञान सुधारते. तसेच, त्याचे नाव जास्तीत जास्त बोला, जेणेकरून तो विशिष्ट आवाज त्याच्या ओळखीशी संबंधित आहे हे बाळाला समजेल
  • आपल्या बाळासाठी गोष्टी वाचा आणि शक्य तितक्या भावना प्रतिबिंबित करण्यासाठी आपला स्वर बदलू द्या. ह्यामुळे त्याला भाषणांच्या पद्धतींबद्दल आणि भिन्न भावना व्यक्त करण्यासाठी ध्वनी आणि स्वर कसे भिन्न आहे याबद्दल कल्पना येते
  • शक्य तितके आपल्या बाळाचे ऐका आणि संभाषणातून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बाळाची बडबड लक्षपूर्वक ऐकत आहात आणि तुम्ही स्वतःच्या शब्दांनी त्यास प्रतिसाद देणार आहात अशी समजूत त्याला द्या. बाळ तुमच्या कडे काहीतरी मागत आहे असे तुम्हाला वाटल्यास त्या विशिष्ट गोष्टीकडे बोट दाखवा आणि ती गोष्ट त्याला हवी आहे का हे त्याला विचारा अन त्याच्या उत्तराची वाट पहा
  • त्याच्याबरोबर सोपे खेळ खेळून आणि शक्य तितके त्याला घरात फिरण्याची परवानगी देऊन त्याचे मोटर कौशल्य सुधारित करा. तथापि, आपले घर बेबीप्रूफ असल्याचे सुनिश्चित करा.

चाचण्या आणि लसीकरण

या कालावधीत, बालरोगतज्ज्ञ बाळास हिपॅटायटीस बी आणि पोलिओ लस देतील. या दोन्ही लसी ६ महिने ते १८ महिन्यांच्या वयोगटात कोणत्याही वेळी दिली जाऊ शकतात. तथापि, बाळ एक वर्षांचे झाल्यानंतर इतर सर्व मोठ्या लसींचे वेळापत्रक तयार केले जाईल.

खेळ आणि क्रियाकलाप

या वयात मुलांसाठी खेळ अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते थेट मुलाच्या संज्ञानात्मक आणि शारीरिक वाढीवर परिणाम करतात. आंघोळीच्या वेळी, तुम्ही तुमच्या बाळासोबत पाणी आणि काही कप वापरुन पाण्याचे गेम खेळू शकता. तुमच्या बाळाला तो एक कप किंवा चमचा पाण्याने कसा भरु शकतो हे दाखवा आणि ते पुन्हा अंघोळीच्या पाण्यात घाला. त्याला ते करण्यास प्रोत्साहित करा हात डोळे समन्वय सुधारित करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

तुमच्या बाळासाठी ओळखीचे संगीत प्ले करा आणि त्यांना हे नाद ओळखले की नाही ते पहा. लवकरच, तुमच्या बाळाचे स्वत: बरोबरच गाणेसुरू होईल, आणि विस्मयकारक नादांमधून त्याला आनंद होईल.

तुम्ही तुमच्या बाळाला बाहेरील ठिकाणी अगदी आपल्या स्थानिक उद्यानात नेले तरी चालेल. बाळाला काही गोष्टी दाखवून त्यांचे नाव मोठ्याने सांगा. हे केवळ बाळाची स्थानिक कौशल्ये सुधारण्यास मदत करतेच परंतु बाळाच्या मनात शब्द संघटना तयार करण्यास देखील मदत करते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

एक आई म्हणून, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मातृवृत्तीला त्रास देतात. म्हणूनच, जर आपणास असे वाटत असेल की आपल्या मुलाच्या वर्तणुकीमध्ये काहीतरी चुकीचे आहे, तर डॉक्टरकडे जाणे चांगले दु: होण्याऐवजी सुरक्षित राहणे चांगले. लसीकरण देखील आवश्यक आहे आणि जर तुमच्या बाळास कोणत्याही आजाराची बाधा झाली असेल, जरी तो बराच काळापासून असलेली साधी सर्दी असली तरी डॉक्टरांना भेट द्या.

तुमच्या बाळाची चालण्याची आणि बोलण्याची क्षमता वेगाने विकसित होत आहे आणि तुमचे बाळ आता टॉडलर होण्याच्या मार्गावर आहे ह्या काळात बाळ खूप खेळकर असते. त्यामुळे बाळाशी तुमचा बंध आणखी घट्ट होण्यासाठी आणि बाळ करीत असलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही बराच वेळ काढला पाहिजे.

मागील आठवडा: तुमचे ३४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article