Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण मुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती

मुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती

मुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती

भारतामध्ये वर्षाच्या उत्तरार्धात अनेक सण साजरे केले जातात. ह्या कालावधीत काही आठवड्यांच्या अंतराने एका मागून एक सण येतात आणि ते साजरे केले जातात. कुटुंबासाठी हा काळ चांगला असतो कारण देशाच्या वेगवेगळ्या भागातून सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात.

जवळजवळ हे सर्व सण म्हणजेच नवरात्री, दसरा आणि दिवाळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात. मुलांना भारताच्या इतिहासाबद्दल शिकवण्यासाठी हा उत्तम काळ आहे. जर तुमच्या कुटुंबात लहान मूल असेल, तर त्यांना या सणांबद्दल माहिती देण्यासाठी आणि मुलांना उत्सवाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून देण्यासाठी ही एक चांगली वेळ आहे.

व्हिडिओ: मुलांसाठी नवरात्री आणि दसरा बद्दल मनोरंजक तथ्ये

नवरात्री म्हणजे काय?

नवरात्री हा सण हिंदुधर्मीय साजरा करतात. हा सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावानी ओळखला जातो जसे की चंद्र दर्शन, सिंदूर तृतीया, चंडी पथ, कुमारी पूजा, संध्या पूजा, महागौरी पूजा आणि आयुध पूजा इत्यादी. ह्या काळात देशाच्या विविध भागात वेगवेगळे विधी केले जातात. प्रत्येक देश किंवा राज्याच्या विविध भागात उत्सव साजरा करण्याच्या पद्धती आणि कालावधी वेगवेगळे आहेत.

नवरात्र का आणि कधी साजरे केले जाते?

हिंदुधर्मीय नवरात्रीचा सण साजरा करतात. हा सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी साजरा केला जातो. याला दुर्गा पूजा असेही म्हणता. ह्या सणादरम्यान भक्त देवी दुर्गा आणि तिचे नऊ अवतार यांची पूजा करतात. ‘नवम्हणजे नऊ आणि रत्रीम्हणजे रात्र म्हणून ह्या उत्सवाचे नाव नवरात्री असे आहे. प्रत्येक दिवसाचा वेगळा रंग ठरवला जातो आणि तो देवीचा प्रत्येक अवतार दर्शवतो.

नवरात्र का आणि कधी साजरे केले जाते?

उत्तरेत, हा उत्सव श्रीरामाच्या उपासनेसाठी आणि सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणावर विजय मिळवला म्हणून उत्सव साजरा जाण्यासाठी केला जातो. ईशान्येकडे, दुर्गा देवीची प्रार्थना करतात आणि महिषासुर राक्षसाच्या रूपातील दुष्ट प्रवृत्तीवरील विजयाचा उत्सव साजरा करतात.

या वर्षी, नवरात्री १५ ऑक्टोबर रोजी सुरू होऊन ४ ऑक्टोबर रोजी संपेल. सिद्धांतानुसार, नवरात्र प्रत्यक्षात एका वर्षात २ ते ४ वेळा येते. सर्वात जास्त साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे पावसाळ्यानंतर साजरा केला जाणारा शारदीय नवरात्र होय . उत्सवाच्या अचूक तारखा दरवर्षी किंचित बदलतात आणि त्या हिंदू चंद्रसौर दिनदर्शिकेवर अवलंबून असतात.

लोक भारतात नवरात्र कसे साजरे करतात?

देशाच्या विविध भागात लोक सण कसे साजरे करतात ते येथे दिलेले आहे

. पूर्व भारतात

पूर्व भारतात नवरात्रीला दुर्गा पूजा म्हणून ओळखले जाते. पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार इत्यादी राज्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये लोकांनी ओसंडून वाहतात. लोक देवी दुर्गेची पूजा करतात आणि महिषासुर या दुष्ट राक्षसावर तिने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करतात. सगळीकडे भव्य मांडव घातले जातात. आठ दिवस देवीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि नंतर विसर्जित केल्या जातात, जेणेकरून तिचे कैलासाकडे परत येणे सूचित होईल.

. उत्तर भारतात

उत्तरेत, नवरात्री एप्रिल महिन्यात काही ठिकाणी साजरी केली जाते. येथे लोक नऊ दिवस उपवास करतात. या नऊ दिवसांत ते अजिबात काही खात नाहीत असे नाही तर ते फक्त गहू आणि तांदूळ टाळतात. पचन सुधारण्यासाठी ही प्रथा आहे असे म्हटले जाते.

हा सण ऑक्टोबर मध्ये पुन्हा साजरा केला जातो. सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणावर श्रीरामांनी मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो.

मुलांना नवरात्रीची कथा रामलीलेद्वारे उत्तम प्रकारे समजावून सांगितली जाते. नऊ रात्री, लोक श्रीरामांची प्रार्थना करतात आणि रामाच्या कथेच्या नाटकांचा आनंद घेतात. दहाव्या दिवशी, रावणाचा भव्य पुतळा मोठ्या थाटामाटात आणि फटाक्यांसह जाळला जातो.

लोक भारतात नवरात्र कसे साजरे करतात?

. पश्चिम भारतात

पश्चिम भारतात आणि गुजरातच्या काही भागात हा सण दांडिया किंवा गरबा नृत्य करून साजरा केला जातो. हे स्त्री पुरुषांमधील पारंपरिक नृत्य आहे आणि त्याला तलवार नृत्यअसे म्हटले जाते कारण ते देवी दुर्गा आणि राक्षस यांच्यातील लढाईचे प्रतिनिधित्व करते.

. दक्षिण भारतात

दक्षिण भारतात, हा सण आयुध पूजा म्हणून ओळखला जातो. ह्या दिवशी वाद्यांची पूजा केली जाते. ह्या दिवशी वाहने, पुस्तके आणि वाद्ये देवतेसमोर ठेवली जातात आणि त्यांना हळद कुंकू आणि चंदन लावले जाते. दक्षिणेकडील विविध राज्यांच्या अनेक भागांमध्ये, लोकांच्या घरामध्ये सजवलेल्या बाहुल्यांचा देखावा केला जातो आणि तो घरात नऊ दिवस ठेवला जातो.

दक्षिण भारतात ह्या दिवशी वाहने आणि वाद्ये देवतेसमोर ठेवली जातात आणि त्यांना हळद कुंकू आणि चंदन लावले जाते

दसरा म्हणजे काय?

दसरा हा सण उत्तरेत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, श्रीरामाने रावणावर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हा नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आणि ह्या दिवशी दहा तोंडाच्या रावणाचा पुतळा जाळला जातो.

दसरा का आणि कधी साजरा केला जातो?

दसरा ऑक्टोबर महिन्यात (महिना अखेरीस) साजरा केला जातो आणि नवरात्र संपल्यावर हा सण साजरा केला जातो. प्रभू रामाने रावणावर त्याची पत्नी सीतेचे अपहरण केल्यानंतर रावणावर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका करण्यासाठी राम रावण ह्यांच्यामध्ये अनेक दिवस युद्ध सुरु होते. मुलांना दसरा ह्या सणाची माहिती करून देण्यासाठी ही चांगली आणि उपयुक्त माहिती आहे.

दसरा का आणि कधी साजरा केला जातो?

हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये हा उत्सव विजयादशमीला संपतो. या उत्सवाचा इतिहास१७ व्या शतकाचा आहे जेव्हा स्थानिक राजा, जगतसिंग याने त्याच्या राज्यात कुल्लूमध्ये रघुनाथची मूर्ती बसवली होती. ह्या दैवताला संपूर्ण खोऱ्याचा अधिपती म्हणून घोषित करण्यात आले होते.

लोक भारतात दसरा कसा साजरा करतात?

इथे दसरा ह्या सणाविषयी काही माहिती दिलेली आहे, देशाच्या विविध भागात दसरा हा सण कसा साजरा केला जातो ह्याविषयीची माहिती इथे दिलेली आहे.

. पूर्व भारतात

वर नमूद केल्याप्रमाणे, दसरा हा सण पूर्वेला दुर्गा पूजा म्हणून साजरा केला जातो. दिवसांची संख्या आणि काही परंपरा वेगवेगळ्या राज्यानुसार भिन्न असतात. स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या कपाळावर आणि ज्या देवीची प्रार्थना करतात त्यांच्या कपाळावर सिंदूर लावतात. उत्सव किंवा पूजा, षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी आयोजित केली जाते आणि पूजेचा शेवट दसऱ्याच्या दिवशी होतो.

. उत्तर भारतात

उत्तरेकडील राज्यांमध्ये, विशेषत: हिमाचल प्रदेशच्या कुल्लू खोऱ्यात, कुल्लू दशहरा नावाचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दसरा उत्सव साजरा केला जातो. येथे, उत्सव दहाव्या दिवशी सुरू होतात आणि पुढे आणखी सात दिवस सुरु राहतात. ज्या दिवशी स्थानिक राजा जगत सिंह यांनी सिंहासनावर भगवान रघुनाथची मूर्ती बसवली होती त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो.

. पश्चिम भारतात

गुजरातमध्ये गरबा हे लोकनृत्य आहे. उत्सवाचे नऊ दिवस हे नृत्य केले जाते. लोक दुर्गा देवतेला प्रार्थना केल्यानंतर लोकगीतांवर नाच करतात.

लोक भारतात दसरा कसा साजरा करतात?

. दक्षिण भारतात

म्हैसूरमध्ये, सुंदररित्या सजवलेल्या म्हैसूर पॅलेसमध्ये ह्या सणाला खूप महत्त्व आहे. कुंभकर्ण, रावण आणि मेघनाथ यांचे पुतळे ह्या शहरात जाळले जातात. येथेही, दुर्गा देवीच्या मूर्ती हत्तीच्या वरून राजवाड्यातून मंडपात नेल्या जातात, ह्या दरम्यान भाविक मूर्तींचे दर्शन घेतात.

अशा प्रकारे, नवरात्र आणि दसरा संपूर्ण देशात मनापासून साजरा केला जातो. त्याचे स्वरूप वेगवेगळे असले तरी सुद्धा वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा उत्सव ह्या सणाद्वारे साजरा केला जातो.

आणखी वाचा: नवरात्रीच्या उपवासासाठी तुम्ही करून बघू शकता अश्या चवदार पदार्थांच्या रेसिपी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article