Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमत्रिणींना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी शुभेच्छासंदेश, मेसेजस आणि कोट्स

तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमत्रिणींना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी शुभेच्छासंदेश, मेसेजस आणि कोट्स

तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमत्रिणींना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी शुभेच्छासंदेश, मेसेजस आणि कोट्स

सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि काही दिवसांत, आपण दिवाळी साजरी करणार आहोत. दिवाळी आधी धनतेरस किंवा धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी ह्या वर्षी २३ ऑक्टोबरला येते आहे. हिंदीमध्ये धनम्हणजे संपत्ती‘. धनत्रयोदशी हा एक शुभ दिवस मानला आहे. ह्या दिवशी सोने किंवा चांदीसारख्या मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या जातात कारण ते शुभ मानले जाते.

सण हे सर्वत्र आनंद पसरवण्यासाठी असतात. धनत्रयोदशीचे हे शुभेच्छा संदेश आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवण्यास विसरू नका.

धनत्रयोदशीचा शुभेच्छा

तुमचा धनत्रयोदशीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शुभेच्छा संदेश

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश येथे आहेत. हे शुभेच्छा संदेश आपण आपल्या प्रियजनांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पाठवू शकता.

1. ही धनत्रयोदशी तुमच्यासाठी समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येवो आणि आनंद तुमच्या दारी येवो. शुभ धनत्रयोदशी!

2. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद असो. ही धनत्रयोदशी तुमच्यासाठी खूप आनंद आणि समृद्धी घेऊन येवो! धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

3. मी प्रार्थना करतो की धनत्रयोदशीचा हा शुभ दिवस, यशाकडे वाटचाल करत असताना तुमच्यासाठी संपत्ती आणि समृद्धी घेऊन येईल. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

4. आपले घर सजवा, पणत्या लावा आणि रांगोळ्या काढा कारण श्रीलक्ष्मीचे आगमन होणार आहे! धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.

5. दिवे काही तास तेवत राहतात, तर दिवस संपल्यानंतर सूर्य मावळतो. पण तुमच्यासाठी माझ्या शुभेच्छा कायम राहतील. धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा

तुमचा धनत्रयोदशीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शुभेच्छा संदेश

6. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला यश आणि धन प्राप्त होऊ दे. शुभ धनत्रयोदशी.

7. ही धनत्रयोदशी तुमच्यासाठी नवीन स्वप्न, नवीन आशा, वेगळा दृष्टीकोन, न शोधलेले मार्ग, आणि सुंदर,उज्ज्वल अशी प्रत्येक गोष्ट घेऊन येवो आणि आपला हा दिवस आनंददायी क्षणांनी भरून जाऊ देत! आपणा सर्वांना आमच्याकडून धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.

8. देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो आणि तुमच्या जीवनात नेहमी समृद्धी येवो. तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा!

9. धनत्रयोदशीला, देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला लाभो! धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा!

10. सोने आणि चांदी खरेदी करून आणि आपल्या प्रियजनांसोबत उत्सव साजरा करून ही धनत्रयोदशी कायम स्मरणात राहील अशी साजरी करा! धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

11. तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व सुख आणि आरोग्य लाभो जे तुम्हाला हवे आहे ते सर्व मिळो!. तुम्हाला धनत्रयोदशीच्या अनेक शुभेच्छा!

12. सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा. श्री. धन्वंतरी आणि श्री. कुबेर यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव असू दे. धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा!

13. या शुभ दिवशी, तुमचे आयुष्य सोन्यासारखे चमकू दे! धनत्रयोदसाच्या शुभेच्छा!

14. श्री लक्ष्मीची तुमच्यावर सदा कृपा राहो धनत्रयोदशी २०२१ च्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

15. चांगले आरोग्य, भरपूर संपत्ती आणि विपुल समृद्धी या सर्व गोष्टी तुम्हाला लाभो धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

शुभ धनत्रयोदशी16. तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद आणि समृद्धी येवो हीच सदिच्छा! धनत्रयोदसाच्या शुभेच्छा!

17. तुमचा व्यवसाय दररोज सातत्याने वाढत जावो आणि तुमच्या कुटुंबात नेहमी शांती आणि सौहार्द राहो. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर मी तुम्हाला समृद्ध वर्षासाठी शुभेच्छा देतो.

18. धनत्रयोदशीच्या दिवशी, तुमच्या आयुष्यात संपत्तीचा वर्षाव होवो आणि मी प्रार्थना करतो की यशाच्या प्रकाशाने तुमचे आयुष्य उजळून जावो. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

19. धनत्रयोदशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुंदर आयुष्य, समृद्धी आणि संपत्ती लाभो!

20. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपलीकडे यश लाभो. माझ्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.

21. देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी दिवे उजळावा. तुम्हाला धनत्रयोदसाच्या शुभेच्छा.

22. तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या ह्या दिवशी श्रीलक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहो! धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

23. ही धनत्रयोदशी तुमच्यासाठी नवी दिशा आणि नवीन आशा घेऊन येवो. तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.

24. या उत्सवाच्या शुभ प्रसंगी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पाठवत आहे. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

25. हा सण तुमच्यासाठी तेज आणि उत्साहाने भरलेला असुदे. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.

26. तुम्हाला आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी श्री धन्वंतरीचे भरभरून आशीर्वाद लाभो! धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

27. मी प्रार्थना करतो की धनत्रयोदशीचा हा सण तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी अनमोल संपत्ती घेऊन येवो. तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!

28. सणांची सुरुवात म्हणजेच हा धनत्रयोदशीचा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया. आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो!

29. तुम्ही सर्व अडचणींशी लढू शकता आणि सोने आणि हिऱ्यांसारखे चमकू शकता. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

30. तुम्हाला माझ्या सर्वोत्तम शुभेच्छा पाठवत आहे. तुमच्या कुटुंबात सदैव आनंद आणि सुसंवाद राहो. धनत्रयोदसाच्या शुभेच्छा!

31. लखलखती दिवे दारी, आली ही दिवाळी, करूया धनत्रयोदशीची तयारी धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

32. यंदाची धनत्रयोदशी तुम्हा सर्वांसाठी चांगले आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन येवो हीच प्रार्थना धनत्रयोदशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला आशा आहे की वर दिलेल्या कोट्स आणि संदेशांद्वारे तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांप्रती असलेल्या तुमच्या भावना व्यक्त करू शकता. त्यांची आठवण काढल्याने तुमचे प्रेम अधिक दृढ होईल. तुम्ही त्यांच्या जीवनात आहात ह्याचा त्यांना आनंद होईल. आमच्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा!

आणखी वाचा:

तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेजेस आणि कोट्स
भाऊबीजेसाठी सुंदर शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article