In this Article
तुम्हाला तुमचे होणारे बाळ खूप हुशार असावे असे वाटते का? नाही, आम्ही गमंत करत नाही.
लहानपणीच बाळाचा संज्ञात्मक विकास झाल्यास आयुष्यभरासाठी त्याचा उपयोग होतो. तुमच्या हुशार बाळासाठी तुम्ही पोषक वातावरण निर्माण करता. बाळाला त्यामुळे लवकर यश मिळण्यास मदत होते. बाळाच्या हुशारीसाठी लवकर प्रयत्न केल्याने बाळाला शाळेच्या अभ्यासासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही. त्याचा शैक्षणिक प्रवास सुरळीत होतो. शिवाय, हुशार असलेल्या मुलांना ADHD सारखे विकार होण्याची शक्यता कमी असते. तसेच त्यामुळे मुलांची कौशल्ये वाढण्यासाठी मदत होते. ह्याचा फायदा मुलांना शाळेच्या अभ्यासाच्या पलीकडे होतो आणि मुलांचा एकूणच शिकण्याचा अनुभव समृद्ध करतो. भविष्यात चांगली आणि सर्वगुणसंपन्न व्यक्ती बनण्यासाठी पाया तयार करतो. बाळाला स्मार्ट बनवण्यासाठी गरोदरपणात खावेत अश्या पदार्थांची यादी इथे दिलेली आहे ती पहा!
तुमच्या बाळाचा संज्ञानात्मक विकास तुमच्या गर्भाच्या आतूनच सुरू होतो आणि जर तुम्हाला जन्मापासूनच उच्च बुद्ध्यांक असलेले आणि नैसर्गिकरित्या हुशार बाळ हवे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा.
बाळाला स्मार्ट आणि हुशार बनवण्यासाठी गरोदरपणात खाण्यासाठी 14 सर्वोत्तम पदार्थ
गरोदरपणात डॉक्टर व्हिटॅमिन डी, फॉलिक ऍसिड आणि आयर्न सप्लिमेंट्स घेण्यास सांगतात. गरोदरपणात तुम्ही जे अन्नपदार्थ खाता ते तुमच्या बाळाच्या संज्ञानात्मक विकासावर परिणाम करतात.
तुमचे बाळ हुशार व्हावे म्हणून गरोदरपणात काय खावे ह्याचा तुम्ही विचार करत आहात का? मग येथे १४ खाद्यपदार्थांची यादी दिलेली आहे. हे पदार्थ तुम्ही तुमच्या गरोदरपणात खाऊ शकता.
1. फॅटी फिश
ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् तुमच्या बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप गरजेचे असतात. बाळ हुशार होण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी सॅल्मन खाणे आवश्यक आहे. दर आठवड्याला किमान दोन किंवा अधिक मासे तुम्ही खाल्ले पाहिजेत. सीफूडमधील आणखी एक पर्याय म्हणजे ऑयस्टर होय. ह्यामध्ये आयोडीन भरपूर प्रमाणात असते. आयोडीनची पातळी कमी असल्यास त्याचा बाळाच्या बुद्धिमत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
2. हिरव्या पालेभाज्या
फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असलेल्या हिरव्या पालेभाज्या आणि काही कडधान्ये खाणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे तुमच्या बाळाच्या मेंदूला ऊतींचे नुकसान होण्यापासून सुरक्षित ठेवण्यास मदत होते. भाज्यांमधील फॉलिक ऍसिड न्यूरल ट्यूब दोषांचा धोका कमी करण्यासाठी तसेच फाटलेले ओठ आणि लहान मुलांमधील हृदयाचे विविध दोष दूर करण्यासाठी देखील ओळखले जाते. फॉलिक ऍसिडने समृध्द असलेले अन्नपदार्थ किंवा पूरक औषधांचे सेवन केल्यास गरोदरपणात प्रीक्लॅम्पसियाचा धोका कमी होऊ शकतो.
3. ब्लूबेरी
ब्लूबेरी मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असतात आणि ते तुमच्या बाळाच्या संज्ञानात्मक विकासास मदत करतात. ब्लूएबेरीऐवजी तुम्ही स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी, टोमॅटो, बीन्स आणि आर्टिचोक सुद्धा खाऊ शकता.
4. अंडी
अंड्यांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात आणि तसेच कॅलरीज कमी असतात. विशेषतः उकडलेल्या अंड्यामध्ये हे प्रमाण जास्त असते. अंड्यामध्ये कोलीन नावाचे अमीनो ऍसिड असते आणि ते मेंदूच्या विकासास आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते. तसेच, तुम्ही पाश्चराइज्ड अंडी खाणे टाळा. कारण त्यामध्ये जिवाणू असतात आणि त्यामुळे जास्त गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
5. बदाम
बदामामध्ये निरोगी चरबी, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि प्रथिने असतात. बदामामध्ये मेंदूला चालना देणारे ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. बाळ जन्मतःच हुशार होण्यासाठी दररोज मूठभर बदाम खाण्याची शिफारस केली जाते. गरोदरपणात शेंगदाणे खाल्ल्याने बाळाची बुद्धी वाढण्यासही मदत होते. अक्रोडमध्ये आरोग्यदायी ओमेगा-३ फॅटी अॅसिडही भरपूर प्रमाणात असतात
6. ग्रीक योगर्ट
बाळाच्या संज्ञानात्मक विकासासाठी आईच्या गर्भाशयात निरोगी चेतापेशी तयार करण्यासाठी प्रथिनेयुक्त पदार्थ आवश्यक असतात. ग्रीक योगर्ट सारखे प्रोबायोटिक पदार्थ खाल्ल्यास बाळाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियम मिळते. ग्रीक योगर्ट देखील आयोडीनचा एक समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता कमी होते.
7.चीज
बाळाच्या संज्ञानात्मक विकासासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. ज्या गरोदर स्त्रियांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी कमी असते, अश्या स्त्रिया कमी बुद्ध्यांक असलेल्या बालकांना जन्म देऊ शकतात. तुम्हाला निरोगी बुद्ध्यांक असलेले स्मार्ट बाळ हवे असल्यास, चीजचा डोस वाढवा!
8. भोपळा बियाणे
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. झिंक हे एक खनिज आहे आणि ते मेंदूच्या योग्य संरचनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि माहितीच्या संज्ञानात्मक प्रक्रियेत मदत करण्यासाठी ओळखले जाते. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात आणि ते अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत!
9. बीन्स
बाळाच्या मेंदूतील चेतापेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी शरीराला लोहाची गरज असते. बीन्समध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, म्हणूनच गरोदर स्त्रियांनी त्यांच्या आहारात ह्या पदार्थाचा समावेश केला पाहिजे. पालक, अंजीर, चिकन आणि मनुका हे तुमच्या आहारात समाविष्ट करण्यासारखे इतर लोहयुक्त पदार्थ आहेत. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मनुके मध्यम प्रमाणात खा.
10. दूध
गरोदर स्त्रियांच्या शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे मानसिक वाढ मंदावते आणि बाळाच्या सर्वांगीण संज्ञानात्मक विकासावर त्याचा परिणाम होतो. दूध प्यायल्यास संज्ञानात्मक कार्ये विकसित करण्यात मदत होते आणि जन्मापूर्वी बाळांच्या मेंदूच्या विकासास समर्थन मिळते.
11. एवोकॅडो
एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. विकसनशील बाळाच्या मेंदूसाठी ते महत्वाचे असते. त्यात फोलेट देखील असते, आणि ते न्यूरल ट्यूब दोष टाळण्यासाठी आवश्यक आहे
12. क्विनोआ
क्विनोआ हे पोषक तत्वांनी भरलेले संपूर्ण धान्य आहे आणि त्यामुळे ऊर्जा मिळते. त्यात लोह, फायबर आणि प्रथिने असतात. वाढत्या गर्भाच्या मेंदूचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी आणि विकासास प्रोत्साहन मिळण्यासाठी क्विनोआची मदत होते.
13. रताळे
बीटा-कॅरोटीनने समृद्ध असलेले रताळे खाल्ल्यास आई आणि बाळ दोघांमध्ये मजबूत रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत होते. रताळे आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे देखील प्रदान करते.
14. चिया सीड्स
चिया सीड्स मध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या लहान बिया गर्भाच्या मेंदूच्या विकासास हातभार लावतात आणि त्यामुळे गर्भवती स्त्रीला ऊर्जा मिळते.
बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी गरोदरपणात तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता! त्यामुळे ह्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.
टिप्स आणि खबरदारी
तुम्ही जे पदार्थ खाता त्याचा तुमच्या बाळाच्या विकासावर परिणाम होतो, त्यामुळे खालील गोष्टींकडे लक्ष द्या
- तुम्ही कुठले पदार्थ तोंडात टाकता ह्याकडे लक्ष ठेवा आणि हुशार बाळासाठी गरोदरपणात खाण्यासाठी ताजे आणि सेंद्रिय पदार्थ निवडण्याचे लक्षात ठेवा.
- प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पदार्थ टाळा. अल्कोहोल, धुम्रपान आणि आरोग्याला घातक अश्या जीवनशैलीला कारणीभूत असलेल्या कोणत्याही गोष्टी टाळा.
- कच्चे मांस, पारा असलेले मासे, कच्चे शेलफिश आणि कॅफिन टाळा, कारण त्यामुळे आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो.
- तुम्ही खात असलेली फळे आणि भाज्या कापण्यापूर्वी चांगल्या प्रकारे घुवून घ्या. जर योग्यप्रकारे धुतले नाही तर जिवाणू फळांमध्ये किंवा मांसात प्रवेश करू शकतात. त्यामुळे तुमच्या पोटातील बाळाला त्रास होऊ शकतो.
- फळे आणि भाज्यांचे सेवन वाढवावे असे तुम्हाला वाटत असल्यास, त्यांचा आहारात समावेश करा. भाज्या चिरून घ्या आणि आपल्या ऑम्लेटमध्ये घाला किंवा फळे कापून घ्या आणि ओटमील किंवा दलियामध्ये घाला. तुमच्या रोजच्या जेवणात त्यांचा समावेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही फळांचा रस देखील घेऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. कोणते पदार्थ माझ्या बाळाला सुंदर बनवू शकतात?
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली बेरी सारखी फळे आणि पालकासारख्या भाज्यांमुळे तुमच्या बाळाची त्वचा निरोगी दिसू शकते आणि बाळ सुंदर होण्यासाठी त्याची नक्कीच मदत होऊ शकते. आवश्यक पोषक तत्वांसह संतुलित आहार घेतल्यास बाळाच्या शारीरिक विकासास मदत होऊ शकते.
2. गर्भवती असताना कुठली फळे खाल्ल्यास माझ्या बाळाचा रंग उजळू शकतो?
बेरी, संत्री आणि आंबा यांसारखी वेगवेगळ्या रंगाची फळे जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. ह्या फळांमुळे बाळाचा रंग उजळू शकतो. ही फळे गरोदरपणात खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.
3. माझे बाळ हुशार आहे की नाही हे मला कसे कळेल?
लहानपणापासूनच बाळाची हुशारी जाणून घेणे तसे कठीण असते. परंतु, उत्तेजक क्रियाकलापांमध्ये गुंतून राहणे, त्यांच्या संकेतांना प्रतिसाद देणे आणि विकासात्मक टप्पे पाहणे त्यांच्या संज्ञानात्मक क्षमता वाढण्यास मदत करू शकतात. बाळाची बुद्धिमत्ता हळू हळू कळत जाते. सुरुवातीच्या परस्परसंवादाची भूमिका महत्त्वाची असते.
4. बाळाच्या जन्माच्या वेळी मेंदूचा कोणता भाग चांगला विकसित होतो?
श्वासोच्छवास आणि हृदयाचे ठोके यासारख्या मूलभूत गोष्टी जन्माच्या वेळी तुलनेने चांगल्या विकसित झालेल्या असतात. कठीण संज्ञानात्मक कार्यांशी संबंधित असेलेले मेंदूचे भाग, बालपण आणि पौगंडावस्थेमध्ये परिपक्व होत राहतात.
लोह, व्हिटॅमिन डी आणि फॉलीक ऍसिड ने समृद्ध आहार घेणे कठीण असल्यास तुम्ही पूरक आहार घेण्याचा विचार करू शकता. परंतु पूरक औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणूनच, जर तुमचे बाळ बुद्धिमान होण्यासाठी काय खावे असा जर तुम्ही विचार करीत असाल तर ह्या लेखात दिलेल्या टिप्स पाळा. आणि ह्या पदार्थांचा आहारात समावेश करा!
आणखी वाचा:
गरोदरपणातील कॅल्शियम समृद्ध आहार
निरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे अन्नपदार्थ