Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणातील कॅल्शियम समृद्ध आहार

गरोदरपणातील कॅल्शियम समृद्ध आहार

गरोदरपणातील कॅल्शियम समृद्ध आहार

तुम्हाला वाटेल की रोज एक ग्लास दूध प्यायल्याने किंवा चीज खाल्ल्याने तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होण्यास मदत होऊ शकते, परंतु ते अंशतः खरे आहे. दूध आणि चीज हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असले तरी, ते तुमच्या कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाहीत कारण आता तुम्ही गर्भवती आहात. तुमच्या पोटात वाढणाऱ्या लहान बाळांच्या हाडांच्या आणि दातांच्या निरोगी वाढीसाठी कॅल्शियमची गरज असते आणि तुम्हाला तुमचे कॅल्शियमचे सेवन वाढवणे आवश्यक आहे (जर तुम्हाला ते पुरेसे मिळत नसेल तर). कॅल्शियमचे स्रोत सुद्धा निरोगी असल्याची खात्री करा. इतर जीवनसत्वे किंवा खनिजे यासारखेच कॅल्शियम सुद्धा तुमच्या गरोदरपणात आवश्यक असलेले खनिज आहे. गरोदरपणात तुम्हाला कॅल्शियमची किती गरज आहे तसेच त्याचे फायदे, स्रोत आणि बरेच काही समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात तुम्हाला किती कॅल्शियमची गरज असते?

काही स्त्रियांना गरोदरपणापूर्वी, दरम्यान आणि नंतर दररोज सुमारे १००० मिलिग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. जागतिक आरोग्य संघटना आणि अन्न तसेच कृषी संघटना (युनायटेड नेशन्सचा भाग) गर्भवती महिलांसाठी दररोज १२०० मिलिग्रॅम कॅल्शियम आहारात घेण्याची शिफारस करतात.

कॅल्शियम हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. पहिल्या तिमाहीत कॅल्शियम घेतल्याने गर्भाच्या वाढीस मदत होते. हाडे आणि दात मजबूत होतात. मज्जातंतूंच्या आवेगांचा प्रसार, स्नायूंचा विकास होतो आणि हृदय मजबूत होते. अपर्याप्त कॅल्शियम सेवनामुळे मुडदूस होतो किंवा हातपाय कमकुवत होऊ शकतात आणि वाढ देखील मंदावते.

दुसया तिमाहीत कॅल्शियमचे पुरेसे सेवन केल्याने प्रीक्लेम्पसियाचा धोका कमी होऊ शकतो, कारण पोषक स्नायू आकुंचनला मदत करतात तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. दुसऱ्या तिमाहीत कॅल्शियम घेतल्याने पाय आणि स्नायूंचे पेटके टाळता येतात. ही ह्या टप्प्यातील एक सामान्य समस्या आहे.

प्रसूतीच्या तयारीसाठी बाळाचा सांगाडा पूर्वीपेक्षा वेगाने विकसित होत असल्याने तिसऱ्या तिमाहीत कॅल्शियमची गरज वाढते.

गर्भवती महिलांसाठी कॅल्शियमचे आरोग्यविषयक फायदे

वर नमूद केल्याप्रमाणे, कॅल्शियम आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. येथे कॅल्शिअमचे काही फायदे आहेत आणि त्यामुळे कॅल्शिअम आहारातील एक महत्वाचा घटक आहे.

आईसाठी कॅल्शियमचे फायदे

गरोदरपणात उच्चरक्तदाब आणि प्रीक्लेम्पसिया या दोन गरोदरपणातील समस्या निर्माण होण्याचा धोका कमी करू शकतो. या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे आई आणि बाळ दोघांवरही परिणाम होतो, त्यामुळे ऑस्टियोपेनिया, हादरे, स्नायूंना पेटके येणे, टिटॅनस, गर्भाची वाढ हळू होणे, जन्मतःच बाळाचे वजन कमी असणे आणि बाळाला कमी प्रमाणात खनिजांचा पुरवठा होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. गरोदरपणात कॅल्शियमचे सेवन केल्यास उच्चरक्तदाबाचा धोका कमी होण्यासारखा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

बाळासाठी फायदे

गरोदरपणात, विकसनशील बाळ मजबूत हाडे आणि दात तयार करण्यासाठी आईकडून कॅल्शियम घेते. गरोदरपणात कॅल्शियम युक्त अन्न खाणे महत्वाचे आहे कारण ते हृदयाची सामान्य लय आणि रक्त गोठण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते.

गरोदरपणात कॅल्शियमचे स्त्रोत

फळांसह अनेक अन्न घटकांमध्ये कॅल्शियम उपलब्ध असते. तुम्ही गरोदर असताना कॅल्शियमचे सेवन वाढविण्याचा विचार करत असल्यास आपण निवड करू शकता अश्या खाद्यपदार्थांची यादी खाली दिलेली आहे.

खाद्यपदार्थ

खाद्यपदार्थ

कॅल्शियमफोर्टिफाइड सीरिअल्स, ज्यूस, कॅन केलेले मासे, सोया आणि ब्रेड हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांप्रमाणेच कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहेत. परंतु सर्व उत्पादने कॅल्शियमफोर्टिफाइड नसतात, म्हणून दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ निवडण्यापूर्वी लेबल तपासून पहा. गरोदरपणात काही कॅल्शिअम समृद्ध अन्नपदार्थांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे

  1. कॉटेज चीज: एक कप कॉटेज चीज (250 मिली) मध्ये 138 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.
  2. योगर्ट: दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि आठऔंस दह्यापासून (सुमारे 237 मिली) 450 मिलिग्रॅम कॅल्शियम मिळू शकते.
  3. दूध: एक कप दुधात (250 मिली) 300 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.
  4. बदाम: बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. एक चतुर्थांश कप सर्व्हिंगमध्ये सुमारे 88 मिलीग्राम कॅल्शियम असते. अंजीर, खजूर, पिस्ता आणि अक्रोड यांमध्येही कॅल्शियम भरपूर असते.
  5. सॅल्मन: सॅल्मनसारख्या माशाच्या 3-औंस कॅनमध्ये सुमारे 180 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.
  6. पालक: पालकाच्या शिजवलेल्या एका सर्व्हिंगमध्ये 120 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.

फळे

जर तुम्ही लैक्टोज असहिष्णु असाल आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नसाल तर गरोदरपणात कॅल्शियम युक्त फळे खाण्याचा विचार करा. ह्यात खालील गोष्टींचा समावेश होतो

  1. संत्री: 100 ग्रॅम संत्र्यामध्ये 40 मिलिग्रॅम कॅल्शियम मिळते.
  2. टांगरिन: 100 ग्रॅम टांगरिन मध्ये सुमारे 37 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.
  3. किवी: 100 ग्रॅम किवीच्या सर्व्हिंगमध्ये सुमारे 34 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.
  4. स्ट्रॉबेरी: 100 ग्रॅम स्ट्रॉबेरीच्या सर्व्हिंगमध्ये सुमारे 16 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.

कॅल्शियम शोषून घेण्यासाठी तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डीची गरज असते. म्हणून, तुमच्या आहारात तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळेल याची खात्री करा.

तुम्ही गरोदर असताना कॅल्शियम सप्लिमेंट घेऊ शकता का?

गरोदरपणात कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणे हा वादाचा विषय आहे. तुमच्या डॉक्टरांना आवश्यक वाटल्यास ते कॅल्शियम सप्लिमेंट लिहून देऊ शकतात, परंतु लक्षात ठेवा की तुमच्या शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता एका वेळी ५०० मिलिग्रॅम आहे. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कॅल्शियम सप्लिमेंट्स घेऊ नका, कारण जास्त कॅल्शियमचे सेवन केल्याने शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

कॅल्शियम सप्लिमेंट्स विविध स्वरूपात उपलब्ध आहेत आणि गरोदरपणात ते कॅप्सूल, च्युईंगम, द्रव, पावडर किंवा कॅल्शियम टॅब्लेट म्हणून घेतले जाऊ शकतात. कॅल्शियम सप्लीमेंट्सचे सामान्य स्त्रोत कार्बोनेट आणि सायट्रेट आहेत, आणि ते शरीरात सहजपणे शोषले जातात.

धोक्याची सूचना: गरोदरपणात कॅल्शियमचे जास्त सेवन

गरोदरपणात कॅल्शियमचे सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात कॅल्शियम घेतल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते, मूत्रमार्गात मुतखडा होण्याचा धोका वाढू शकतो आणि मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो. ह्यामुळे तुमच्या शरीरातील इतर आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांचे शोषण करण्यास देखील अडथळा येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या स्त्रीरोगतज्ञांनी दिलेले पूरक औषधांचे डोस घ्या.

गरोदरपणात कॅल्शियमयुक्त आहार घेणे आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर आहे. स्वतःचे आणि बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गरोदरपणाचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा ही पोषक तत्वे घेत रहा.

आणखी वाचा:

गरोदर असताना नारळपाणी पिणे
गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article