In this Article
तुमचे बाळ आता ४५ आठवड्यांचे झालेले आहे. म्हणजेच बाळाचे वय आता ११ महिने आणि २ आठवडे इतके आहे. तुमचे बाळ आता मोठे झाले आहे. त्याला त्याच्या आसपासच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास अधिक रस आहे. तुम्ही मोठ्यांदा ‘नाही‘ म्हणेपर्यंत तो त्याचा दुधाचा कप खाली आपटेल किंवा तुमचे केस ओढत राहील. ह्या वयात बाळाचे मोठ्यांदा रडणे, तुम्हाला चिकटून राहणे किंवा विक्षिप्तपणा ह्यासारख्या इतर गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु ह्या वयात बाळाचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तो अधिक स्वतंत्र होईल. बाळ रांगू लागेल तसेच स्वतःचे स्वतः उभे राहू लागेल कदाचित चालायला देखील तो सुरुवात करेल. तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाने आतापर्यंत टाळ्या वाजवण्यास सुरुवात केलेली असेल आणि तो चुंबन देण्यास शिकलेला असेल. तो तुम्हाला चुंबन देण्यासाठी त्याचे तोंड तुमच्या गालाजवळ आणू शकतो, परंतु सावध रहा कारण तो तुम्हाला चावू सुद्धा शकतो! या वयात बाळ काय करेल ह्याचा नक्की अंदाज बांधता येत नाही.
तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाचा विकास
तुमचे ४५–आठवड्याचे बाळ अनेकदा दोन गोष्टी करत असते आणि त्या करताना गोंधळलेले असते. पाहिलं म्हणजे बाळाचे तुमच्यावर लक्ष असते कारण त्याला विभक्त होण्याची चिंता असते तसेच त्याला आजूबाजूला फिरायचे असते आणि भोवतालच्या गोष्टींचा शोध घेण्याची तीव्र इच्छा असते. ह्या दोन्ही गरजा अगदी विरुद्ध असतात. परंतु सगळीकडे फिरत असताना तुम्ही आजूबाजूला आहात ना हे पाहण्यासाठी बाळ पुन्हा मागे येईल.
तुम्हाला पाहून त्याचा आत्मविश्वास वाढेल. परंतु तुम्ही तुमच्या जागेवर नसल्यास त्याला ते समजेल. तुमच्या बाळाला तुमच्यासोबत रंगीबेरंगी चित्रे असलेली पुस्तके वाचायला आवडतील आणि तो तुम्हाला पुस्तकातल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवायला सुरुवात करेल. तसेच तुम्ही त्याच्यासाठी नेहमी पुस्तके वाचत असाल तर तो त्यांची नावे सुद्धा सांगेल. ह्या वयाच्या बाळांचे हात पाय गुटगुटीत असतील आणि पोट मोठे असेल परंतु पुढील काही महिन्यांमध्ये बाळाचे हातपाय बारीक होतील. त्यामुळे आत्ताच ह्या गुटगुटीत बाळासोबत तुम्हाला हवे तेवढे खेळून घ्या!
आणखी वाचा: तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे
४५ आठवड्यांच्या बाळांचे विकासाचे काही टप्पे खाली दिलेले आहेत ते तुम्ही ओळखू शकता
- तुमचे बाळ पोटावर झोपलेले असताना आता उठून बसू शकेल.
- तुमच्या बाळाला ‘नाही‘ चा अर्थ समजेल पण नेहमी त्याचे पालन होत नाही.
- तुमचे बाळ खाली वाकून बोटांनी वस्तू उचलू शकेल.
- तुमचे बाळ आवाजाचे अनुकरण करू लागेल.
- तुमचे बाळ हातवारे करून ‘मला चेंडू दे ’ किंवा ‘मला ते दे‘ ह्या सारख्या सोप्या सूचनांचे पालन करू लागेल.
- तुमच्या मदतीने बाळ आता बोलून उत्तरे देऊ लागेल. जसे तुम्ही ‘गाय काय म्हणते‘ असे विचारता तेव्हा तो ‘मू‘ ने उत्तर देऊ शकतो.
- ‘आई‘ ‘बाबा‘ ह्या सारख्या शब्दांसोबतच तुमचे बाळ ४ ते ५ वेगवेगळे शब्द बोलू लागेल.
आणखी वाचा: १० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
बाळाला आहार देणे
तुमचे ४५ –आठवड्याचे बाळ एक वर्ष पूर्ण करत आहे, म्हणून तुम्ही त्याचे स्तनपान सोडवण्याचा विचार कराल. जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही तुम्हाला हवा तितका वेळ बाळाला स्तनपान देऊन त्याचा आनंद घेऊ शकता. स्तनपानातून बाळाला भरपूर पोषण मिळते तसेच स्तनपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याचे दूध सोडवायचे असेल तर तुमच्या स्तनांना आणि शरीराला ह्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी वेळ द्या. दर आठवड्याला स्तनपानाची एक वेळ कमी करणे हा एक पद्धतशीर दृष्टीकोन आहे. स्तनपान देण्याची योजना खाली दिलेली आहे:
- बाळ उठल्यावर एकदा स्तनपान देणे
- नाश्त्याच्या वेळी
- सकाळी झोपण्यापूर्वी
- स्तनपान आणि दुपारचे जेवण
- दुपारी झोपण्यापूर्वी
- स्तनपान आणि रात्रीचे जेवण
- झोपेच्या वेळी स्तनपान करा
- रात्री बाळ उठल्यावर स्तनपान करा
जेव्हा तुम्ही बाळाचे स्तनपान सोडवता तेव्हा तुम्ही स्तनपानाच्या ऐवजी बाळाला दुसरे अन्नपदार्थ देता. तुमच्या स्तनांना सवय होण्यासाठी, सलगपणे स्तनपान न देणे टाळा. उदाहरणार्थ, तुम्ही एका आठवड्यात दुपारचे स्तनपान टाळू शकता आणि पुढील आठवड्यात रात्रीचे स्तनपान देणे थांबवू शकता. तुम्ही अशा वेळी स्तनपानाऐवजी बाळाला कपमधून अन्न आणि पाणी देऊ शकता. तसेच, तुम्ही स्तनपानाऐवजी बाळाला फॉर्मुला देऊन शांत करू शकता. जर तुम्ही हे पाळलेत तर रात्रीच्या वेळी सुद्धा बाळाला स्तनपान न घेण्याची सवय लागेल.
आणखी वाचा: १० महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय
बाळाची झोप
४५ आठवड्यांच्या बाळांना झोपेचा त्रास होतो. त्यामुळे तुमचे बाळ रात्रीच्या वेळी वारंवार स्तनपान घेऊ शकते. त्याला इंग्रजीमध्ये ‘ब्रेस्ट स्लीपिंग‘ असे म्हणतात. हे बाळासाठी सकारात्मक तसेच आव्हानात्मक असू शकते. परंतु काही वेळा, तुमचे बाळ पुन्हा चांगले झोपेपर्यंत आत्मसमर्पण करणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. जर तुम्ही या परिस्थितीत असाल, तर आधी स्वतःची काळजी घ्या आणि ताण कमी करा. कधीकधी मध्यरात्री, तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी तसेच तुमच्या शरीराची स्थिती आरामदायक होण्यास मदत करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कुशीवर वळू शकता. हा कालावधी तीव्र असला तरी तो तात्पुरता आहे. एकदा तुमच्या बाळाने विकासाचा हा टप्पा पार केला कि, तुम्ही त्याला वेगळीकडे त्याच्या बिछान्यावर झोपवू शकता.
तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळासाठी काळजी घेण्यासाठी टिप्स
तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत:
- जेव्हा तुमचे बाळ तुम्हाला सिप्पी कप फेकून मारते किंवा टेलिफोनच्या कॉर्डवर झटका देऊन तुम्हाला ‘नाही‘ म्हणण्यास प्रवृत्त करते तेव्हा त्याला ‘नाही‘ म्हणू नका. फक्त त्याच्याकडून कप काढून घ्या किंवा खऱ्या टेलिफोन ऐवजी खेळण्यातला टेलिफोन ठेवा.
- जर तुमच्या घरी जिना असेल तर तुमचे बाळ वर चढण्याचा प्रयत्न करेल. बाळावर लक्ष ठेवा. तुम्ही त्याचा हात पकडू शकता आणि तोल गमावल्यास त्याला पकडण्यासाठी मागे राहून वर कसे जायचे ते शिकवू शकता. खाली येताना आधी पाय खाली ठेवून मग पोटावर सरकायला त्याला शिकवा आणि हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे असे त्याला सांगा. त्याला कधीही एकटे सोडू नका.
- जर तुमच्या बाळाकडून रिमोट कंट्रोल सारख्या वस्तू काढून घेतल्या आणि त्याने चिडचिड केली तर त्याला बिल्डिंग ब्लॉक्स सारखी खेळणी द्या. जर त्याने त्रास दिला तर त्याला झोपवा. त्याने कितीही आरडाओरडा केला तर सुद्धा तुम्ही हार मनू नका. त्याऐवजी त्याला त्या वस्तू का मिळणार नाही हे सांगा. त्याला क्रिब सारख्या सुरक्षित ठिकाणी झोपवा जेणेकरून तो रडून मोकळा होईल आणि शांत होईल. तुम्ही जास्त ताण घेऊ नका तो फक्त तुमच्या मर्यादा तपासून बघत आहे.
चाचणी आणि लसीकरण
बाळ १० –११ महिन्यांचे झाल्यावर डॉक्टर सहसा तुमच्या बाळाची वैद्यकीय तपासणी करणार नाहीत.
१. चाचण्या
तुमच्या बाळामध्ये ऍनिमियाची लक्षणे दिसत असल्यास, डॉक्टर त्याच्या रक्तातील हिमोग्लोबिन, लोह आणि शिसे यांची पातळी तपासण्यासाठी रक्त तपासून घेण्यास सांगू शकतात. डॉक्टर तुमच्या बाळाच्या विकासाचा मागोवा घेण्यासाठी त्याची उंची आणि वजन देखील मोजतील.
२. लसीकरण
६–१८ महिन्यांच्या दरम्यान, तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी लसीचा अंतिम डोस आणि आयपीव्ही (पोलिओ) लसीचा तिसरा डोस आवश्यक असेल. हे आजूबाजूचे वातावरण आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर अवलंबून असेल. त्याला डॉक्टरांनी शिफारस केलेल्या इन्फ्लूएंझा लसीची देखील आवश्यकता असू शकते.
खेळ आणि उपक्रम
खाली काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत जे तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळू शकता:
- पीकाबू/लपवा आणि शोधा – ह्या टप्प्यावरील बाळांना विभक्त होण्याची चिंता असते, असे खेळ खेळल्यामुळे तुम्ही दिसत नसतानाही तुम्ही जवळपास आहात अशी त्यांना खात्री पटते.
- तुम्ही बॉक्स गेम खेळू शकता. ह्या गेम मध्ये तुम्ही तुमच्या बाळाला एका मोठ्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये बसवून झाकण उघडणे आणि बंद करणे सुरू ठेवा. बाळाला हाक मारा जेणेकरून तुम्ही तिथेच आहात हे त्याला समजेल.
- तुम्ही त्याला खेळण्यासाठी छोटा बोगदा तयार करू शकता. ह्या बोगद्यामध्ये तो रांगत जाऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा आनंद घेऊ शकतो.
- तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन इतर पालकांसोबत लपाछपी खेळू शकता. आणि लपलेल्या लोकांना शोधू शकता.
- तुमच्या बाळाला त्याचे आवडते खेळणे किंवा पॅसिफायर सारखी एखादी विशिष्ट वस्तू शोधण्यास सांगा.
- तुम्ही तुमच्या बाळाला जेवणाच्या वेळी एखादा पदार्थ जास्त हवा असेल तर तुम्ही त्याला ‘आणखी हवे‘ असे म्हणण्यास शिकवू शकता.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाच्या विकासादरम्यान तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला खालील परिस्थितीत घ्यावा:
- बाळ चालताना जर तुम्हाला काही वेगळे आढळले किंवा फक्त एक पाय वाकलेला असेल किंवा एक गुडघा वाकलेला दिसत असेल, तर तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या बाळाला मुडदूस किंवा इतर कोणतीही समस्या असू शकते. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे.
- तुमचे बाळ या टप्प्यावर अधिक हालचाल करणार असल्याने, तो पडत तर नाही ना किंवा तीक्ष्ण कडांवर तर आपटत नाही ना ह्याकडे लक्ष द्या. जर बाळ पडले आणि काही दिवसांनी तुमच्या बाळाला वेदना होत असल्याचे तुमच्या लक्षात आले तर तुमच्या डॉक्टरांना फोन करा.
४५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेणे तितकेसे सोपे नसते कारण बाळाची झोप नीट होत नाही त्यामुळे बाळ चिडचिड करते. बाळाच्या विकासाचा हा टप्पा पार करेपर्यंत बाळाला हाताळण्यासाठी तुम्ही वरील टिप्स फॉलो करू शकता.