Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

ह्या टप्प्यावर बाळाची हातापायांची हालचाल आणि लवचिकता वाढते. आता आव्हाने पेलण्यास तयार राहा कारण बाळाची अचूकता आणखी वाढणार आहे. तुमची बाळाला हानी पोहचू नये म्हणून सुरक्षित ठेवण्याची इच्छा नियंत्रित ठेवा. बाळाला थोडे मोकळे सोडून नवनवीन गोष्टी माहित करून घेण्याची संधी द्या. तुमच्या बाळाला सुरक्षित जागी ठेवा कारण त्यामुळे बाळास हानी पोहोचण्याची शक्यता कमी असते. बाळामध्ये होणारे मोठे बदल तुमच्या लक्षात येतील.

बाळाची वाढ

बाळाच्या शारीरिक वाढीचा विचार करता तुमच्या बाळाचे वजन जन्माच्या वजनापेक्षा तिपटीने वाढले पाहिजे. बाळाचा आकार एका वर्षात त्याच्या जन्मापेक्षा तिपटीने वाढला आहे. प्रत्येक बाळाची वाढ वेगवेगळ्या गतीने होते आणि बाळाच्या वाढीमध्ये आणि आकारात गुणसूत्रांच्या महत्वाचा सहभाग असतो. बाळाचा आहार आणि वातावरण सुद्धा त्यासाठी कारणीभूत असते. तुमच्या बाळाची लक्षणीय वाढ झाली आहे किंवा नाही हे समजण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे बाळाला जुने कपडे बसतात किंवा नाही हा होय. काही आठवड्यांपूर्वी बाळाला बसणारे कपडे आता बाळाला छोटे होऊ लागतील. तुम्हाला हे सुद्धा लक्षात येईल की बाळाला आता बिछान्यावर जास्त जागा लागत जाईल. तुम्ही त्यांना कुशीत घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की बाळ आधीपेक्षा मोठे झाले आहे. बाळाची वाढ हळूहळू होईल, परंतु ह्या टप्प्यावर दृश्य स्वरूपात लक्षणे दिसू लागतात.

बाळाचा विकास

बाळ एका विशिष्ठ पद्धतीने रांगू लागते. रांगण्याच्या क्रियेचा वाढलेल्या आकलनशक्तीशी संबंध असतो. हातापायांच्या हालचालींचा संबंध हा मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूशी जोडलेला असतो. ह्या प्रक्रियेदरम्यान बाळ हळूहळू मोठे होत असते आणि वॉकरची तशी काही गरज नसते. तुमचे १० महिन्यांचे बाळ हे कुठेही जाऊ शकते त्यामुळे बाळाची सुरक्षा खूप महत्वाची असते. खाली बाळाच्या विकासाचे काही टप्पे दिले आहेत.

  • ४० आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे बाळ आता सोपे शब्द आणि वाक्ये बोलू लागते, त्यामुळे बाळाशी बोलत रहा. बाळाशी बोबडे बोल टाळा कारण आता बाळाला भाषेची ओळख होणे गरजेचे आहे. उदा: ‘बाबा‘ , त्यामुळे तुमची प्रतिक्रिया असली पाहिजे की तुला हे खेळणे हवं आहे का?” बाळ एखादा शब्द बोलले तर त्याला ती वस्तू दाखवा. त्यामुळे बाळाला त्या विशिष्ट वस्तूचे नाव समजू लागते. संवादामुळे बाळ बोलायला शिकते. जरी बाळाची बडबड निरर्थक असली तरी प्रश्नांची उत्तरे देत रहा. त्यामुळे बाळ बोलायला शिकू लागेल.

  • ४१ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळाच्या चपळ बोटांमुळे बाळाची बोटांच्या चिमटीची पकड घट्ट होईल, तुमचे बाळ आता मनगट खाली टेकवता वस्तू उचलू शकेल. बाळाला छोट्या गोष्टी आणि वस्तू जास्त आवडू लागतील त्यामुळे बाळाच्या आसपास कुठल्या हानिकारक गोष्टी तर नाहीत ना ह्याची खात्री करून घेतली पाहिजे. बाळाला फळे, भाज्या आणि फिंगर फूड चे शिजवलेले तुकडे देऊन वस्तू धरण्यास प्रोत्साहन द्या.

  • ४२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळाला तुमची आधीसारखी गरज भासणार नाही. बाळ आता उभे राहण्याचा तसेच पुढे वाकण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न करेल आणि स्वतःचे स्वतः स्वतंत्र होण्याची क्षमता दर्शवेल. बाळाला कपडे घालताना बाळाची वाढलेली उत्सुकता तुम्हाला दिसून येईल. जेवताना बाळाचे लक्ष त्यावर केंद्रित होईल आणि बाळ त्याचा कप किंवा चमचा धरण्याचा प्रयत्न करेल. बाळाला स्वतः वस्तू खाली फेकून दुसऱ्याने त्या उचलल्यास मजा येईल. ह्या वयात, बाळाला वस्तू घेणे आणि फेकण्याची कला येईल. बाळ जास्त स्वतंत्र झाल्यावर वाकणे आणि इकडे तिकडे पळण्यास तयार रहा.

  • ४३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या बाळाला आता त्याच्या मित्रांची आणि भावंडांची सोबत आवडेल. तुमच्या लक्षात येईन की बाळांना त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये रहाणे आणि खेळणे आवडेल. बाळाची सामाजिक कौशल्ये वाढण्यासाठी हा काळ चांगला आहे. त्यामुळे बाळाची इतर मुलांसोबत चांगली मैत्री होईल. जरी बाळाला मैत्रीची समजण्यासाठी बाळ आता खूप लहान असले तरी सुद्धा ह्या सुसंवादाने बाळाचा एखाद्या समूहामध्ये मिसळण्याचा पाया पक्का होईल. बाळ नुसते निरीक्षण करून आणि दुसऱ्या मुलांसोबत आनंदाने वेळ घालवत असताना बऱ्याच गोष्टी शिकेल.

बाळाची तब्येत

बाळाची हालचाल, लवचिकता, एखादी गोष्ट धरण्याची क्षमता वाढेल तसेच तुमचे बाळ गोष्टी तोंडात घालू लागेल. १० व्या महिन्यात तुमच्या बाळाला संपूर्णपणे स्वच्छ ठेवणे अशक्य आहे. तुम्ही बाळाला बागेत घेऊन गेल्यावर बाळ चिखलात खेळेल आणि गलिच्छ गोष्टी हाताळू लागेल. त्यामुळे सॅनिटायझर किंवा वाईप्स जवळ ठेवा. एखादा जास्तीचा टॉवेल जवळ ठेवा किंवा तुमच्या पर्स मध्ये स्वच्छतेसाठी एखादा कपडा ठेवा.

बाळाच्या विकासाचे टप्पे १० महिने

बाळाची आकलनविषयक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक वाढ होईल आणि त्याद्वारे बाळाचा विकास होईल. प्रत्येक श्रेणीमध्ये वाढ आणि विकासासाठी विशिष्ट टप्पा गाठणे महत्वाचे आहे.

. आकलन विषयक टप्पा:

ह्यामध्ये मानसिक चपळता, वैचारिक धैर्य आणि हुशारी ह्याचा समावेश होतो.

  • वस्तू ओळखणे: एखाद्या वस्तूचे अस्तित्व बाळ ओळखू लागते. ह्या टप्प्यावर बाळाला लक्षात येते की लपवलेल्या वस्तू अगदी संपूर्णतः अदृश्य होत नाहीत. त्यामुळे जर बाळाला आई बाबा दिसले नाहीत तर बाळाला आधीसारखी चिंता वाटत नाही.
  • उत्सुकता आणि जिज्ञासू वृत्ती: तुमचे बाळ त्यांच्या दृष्टीक्षेपात वस्तू बघण्यास उत्सुक असेल. जर बाळाच्या दृष्टिक्षेपापासून काही दूर झाले तर बाळ ते शोधण्यासाठी डोळ्याला ताण देऊन ते बघते.
  • चित्रे आणि पोस्टर्स आवडू लागतात: तुमच्या बाळाला रंगीबेरंगी गोष्टी उदा: चित्रे आवडू लागतात. बाळांना चित्रे असलेल्या गोष्टी ऐकण्यास आवडू लागतात तसेच बाळ माहिती सुद्धा साठवत असते. बाळाचा मेंदू आता चित्रे, आवाज ह्यांच्यावर प्रक्रिया करू लागते त्यामुळे समन्वय प्रक्रियेस मदत होते.
  • शब्दांचा समन्वय: तुमचे बाळ आता शब्द आणि अर्थ ह्यांचे संदर्भ लावू लागेल. बाळाला हो‘, ‘नाहीकिंवा हॅलो; ह्या शब्दांचा अर्थ समजू लागेल.
  • हावभावांची नक्कल करेल: तुमच्या बाळाला हावभाव लक्षात राहतील आणि ते त्याची नक्कल करतील. बाळ प्रतिक्रया मिळवण्यासाठी काही क्रिया करेल.
  • लोकांना संबोधित करणे: ह्या टप्प्यावर बाळ आई बाबांना ओळखू लागेल आणि त्यांना नावाने संबोधू लागेल.
  • विनंतीचे आकलन होणे: बाळाला तुम्ही केलेल्या विनंतीचे आकलन होईल आणि बाळ त्यावर प्रतिक्रिया देईल.

आकलन विषयक टप्पा. शारीरिक विकासाचे टप्पे

ह्यामध्ये १० महिन्यांच्या बाळाचे शारीरिक गुणधर्म आणि हालचाल कौशल्यांचा समावेश होतो.

  • रांगण्यात तरबेज: तुमचे बाळ रांगत रांगत तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा शोधून काढेल.
  • बोटांच्या चिमटीत वस्तू पकडणे: तुमचे १० महिन्यांचे बाळ आता तर्जनी आणि अंगठ्याचा वापर करून वस्तू पकडेल.
  • बसू लागेल: जेव्हा तुमचे बाळ पोटावर झोपून कंटाळेल तेव्हा बाळ स्वतःहून बसेल. बाळाचे पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत होतील.
  • उभे राहण्याचा प्रयत्न करतील: आधार घेऊन तुमचे बाळ उभे राहण्याचा प्रयन्त करेल आणि नंतर बाळ चालू आणि पळू लागेल.
  • चालण्याचा प्रयत्न करेल: बाळ आधार घेऊन उभे राहील , तुमचे बाळ पाऊल पुढे टाकून आपण चालू शकतो का हे पडताळून पाहिलं. तसेच बाळ आधार घेऊन एका वेळेला एक पाऊल टाकून पुढे सरकेल.
  • पुढचे दात येतील: पुढचे दात येण्यास आठव्या महिन्यात सुरुवात होईल आणि १० व्या महिन्यापर्यंत तुमच्या बाळाला दात येतील आणि बाळ अन्न चावू शकेल.
  • बाळाची दृष्टी विकसित होईल: दृष्टी पटकन विकसित होते आणि तुमचे बाळ आता हात आणि पायाचा समन्वय साधू लागते आणि त्यामुळे बाळाची दृष्टी विकसित होते.

शारीरिक विकासाचे टप्पे

. सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे:

आपल्या बाळाचा सामाजिक संवाद विकसित होईल आणि भावनिक स्वभाव सुद्धा तयार होईल

  • टाटा करणे: तुमच्या १० महिन्यांच्या बाळाला आता “bye” म्हणजे काय हे समजेल आणि बाळ तुमच्याकडे बघून हात हलवू लागेल.
  • अनोळखी व्यक्तींची भीती वाटेल: तुमच्या बाळाला अनोळखी व्यक्तींच्या सानिध्यात असुरक्षित वाटेल आणि त्यांच्या सहवासात किंवा आजूबाजूस राहण्यास बाळ नकार देईल.
  • आपल्या लोकांपासून दूर ज्यांची भीती: १० व्या महिन्यात तुमचे बाळ ओळखीच्या व्यक्तींकडेच जाईल आणि त्यांच्यापासून दूर जाताना रडेल.
  • प्रतिक्रिया: तुमच्या बाळाला अनोळखी आवाज आला किंवा जरी तुम्ही बाळाचे खेळणे घेतलेत तरी बाळ त्यास प्रतिक्रिया देईल.

विकासाचे हे टप्पे ह्या टप्प्यावर बाळाचा विकास कसा झालेलं पाहिजे ह्याची कल्पना देतात. बाळे वेगवेगळी असतात आणि त्यांच्या क्षमतेनुसार बाळाची कौशल्ये बदलतात. ह्या टप्प्याचा आनंद घ्या आणि जर काही समस्या आढळली तर त्यावर लक्ष ठेवा.

वर्तणूक

बाळाच्या आजूबाजूस लोक असल्यावर बाळाच्या प्रतिक्रियेवर लक्ष ठेवा. ह्या वयात बाळ डोळ्यांनी रोखून बघू लागते. जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याकडे त्यांचा कल असतो आणि त्यामुळे त्यांना झोप चांगली लागते. दिवसा काही तास झोपल्यास त्यांना अतिशय आवश्यक असा आराम मिळतो. ह्या अनुभवांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणि वर्तणूक विकसित होते. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मुलाला इतर मुलांशी खेळण्यात कमी रस आहे. परंतु काळजी करू नका. बाळांना ह्या वयात थोडा गर्व असतो आणि त्यांना कुणाचीही सोबत नको असते. बाळावर जवळून लक्ष ठेवा आणि कुठली वर्तणूक चांगली आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्या.

१० महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

  1. तुमच्या १० महिन्यांच्या बाळाशी खेळ खेळ आणि त्यांच्या भोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करा. त्यांना वस्तू भरणे, रिकाम्या करणे, एकावर एक रचून ठेवणे किंवा त्या ओळखणे अशा खेळांमध्ये गुंतवून ठेवा.
  1. बाळासाठी खेळण्यातील फोन आणा ज्यामधून आवाज निघेल. कानाला फोन लावून बाळाला बोलण्यात गुंतवा. त्यामुळे बाळाची बोलण्याची क्षमता वाढेल.
  1. पुस्तके वाचा आणि त्यांची पंचेंद्रिये जागृत होतील. वाचण्याने समन्वय साधण्यास मदत होते आणि बाळ जे काही बघेल ती माहिती बाळ साठवून ठेवेल.
  1. तुमच्या बाळाला आता वेगवेगळ्या भूमिका बजावायला आवडतील. काहीतरी नाटक करून बाळाच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन द्या.

१० महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची आरोग्यपूर्ण वाढ होताना बाळ विकासाचे टप्पे गाठेल. पोषण, योग्य आहार, पुरेसा आराम आणि झोप आणि बाळाला वाढवण्याचे योग्य कौशल्य ह्या सगळ्यामुळे बाळ प्रत्येक टप्प्यातून अगदी सहज पार होते. बाळाला जबरदस्ती करणे चांगले नाही आणि त्यांना स्वतःचे स्वतः शिकू द्या. प्रत्येक बाळ हे वेगळे आहे आणि प्रत्येक गोष्ट शिकण्याचा वेग प्रत्येक बाळाचा वेगळा आहे. त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवा आणि जर तुम्हाला काही वेगळं जाणवलं तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या बाळाला ह्या टप्प्यावर चांगल्या काळजीची, प्रेमाची गरज आहे.

१० महिन्यांच्या बाळाची काळजी

बाळाला भरवणे

तुमच्या बाळाचा खाण्यापेक्षा खेळकर राहण्याकडे जास्त कल असेल. अशा वेळी जास्त ताण घेऊ नका आणि बाळाच्या आहारात निरनिराळ्या पदार्थांचा समावेश करा. तोंडी कलाकुसर करून बाळाला घरी केलेले अन्नपदार्थ द्या. बाळासाठी घनपदार्थांसोबत दूध सुद्धा एक गरजेचं घटक आहे. वर्षाचे होईपर्यंत बाळाला विशिष्ट पदार्थांची श्रेणी आवडू लागते म्हणून आधीच बाळाला वेगवेगळ्या पदार्थांची ओळख करून द्या म्हणजे बाळाला ते खाण्याची सवय असेल.

बाळाची झोप

१० व्या महिन्यात बाळ दिवसातून फक्त दोनदा झोपते. जर बाळ लवकर उठले तर नाश्त्यानंतर ते झोपू शकते. तुम्हाला बाळ दमले असल्याची लक्षणे सतत दिसतील आणि तुम्हाला बाळ जांभई देताना किंवा खेळत असताना पडताना दिसेल. शांत राहा आणि दिनचर्या पाळा आणि बाळाचा दिवसाच्या आणि रात्रीच्या झोपेचा नमुना नियमित करा.

पालकांसाठी काही टिप्स

तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची काळजी घेताना खाली काही टिप्स आहेत ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.

  • बाळाला आजूबाजूला इतक्या नवीन गोष्टी दिसत असतात की बाळाचे संपूर्ण लक्ष कुठलेतरी साहस करण्याकडे असते. तुमच्या १० महिन्यांच्या बाळाच्या खेळांवर संशोधन करा आणि त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होईल असे पहा.
  • १० महिन्यांच्या टप्प्यावर बाळाचा विकास होताना वर्तणुकीत बदल होतात, संशोधन वृत्ती वाढते. बाळ काही या स्पष्ट बोलू लागते तसेच बाळाचे व्यतिमत्व सुद्धा सुधारते. बाळाला लागेल तिथे सहकार्य करा आणि प्रोत्साहन द्या.
  • बाळाचा विकास योग्य होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी १० महिन्यांच्या बाळासाठी वाढीचे तक्ते उत्तम आहेत त्यामुळे बाळाचे वजन सुद्धा वेळोवेळी पडताळून पाहता येते. बाळाच्या वाढीच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी तुमच्या बालरोगतज्ञांची मध्ये मध्ये भेट घेत जा.

१० व्या महिन्यात तुमचे बाळ आता उभे राहणे, चालणे, स्वतःचे स्वतः खाणे, चढणे इत्यादी क्रिया करू लागेल. तुमचे बाळ टॉडलर बनण्याचा हा पाया आहे तुम्ही ह्याचा आनंद घेतला पाहिजे आणि आहे त्या गतीने त्यास सामोरे गेले पाहिजे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article