Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

आपल्या बाळासोबत काही आठवडे घालवल्यामुळे तुम्ही एकमेकांना आता चांगले ओळखत आहात असा विश्वास तुम्हाला वाटू लागतो. त्यामध्ये किती तथ्य आहे हे कळण्याआधीच बाळ आणखी काही नवीन गोष्टी करणे सुरू करते. त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता आणि विचार करू लागता की आपण आपल्या बाळाला खरोखरच ओळखत नाही कि काय? काळजी करू नका, कारण ही सर्व आपल्या बाळाच्या वाढीची चिन्हे आहेत. बाळाचे त्याच्या आजूबाजूच्या जगाबद्दलचे आकलन वेगाने वाढत आहे.

३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

प्रत्येक बाळ दुसऱ्यापेक्षा थोडेसे वेगळे वाढते. म्हणूनच, बाळाची निरोगी वाढ मोजण्यासाठी कोणताही विशिष्ट नियम किंवा बेंचमार्क नाही. ३ आठवड्यांच्या बाळाची वाढ वेगाने होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले बाळ कमी कालावधीत वेगळे दिसू लागेल.

तुमचे बाळ पूर्वीपेक्षा आणखी आवाज काढण्यास सुरवात करेल आणि हळू हळू मान वळवून आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करू लागेल. डोळ्यांना थोडी स्थिरता येण्यास सुरवात होईल आणि तो एका योग्य दिशेने पाहण्यास सक्षम होईल.

तीन आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

सामान्यपणे ३ आठवड्यांच्या बाळाचे वजन आणि उंची, मुलगा आणि मुलगी ह्यानुसार निश्चित केली जाते. मुली साधारणपणे ५२५३ सेमी लांबीच्या असतात, वजन सुमारे ३.५ ते ४ किलो असते. तर मुलांची लांबी ५३५४ सेमी आणि वजन सुमारे ४.५ किलो शकते. नेहमीपेक्षा मोठ्या किंवा अकाली जन्मलेल्या मुलांची लांबी आणि उंची वर नमूद केलेल्या प्रमाणाबाहेर असू शकते.

ह्या वयातच, बाळे असंख्य प्रकारे आपली मान हलवू लागतील आणि काही आवाजांना प्रतिसाद देताना किंवा आपला चेहरा पाहताना थोडेसे हसू लागतील. आपले बाळ हळू हळू वेगवेगळे आवाज काढण्यास सुरवात करेल.

जेव्हा आपल्या बाळाच्या शरीराच्या वरच्या भागाची शक्ती वाढू लागते, तेव्हा तुमच्या देखरेखीखाली पोटावर झोपवल्यावर बाळ डोके उंचावण्याचा प्रयत्न करतो किंवा समर्थन करण्यासाठी हात वापरण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांसह, स्वतःस आधार देण्यासाठी आवश्यक सामर्थ्य बाळे विकसित करू शकतात.

तीन आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाला तुम्ही आणि इतर लोकांमधील फरक समजू शकेल. इतर बाळे आणि त्यांच्या आई बाबांशी संवाद साधून, तुमचे बाळ जीवनाचे सामाजिक पैलू समजू शकते आणि आजूबाजूच्या विविध लोकांचे निरीक्षण करू लागते.

स्तनपान/ दूध देणे

पूर्वीच्या तुलनेत ३ आठवड्यांच्या बाळाची दूध घेण्याची वारंवारिता वाढते. अधिक दूध शोषण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्यामुळे बाळाला थकवा येऊ शकतो. म्हणून बाळ दीर्घकाळ झोपते किंवा दूध पाजल्यानंतर लगेच झोपी जाते.

पोट अद्याप लहान असल्याने त्यामध्ये जास्त दूध मावत नाही त्यामुळे बाळाला वारंवार म्हणजेच दर दोन तासांनी एकदा दूध पाजावे लागेल. जर आपल्या बाळास स्तनपान देण्यास त्रास होत असेल आणि तुम्ही बाटलीने दूध देण्याचा पर्याय निवडला असेल तर हे प्रमाण दर ४ तासांनी एकदा असू शकते. नियमित रुटीन लागू करणे ह्या काळात थोडे अवघड आहे कारण बाळाची वाढ वेगाने होत असते.

झोप

दूध पिण्याची वारंवारिता वाढल्यामुळे बहुतेक वेळेस थकवा येतो आणि बाळाला लगेच झोप येते आणि बाळ झोपून जाते. बाळाला दूध दिल्यानंतर थोडे जवळ घेऊन थोपटल्यास बाळ झोपी जाते. पोट भरल्याने तुमचे बाळ समाधानी व शांत राहते आणि बाळाच्या शरीराला आता झोपले पाहिजे हे समजते.

बाळाला सतत भूक लागत असल्याने ३ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेचा विशिष्ट नमुना ठरत नाही. कारण एकदा दूध प्यायल्यानंतर काही तासांत बाळ पुन्हा दूध पिण्यासाठी तयार होईल. दूध पाजल्यानंतरसुद्धा जर बाळाला झोप लागत नसेल तर डॉक्टरांना त्याबद्दल माहिती देणे महत्वाचे आहे. अपेक्षेनुसार वजन वाढते आहे की नाही हे प्रामुख्याने तपासले पाहिजे. जन्माच्या वेळची गुंतागुंत किंवा अकाली जन्मलेल्या बाळांचे वजन वाढण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो.

झोप अधिक अनुकूल बनविण्यासाठी, आपल्या बाळास हलक्या कपड्यात लपेटून क्रिबमध्ये किंवा पाळण्यात ठेवा. काही वेळा, लहान बाळे दचकून उठतात आणि स्वत: ला किंवा क्रिबवर हाताने मारतात. कपड्यात त्यांना गुंडाळल्यामुळे अशा हालचालींवर प्रतिबंध होतो. बाळाला नेहमी पाठीवर झोपवा.

वागणूक

सर्व माणसे त्यांच्यात काही विशिष्ट प्रतिक्षिप्त क्रिया घेऊन जन्माला येतात आणि बाळांमध्ये ह्या टप्प्यावर त्या अधिक स्पष्ट होऊ लागतात. स्तनांमधून दूध ओढणे, वस्तूंचे आकलन करणे किंवा स्तनावर घट्ट पकड आणि पाय हलविणे या सर्व गोष्टी बाळ स्वतःचे स्वतः करू लागते. ह्या काळात झोपेतून जागे होणे किंवा झोपेत असताना हात पाय हलविण्यासारख्या प्रतिक्षिप्त क्रिया उद्भवू शकतात आणि हे पुढील अनेक वर्षे सुरु राहते.

जागे झाल्यावर, बाळ आधीपेक्षा कितीतरी जास्त तरतरीत वाटू लागते. कारण आवाज आणि चेहरा ओळ्खल्याचा प्रतिसाद वाढू लागतो. बाळ तुमच्या चेहऱ्यावरील नाक, कान आणि इत्यादी अवयवांवर लक्ष केंद्रित करू शकते. निरनिराळे आवाज काढणे आणि दूध हवे असल्यास जीभ दाखवणे इत्यादी गोष्टी बाळ स्वतःचे स्वतः करू लागते. कधीकधी वेगवेगळे आवाज काढते आणि हालचाली करते आणि ते सगळे आपल्यासाठी नवीन असू शकते. खात्री बाळगा, ही तुमच्या बाळाची फक्त अनोखी ओळख आहे.

३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी येथे काही टिप्स आहेत

योग्य आहार

ह्या काळात बाळाला सारखे दूध पाजणे खूप कंटाळवाणे होऊ शकते परंतु तरीही नियमितपणे दूध देणे महत्वाचे आहे. दूध पीत असताना कदाचित बाळ झोपी जाऊ शकेल किंवा स्तनपान झाल्यावर लगेच ते जागे होईल. त्यांना आवश्यक तेवढे दूध मिळत असल्याची खात्री करा.
झोपेच्या पद्धतींचे समायोजन

तुमचे बाळ झोपल्याबरोबर तुम्हाला झोपायला आवडेल, परंतु काही तासांनंतर बाळाला भूक लागल्यावर जागे व्हा. काही वेळा दूध पाजल्यानंतर काही वेळा बाळाला झोपवण्यासाठी तुम्हाला बाळाला जवळ घेऊन थोपटावे लागेल. झोप अनियमित असली तरी त्यांना चांगली झोप मिळते आहे ना हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

पोटावर झोपवण्याची वेळ

पोटावर झोपवण्याची वेळ

बाळाच्या शरीराच्या वरच्या भागाची शक्ती वाढत आहे हे त्यांना समजणे आवश्यक आहे. आपल्या बाळाला अधूनमधून त्याच्या पोटावर झोपवले पाहिजे जेणेकरून बाळ धरू लागेल किंवा आधारासाठी हातांचा वापर करु शकेल. आजूबाजूचा परिसर पाहण्याकरिता बाळ डोळे फिरवू लागेल. जर बाळ रडण्यास सुरूवात करत असेल तर, त्याला पुन्हा पाठीवर झोपवा आणि काही काळानंतर पोटावर झोपवण्याचा प्रयत्न करा.

नॅपी नियमित बदलणे

दूध पिण्याचे प्रमाण वाढल्यावर बाळाचे शी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढते. वेळेवर नॅपी बदलणे ही एक गरज बनते. नॅपी बदलण्यासाठी एखादी जागा ठरवून ठेवणे चांगले, कारण तुम्हाला स्वच्छ जागा आणि लागणाऱ्या साहित्याची शोधाशोध करावी लागणार नाही.

नाभीजवळील भागाची काळजी

ह्या काळात, आपल्या बाळाच्या नाभीजवळील नाळेचा भाग सुकलेला असतो आणि नाळ पडलेली असते. तथापि, ती जागा अजूनही थोडीशी संवेदनशील आहे. म्हणूनच, बाळाला अंघोळ घालताना काळजीपूर्वक घालणे आवश्यक आहे. नाभीजवळील भाग कोरडा राहून त्यास हवा लागली पाहिजे.

स्वच्छता

आपल्या बाळाला दररोज आंघोळ करणे आवश्यक नसले तरी बाळाच्या शरीराचे सर्व भाग स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ आवश्यक आहे. तसेच, छान अंघोळ घातल्यास बाळ शांत राहून त्यास आरामदायक वाटेल आणि बाळाला सहज झोप येण्यास मदत होईल.

शौचास नियमित होणे

काही बाळांना बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो. आपल्या बाळाला प्रत्येक वेळेला पाजल्यावर शी होते आहे कि नाही हे तपासणे महत्वाचे आहे. काही वेळा, बाटलीचे दूध पिणाऱ्या बाळांना एका दिवसात फक्त ३ वेळा शौचास होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत, जर आपल्या बाळाने २३ दिवस किंवा त्याहून अधिक काळ शौचास केलेली नसेल तर ते डॉक्टरांच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे.

चाचण्या आणि लसी

आधी सांगितल्याप्रमाणे, जर पहिल्या आठवड्याच्या सर्व लसी त्या आठवड्यात किंवा त्या पुढील आठवड्यात यशस्वीरित्या दिल्या गेल्या असतील तर ह्या आठवड्यात कोणत्याही लसींची अजिबात गरज नाही.

खेळ आणि क्रियाकलाप

ह्या वयात आपले बाळ विविध आवाज काढण्यास सुरुवात करते, त्यामुळे त्याला बोलण्यात गुंतवणे चांगले आहे. जेव्हा तुम्ही बोलू लागता तेव्हा तुमचे डोळे आणि तोंड पाहण्याचा पाहण्याचा बाळ प्रयत्न करेल आणि तुमच्याकडे पाहून तसेच करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सुद्धा पुन्हा त्याच हावभावांची पुनरावृत्ती करून बाळाशी बोलत राहा. असे केल्याने बाळ आनंदी होईल आणि तुमच्याशी कनेक्ट होईल. तुमच्या बाळास पूर्वीपेक्षा बरेच काही चांगले दिसू शकते, मजेदार चेहरे बनविणे, तुमचा हात देऊन त्याला व्यस्त ठेवणे ह्या सर्व गोष्टी एखाद्या बाळाच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आवश्यक आहे. त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत जाण्यासाठी तुमच्या दोन बोटांचा वापर करा आणि त्यासोबत हळूहळू वाढणारा आवाज करा. शेवटी कलायमॅक्सला बाळाला हसू येईल.

खेळ आणि क्रियाकलाप

आपल्या डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल?

आहार वाढल्यामुळे ह्या टप्प्यातील बाळांना अतिसाराचा सामना करावा लागतो. जर हा त्रास एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चालू राहिला आणि त्यातून रक्त पडत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

उलट्या होणे आणि थुंकणे उद्भवू शकते, परंतु एका दिवसापेक्षा जास्त काळ ते टिकू नये किंवा एकाच दिवसात सुमारे १० पेक्षा जास्त काळ तसे होता कामा नये. बाळाला दररोज शौचास होणे आवश्यक आहे. म्हणूनच, जर दोन दिवसांपर्यंत बाळाला शौचास होत नसेल तर लवकरच आपल्या डॉक्टरांना सांगा.

३ आठवड्यांत, आपले बाळ आपल्याशी अधिक वेळा संवाद साधण्यास सुरवात करेल. त्यामुळे बाळासोबतचा हे क्षण खूप आनंदाचे असतात आणि आपल्याला बऱ्यापैकी व्यस्त ठेवतात. बाळासोबत खेळण्यासाठी आपल्या पतीला सुद्धा सहभागी करून घेणे चांगले आहे कारण आपल्यालाही विश्रांतीची आवश्यकता आहे.

मागील आठवडा: तुमचे २ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ४ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article