Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास ५२ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

५२ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

५२ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता अधिकृतपणे एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!. तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करून एक वर्ष झाले आहे आणि अवघ्या एका वर्षात बाळामध्ये बरेच बदल झालेले तुम्ही पाहिले आहेत. तुमच्या बाळाने विकासाचे बरेच टप्पे गाठले आहेत आणि त्याची दररोज वाढ होत आहे. तुमचे बाळ आता लहान आहे आणि बाळाचे आता स्वतःचे व्यक्तिमत्त्व आहे. जेवणाच्या बाबतीत बाळाला त्याच्या आवडीनिवडी असतील. तुम्ही त्याच्याशी बोलाल तेव्हा त्याला ते समजेल आणि लवकरच तो चालायला सुरुवात करेल. तुमचे बाळ अक्षरशः जे काही पाहते त्याकडे बोट दाखवून ते काय आहे?’ असे विचारेल. तुमच्या बाळाच्या वयाच्या ५२ आठवड्यांत अनेक विकासात्मक बदल घडतील. ह्या लेखात त्या बदलांबद्दल जाणून घेऊयात!

तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या काळात, तुमच्या बाळाच्या खाण्याच्या तसेच झोपण्याच्या सवयी बदलू शकतात. १२ ते १४ महिन्यांच्या दरम्यान बाळांना झोपेत स्वप्ने पडू लागतात. ही स्वप्ने कधी कधी तुमच्या बाळाला घाबरवतात आणि जागे करतात. अशा वेळी, तो पुन्हा झोपेपर्यंत त्याचे सांत्वन करावे. ह्या टप्प्यावर, तुमचे बाळ, आता एक लहान मूल आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा झपाट्याने विकास होत असेल. त्याची भाषा कौशल्ये जलद गतीने विकसित होत असतील आणि तो लवकरच त्याचे हावभाव समजू न शकणाऱ्या किंवा वाहम्हणजे पाणी आहे हे माहित असणाऱ्या लोकांशी संवाद साधू शकेल. शारिरीकदृष्ट्या, जर तो धावताना अडखळत असेल, तर तो लवकरच धावेल, उड्या मारू लागेल आणि नाचू लागेल. त्याची स्वतःबद्दलची संकल्पना देखील अधिक मजबूत होईल, त्यामुळे त्याला अनोळखी लोकांशी संवाद साधणे किंवा इतर लहान मुलांसोबत खेळणे सोपे होईल. पण त्याला तुमचे प्रेम आणि पाठिंबा नेहमीच हवा असेल आणि ही त्याची अपेक्षा कायम राहील.

तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

खाली तुमच्या ५२ आठवड्याच्या बाळाचे विकासाचे टप्पे आहेत. ह्या टप्प्यांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

 • तुमचे बाळ शब्दांऐवजी वेगवेगळे हावभाव करेल.
 • तुमचे बाळ हाय फाईव्ह करू लागेल.
 • या वयाच्या आसपास बाळ पहिले पाऊल उचलेल.
 • तुमच्या बाळाने आतापर्यंत उत्तम मोटर कौशल्ये विकसित केली असतील. तो अंगठा आणि तर्जनी यांच्या साहाय्याने द्राक्षे उचलू शकतो.
 • तुमच्या बाळाला वस्तूचा स्थायीभाव समजेल.
 • तुमच्या बाळाला आता सुमारे २५ शब्द समजू लागतील आणि सोप्या एका वाक्याच्या सूचनांना बाळ प्रतिसाद देऊ शकेल.
 • बाळ त्याच्या आवडत्या गोष्टी आणि ठिकाणे ओळखू शकतो.
 • तुमचे बाळ एखादी गोष्ट दाखवून तुम्हाला प्रश्न विचारेल आणि विचारताना शब्दांचा वापर करणार नाही.

आणखी वाचा: तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

बाळाचा आहार

आता तुमचे बाळ १२ महिन्यांचे झाले आहे. आता बाळ वेगवेगळे अन्नपदार्थ खात असेल परंतु तुम्ही त्याला भरवणे सुरु ठेवले पाहिजे. तुम्ही बाळाची बाटलीची सवय मोडली पाहिजे त्यासाठी त्याला रात्रीचे दूध किंवा पाणी देताना कप मधून देण्यास सुरुवात करा. ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाला विशिष्ट अन्नपदार्थांची आवड निर्माण होईल. त्यामुळे त्याला वेगवेगळे पदार्थ देण्यास सुरुवात करा. त्याच्या भुकेपेक्षा जास्त खाण्यासाठी त्याच्यावर दबाव आणू नका. त्याला जंक फूड पासून दूर ठेवा. तो पुरेसे खात नाही अशी तुम्हाला काळजी वाटू शकते परंतु काळजी करू नका. जोपर्यंत तो सामान्य दिसतो तोपर्यंत तो ठीक आहे. दूध सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याला गाईचे दूध देण्यास सुरुवात करा. दूध पाश्चराईज्ड केलेले असल्याची खात्री करा. वाढत्या वयाच्या मुलांना संपूर्ण दुधामध्ये असलेली अतिरिक्त चरबी आणि कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते.

बाळाची झोप

ह्या टप्प्यावर, तुमचे बाळ रात्रभर झोपू शकत नाही. रांगायला सुरुवात केल्याच्या एक महिना आधी आणि नंतर तीन महिने झोपेत व्यत्यय येणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. संशोधनामध्ये असे सूचित होते की तुमच्या बाळाला आयुष्याच्या पहिल्या वर्षभरात एकूण २३ आठवडे झोपेत व्यत्यय येईल यास इंग्रजीमध्ये फसी पीरियड्सअसे म्हणतात. मानसिक आणि शारीरिक विकास होत असल्यामुळे असे होते. तसेच बाळाचा सरासरी वाढीचा वेग वाढलेला असतो आणि बाळाला दात येत असतात. सरासरी, १२ महिन्यांच्या बाळांना त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत आठ प्राथमिक दात असणे आवश्यक आहे. त्याच्या दुसया वाढदिवसापर्यंत आणखी आठ दात येतील. म्हणजेच रात्रीच्या वेळी बाळाचे दात जास्त दुखू लागतील आणि तुमची व तुमच्या बाळाची झोप अधिक विस्कळीत होईल.

बाळाला दात येत असताना वेदना होतात त्यामुळे बाळ बोटे चावू शकते

तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयी काही टिप्स

तुम्ही तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाची काळजी खालीलप्रकारे घेऊ शकता:

 • बाळाला स्तनपान देत असताना तुमची बोटे तुमच्या बाळाच्या तोंडाजवळ असतात. बाळाला दात येत असताना वेदना होतात त्यामुळे बाळ बोटे चावू शकते त्यामुळे सावध रहा.
 • तुम्हाला तुमच्या बाळाचे दूध सोडायचे असल्यास, बाळाच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि बाळाला गाईचे दूध देण्यास सुरुवात करा.
 • तुमच्या बाळाला ज्यूसचे प्रक्रिया केलेले पॅक देणे टाळा कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बाळाचे पोट भरल्यासारखे होते आणि त्याला अन्न खाण्याची इच्छा होत नाही.
 • मटार, चीज, अंडी, बीन्स आणि दही यांसारख्या विविध स्रोतांमधून तुमच्या बाळाच्या आहारात प्रथिनांचा समावेश करा.
 • आपल्या बाळाला ताजी फळे द्या, ते अत्यावश्यक जीवनसत्त्वांचे उत्तम स्रोत आहेत.
 • जेव्हा तुमचे बाळ एखादी गोष्ट दाखवून तुमच्याकडे अपेक्षेने पाहते तेव्हा नेहमी विनोद करा. त्याला आनंदाने आणि योग्य वाक्यात उत्तर द्या.
 • बाळाला वेगवेगळ्या वस्तू दाखवून नावे सांगा जेणेकरून तुमचे बाळ त्यांच्याशी परिचित होईल. ही साधी क्रिया तुमच्या बाळाच्या भाषेच्या विकासात मदत करेल.
 • चित्रांच्या पुस्तकांमधून तुमच्या बाळाला कथा सांगत रहा.
 • झोपण्याच्या वेळेची एक योग्य दिनचर्या सेट करा ज्यामध्ये आंघोळ, एक कप दूध पिणे, दात घासणे आणि झोपण्याच्या वेळेची कथा इत्यादींचा समावेश असेल.

चाचण्या आणि लसीकरण

तुमचे बाळ आता एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या बाळाचा वाढदिवस तुम्ही साजरा करणार आहातच परंतु बाळाचा विकास कसा होत आहे हे पाहण्यासाठी तुम्ही त्याला बालरोगतज्ञांकडे देखील घेऊन जावे.

. चाचण्या

तुमचे डॉक्टर तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी त्याची उंची, वजन आणि डोक्याचा घेर मोजतील आणि त्याचा आहार, झोपेच्या सवयी आणि वर्तन ह्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारतील.

. लसीकरण

तुमच्या बाळाला त्याच्या वयाच्या ५२ व्या आठवड्यात, मागील वर्षात दिलेल्या लसीकरणाच्या बूस्टर्सची गरज भासेल. ह्यामध्ये हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी, एचआयबी, पोलिओ, इन्फ्लूएंझा आणि डीटॅप इत्यादी लशींचा समावेश होतो. त्याला एमएमआर आणि चिकनपॉक्स लसीच्या पहिल्या डोसची देखील आवश्यकता असेल.

खेळ आणि उपक्रम

खाली काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत आणि ते तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत खेळू शकता:

 • तुमच्या बाळाचा हात किंवा पाय पोस्टरच्या शाईवर दाबा आणि पांढऱ्या कागदाच्या तुकड्यावर ठेवा. त्यानंतर तुम्ही या प्रिंटला फ्रेम करू शकता किंवा वंशजांसाठी जतन करू शकता.
 • हा टप्पा तुमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आसपास असल्याने, त्याला हॅपी बर्थडेकसे म्हणायचे ते शिकवा. झोपायच्या आधी, जेव्हा तो उठतो तेव्हा, किंवा तुम्हाला जिथे जमेल तिथे हॅप्पी बर्थडे हे गाणे गा. तो लवकरच तुमची नक्कल करायला शिकेल आणि वेळेत टाळ्या वाजवेल.
 • तुमचे बाळ उभे असताना त्याचे हात धरा आणि हळू हळू त्याला अवतीभोवती फिरवा जेणेकरून त्याला चालण्याची हालचाल कळेल आणि तो वेळेत स्वतःचे स्वतः चालू लागेल.
 • आता हालचाल करू लागणाऱ्या तुमच्या बाळाकडे डोकावून पहा किंवा घराभोवती लपाछपी खेळा. तुम्ही तुमचे घर बेबी प्रूफ केले असल्याची खात्री करा.

तुमच्या बाळाकडे डोकावून पहा किंवा घराभोवती लपाछपी खेळा

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमच्या ५२आठवड्याच्या बाळाच्या विकासात, तुम्हाला खालील गोष्टी लक्षात आल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या:

 • तुमच्या बाळाला स्ट्रॉबेरी, मध, गाईचे दूध, अंडी, नट किंवा इतर कोणत्याही अन्नाची ऍलर्जी असल्यास ते तपासून पहा. हे असे वय असते जेव्हा विशिष्ट अन्नामुळे बाळाला ऍलर्जी होऊ शकते, ज्यामुळे पुरळ येण्यापासून ते डोळे पाणावणे, जीभ, चेहरा किंवा हात सुजणे किंवा श्वास घेण्यात येणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. तुम्ही तुमच्या बाळामध्ये अशा काही गोष्टी पाहिल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • जर तुमच्या बाळाचे वजन कमी होत असेल आणि त्याला ताप किंवा जुलाबाची लक्षणे दिसत असतील आणि बाळ काहीही खाण्यास नकार देत असेल तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा कारण त्याला संसर्ग झाला असण्याची शक्यता असू शकते.
 • तुमच्या बाळाला गाईचे दूध देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. तुम्हाला लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, तुमचे डॉक्टर बाळाला सुद्धा कमी चरबीयुक्त दूध देण्याचा सल्ला देतात.

बाळाची काळजी घेणे सोपे नाही, परंतु तुम्ही तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करा आणि थोडा आनंद सुद्धा घ्या. तुम्ही आणि तुमच्या पतीने गेल्या वर्षभरात चांगले व्यवस्थापन केले ह्याचा अभिमान बाळगा. तुमच्या बाळाने शिशुवस्थेत प्रवेश केला आह. आता तुम्ही आणखी व्यस्त होणार आहात, त्याच्याभोवती तुम्हाला धावावे लागणार आहे. परंतु आम्हाला माहित आहे की तुम्ही आणि तुमचे पती सगळे अगदी नीट पार पडणार आहात!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article