In this Article
२१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळामध्ये काही रोमांचक बदल झालेले तुम्हाला दिसतील. आपले बाळ स्वतःचे स्वतः बसत आहे किंवा रांगण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून तुम्हाला आनंद होईल. तुमचे बाळ कदाचित तुम्हाला प्रतिसाद देईल किंवा तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करेल. तुमचे बाळ तुम्ही त्याला घ्यावे म्हणून हात उंचावेल आणि तुम्ही त्याला घेतल्यानंतर तुम्हाला घट्ट मिठी मारेल हा खरोखरच खूप हृदयस्पर्शी क्षण आहे. ह्या आठवड्यात, बहुतेक बाळे त्याच्या आजूबाजूच्या प्रौढांच्या कृती आणि शब्दांचे अनुकरण करण्यास सुरवात करतात. तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाने यापैकी काही चिन्हे आधीच दर्शविली आहेत का? आपल्या २१ आठवड्यांच्या बाळामध्ये दिसू शकतील असे विकासाचे आणि वाढीचे टप्पे शोधण्यासाठी हा लेख वाचा.
२१–आठवड्यांच्या बाळाचा विकास
२१ व्या आठवड्यात तुमच्या बाळामध्ये शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उल्लेखनीय प्रगती दिसू शकते. त्याचे वजन सुमारे १४ ते १६ पौंड असेल आणि त्याची श्रवणशक्ती आणि दृष्टी सुधारत जाईल. जेव्हा तुम्ही त्याचे नाव घ्याल तेव्हा तो तुमच्याकडे लक्ष देईल. तुमचे बाळ आनंद, चिंता, चिडचिडेपणा आणि कंटाळवाणेपणासारख्या अनेक भावना दर्शवू शकतो
२१ व्या आठवड्यात, तुमचे लहान बाळ आईपासून विभक्त झाल्यामुळे अस्वस्थता देखील दाखवू शकेल. दुसर्याकडे गेल्यावर तुमचे बाळ रडण्यास सुरुवात करू शकते. जर तुमच्या बाळाच्या बाबतीत हे सामान्यपणे घडत असेल तर नवीन लोकांशी परिचित होण्यासाठी तुम्ही बाळाला पुरेसा वेळ दिला पाहिजे. तुमचे बाळ त्याचा पहिला शब्द आता कधीही बोलेल. तो बहुतेक वेळा ऐकत असलेल्या आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न करेल.
तुमचे २१ आठवड्यांचे बाळ विकासाचे कोणकोणते टप्पे गाठू शकेल ते पाहूया.
२१ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
प्रत्येक बाळ त्याच्या स्वत: च्या गतीने विकसित होते. तर, प्रत्येक बाळासाठी विकासात्मक टप्पे भिन्न असू शकतात. बहुतेक २१ आठवड्यांच्या बाळांचे येथे काही सामान्य विकासाचे टप्पे दिलेले आहेत:
- आतापर्यंत बाळाच्या चवकळ्या अधिक विकसित झाल्या आहेत. तुमचे बाळ आपल्या तोंडात ठेवू शकतील अशा वस्तू तोंडात घालेल
- काही बाळांना या आठवड्यात बसता येईल, बहुतेक बाळांना बसल्यावर आधाराची गरज भासू शकते
- तुमच्या बाळाची दृष्टी सतत विकसित होते. तो हलणाऱ्या आणि लहान आकाराच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करू शकेल
- तुमच्या बाळाचे स्नायू अधिक मजबूत होत आहेत. तो पोटावर पालथे पडण्यास सुरुवात करू शकतो
- तुमचे बाळ बोबडी बडबड करेल किंवा गुर्रर्र असे नवीन आवाज काढेल. असे आवाज काढून तो कदाचित त्याच्याभोवती ऐकू येत असलेल्या आवाजाची पुनरावृत्ती करीत असेल
- तुमचे बाळ हसू लागेल तसेच तुम्ही केलेले मजेदार चेहरे आणि आवाजांचा आनंद घेऊ लागेल
- या आठवड्यात काही बाळांना दात येण्यास सुरूवात होते. अधिक लाळ गळणे, हिरड्यांना सूज येणे किंवा बाळाची चिडचिड वाढणे ही सगळी बाळाला दात येत असल्याची लक्षणे आहेत
बाळाचा आहार
तुमच्या बाळाची भूक वाढलेली पाहून तुम्हाला आनंद होईल. तुम्ही तुमच्या बाळाला शांत वातावरणात खायला देऊ शकता कारण त्याच्या सभोवतालच्या वातावरणात तो विचलित होण्याची शक्यता कमी असेल आणि चांगले खाऊ शकेल. या आठवड्यात आहार देण्याची पद्धत बदलू शकते. बाळाला खाताना किंवा दूध पिताना डुलकी येऊ शकते. बाळाची दूध पिण्याची वारंवारिता कमी होऊ शकते कारण बाळाला त्या वेळेस झोपायला आवडते.
२१ व्या आठवड्यात बाळाच्या आहारात घन पदार्थांचा परिचय करून जाऊ शकतो. परंतु, बाळाला घनपदार्थांचा परिचय करून दिल्यावर सुद्धा तुम्ही बाळासाठी काही महिने स्तनपान सुरु ठेवणे आवश्यक आहे. या वयात जर बाळाला वेळेवर आणि हवे तसे स्तनपान दिले तर, बाळाच्या पौष्टिक गरजा भागवण्यासाठी स्तनपान पुरेसे आहे. लगेच घनपदार्थांची ओळख करून देण्याची घाई नाही. घनपदार्थ खाणे बाळे जास्त पसंत करीत असल्याने स्तनपान नाकारू शकतात.
बाळाची झोप
तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेमध्ये बदल झालेले असूनही झोपेचे वेळापत्रक नियमित होऊ शकते. तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेच्या नमुन्यांविषयी काही मुख्य मुद्दे येथे आहेतः
- तुमचे बाळ रात्रभर झोपू शकत नाही, परंतु तो रात्री जास्त तास झोपू शकतो
- तहान व भूक यामुळे बहुतेक बाळ रात्री उठतात. सहसा, आपल्या बाळाला स्तनपान देऊन त्याला शांत राहण्यास आणि झोपण्यास मदत करावी
- तथापि, या टप्प्यात बाळ थोड्या थोड्या वेळाने थोडे झोपू शकेल. दिवसभर वारंवार छोटी झोप (सुमारे ४५ मि.) घेण्याची अधिक शक्यता असते
- रात्री बाळ झोपण्याच्या आशेने बाळाला झोपेच्या वेळेस जास्त खायला घालणे चांगले नाही. जास्त सेवन केल्याने पोटशूळ होऊ शकते आणि बाळ जागे राहू शकते
- २१ आठवड्यांच्या बाळांचा झोपेचा त्रास या टप्प्यातील वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या बाळाला रात्री झोप येत असेल परंतु अनपेक्षितरित्या रात्री जागे होणे किंवा झोपेच्या समस्या उद्भवू लागतात. वाढीस उत्तेजन मिळाल्यामुळे त्याला झोपेचा त्रास होत आहे.
जसे जसे तुमच्या बाळाचे वय वाढते, तसे तुम्हाला बाळाची काळजी वेगवेगळ्या प्रकारे घ्यावी लागेल. या आठवड्यादरम्यान, तुमच्या लहान बाळाकडे थोडे अधिक लक्ष देण्याची आणि धैर्याची आवश्यकता असेल. पुढच्या आठवड्यात तुमच्या बाळाचे आरोग्य निरोगी, आनंदी आणि वाढीसाठी तयार होण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी? चला पाहूया.
तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाचे संपूर्ण आरोग्य आणि योग्य वाढीसाठी या टिप्सचे अनुसरण करा:
- बाळाचे पडणे टाळण्यासाठी ग्राउंड सेटिंग्ज किंवा गाद्यांचा वापर करणे योग्य आहे कारण आता तुमचे बाळ स्वतःचे स्वतः पालथे पडू लागले आहे
- तुमच्या बाळाला दात येत असेल तर त्याला सुखदायक आणि सुरक्षित खेळणी किंवा चकती देऊ शकता
- बाळाची इतर खेळणी सुद्धा निर्जंतुक करणे आवश्यक आहे कारण बाळ ती खेळणी तोंडात घालू शकतो .
- जेव्हा तुमचे बाळ लहान वस्तू किंवा खेळण्यांशी खेळत असेल तेव्हा त्याकडे लक्ष द्या, कारण त्यामुळे बाळाला धोका निर्माण होऊ शकतो
- तुमचे घर चाइल्डप्रूफ करा आणि लटकणाऱ्या केबल्स किंवा बाळाच्या हाताशी येतील अशा वस्तू दूर करा, ज्या तो खाली खेचून स्वतःला दुखापत करू शकतो
- जर तुमचे बाळ सतत लाळ गाळत असेल तर बिब्स जवळ ठेवा
- डायपर पुरळ टाळण्यासाठी खराब झालेले डायपर वारंवार बदला, क्षेत्र योग्य प्रकारे स्वच्छ करा आणि दररोज बाळाला काही काळ डायपरशिवाय राहू द्या.
या टिप्स सोबत, तुम्ही तुमच्या बाळाचे लसीकरण वेळापत्रक अद्ययावत ठेवणे जरुरीचे आहे. त्याबद्दलही चर्चा करूया.
चाचण्या आणि लसीकरण
२१ आठवड्यांत जर तुमच्या बाळाच्या ४ महिन्यांच्या लसी द्यायच्या राहिल्या असतील तर तुमच्या डॉक्टरांशी भेटीची वेळ प्राधान्याने ठरवू शकता.
तुमच्या बाळाला मोटर आणि संज्ञानात्मक कौशल्याची निर्मिती करणारे पुरेसे क्रियाकलाप मिळतील याची खात्री करणे हा बाळाची काळजी घेण्याचा आणखी एक भाग होय. लेखाच्या पुढील भागात, तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळू शकाल असे खेळ आणि क्रियाकलाप यावर चर्चा करू.
खेळ आणि क्रियाकलाप
खेळ आणि क्रियाकलाप हे तुमच्या बाळामध्ये शारीरिक आणि मानसिक विकास घडवून आणतात आणि तुमच्या बाळामध्ये आणि तुमच्यामध्ये बंध निर्माण करण्यासाठी देखील मदत करतात. तुम्ही तुमच्या बाळासोबत आनंद घेऊ शकता असे काही खेळ आणि क्रियाकलाप ह्यांची यादी इथे दिलेली आहे.
- ग्राउंड टाइम – जमिनीवर चटई अंथरा आणि तुमच्या बाळास जास्त वेळ चटईवर खेळण्याचा आनंद घेऊ द्या. त्याला तुम्ही सुरुवातीला पाठीवर झोपवू शकता आणि त्याला हवे तेवढ्या वेळा पालथे पडू देऊ शकता. बहुतेक बाळे २१ व्या आठवड्यांत शोध घेण्यास सुरवात करतात आणि हळूहळू आजूबाजूच्या परिसराचा शोध घेऊ लागतात. बराच वेळ तुमच्या देखरेखीखाली बाळाला जमिनीवर ठेवल्यास क्रिबमध्ये असल्यापेक्षा बाळ सुरक्षित असते आणि बऱ्याच आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घेऊ शकते.
- बसणे – आपल्या बाळास बसण्यास मदत करा. त्याला आधार देण्यासाठी त्याच्याभोवती काही उशा ठेवा.
- आवाजाच्या दिशेचा शोध घ्या – वाजणारे/ संगीत असणारे खेळणे मिळवा आणि काही आवाज काढण्यासाठी ते हलवा किंवा प्ले करा . जोपर्यंत बाळ आवाजाच्या दिशेने जात नाही तोपर्यंत हे करत रहा. आवाजा ची दिशा बाळाने शोधल्यावर पुन्हा दिशा बदला. जेव्हा तुमचे बाळ बसलेले असाल तेव्हा आपण हे क्रियाकलाप देखील करु शकता.
- आवाज – तुमचे बाळ संवाद साधायला शिकण्यासाठी, शक्य तितक्या वेळा त्याच्याशी बोला आणि तुम्ही बोलत असताना बाळ तुमच्याकडे पहात आहे याची खात्री करा. अखेरीस, तुमचे बाळ तुमच्या ओठांच्या हालचालीचे अनुकरण करेल आणि अगदी तसेच आवाज काढण्याचा प्रयत्न करेल
- त्यांचे मनोरंजन करा – नाही, तुमच्या लहान बाळाचे दररोज मनोरंजन करण्यासाठी एखादा परफॉरमन्स सेट करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी फक्त तुमच्याकडे गडद रंगांची खेळणी असणे आवश्यक आहे, बाळ दातांनी चावू शकेल अशी खेळणी, संगीत खेळणी, रॉली–पॉलि खेळणी इत्यादी. अशी खेळणी बाळाचे लक्ष वेधून घेऊ शकतात.
- बेबी गेम्स – त्याच्या कौशल्यांचा विकास सुरू ठेवण्यासाठी पीकाबू, इट्स बिट्ससी स्पायडर, लिटिल पिगी, खेळणी/ऑब्जेक्ट इत्यादी सारखे खेळ खेळा.
आपल्या लहान चिमुकल्याची काळजी घेण्याची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. डॉक्टरांच्या पुढच्या नियोजित भेटीच्या आधी बाळाला जर आरोग्यविषयक समस्या आल्या तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
बालरोगतज्ञांचा सल्ला कधी घ्यावा?
२१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती अद्याप पूर्ण विकसित झाली नाही. म्हणून, त्याला सामान्य सर्दी आणि फ्लूचा धोका असू शकतो. तुमच्या बाळाचे नाक सतत वाहत असेल, बाळाला ताप आलेला असेल किंवा तो सतत रडत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीकधी, बाळांना पोटशूळ होतो. आईच्या अंतःप्रेरणेचे पालन करणे आणि आपल्याला काहीतरी चुकीचे वाटत असल्यास बालरोगतज्ञांना कॉल / सल्ला घेणे चांगले आहे.
तुमचे २१ आठवड्यांचे बाळ आता वेगाने विकसित होत आहे. हा प्रवास कंटाळवाणा असू शकतो, पण खात्रीने तो रोमांचक असेल. बाळासोबत तुमचा बंध आणखी घट्ट करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालवा कारण तो लवकरच मोठा होणार आहे. लक्षात ठेवा, मातृत्वाचा आनंद घेण्याची ही एक चांगली वेळ आहे!
मागील आठवडा: तुमचे २० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे २२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी