Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)

गरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)

गरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)

गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील नाजूक काळ असतो. आई व बाळ निरोगी राहण्यासाठी अत्यंत काळजी घेणे जरुरीचे असते. गर्भवती स्त्री आणि बाळाची तब्येत तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध चाचण्यांपैकी ट्रान्स्व्हजायनल अल्ट्रासाऊंड स्कॅन (टीव्हीएस) ही आजच्या काळातील सर्वात विश्वासार्ह चाचणी आहे. ट्रान्स्व्हजायनल अल्ट्रासाऊंड हा स्कॅनचा एक प्रकार आहे. ह्या स्कॅन द्वारे डॉक्टरांना स्त्रीच्या पुनरुत्पादक अवयवांची तपासणी करता येते आणि बाळाचा विकास कसा होतो आहे हे ठरविण्यास मदत होते. तुम्ही गर्भवती असल्यास, ट्रान्स्व्हजायनल स्कॅन बद्दल ह्या लेखाद्वारे जाणून घ्या आणि ते का केले जाते ह्याविषयी सुद्धा ह्या लेखामध्ये माहिती दिलेली आहे.

ट्रान्स्व्हजायनल स्कॅन म्हणजे काय?

सर्व अल्ट्रासाऊंड चाचण्या गर्भवती महिलेच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा प्राप्त करण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी साउंड वेव्हज वापरतात. बाळामध्ये कुठले व्यंग तर नाही ना ह्याचे निदान करण्यासाठी ह्या चाचण्या डॉक्टरांना मदत करतात. ट्रान्स्व्हजायनल स्कॅन मध्ये सुद्धा हेच तत्व लागू केले जाते. ह्या चाचणी दरम्यान, डॉक्टर अंडाशय, योनी, ग्रीवा, बीजवाहिन्या आणि गर्भाशय ह्यासारख्या स्त्रीच्या प्रजनन अवयवांची तपासणी करतात. ही चाचणी म्हणजे त्या अवयवांची अंतर्गत तपासणी आहे. ह्या तपासणी दरम्यान डॉक्टर योनीमार्गात अल्ट्रासाऊंड प्रोब घालतात आणि ध्वनी लहरी गर्भाशयातील बाळाची प्रतिमा तयार करतात. प्रतिमेचा आकार मोठा करून डॉक्टर बाळामध्ये कुठली विकृती किंवा विसंगती असेल तर ओळखतात.

ट्रान्स्व्हजायनल स्कॅन म्हणजे काय?

टीव्हीएसची आवश्यकता केव्हा असते?

गर्भवती स्त्रीला गर्भपात किंवा एक्टोपिक गर्भधारणेचा इतिहास असल्यास किंवा वेदना अथवा रक्तस्त्राव होत असल्यास किंवा स्त्रीने वंध्यत्वाचा उपचार घेतलेले असतील तर डॉक्टर पहिल्या सहा ते दहा आठवड्यांतच टीव्हीएस स्कॅन करण्याचे सुचवतात. ही चाचणी गर्भारपणाच्या १० आठवड्यांनंतर ते गरोदरपण संपेपर्यंत केव्हाही केली जाते. स्त्रीची आधी अकाली प्रसूती झालेली असेल तर ही चाचणी करण्याची गरज असते. अशा वेळी स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखाची चाचणी करण्याची गरज असते. जर गर्भवती स्त्रीचे वजन जास्त असेल आणि नियमित स्कॅन करून प्रतिमा सुस्पष्ट दिसत नसतील तर ही चाचणी करण्यास सांगितले जाऊ शकते.

टीव्हीएस करण्यास किती वेळ लागतो?

ट्रान्स्व्हजायनल स्कॅन करण्यास सुमारे ३० ते ६० मिनिटे लागतात, यामध्ये चाचणीसाठी गर्भवती स्त्रीला तयार करण्याच्या वेळेचा देखील समावेश असतो. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या कालावधीत, म्हणजेच १० आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच बाळाची वाढ कशी होते आहे ह्याची डॉक्टरांना तपासणी करायची असल्यास ही चाचणी डॉक्टर करतात. ह्या चाचणीद्वारे डॉक्टरांना बाळ बघता येते. ह्या टप्प्यावर बाळ खूप छोटेसे असते आणि आईच्या गर्भाशयात ते खालच्या बाजूला असते त्यामुळे नेहमीच्या स्कॅन मध्ये ते दिसत नाही.

ट्रान्स्व्हजायनल स्कॅन का केले जाते?

ही चाचणी केल्याने डॉक्टरांना बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकता येतात. तसेच बाळामध्ये व्यंग असेल तर ते शोधता येते. ट्रान्स्व्हजायनल अल्ट्रासाऊंड चाचणीचा आणखी एक फायदा म्हणजे डॉक्टरांना एक्टॉपीक प्रेग्नन्सी ची शक्यता आहे का ते बघता येते . आणि गरोदरपण सुरळीत सुरु असल्याची खात्री करता येते . जुळे किंवा तिळे असल्यास ते सुद्धा ह्या चाचणीद्वारे लक्षात येते. जर गर्भवती स्त्रीला हलके डाग किंवा रक्तस्रावाचा त्रास होत असेल किंवा तिला वेदना होत असतील तर डॉक्टर त्यामागचे कारण शोधून काढण्यासाठी ही चाचणी करतात.

ट्रान्स्व्हजायनल स्कॅन का केले जाते?

टीव्हीएसची तयारी कशी करावी?

ही चाचणी करताना कमरेच्या खालील भागातील कपडे काढून ठेवण्याची गरज असल्याने चाचणी करायला जाताना स्लॅक्स किंवा सलवार कुर्ता असे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. ही चाचणी डॉक्टर किंवा टेक्निशियन मार्फत केली जाते . तुम्हाला स्त्री डॉक्टर किंवा स्त्री टेक्निशियन कडून ही चाचणी करून घ्यायची असेल तर तसे क्लिनिक मध्ये आधीच सांगून ठेवावे. बऱ्याच स्त्रियांना टीव्हीस चाचणी नेहमीच्या अल्ट्रासाऊंड पेक्षा जास्त सोयीची वाटते कारण ह्या चाचणीला मुत्राशय संपूर्ण भरलेले असणे आवश्यक नसते. किंबहुना मूत्राशय रिक्त असल्यास बाळाची प्रतिमा स्पष्टपणे पाहायला मिळते.

ट्रान्स्व्हजायनल स्कॅन प्रक्रिया

तुम्ही ट्रान्स्व्हजायनल स्कॅनसाठी करण्यासाठी जात असल्यास, तुम्हाला ह्या प्रक्रियेबद्दल माहिती असणे जरुरीचे आहे. तर, तुम्हाला काय काय करायला सांगितले जाऊ शकते ते पुढीलप्रमाणे कंबरेखालचे कपडे काढून ठेवल्यावर तुम्हाला पाठीवर झोपायला सांगितले जाते आणि पाय गुडघ्यात वाकवून घ्यायला सांगितले जाते. नर्स बेडशीटने कंबरेखालील भाग झाकून घेईल. डॉक्टर तुमच्या योनीमार्गात अल्ट्रासाऊंड प्रोब दोन ते तीन इंच आतमध्ये घालतील. प्रोब आतमध्ये नीट जाण्यासाठी त्याला जेल लावली जाते. तुम्हाला सुरुवातीला थोडे अस्वस्थ वाटू शकते परंतु तुम्ही दीर्घ श्वास घेऊन आरामात रहा त्यामुळे तुमची चाचणी लवकर होईल तसेच तुम्हाला वेदना होणार नाहीत.

स्कॅन नंतर काय होते?

तुम्हाला स्कॅन दरम्यान तणावग्रस्त वाटत असल्यास तुमचे स्नायू थोडा वेळ दुखल्यासारखे वाटतील. तुम्हाला सुरुवातीला अस्वस्थ वाटू शकेल आणि स्कॅन नंतर थोडे हलके डाग दिसतील. गर्भाशयाच्या मुखाजवळील रक्तवाहिन्याना इजा झाल्यामुळे साधारणपणे असे होते. परंतु ते नॉर्मल आहे. पण रक्तस्रावासोबत तुम्हाला पोटात दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

ट्रान्स्व्हजायनल स्कॅन: जोखीम आणि दुष्परिणाम

ट्रान्सव्हाजयनल स्कॅन मध्ये रेडिएशनचा वापर नसल्यामुळे ते आई आणि बाळासाठी सुरक्षित मानले जाते. या प्रकारच्या इमेजिंग तंत्रामध्ये कोणताही धोका नाही. तथापि, जर तुम्हाला चाचणी करताना अत्यंत अस्वस्थ वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना सांगा.

चाचणीच्या निकालावरून काय कळते?

टीव्हीएसच्या निकालांचे विश्लेषण रेडिओलॉजिस्टद्वारे केले जाते आणि नंतर ते डॉक्टरांकडे पाठवले जातात ह्या चाचणीच्या निकालावरून डॉक्टरांना गर्भवती स्त्रीमध्ये फायब्रॉइड् , अल्सर, कर्करोग, ओटीपोटाचा संसर्ग, गर्भपात, कमी सखल नाळ, एक्टोपिक गर्भधारणा आणि सामान्य गर्भधारणा यासारख्या स्थितीचे निदान करण्यात मदत होते.

चाचणीच्या निकालावरून काय कळते?

ट्रान्स्व्हजायनल स्कॅनला किती खर्च येतो?

टीव्हीएससाठी येणारा खर्च शहरांनुसार बदलू शकते. तुम्ही निवडलेल्या मेडिकल सेंटर नुसार सुद्धा हा खर्च बदलतो. परंतु टीव्हीएस स्कॅनची किंमत सरासरी ७०० ते ११०० रुपयांपर्यंत असते.

सामान्य प्रश्न

. टीव्हीएसमुळे गर्भपात होऊ शकतो का?

ट्रान्स्व्हजायनल अल्ट्रासाऊंड प्रशिक्षित व्यावसायिकांद्वारे केल्यास गर्भपात होण्याचा धोका नसतो. इतर कोणत्याही गरोदरपणातील अल्ट्रासाऊंड प्रमाणे, टीव्हीएस सुद्धा सुरक्षित समजला जातो आणि काळजी करण्याची आवश्यकता नसते.

. टीव्हीएस वेदनादायक आहे का?

तुम्ही ताण घेतल्यास आणि चाचणी दरम्यान तुमचे स्नायू घट्ट राहिल्यास टीव्हीएस स्कॅन वेदनादायक असू शकते. वेदना होऊ नयेत म्हणून चाचणीच्या आधी आणि चाचणी दरम्यान आरामात रहा आणि दीर्घ श्वास घ्या. तथापि, तरीही वेदना होत राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीव्हीएस दरम्यान तुम्हाला किरकोळ अस्वस्थता जाणवू शकते आणि विचित्र वाटू शकते, परंतु ह्या चाचणीचे निकाल विश्वसनीय आहेत आणि ते २४ तासांच्या आत उपलब्ध होतात. बाळ आणि आईच्या अंतर्गत अवयवांची स्पष्ट प्रतिमा मिळविण्यासाठी या जोखीममुक्त चाचणीची शिफारस केली जाते.

आणखी वाचा:

गरोदरपणात ताप येणे
गरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article