Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात मेथी दाण्यांचे सेवन (फेनुग्रीक सीड्स) करणे

गरोदरपणात मेथी दाण्यांचे सेवन (फेनुग्रीक सीड्स) करणे

गरोदरपणात मेथी दाण्यांचे सेवन (फेनुग्रीक सीड्स) करणे

मेथी ही एक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचे मूळ आशिया आणि भूमध्य प्रदेशात आहे. मेथीचे दाणे स्वयंपाकात आणि औषधी कारणांसाठी वापरले जातात. मेथीच्या दाण्यांची चव तीव्र असते आणि ते कच्चे खाल्ल्यास त्यांची चव कडू लागते. परंतु मेथ्यांचे विविध आरोग्य विषयक फायदे आहेत त्यामुळे लोक मेथी दाणे खातात. मेथीचे दाणे पचन आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि पचन संस्था मजबूत करण्यासाठी वापरतात. ह्या बिया मासिक पाळीच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि प्रसूतीस उत्तेजन देण्यासाठी देखील ओळखल्या जातात. पण तुम्ही गरोदरपणात मेथी दाणे खाऊ शकता का?

गरोदरपणात मेथी दाण्यांचे सेवन करण्याचे फायदे

मेथीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. गरोदरपणात मेथी दाण्यांपासून आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात. गरोदरपणात मेथीचे सेवन करण्याचे काही फायदे येथे दिलेले आहेत.

  • गरोदरपणात मेथीचे दाणे खाणे गर्भावस्थेतील मधुमेहासाठी नैसर्गिक लढाऊ म्हणून काम दिलेले करते.
  • गरोदरपणात स्तनांची वाढ होते आणि ते सामान्य आहे. गरोदरपणात स्तन कोमल होतात आणि ते वेदनादायक असू शकते. परंतु, मेथीचे सेवन केल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. काही मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी ते पाणी गाळून प्या.
  • मेथीमुळे प्रसुतीदरम्यानच्या वेदना कमी होण्यास मदत होते आणि आकुंचन कालावधी कमी करण्यास देखील मदत होते असे दिसून आले आहे.
  • गरोदरपणात मेथी खाल्ल्यास साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.
  • मेथ्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार, इन्फ्लूएन्झा आणि विविध प्रकारच्या ऍलर्जींशी लढण्यास मदत होते.

गरोदरपणात किती मेथी दाणे खावेत?

तुम्ही गरोदर असताना मेथी तुमच्या शरीराला मदत करू शकतात, परंतु तुम्ही त्यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश केला पाहिजे. मेथ्यांच्या दाण्यांचे कमी प्रमाणात सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. ऍलर्जी टाळण्यासाठी आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करण्यासाठी मेथ्यांची मदत होऊ शकते. तुमचा चयापचय दर वाढवण्यात मदत करणारा हा एक उत्तम घटक आहे. मेथ्यांचा तुमच्या आहारात तुम्ही कसा समावेश करू शकता ते येथे दिलेले आहे.

तुम्ही एक चमचा मेथीच्या बिया एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि नंतर ते पाणी गाळून सकाळी प्या. तसेच, तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांमध्ये एखादा चमचा मेथ्या घालू शकता. दुसरा पर्याय म्हणजे मेथीच्या बिया पाण्यासोबत गिळणे. पाण्यासोबत मेथ्या गिळल्यास बियांचा प्रभाव कमी होईल. तुम्ही तुमच्या आहारात मेथीची पाने वापरू शकता. दिवसातून एक मुठभर स्वच्छ पाने तुम्ही खाऊ शकता. परंतु मेथीच्या बिया आणि पाने कमी प्रमाणात खावीत.

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात मेथीचा समावेश करण्यासाठी टिप्स

खालील प्रकारे तुम्ही तुमच्या आहारात मेथीच्या दाण्यांचा समावेश करू शकता:

  • स्वयंपाक करताना, विशेषतः भारतीय पदार्थ करताना अर्धा चमचा मेथी दाणे घाला. अशा प्रकारे तुमचे जेवण अधिक चवदार बनते आणि तुम्हाला मेथी दाण्यांचे फायदे देखील मिळतात.
  • मेथीची पाने किंवा मेथ्या घालून तुम्ही भाजी बनवू शकता.परंतु, अन्नपदार्थ जास्त मसालेदार बनवू नका. कडूपणा कमी करण्यासाठी तुम्ही थोडा गूळ घालू शकता.
  • दररोज सॅलड तयार करण्यासाठी पालक किंवा लेट्युसची पाने वापरा. त्यामुळे तुमचे पोट हलके आणि ताजेतवाने राहील.
  • मूठभर मेथीचे दाणे थोड्या पाण्यात रात्रभर भिजवा, बिया गिळून टाका. दिवसाची सुरुवात सजलीत होऊन आणि पौष्टिक पदार्थ खाऊन करा.
  • मूठभर स्ट्रॉबेरी, सब्जा, मध, दही आणि मेथीचे दाणेएकत्र करून स्मूदी तयार करा. त्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास मदत होईल.
  • मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसर्‍या दिवशी ते पाणी सूपसाठी वापरा. भिजवलेल्या मेथीच्या बिया बारीक करून मटणाच्या सूप मध्ये घाला. त्यात भाज्या, मांस आणि मसाला घाला आणि उकळू द्या. हे अत्यंत उच्च पौष्टिक मूल्य असलेले हलके डिनर असू शकते.
  • मेथीदाण्यांची पावडर करा आणि पावडर एका ग्लास टरबूजाच्या रसात घाला. चवदार आणि उत्साहवर्धक मॉकटेल बनवण्यासाठी त्यात थोडे लिंबू पिळून घ्या.
  • एक ग्लास कोमट दुधात अंबाडी, मेथी दाणे, धणे पावडर आणि हळद मिसळा आणि प्या. यामुळे घसादुखी आणि सर्दीपासून आराम मिळू शकतो.
  • थोडे आले आणि लसूण किसून घ्या, दोन चमचे पाणी घालून मिक्सर मध्ये चांगली पेस्ट करून घ्या. मांस किंवा माश्याना मॅरिनेशन करण्यासाठी आले लसूण पेस्टमध्येमेथी दाण्यांची पूड,  रोझमेरी आणि थाईम घाला.

गरोदरपणात मेथी दाण्यांचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम

गरोदरपणात मेथीचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही वेळा त्यामुळे आरोग्यास धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. गरोदरपणात मेथीच्या सेवनाने उद्भवू शकणारे काही दुष्परिणाम खाली नमूद केले आहेत.

  • मेथी दाण्यांमुळे गर्भाशयाचे आकुंचन होते, म्हणून प्रसूतीच्या वेळेला मेथीदाण्यांचे सेवन करण्यास सांगितले जाते. परंतु तुम्ही 37व्या आठवड्यापूर्वी मेथी दाणे खाणे टाळले पाहिजे कारण यामुळे अकाली प्रसूती होऊ शकते.
  • मेथीचे दाणे खाल्ल्याने सूज येणे, गॅस, अतिसार आणि मळमळ होऊ शकते.
  • काही लोकांना नैसर्गिकरित्या मेथीची ऍलर्जी असते. जर तुम्हाला मेथ्यांची ऍलर्जी असेल तर सूज येणे, नाक बंद होणे आणि घरघर होणे यासारख्या समस्या येऊ शकतात.
  • मेथीचे दाणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात.
  • प्रसूतीपूर्वी मेथीचे दाणे खाल्ल्यास बाळाला शरीराचा असामान्य वास येऊ शकतो.परंतु, ह्या वासाचा बाळावर दिर्घकालीन परिणाम होत नाही.

गरोदरपणात मेथी दाण्यांचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम

गरोदरपणात मेथीचे दाणे खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते परंतु मेथी दाणे खाण्याने  काही वेळा आरोग्यविषक गुंतागुंत देखील निर्माण होऊ शकते. विशेषकरून जर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी मेथीदाणे खाल्ले तर हा त्रास होऊ शकतो. मेथी दाण्यांचे किंवा पानांचे कमी प्रमाणात सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि ऍलर्जी टाळण्यास मदत होते. परंतु, तुमच्या आहारात मेथीचे दाणे किंवा पाने समाविष्ट करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुमच्या डॉक्टरांनी परवानगी दिली तर तुम्ही मेथीदाण्यांचा आहारात समावेश करू शकता.  तुम्ही ऍलर्जीच्या सर्व लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. ऍलर्जी झाल्यास, लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुम्ही नियमितपणे किती मेथीदाण्यांचे सेवन केले पाहिजे.  तुमच्या शरीराच्या पोषणविषयक गरजा काय आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी चांगल्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

गरोदरपणात मखान्याचे (लोटस सीड्स) आरोग्यविषयक फायदे
गरोदरपणात काबुली चणे (छोले) खाणे – आरोग्यविषयक फायदे आणि

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article