Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात मासे खाणे – सुरक्षित की असुरक्षित?

गरोदरपणात मासे खाणे – सुरक्षित की असुरक्षित?

गरोदरपणात मासे खाणे – सुरक्षित की असुरक्षित?

गरोदरपणात मासे खावेत की खाऊ नयेत ह्याविषयी तुम्हाला परस्पर विरोधी मते वाचायला मिळतील. त्यामुळे मासे खाणे सुरक्षित आहे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होईल. परंतु, माशांमध्ये बरेच सकारात्मक गुण आहेत. माशांच्या काही जाती वगळता, गरोदरपणात मासे खाणे सुरक्षित मानले जाते. ह्या लेखात, आपण गरोदरपणात मासे खाण्याच्या सर्व संभाव्य पैलूंवर चर्चा करू आणि शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

व्हिडिओ: गरोदरपणात मासे खाणे सुरक्षित की असुरक्षित?

गर्भवती स्त्रीने मासे खावेत का?

हा प्रश्न बहुसंख्य गरोदर स्त्रियांना सतावत असतो. उत्तर अगदी सरळ आहे होय, तुम्ही मासे खाल्ले पाहिजेत! परंतु, आपल्याला मासे काळजीपूर्वक निवडावे लागतील. तुम्ही माश्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. तुमच्या बाळाचा विकास चांगला होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषक तत्वांची गरज असते आणि माश्यांकडून पौष्टिक मूल्ये बऱ्याच प्रमाणात मिळतात. माशांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते परंतु व्हिटॅमिन डी आणि प्रथिने यांसारखी पोषकतत्त्वे जास्त असतात. हे पौष्टिक घटक विकसनशील बाळासाठी आवश्यक असतात. माश्यांमधील घटक निरोगी गर्भधारणेला देखील मदत करतात. तुमचे डॉक्टर तुम्हाला विशेषतः पहिल्या तिमाहीमध्ये मासे खाण्यास सांगतील. शिवाय, माशांमध्ये दोन आवश्यक ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, आणि ते म्हणजे इपीए आणि डि एचए. हे सर्व घटक इतर पदार्थांमध्ये शोधणे कठीण आहे परंतु बाळाच्या विकासासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे गरोदरपणात तुमच्या आहारात मर्यादित प्रमाणात माशाचा समावेश करण्यास हरकत नाही.

सर्वात प्रथम, आपण मासे घेण्यासाठी बाजारात जाण्यापूर्वी काही सामान्य समस्यांबद्दल चर्चा करूया!

माशांमध्ये असलेला पारा

पारा केवळ पाण्यातच नाही तर आपण श्वास घेत असलेल्या हवेतही आढळतो.जलद औद्योगिकीकरणामुळे, रासायनिक उद्योग, पॉवर प्लांट, सिमेंट प्लांट आणि उत्पादक कंपन्यांद्वारे हवेत अधिक पारा सोडला जात आहे. थर्मोमीटर, फ्लोरोसेंट दिवे, थर्मोस्टॅट्स इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये देखील पारा असतो आणि नद्या आणि समुद्रात त्यांची विल्हेवाट लावल्याने पाणी प्रदूषित होते. जीवाणू पाण्यात स्थिरावलेल्या पाऱ्याचे मिथाइलपारामध्ये रूपांतर करतात. जेव्हा मासे या पाण्यात पोहतात आणि इतर जीवांची त्यांना मेजवानी मिळते तेव्हा पारा त्यांच्या प्रणालीमध्ये प्रवेश करतो आणि माश्यांच्या स्नायूंमध्ये राहतो. सर्वात चिंताजनक वस्तुस्थिती अशी आहे की मासे शिजवल्यानंतरही पारा स्नायूंमध्ये राहतो.

माश्यांमध्ये अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. आणि हे सर्व पौष्टिक घटक गर्भवती स्त्रीला निरोगी गर्भ वाढवण्यासाठी आवश्यक असतात. परंतु, आपण खातो त्या माशांमध्ये अनेक विषारी पदार्थ आणि प्रदूषक घटक असतात. ह्या माशांचे सेवन केल्यावर मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. पाऱ्याचे प्रमाण जर कमी असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर फारसा प्रभाव पडत नाही. अभ्यासात असे दिसून आले आहे की जर पाऱ्याची पातळी उच्च राहिली आणि अनियंत्रित राहिली तर बाळाच्या न्यूरोलॉजिकल विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. एक माता म्हणून, तुम्हाला गरोदरपणातील पाऱ्याचा धोका दूर करायचा आहे आणि म्हणूनच, ह्या काळात कमी पारा असलेले मासे खाणे चांगले आहे. त्याबद्दल आपण खालील लेखात चर्चा करू.

आता, तुम्ही किती मासे खाऊ शकता यावर एक नजर टाकूया कारण, इतर कोणत्याही पदार्थांप्रमाणे, मासे जास्त प्रमाणात खाल्ल्याने देखील परिणाम होतात.

गरोदर असताना किती प्रमाणात मासे खावेत?

एफडीए (अन्न आणि औषध प्रशासन) आणि इपीए (पर्यावरण संरक्षण एजन्सी) सारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सी दर आठवड्याला दोन किंवा तीन सर्व्हिंग, म्हणजे, ८ ते १२ औंस (२२६ ते ३४० ग्रॅम) कमी पारा असलेल्या माशांची शिफारस करतात. स्तनपान करणाया मातांनी देखील आपल्या बाळाला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यासाठी त्याच सूचनांचे पालन केले पाहिजे.

जास्त प्रमाणात मासे खाल्ल्याने गर्भाच्या विकासास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आणि, एक आई म्हणून, तुम्हाला मासे खाण्याचे संभाव्य धोके माहित असणे आवश्यक आहे. आपण चुकून उच्चपारा असलेल्या माशांचे सेवन केल्यास, काय करू शकतो यावर देखील एक नजर टाकूया.

गरोदरपणात जास्त पारा सेवनाचे धोके

माशामध्ये असलेल्या मिथाईल पाऱ्याचे सेवन केल्यावर आपल्या शरीराद्वारे ते शोषले जाते आणि ते नाळेतून बाळापर्यंत पोहोचते. मिथाइलपाऱ्याची पातळी कमी असली तरीसुद्धा बाळाच्या मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दृष्टी, भाषा, मोटर कौशल्ये तसेच लक्ष आणि स्मरणशक्ती यांसारखी संज्ञानात्मक कौशल्ये यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर पाऱ्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून, गर्भवती स्त्रियांनी त्या कोणत्या प्रकारचे मासे खात आहेत यावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे.

उच्च पारा असलेले मासे तुम्ही खाल्ले असल्यास काय करावे?

जास्त पारा असलेले मासे तुम्ही चुकून खाल्ले असतील तर घाबरू नका. सर्वात आधी अश्या माशांचे सेवन थांबवा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुमच्या अवयवातून धातू काढून टाकण्यासाठी औषधे देऊन चिलेशन थेरपी सुचवू शकतात. चेलेशन थेरपी तुमच्या शरीराला पाऱ्यापासून मुक्त होण्यास आणि त्याचे परिणाम कमी करण्यास मदत करेल.

उच्चपारा असलेल्या माशाचा तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे आता तुम्हाला माहिती आहे . चला तर मग माशांचे काही आरोग्य विषयक फायदे पाहू या. लक्षात ठेवा की हे फायदे मिळविण्यासाठी, तुम्ही फक्त पारा नसलेल्या किंवा पाऱ्याचे प्रमाण कमी असलेल्या माशांचे सेवन करणे आवश्यक आहे.

गरोदरपणात मासे खाण्याचे आरोग्य विषयक फायदे

गर्भवती महिलेच्या दैनंदिन आहारात माश्यांचा समावेश करण्याचे खरोखरच काही मोठे फायदे आहेत. ते फायदे खालीलप्रमाणे:

 • मासे प्रथिनांचे शक्तिशाली स्त्रोत आहेत. ही प्रथिने आवश्यक अमीनो ऍसिडसने बनलेली असतात. गर्भाच्या वाढीस मदत होते. ही प्रथिने केस, हाडे, त्वचा आणि बाळांच्या स्नायूंच्या पेशी तयार करण्यासाठी मदत करतात.
 • तांबूस पिवळट रंगाचा मासा डीएचए, ओमेगा३ फॅटी ऍसिडचा एक उत्तम स्रोत आहे, आणि तो बाळाच्या मेंदूच्या विकासास चालना देण्यासाठी ओळखला जातो. ओमेगा ३ चा चांगला पुरवठा गर्भवती महिलांना त्यांच्या बाळाची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूची क्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच, तिसऱ्या तिमाहीत बाळाची वाढ खूप वेगाने होते आणि या कालावधीत मासे खाणे विशेषतः महत्वाचे आहे.
 • माशांचे सेवन केल्यानंतर डीएचए आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे वाढलेले सेवन देखील गरोदरपणातील मूड स्विंग्स आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी मदत करतात.
 • जर आईला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मासे खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. मासेयुक्त आहार रक्त गोठणे आणि रक्तातील चरबीचे प्रमाण कमी करते, त्यामुळे गरोदर स्त्रियांमधील हृदयविकाराचा धोका कमी होतो.
 • ज्या स्त्रियांना माशाचे सेवन केल्याने किंवा इतर सप्लिमेंट्सद्वारे पुरेशा प्रमाणात ओमेगा३ मिळते अश्या स्त्रियांना मुदतपूर्व जन्माचा धोका कमी असतो.

गर्भवती स्त्रीने मासे खावेत का?

तर, गरोदरपणात तुम्ही कोणते मासे खाऊ शकता किंवा कोणते मासे टाळावेत? चला शोधूया!

गरोदरपणात तुम्ही खाऊ शकता असे मासे

रेस्टॉरंटमध्ये जेवताना किंवा घरी स्वयंपाक करताना, तुम्ही गरोदरपणात खाण्यासाठी सुरक्षित माशांची यादी लक्षात ठेवावी. तुम्ही सॅल्मन, कोळंबी मासा, कॅटफिश, क्रॅब, कॉड, लॉबस्टर, क्लॅम्स आणि ट्राउटची निवड करू शकता. हलिबट, कोळंबी आणि स्नॅपर दर आठवड्याला १ पेक्षा जास्त सर्व्हिंग खाऊ नये, तर वर नमूद केलेले इतर मासे तुम्ही आठवड्यातून २३ साविंग्ज तुम्ही खाऊ शकता. सर्व्हिंगचा आकार हा माशाचा प्रकार आणि तो कसा तयार केला गेला आहे ह्या आधारावर बदलू शकतो. परंतु माशांचे एकच सर्व्हिंग सहसा ३६ औंस (८५ ते १७० ग्रॅम) इतके असते. तुम्ही एफडीए (अन्न आणि औषध प्रशासन) आणि इपीए (पर्यावरण संरक्षण एजन्सी) द्वारे शिफारस केलेले प्रमाण फॉलो करू शकता, परंतु जोखीम कमी करण्यासाठी ते मर्यादित करण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा. तसेच, मासे ताजे असल्याची खात्री करा आणि जिथे शक्य असेल तिथे सेंद्रिय पद्धतीने शेती केलेले मासे मागवा. गरोदरपणात किंग मॅकरेल, मार्लिन, शार्क, स्वॉर्डफिश, टाईलफिश, अही टूना आणि बिगये ट्यूना खाणे टाळा, कारण त्यात पारा जास्त प्रमाणात असतो.

गरोदरपणात तुम्ही खाऊ शकता असे मासे

अलीकडे, सॅल्मन आणि फार्मेड सॅल्मनमध्ये आढळणारे पीसीबी (पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स) च्या उच्च पातळीबद्दल परस्परविरोधी अहवाल आले आहेत. पीसीबी विषारी रसायने आहेत आणि त्यांचा कर्करोगाशीही संबंध आहे. सुरक्षित राहण्यासाठी, तांबूस पिवळट रंगाचा किंवा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला सॅल्मन खा.

गरोदर असताना कुठले मासे टाळावेत?

माश्यांमध्ये असलेला पारा हा घटक मासेप्रेमींसाठी मासे खाण्यास प्रतिबंध करण्यास कारणीभूत आहे. मिथाइलपारा हे एक प्रकारचे न्यूरोटॉक्सिन आहे. जेव्हा त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते. गरोदरपणात, शार्क, किंग मॅकरेल, स्वॉर्डफिश आणि टाईलफिश यासारखे मासे पूर्णतः टाळले पाहिजेत. तुम्ही सुशी, सेविचे आणि साशिमी यासह सर्व प्रकारचे कच्चे मासे देखील टाळावेत कारण त्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. त्याचप्रमाणे, रेफ्रिजरेटेड स्मोक्ड माशांपासून लिस्टेरियाचा धोका असतो (एक गंभीर जीवाणूजन्य संसर्ग) आणि असे मासे टाळावेत.

गरोदर असताना कुठले मासे टाळावेत?

तसेच, सहज गमतीने पकडलेले मासे खाणे टाळा आणि ते खाण्यापूर्वी शक्य असल्यास त्यामधील पाण्याची माहिती तपासा. अशा प्रकारचे मासे खाण्यापूर्वी तुम्ही त्वचा आणि अतिरिक्त चरबी काढून टाकली पाहिजे.

कॅन केलेला ट्यूना गरोदरपणात खाणे सुरक्षित आहे का?

कॅन केलेला ट्युना हा उच्च जोखमीचा मासा म्हणून ओळखला जातो. परंतु, गरोदर स्त्रिया हा मासा खाऊ शकतात. हा मासा खाण्याचे प्रमाण मर्यादित असावे आणि हा मासा त्यांचे प्रमुख अन्न नसावा. अधूनमधून ट्यूना खाल्ल्याने तुमच्या बाळाला इजा होणार नाही. परंतु, अल्बेकोर ट्यूना (ज्याला पांढरा ट्यूना देखील म्हणतात) टाळा कारण त्यात पारा जास्त प्रमाणात असतो हे सर्व ज्ञात आहे. इतर जातींपेक्षा हलक्या ट्यूनाला प्राधान्य द्या.

कॅन केलेला ट्यूना गरोदरपणात खाणे सुरक्षित आहे का?

व्यावसायिक मासेमारी उद्योग चांगल्या प्रकारे नियंत्रित असतात, आणि म्हणून, रेस्टॉरंट्स आणि सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असलेले कॅन केलेले मासे गरोदरपणात खाण्यासाठी सुरक्षित असतात. कोणत्याही प्रकारचे मासे खाण्यापूर्वी जोखीम आणि फायदे पहिले पाहिजेत किंवा जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेबद्दल काळजी वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्ही स्थानिक पाण्यात पकडलेले मासे खाऊ शकता का?

स्थानिक पाण्यात पकडले जाणारे मासे खाण्यासाठी असुरक्षित असतात. ह्याचे कारण म्हणजे नद्या आणि समुद्रांचे प्रदूषण कालांतराने वाढले आहे. इंडस्ट्रीमधून समुद्रामध्ये, प्रक्रिया न केलेली रसायने सोडली जातात. ज्या ठिकाणी पाऱ्याच्या प्रमाणावर कोणतेही निरीक्षण केले जात नाही अशा ठिकाणचे मासे गरोदरपणात खाणे टाळावे. तसेच अशा ठिकाणी मासे पकडणे टाळणे चांगले.

ओमेगा३ मिळविण्यासाठी माशांना पर्याय आहेत का?

जर तुम्हाला माश्यांची चव आवडत नसेल किंवा धार्मिक कारणांसाठी तुम्ही मासे खाणे टाळत असाल आणि तुम्हाला गरोदरपणात ओमेगा -3 फॅटी ऍसिडच्या सेवनाबद्दल काळजी वाटत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मासे आणि माशांच्या तेलांव्यतिरिक्त, नैसर्गिकरित्या ओमेगा -3 फॅटी ऍसिड मिळवण्यासाठी तुम्ही खालील खाद्यपदार्थ खाऊ शकता:

 • अक्रोड हे ओमेगा३ फॅटी ऍसिडचे समृद्ध स्रोत आहेत आणि गरोदरपणात दुपारचा नाश्ता म्हणून मूठभर अक्रोड तुम्ही खाऊ शकता.

गरोदरपणात अक्रोड तुम्ही खाऊ शकता

 • ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण संतुलित करण्यासाठी अन्न शिजवताना ऑलिव्ह ऑइल वापरा. परंतु ह्या तेलामध्ये कॅलरी जास्त असल्याने त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करा.

गरोदरपणात ऑलिव्ह ऑइल तुम्ही खाऊ शकता

 • अंबाडीच्या बिया ओमेगा३ चे आणखी एक मौल्यवान स्त्रोत आहेत. न्याहारी किंवा संध्याकाळच्या जेवणात अंबाडीच्या बिया दही किंवा ओट्समध्ये घालून तुम्ही खाऊ शकता.

गरोदरपणात अंबाडीच्या बिया तुम्ही खाऊ शकता

मासे खाण्याआधी ते सुरक्षित आणि पोषक तत्वांनी समृद्ध असल्याची खात्री करण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत:

मासे योग्यरित्या शिजवण्यासाठी टिप्स

योग्य पद्धतीने मासे शिजवल्याने दूषित घटक नष्ट होण्यास मदत होते. ह्या दूषित घटकांमुळे तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला हानी पोहोचू शकते. पौष्टिक आणि चवदार पद्धतीने माशांचे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत

 1. कोळंबी, लॉबस्टर आणि ऑयस्टरसह सर्व सीफूड कोणत्याही दूषित घटकांना दूर करण्यासाठी मासे ७५ °C च्या तापमानाला शिजवले पाहिजेत.
 2. शिंपले त्यांचे कवच उघडल्यास उत्तम प्रकारे शिजवले जातात. नीट शिजवलेले नसल्यास त्यांचे सेवन करू नका.
 3. ताजे, तसेच रेफ्रिजरेटेड सीफूड खरेदी करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. मासे हवाबंद कंटेनरमध्ये बंद करा आणि जर तुम्ही ते ताबडतोब वापरणार नसाल तर ते फ्रिज करा.
 4. स्वच्छतेच्या उद्देशाने भाज्या आणि मांस तसेच मासे यांच्यासाठी वेगवेगळे कटिंग बोर्ड वापरा.
 5. दूषित होण्याची शक्यता जास्त असल्याने कच्चे अन्न पूर्णपणे टाळावे. किमान गरोदरपणात सुशी आणि इतर कच्च्या माशांना तुमच्या स्वयंपाकघरातून काही काळ बाहेर ठेवा.

गरोदरपणात चांगले शिजवलेले मासे थोड्या प्रमाणात खाणे चांगले असते. त्याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि तुम्ही मासे खाणे योग्य आहे का हे तपासून पहा. लक्षात ठेवा, गरोदरपणाच्या काळात तुम्हाला आणि तुमच्या बाळाला विविध पोषक तत्वांची गरज असते. योग्य सावधगिरी बाळगून मासे खाल्ल्यास तुम्हाला हे पौष्टिक घटक नक्कीच मिळू शकतात.

आणखी वाचा:

गरोदरपणात अंडी खाणे
गरोदरपणात चिकन खाणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article