Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात काजू खाणे – फायदे आणि दुष्परिणाम

गरोदरपणात काजू खाणे – फायदे आणि दुष्परिणाम

गरोदरपणात काजू खाणे – फायदे आणि दुष्परिणाम

जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही काय खाल्ले पाहिजे ह्याविषयी तुम्हाला बरेच सल्ले मिळतील. आणि इतकी सगळी माहिती लक्षात ठेवताना तुम्ही भांबावून जाल! तुम्ही कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी दोनदा विचार कराल आणि गरोदरपणात तो पदार्थ खाणे सुरक्षित आहे की नाही ह्याची काळजी कराल. परंतु गरोदरपणात टाळले पाहिजे परंतु नंतर तुम्ही खाऊ शकता असे बरेच पदार्थ आहेत! गरोदरपणात तुम्ही संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे खाण्याव्यतिरिक्त, सुकेमेवा आणि नट्स देखील खाऊ शकता.  ह्या लेखात तुम्हाला गरोदरपणात काजू खाण्याबद्दल सर्व माहिती मिळेल. काजू पौष्टिक, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असतात – परंतु काजू खाणे गर्भवती स्त्रियांसाठी सुरक्षित आहेत का? जाणून घ्या!

गरोदरपणात काजू खाणे सुरक्षित आहे का?

होय, जर तुम्ही योग्य काळजी घेत असाल तर गरोदरपणात काजू खाणे सुरक्षित आहे. चविष्ट काजूला नाही म्हणणे खूप कठीण आहे. काजूमध्ये असलेले पौष्टिक घटक आणि तोंडाला पाणी आणणारी चव यांचे उत्तम मिश्रण म्हणजे काजू. ही वस्तुस्थिती काजूला आणखी मोहक बनवते. गरोदरपणात काजू खाताना योग्य काळजी घेतल्यास, दुष्परिणामांची काळजी न करता काजूचे सुरक्षितपणे सेवन केले जाऊ शकते. बाळाच्या निरोगी विकासासाठी, गर्भवती स्त्रीने कॅल्शियम, जीवनसत्त्वे, जस्त, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे यांचे सेवन करणे आवश्यक आहे. काजूमधून ही सर्व आवश्यक पोषक तत्वे तुम्हाला मिळू शकतात. काजू कमी प्रमाणात खा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.

गरोदरपणात काजू खाण्याचे पोषणविषयक फायदे

काजू म्हणजे नैसर्गिक जीवनसत्वाच्या गोळ्या आहेत कारण प्रत्येक औंस (28 ग्रॅम) काजूमध्ये 9 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 4.3 ग्रॅम प्रथिने आणि 13 ग्रॅम चरबी असते. पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून काजूचे काही फायदे येथे दिलेले आहेत:

 • काजूमध्ये बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे असतात. गरोदरपणात खाण्यासाठी काजू हे एक आदर्श स्नॅक्स आहे
 • काजूमधील जिवाणूविरोधी गुणधर्म संक्रमणाशी लढण्यास मदत करू शकतो
 • गर्भारपणाचा काळ हा अनेक स्त्रियांसाठी कठीण काळ असू शकतो परंतु काजू खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते
 • काजूमधील तंतुमय पदार्थ हे बद्धकोष्ठता आणि अतिसाराशी लढण्यास मदत करू शकतात
 • प्रत्येक औंस काजूमध्ये 7मिलीग्राम लोह असते. अशा प्रकारे काजू हे लोहयुक्त पदार्थांपैकी एक असू शकते. काजूचे इतर पदार्थांसोबत सेवन केल्यावर 27 मिलीग्राम/दिवस लोहाचे सेवन पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. गर्भवती स्त्रियांना लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा धोका जास्त असतो. त्यांना गरोदरपणात जास्त लोहाची गरज असते. ही लोहाची गरज आहारात काजूचा समावेश करून पूर्ण करता येते. अशा प्रकारे काजू अशक्तपणाशी लढण्यास मदत करू शकतात
 • काजू मॅग्नेशियमचा समृद्ध स्रोत आहेत. त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. स्नायू मध्ये येणारे पेटके, उच्च रक्तदाब, थकवा आणि मायग्रेनपासून सुटका होण्यास मदत होते
 • एक औंस काजूमध्ये 8एमसीजी (मायक्रोग्राम) व्हिटॅमिन के असते. गर्भवती स्त्रियांना या टप्प्यावर जास्त रक्तस्त्राव होऊ नये म्हणून दररोज 90 एमसीजी या महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वाची आवश्यकता असते
 • गरोदरपणात काजू (तांब्याचा एक चांगला स्रोत) खाल्ल्यास गर्भाच्या रक्तपेशींचा विकासही वेगाने  होतो. एक औंस काजूमध्ये 6मिलीग्राम तांबे असते आणि गर्भवती स्त्रीची दररोज 1 ग्रॅम तांब्याची गरज पूर्ण करण्यात मदत होते

गरोदर असताना काजू खाण्याचे फायदे

गरोदरपणात काजू खाण्याचे काही आरोग्यविषयक फायदे येथे दिलेले आहेत:

 • काजू तुमच्या बाळाला वाढीच्या वयात आवश्यक जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे पुरवतील
 • गरोदरपणात हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि दात किडणे टाळण्यासाठी काजू खाल्ल्यास मदत होऊ शकते
 • तुमच्या गरोदरपणाच्या आहारात काजूचा समावेश केल्याने तुमच्या लिपिड प्रोफाइलची पातळी योग्य राखण्यात मदत होऊ शकते, खासकरून जर तुम्हाला गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता असेल तर ह्याची जास्त मदत होते

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात काजूचा समावेश करण्याचे मार्ग

गरोदरपणात काजू खाल्ल्याने तुमच्या पोषणविषयक गरजा पूर्ण होऊ शकतात. तर मग तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या काजूचा आहारात समावेश कसा करू शकता ते येथे दिलेले आहे!

 • काजू खाण्याचा एक आदर्श मार्ग म्हणजे ते इतर सुक्या मेव्यामध्ये मिसळून पौष्टिक नाश्ता बनवणे

काजू बरोबर ड्रायफ्रूट मिसळा

 • तुम्ही ब्लेंडरमध्ये काजू घालू शकता आणि काजू बटर बनवू शकताआणि ते फळे तसेच भाज्यांसोबत चविष्ट डिप म्हणून खाऊ शकता.

काजू बटर

 • खमंग चवीसाठी तुम्ही तुमच्या तळलेल्या भाज्यांमध्ये अगदी शेवटी काजू घालू शकता किंवा ते तुमच्या न्याहारीच्या सीरिअल्स मध्ये घालू शकता.

भाजलेल्या भाज्यांमध्ये काजू

 • ते भारतीय, थाई आणि मेडिटेरिअन पाककृतींचे अविभाज्य भाग आहेत. चॉकलेट आणि मिष्टान्नामध्ये देखील तुम्ही काजू घालून खाऊ शकता.

 काजूसह थाई आणि भूमध्यसागरीय पाककृती

तुम्ही सिरपमध्ये काजू घालू शकता आणि सकाळच्या नाश्त्याच्या पॅनकेकसाठी ते उत्कृष्ट टॉपिंग बनेल.

 पॅनकेकच्या टॉपिंगसाठी सिरपमध्ये काजू घाला

गरोदरपणात खाण्यासाठी तुम्ही सेंद्रिय काजू का निवडावे?

ऑरगॅनिक काजू, आकाराने लहान असले तरी ते पौष्टिक आणि चविष्ट देखील आहेत! तणनाशके आणि कीटकनाशके न वापरता ते नैसर्गिक पद्धतीने पिकवले जात असल्याने त्यांची मूळ चव टिकून राहते आणि ते आरोग्यासाठीही चांगले असतात. सेंद्रिय काजू तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे इत्यादींनी समृद्ध असतात त्यामुळे ते गर्भवती स्त्रियांसाठी उत्कृष्ट असतात.

गर्भाच्या सर्वांगीण वाढीस देखील काजूमुळे मदत होते आणि गरोदरपणातील आवश्यक पोषक तत्वांसह आईच्या शरीरासाठी ते पूरक असतात. हे अष्टपैलू आणि निरोगी अन्न गर्भवती स्त्रियांसाठी आवश्यक आहे.

गरोदरपणात काजू खाण्याचे काही हानिकारक परिणाम होतात का?

काजू पौष्टिक असले तरी सुद्धा ते जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जर तुम्ही शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात काजूचे सेवन करीत असाल, तर तुमचे वजन जास्त वाढू शकते कारण काजूमध्ये कॅलरी  खूप जास्त असतात. जर सेवन सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल तर गर्भवती स्त्रियांना मूत्रपिंड आणि पित्त मूत्राशयाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. याचे कारण म्हणजे काजूमध्ये ऑक्सलेट्स असतात त्यामुळे गर्भारपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

काजू खाताना घ्यावयाची काळजी

गरोदरपणात काजूचे सेवन करताना काही खबरदारी घ्या

 • साधे काजू खा. मसालेदार काजू खाऊ नका. खारट आणि मसाला काजूमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गरोदरपणात जास्त प्रमाणात काजू खाणे टाळले पाहिजे
 • गरोदरपणात दररोज एक औंसपेक्षा जास्त काजू खाऊ नये,  कारण तसे केल्यास अस्वस्थता वाटू शकते
 • जर तुम्हाला काजूची ऍलर्जी असेल तर तुम्ही काजू खाऊ नका. शिंका येणे, खोकला, त्वचेवर पुरळ येणे, त्वचेची जळजळ आणि अपचन ही काजूच्या ऍलर्जीची लक्षणे असू शकतात. या लक्षणांकडे लक्ष द्या!
 • गरोदरपणात तुमच्या दैनंदिन आहारात काजूचा समावेश करणे योग्य आहे का हे तुमच्या डॉक्टरांना विचारा

कमी प्रमाणात खाल्ल्यास गरोदर स्त्रियांना काजूचे खूप फायदे होऊ शकतात. तुमचा गरोदरपणाचा प्रवास तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असणार आहे, त्यामुळे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगा. तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत आवश्यक ती सर्व काळजी घ्या. तुमच्या बाळाला हानी पोहोचवू शकतात अश्या गोष्टी टाळा. तुम्हाला निरोगी गर्भारपणासाठी शुभेच्छा!

आणखी वाचा:

गरोदरपणात बदाम खाणे
गरोदरपणात अक्रोड खाण्याचे फायदे आणि जोखीम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article