Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘प’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘प’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘प’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

जर तुम्ही पहिल्यांदाच पालक झालेले असाल तर बाळाचे नाव ठेवण्याबाबत तुम्ही उत्साही असाल आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक नावांपैकी कुठले चांगले आहे ह्या विचारात असाल. पालक आपल्या बाळामध्ये स्वतःचे प्रतिबिंब बघतात आणि म्हणून बाळाचे नाव खूप विचारपूर्वक ठेवतात. अशावेळी पालकांच्या डोक्यात खूप गोष्टी असतात जसे की बाळाचे नाव छोटे असले पाहिजे, नाव खूप वेगळे आणि युनिक हवे. ह्याव्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात एखाद्या अक्षराविषयी झुकते माप असते किंवा काही लोक बाळाचे नाव ठेवण्याआधी त्याच्या जन्मराशीचा आधार घेतात. तर एवढ्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्यानंतर बाळाचे एखादे छानसे गोड नाव ठेवणे जरा चॅलेंजींग होते.

म्हणून आम्ही एखाद्या विशेष अक्षराने सुरु होणाऱ्या नावांची सिरीज सुरु केली आहे. हा लेख म्हणजे त्याच सिरीजचा भाग आहे. इथे आम्ही मुलांसाठी अक्षराच्या नावांचे संकलन केले आहे आणि ही नावे संकलित करताना वरील सर्व मुद्द्यांचा विचार केलेला आहे. ह्याव्यतिरिक्त आम्ही आपणाला सांगू की अक्षराने सुरु होणाऱ्या नावांचे लोक खूप बुद्धिवान आणि प्रतिभाशाली असतात. हे लोक खूप हजरजबाबी असतात आणि लोकांच्या मनात त्यांची प्रतिमा एक उदार व्यक्तिमत्व म्हणून असते.

ने सुरु होणारी मुलांची नावे

खाली दिलेल्या यादीमध्ये मुलांसाठी अक्षराने सुरु होणारी १५० नावे आहेत. ही नावे आम्ही खास तुमच्यासाठी संकलित केलेली आहेत.

अक्षराने सुरु होणारी नावे नावाचा अर्थ धर्म
पद्म कमळ,हत्ती हिंदू
पद्मकांत कमळासारखी कांती असलेला हिंदू
पद्मनयन कमळासारखे डोळे असलेला हिंदू
पद्मनाभ श्रीविष्णू हिंदू
पद्मपाणी ज्याच्या हातात कमळ आहे असा हिंदू
पद्मलोचन कमळासारखे डोळे असलेला हिंदू
पद्माकर कमळांचा ताटवा हिंदू
पद्माक्ष कमळासारखे डोळे असलेला हिंदू
प्रकाश उजेड हिंदू
प्रकीर्ति ख्याती हिंदू
प्रजापती एका राजाचे नाव हिंदू
प्रद्योत उज्जयिनीचा राजा हिंदू
प्रणव ओंकार हिंदू
प्रणित पवित्र अग्नी हिंदू
प्रताप पराक्रम हिंदू
प्रतीक मूर्ती हिंदू
प्रत्युष प्रभात हिंदू
प्रतोष आनंद हिंदू
प्रथित प्रख्यात हिंदू
प्रथम पहिला हिंदू
प्रथमेश गणपती हिंदू
प्रदीप दिवा हिंदू
प्रफुल्ल टवटवीत हसरा हिंदू
प्रभव जन्म हिंदू
प्रभंजन झंझावात हिंदू
प्रभाव जागृत हिंदू
प्रभाकर सूर्य हिंदू
प्रभात प्रातःकाळ हिंदू
प्रभास सौंदर्य, कांती हिंदू
प्रभाशंकर कांतिमय, श्रीशंकर हिंदू
प्रभुदास ईश्वराचा सेवक हिंदू
परमानंद मोक्षानंद, ब्रम्हानंद हिंदू
परमेश सर्वश्रेष्ठ ईश्वर हिंदू
प्रमोद आनंद हिंदू
प्रल्हाद एक विष्णुभक्त हिंदू
प्रवीण कुशल, तरबेज हिंदू
पवन वायू हिंदू
परशुराम विष्णूचा सहावा अवतार हिंदू
प्रशांत शांत, धीरगंभीर हिंदू
प्रसन्नवदन प्रसन्न चेहऱ्याचा हिंदू
प्रसाद कृपा, शांती, कल्याण हिंदू
प्रज्ञेश बुद्धीचा देव, गणपती हिंदू
पराग फुलातील केशर हिंदू
प्राजक्त प्राजक्ताचे फुल हिंदू
प्राण जीव हिंदू
पराशर एका ऋषीचे नाव हिंदू
प्रीतम प्रिय हिंदू
प्रितीश प्रीतीचा अधीश हिंदू
पारितोष संतोष, आवड हिंदू
परिमल सुवास हिंदू
परिमित पुरेशा प्रमाणात असलेला हिंदू
परीक्षित कसोटीस उतरलेला हिंदू
प्रियवदन गोड चेहऱ्याचा हिंदू
प्रेम प्रीती हिंदू
प्रेमकुमार प्रेमी हिंदू
प्रेमनाथ प्रेमाचा स्वामी हिंदू
प्रेमानंद प्रेम हाच आनंद मानणारा हिंदू
प्रियंक आवडता हिंदू
पुनीत पवित्र हिंदू
पूर्णचंद्र पौर्णिमेचा चंद्र हिंदू
पुरु विपुल हिंदू
पुरुषोत्तम नरश्रेष्ठ हिंदू
पुष्कर कमळ, तलाव हिंदू
पृथ ऋषिपुत्र हिंदू
पृथ्वीराज एका राजाचे नाव हिंदू
पृथू ऋषिपुत्र हिंदू
प्रेमल प्रेमळ हिंदू
प्रेयस प्रिय हिंदू
परेश विष्णू हिंदू
परन्जय वरुण, शुद्ध हिंदू
पल्लव पालवी, अंकुर हिंदू
पाणिनी आद्य संस्कृत आचार्य हिंदू
पारसनाथ एक जैन तीर्थंकर हिंदू
पिनाकीन शंकराचे नावे हिंदू
प्रियंवद आवडेल असे बोलणारा हिंदू
प्रियांक लाडका हिंदू
पितांबर रेशमी पिवळे वस्त्र हिंदू
पुष्पकांत फुलांचा स्वामी हिंदू
पुष्पसेन एक गंधर्व विशेष हिंदू
पुष्पेन्द्र फुलांचा इंद्र हिंदू
पंकज कमळ हिंदू
पंचम निपुण, सूर हिंदू
पंडित विद्वान, चतुर, तरबेज हिंदू
पंढरी पंढरपूर हिंदू
पंढरीनाथ श्रीविठ्ठल हिंदू
पुंडलिक प्रसिद्ध विठ्ठल भक्त हिंदू
प्रबळ शक्तिवान हिंदू
प्रभास सुंदर हिंदू
प्रभाव परिणाम हिंदू
प्रभू परमेश्वर हिंदू
प्रबीर राजा हिंदू
प्रबोध चांगला सल्ला हिंदू
प्रबोधन ज्ञान हिंदू
प्रचेत श्रीविष्णू हिंदू
प्रचुर भरपूर प्रमाणात हिंदू
प्राधि हुशार हिंदू
प्रदिश गोड हिंदू
प्रज्ञेश बुद्धीची देवता हिंदू
प्रद्योत प्रकाशाचा किरण हिंदू
प्रद्युन चकाकणारा हिंदू
प्रद्युत प्रकाश हिंदू
प्रग्न्य प्रसिद्ध, हुशार हिंदू
प्रग्नेंश हुशार हिंदू
प्रगुन प्रामाणिक हिंदू
प्रल्हाद आशीर्वाद हिंदू
प्रहर्ष प्रसिद्ध ऋषींचे नाव हिंदू
प्रहसीत हसणारा, उत्साही हिंदू
प्रजीत विजेता हिंदू
प्रजेस श्रीब्रह्म हिंदू
प्रजीन दयाळू हिंदू
प्रज्ज्वल प्रकाश हिंदू
प्रजनय समुद्राचा स्वामी हिंदू
प्रज्वत पहिला किरण हिंदू
प्रज्वत पहिला किरण हिंदू
प्रकित निसर्ग हिंदू
प्राकृत पुरातन हिंदू
प्रकुल सुंदर शरीर असलेला, राजबिंडा हिंदू
प्रलय हिमालय हिंदू
प्रलेश वाईट गोष्टींचा अंत हिंदू
प्रमा सर्वोत्तम हिंदू
प्रमात घोडा, हुशार हिंदू
प्रमथ हुशार हिंदू
परमेश ज्ञानी हिंदू
प्रमीत तर्कशुद्ध हिंदू
प्रमसु हुशार हिंदू
प्रमोदन श्रीविष्णू हिंदू
प्रमुख मुख्य हिंदू
प्राण ऊर्जा हिंदू
प्रणाम नमस्कार हिंदू
प्रणब श्रीविष्णू हिंदू
प्रनाद श्रीविष्णू हिंदू
प्राणिल श्रीशंकर हिंदू
प्रणित शांत, विनम्र हिंदू
प्राणेश प्राणाचा ईश्वर हिंदू
प्रनेय आज्ञाधारक हिंदू
प्रांजल प्रामाणिक हिंदू
प्रांजुल प्रामाणिक हिंदू
प्रांशू उंच, श्रीविष्णू हिंदू
प्रांशूल श्रीशंकर हिंदू
प्रांतिक शेवट हिंदू
प्रारंभ सुरुवात हिंदू
प्रार्थन प्रार्थना हिंदू
प्रशम शांतता हिंदू
प्राश्रय प्रेम, आदर हिंदू
प्रयंक पर्वत हिंदू
प्रयास प्रयत्न हिंदू
पारस दगडाचे सोने करणारी गोष्ट हिंदू
पुलक उत्साह हिंदू
पल्लव पालवी हिंदू
प्रजीत विजयी हिंदू

अक्षराने सुरु होणारी सर्व नावे एकदम ट्रेंडी आणि क्युट आहेत आणि तुमच्या छोट्या राजकुमारासाठी परफेक्ट आहेत. म्हणून उशीर न करता पटकन ह्यातील एखादे नाव निवडून तुमच्या बाळाचे नामकरण करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article