Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य ४-६ महिन्यांच्या बाळाची झोप

४-६ महिन्यांच्या बाळाची झोप

४-६ महिन्यांच्या बाळाची झोप

बाळाला पुरेशी झोप मिळणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यांच्या महत्वाच्या अवयवांना पुरेशी विश्रांती आवश्यक असते तसेच शरीराची कार्ये सुरळीत चालवीत म्हणून आराम मिळणे खूप महत्वाचे आहे. पालक म्हणून तुम्ही बाळाला चांगली झोप मिळत आहे ना ह्याची खात्री केली पाहिजे. त्यांच्या झोपेच्या वेळांवर लक्ष ठेऊन त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये तर काही अडथळा येत नाही ना हे पहिले पाहिजे.

बाळाला झोपण्याच्या चांगल्या सवयी लागण्यासाठी काही मार्ग आहेत आणि त्यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून तुमच्या बाळाला सुद्धा ह्या झोपेच्या चांगल्या सवयी लागतील.

माझ्या बाळाचा झोपेचा नमुना काय आहे?

प्रत्येक बाळ वेगळे आहे आणि तुम्ही बाळाच्या गरजा आणि सवयी हयाबाबत संवेदनशील असले पाहिजे. बाळ झोपल्यावर तुम्हाला सुद्धा हवा असलेला आराम मिळेल. ह्यातील चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या बाळाला झोपेच्या चांगल्या सवयी लावू शकता, ज्यामुळे बाळाच्या दिवसभरच्या झोपेच्या सगळ्या गरजा भागतील आणि तुम्हाला सुद्धा हवा असलेला आराम मिळेल.

४ महिन्याच्या बाळाच्या झोपेचा नमुना हा त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या म्हणजेच १० ११ महिन्यांच्या बाळापेक्षा थोडा वेगळा असतो.

माझ्या बाळाचा झोपेचा नमुना काय आहे?

वयाच्या ४६ महिन्यांच्या आसपास बाळाला ठराविक वेळेला झोपण्याची सवय लागेल. काही वेळेला काही बाळांना रात्री झोपताना स्तनपान लागेल, पण त्याची वारंवारिता कमी होईल.

माझ्या बाळाला किती झोप लागेल? (६ महिने)

वयाच्या ह्या टप्प्यावर, बाळे सामान्यपणे दिवसाला १२ ते १६ तास झोपतात. ह्यामध्ये रात्रीची दीर्घ झोप आणि दिवसातून दोनदा छोटी झोप ह्यांचा समावेश होतो.

दिवसा

सरासरी, दिवसाची झोप ही ३४ तास इतकी असते. बाळ जसजसे मोठे होऊ लागते तसे बाळाची दिवसाची झोप कमी होते आणि झोप नियमित होत जाते.

रात्री

रात्री, बाळ साधारणपणे १० तास झोपते. बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर, बरीचशी बाळे रात्री ९ तास झोपतात किंवा कधी कधी त्यापेक्षा सुद्धा जास्त झोपतात.

बाळाला झोपेच्या चांगल्या सवयी कशा लावाल?

तुम्ही झोपेचे कुठलेही रुटीन ठरवा त्यामुळे बाळाला झोप लागेल. बाळाला गुंगी येईल असे काही खेळ किंवा क्रिया केल्यास त्याचाही फायदा होतो. तुम्ही बाळाला कोमट पाण्याने चांगली अंघोळ घालू शकता आणि त्यानंतर गाणी म्हटल्यास किंवा गोष्ट सांगितल्यास तो दिवसाचा शेवट झाल्याचे बाळाला समजू शकेल. हे खेळ बाळाच्या झोपेच्या वेळेला खेळत रहा.

बाळाला झोपेच्या चांगल्या सवयी कशा लावाल?

बाळ स्वतःचे स्वतः झोपत असेल तर तुम्ही त्यास प्राधान्य द्याल. बाळ झोपेला आल्यावर बाळाला पाळण्यात ठेवण्याआधी तुमची रात्रीची सर्व कामे तुम्ही संपवली पाहिजेत. जर बाळ रडू लागले तर काही मिनिटांसाठी बाजूला होणे चांगले, बाळाला स्वतःचे स्वतः शांत होऊ द्या आणि स्वतःचे स्वतः झोपी जाऊद्या. बाळाला जवळ घेण्याचा मोह टाळा, विशेषकरून जर तुम्हाला बाळाला स्वतःचे स्वतः झोपण्यास शिकवायचे असेल तर तुम्ही हा मोह टाळला पाहिजे. जर बाळाचे रडणे सुरूच राहिले तर तुम्ही बाळाला थोडे जास्त वेळ जवळ घेऊ शकता.

ह्या वयात झोपेच्या काही समस्या असतात का?

६ महिन्यांच्या बाळांच्या झोपेच्या काही समस्या असतात आणि त्या पुन्हा पुन्हा उद्भवत राहिल्या तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते, परंतु सवयीने आणि काही वेळ गेल्यानंतर तुमचे बाळ स्वतःचे स्वतः झोपू लागेल. बाळांना दूर ठेवल्यावर त्यांना चिंता वाटू शकेल, त्यामुळे तुम्ही बाळाकडे लक्ष ठेवा.

बाळाची झोप आणि विकास

बाळाची चिडचिड होऊ नये म्हणून तसेच बाळाला निरोगी आणि आजारपणांपासून दूर ठेवण्यासाठी बाळाला पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. बाळाचे शरीर अजूनही विकसित होत असल्याने बाळाला पुरेशी झोप आणि आराम मिळाल्यास बाळाच्या शरीराचे कार्य उत्तमरीत्या सुरु राहते. प्रतिकार प्रणालीच्या आणि मेंदूच्या विकासासाठी बाळाला पोटभर अन्न आणि चांगली झोप मिळणे आवश्यक असते.

६ महिन्यांच्या बाळाच्या झोपेसाठी काही टिप्स

बाळाच्या विकासामध्ये झोप हा महत्वाचा घटक आहे. बाळाचा आहार, आजारपण ह्यांच्या तुलनेत बाळाची झोप हा घटक तुम्ही सहज व्यवस्थापित करू शकता.

खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे बाळाला चांगली झोप लागेल ह्याची खात्री तुम्ही करू शकता:

  • जर बाळाला पाठीवर झोपण्याची सवय असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न करा. बाळ कुशीवर किंवा पोटावर झोपत आहे ना ह्याची खात्री करा.
  • त्यांना घट्ट पृष्ठभागावर ठेवा आणि गादीवर नीटनेटके बेडशीट घाला
  • इतर गोष्टी जसे की उश्या, मऊ खेळणी इत्यादी गोष्टी पाळण्यात ठेवू नका. जर गरज वाटली तर बेबी मॉनिटर ठेवा. तुम्ही बाळाच्या खोलीत नसताना तुम्ही बाळाचे विविध आवाज ऐकू शकता त्यामुळे हा परिणामकारक उपाय आहे.
  • खोली खूप जास्त गरम होणार नाही ह्याकडे लक्ष द्या. बाळाला सुद्धा थंड ठेवा. (पण खूप जास्तही नको) आणि बाळ मोकळ्या वातावरणात झोपत आहे ना ह्याची खात्री करा. बाळाला खूप गुंडाळून ठेवण्याचे टाळा.
  • बाळ झोपत असताना त्याला चोखणी द्या. बाळ चोखणी घेण्यास तयार नसेल तर जबरदस्तीने देऊ नका.

बाळ झोपते ती जागा सुरक्षित आहे ना ते पहा. दोर, तार किंवा बाळाला धोकादायक ठरतील अशा कुठल्याच गोष्टी आजूबाजूला नाहीत ना ह्याची खात्री करा.

बाळ रात्रीचे मध्येच उठले तर? काळजी करू नका. ह्याचे कारण म्हणजे त्यांचे लक्ष विचलित झालेले असू शकेल किंवा त्यांना झोपेच्या आधी थोडी शांतता हवी आहे. तुम्ही बाळाला क्रिबमध्ये ठेवण्याआधी बाळाला छान झोप लागली आहे ना ते पहा.

बाळाला झोप लागली असल्याची लक्षणे

बाळाला झोप लागली असल्याची लक्षणे

बाळाचा जन्म झाल्यानंतर, तुम्हाला बाळाच्या झोपेचा नमुना लक्षात येईल. ५ महिन्यांचे बाळ खूप जास्त झोपत असेल तर ते चांगले लक्षण आहे कारण त्यांना आरामाची जास्त गरज आहे. पालक म्हणून, तुम्ही फक्त बाळ नेहमीपेक्षा खूप जास्त झोपत नाही ना ह्याकडे लक्ष द्या.

बरेचदा आईला बाळाला झोप लागली आहे की नाही हे समजत नाही. इथे झोपलेल्या बाळाची काही लक्षणे दिली आहेत.

  • बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव शांत ते गंभीर असे बदलत राहतात
  • बाळ तुमच्याकडे बघायचे थांबते आणि शून्यात बघत राहते
  • बाळ कान आणि डोळे खाजवू लागते
  • खूप जांभया देते
  • मुठी घट्ट आवळते

झोप आली आहे हे बाळाला समजते, म्हणून आपण बाळाला जितक्या लवकर ओळखू शकतो तितके चांगले.

नेहमीच आपल्या मुलांना चांगली झोप मिळते आहे ना ते पहा आणि त्यांचे बालपण शांततेत आणि आरामात जाईल ह्याची खात्री करा. याचे कारण असे आहे की बाळांना पहिल्या काही वर्षांमध्ये मिळणारे पोषण आणि विश्रांती नंतरच्या काळात त्यांच्या विकासात मोठी भूमिका निभावते

आणखी वाचा:

बाळाला रात्री कसे झोपवावे?
एसआयडीएस (SIDS) आणि बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article